लाल बहादूर शास्त्री जयंती भाषण मराठी [03] BEST Lal Bahadur Shastri Bhashan Marathi 2023


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

लाल बहादूर शास्त्री जयंती भाषण मराठी | Lal Bahadur Shastri Bhashan Marathi 2023 – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त भाषण मराठी मध्ये बघणार आहोत. दरवर्षी 02 ऑक्टोबर रोजी आपण महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो. या शुभ दिनी भारत मातेचे ही दोन सुपुत्रे जन्माला आली. या दिवशी शाळेत तसेच शासकीय कार्यालयात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

या दिवशी शाळेत भाषण स्पर्धा आयोजित केल्या जातात. या भाषण स्पर्धेत भाग घेण्याची तुमची इच्छा असेल तर या लेखातील भाषणे तुमच्यासाठीच आहे. आज आपण या लेखात 03+ अतिशय सुंदर आणि धडाकेबाज भाषणे बघणार आहोत. ही भाषणे इयत्ता 01 ली ते 10वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील याची आम्हाला खात्री आहे. चला तर मित्रांनो आपण भाषणाला सुरुवात करुया.

लाल बहादूर शास्त्री जयंती भाषण मराठी | Lal Bahadur Shastri Bhashan Marathi – भाषण क्र.01

लाल बहादूर शास्त्री जयंती भाषण मराठी 10 ओळी

 1. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो…
 2. सर्वांना लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती च्या हार्दिक शुभेच्छा!
 3. लालबहादूर शास्त्री हे स्वतंत्र चळवळीतील एक थोर सेनानी, कार्यकर्ते, राष्ट्रभक्त आणि भारताचे दुसरे पंतप्रधान होते.
 4. लालबहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी बनारस जवळील मोगल सराई या रेल्वे वसाहतीत झाला.
 5. शासनाच्या आईचे नाव रामदुलारी तर वडिलांचे नाव शारदा प्रसाद असे होते.
 6. महात्मा गांधी, लाला लजपतराय आणि पंडित जवाहरलाल नेहरू या महान व्यक्तींचा त्यांच्यावर प्रभाव होता.
 7. स्वातंत्र्य चळवळीत असताना त्यांना अनेकवेळा अटक झाली. त्यांनी यावेळी एकूण नऊ वर्षाचा कारावास भोगला.
 8. 1957 ते 1964 या कार्यकाळात केंद्रीय मंत्रिमंडळात संचार व परिवहन, उद्योग व व्यापार, गृह इत्यादी खाती व्यवस्थितरित्या सांभाळली.
 9. पंडित नेहरू यांच्या निधनानंतर काँग्रेस संसदीय सभेने 9 जून 1964 रोजी लालबहादूर शास्त्री यांचे पंतप्रधान पदावर एकमताने नियुक्ती केली.
 10. 11 जानेवारी 1966 रोजी या महान देशभक्ताचे हृदयविकाराने निधन झाले.

लाल बहादूर शास्त्री जयंती भाषण मराठी | Lal Bahadur Shastri Bhashan Marathi – भाषण क्र.02

सादगी और इमानदारी,
यही है शास्त्री जी की पहचान !
सत्ता पाकर भी नही था,
उन्हे तनिक भी अभिमान !!

‘जय जवान, जय किसान’ ही घोषणा देऊन सर्व देशवासीयांचे बळ सेनादला मागे उभे करणारे, युद्धात पाकिस्तानला खडे चारून भारताचा मान व शान जगात वाढविणारे असे स्वाभिमानी, विनयशील, कणखर परंतु उदार मनाचे थोर देशभक्त म्हणजे लालबहादूर शास्त्री होय.

उत्तर प्रदेश मधील ‘मोगलसराई’ या गावी एका गरीब कुटुंबात 02 ऑक्टोबर 1904 रोजी लालबहादूर शास्त्री यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शारदाप्रसाद श्रीवास्तव तर आईचे नाव रामदुलारी होते. शारदाप्रसाद प्राथमिक शाळेत शिक्षक होते. शास्त्रींच्या जन्माच्या 18 महिन्यानंतरच त्यांच्या वडिलांचे निधन झाले.

लालबहादूर शाळेत मन लावून अभ्यास करायचे. अभ्यासात हुशार असल्यामुळे लालबहादूर यांनी मॅट्रिक झाल्यानंतर बनारस विद्यापीठात प्रवेश घेऊन तत्त्वज्ञान या विषयात ‘शास्त्री’ ही पदवी मिळवली. पुढे तेच त्यांचे आडनाव बनवून लालबहादूर शास्त्री भारतभर विख्यात झाले.

राजकीय आणि व्यक्तिगत आयुष्यात गांधीजींच्या विचारांचा त्यांच्या मनावर फारच प्रभाव पडला. ऐन तारुण्यात त्यांनी खूप पैसे मिळवून ऐश आरामात राहण्यापेक्षा देशसेवेला वाहून घेण्याचे ठरविले. भारत सेवक समाज या सेवाभावी संस्थेचे ते सक्रिय सभासद झाले.

शास्त्रींनी महात्मा गांधीजींच्या सर्व आंदोलनात सक्रिय पद्धतीने पुढाकार घेतला. 1921 मधील असहकार आंदोलन, 1930 मधील दांडी यात्रा, 1942 मधील भारत छोडो आंदोलनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. साधेपणाचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे लालबहादूर शास्त्री होय.

‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ या उक्तीचा प्रत्यय घडवून देणारे लालबहादूर शास्त्री हे एक महान नेतृत्व होते. आपल्या देशाप्रती समर्पित सेवेमुळे लालबहादूर शास्त्री निष्ठा आणि समतेसाठी जनमानसात लोकप्रिय झाले. नम्र, दृढ आणि जबरदस्त आंतरिक शक्ती असलेले शास्त्रीजी सामान्य लोकांची भावना समजून घेऊन खऱ्या अर्थाने त्यांचे मित्रच बनले.

अनेक लहान मोठ्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. देश स्वतंत्र झाल्यावर ते दिल्लीत आले. देशाचे गृहमंत्री, वाणिज्य मंत्री, रेल्वेमंत्री म्हणून काम करताना त्यांच्या कसोटी पूर्ण आणि कार्यक्षम नेतृत्वाने ते लोकप्रिय झाले.

शास्त्रीजींनी आपल्या दूरदर्शी वृत्तीने देशाला विकासाच्या मार्गावर नेले. अशा विनयशील व्यक्तीच्या मागे त्यांचे गुरु महात्मा गांधीजींच्या राजकीय शिकवणीचा मोठा पगडा होता. शास्त्रीजी नेहमी म्हणत असत की, कठोर मेहनत ही प्रार्थना समान आहे. अशा उदार मनाच्या थोर देशभक्ताने भारतीय संस्कृतीचे खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व केले.

अशा या थोर विभुतीस माझे कोटी कोटी प्रणाम!!
जय हिंद! जय महाराष्ट्र! जय भारत!
धन्यवाद.!

लालबहादूर शास्त्री भाषण मराठी PDF DOWNLOAD

लाल बहादूर शास्त्री जयंती भाषण मराठी | Lal Bahadur Shastri Jayanti Speech in Marathi – भाषण क्र.03

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो, आज दोन ऑक्टोबर, भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त मी आपणास जी माहिती सांगणार आहे, ती आपण सर्वांनी शांतचित्ताने ऐकावी ही नम्र विनंती.

लालबहादूर शास्त्री हे थोर भारतीय स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान होते. उत्तर प्रदेश मधील मोगलसराई या गावी एका गरीब कुटुंबात 02 ऑक्टोबर 1904 रोजी लालबहादूर यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शारदाप्रसाद श्रीवास्तव तर आईचे नाव रामदुलारी होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण मिर्झापूर येथे तर माध्यमिक शिक्षण वाराणसीला झाले.

त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्या कारणामुळे शास्त्रीजी नदीच्या पाण्यात पोहून शाळेत जात असत. लालबहादूर शाळेत मन लावून अभ्यास करायचे. अभ्यासात हुशार असल्यामुळे लालबहादूर यांनी मॅट्रिक झाल्यानंतर बनारस विद्यापीठात प्रवेश घेऊन तत्त्वज्ञान या विषयात शास्त्री ही पदवी मिळवली. पुढे तेच त्यांचे आडनाव म्हणून लालबहादूर शास्त्री हे भारतभर विकत झाले.

वयाच्या अकराव्या वर्षी गांधीजींच्या भाषणाने ते भारावून गेले. मग चंपारण्य सत्याग्रह, रोलेट अॅक्ट, जालियनवाला हत्याकांड इ. घटनांचे प्रतिसाद त्यांच्या मनात घर करून बसले. तेव्हाच त्यांनी देशसेवेला वाहून घ्यायचा निश्चय केला. भारतीय स्वातंत्र्य युद्धात शास्त्रींनी ‘मरो नाही मारो’ ची घोषणा दिली. ज्याने संपूर्ण देशात स्वातंत्र्याची ज्वाला अधिक तीव्र केली.

शास्त्री महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित एक गांधीवादी नेते होते. त्यांनी सर्व आंदोलनात सक्रिय पद्धतीने पुढाकार घेतला. त्यांनी 1921 मधील असहकार आंदोलन, 1930 मध्ये दांडी यात्रा व 1942 साली महात्मा गांधी यांनी इंग्रज सरकार विरुद्ध सुरू केलेल्या “भारत छोडो आंदोलनात” सहभागी होऊन महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडली.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या लढाईत त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकुन दिले होते. यासाठी अनेक वेळा त्यांनी तुरुंगवास देखील भोगला. भारत देश स्वतंत्र झाल्यावर ते दिल्लीत आले. देशाचे वाहतूक आणि दळणवळण मंत्री, वाणिज्य आणि उद्योग मंत्री, रेल्वेमंत्री, गृहमंत्री आणि नेहरूंच्या आजारपणात दिवाण खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले.

यावेळी सचोटीपूर्ण आणि कार्यक्षम नेतृत्वाने ते लोकप्रिय झाले. अनेक लहान मोठ्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत त्यांनी आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविला. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यूनंतर ते स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान झाले. त्यावेळी देशात खूप बिकट परिस्थिती पसरली होती. भारत-पाक युद्धाच्या वेळी देशात सर्वत्र कोरडा दुष्काळ पडला होता.

लोक अन्न – पाण्यासाठी त्रासून गेले होते. देशातील लोकांची परिस्थिती पाहता शास्त्री यांनी देशातील लोकांना एका दिवसाचा उपवास पकडण्याची विनंती केली. तसेच लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी “जय जवान, जय किसान” हा बहुमूल्य नारा दिला. जो कालांतराने खूप प्रसिद्ध झाला. त्यावेळी भारत नुकताच चीन सोबतच्या युद्धात हरला होता. पाकिस्तानच्याही कुरापती वाढल्या होत्या.

1965 मध्ये जेव्हा पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. तेव्हा शास्त्रीजींच्या कुशल नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. त्यानंतर त्यांनी 10 जानेवारी 1966 रोजी तात्कालीन सोवियत युनियन मध्ये पाकिस्तानचे तात्कालीन राष्ट्राध्यक्ष आयुब खान यांच्यासोबत शांतता करारावर सह्या केल्या.

आंतरराष्ट्रीय दबावाखाली शास्त्रीजी यांनी करारावर स्वाक्षरी केली. दुसऱ्या दिवशी 11 जानेवारीला त्यांचा रहस्यमयी मृत्यू झाला. अशा साध्या आणि शांत, परंतु उच्च विचारसरणी असलेल्या शास्त्रीजीना मृत्यूनंतर देशाचा सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ देण्यात आला.

लालबहादूर शास्त्री यांच्यासारख्या महान स्वातंत्र्य सेनानी व कुशल राजनेत्यांनी आपल्या देशात जन्म घेतला हे आपलं भाग्य समजावा लागेल. त्यांनी आपल्या देशाकरिता दिलेले योगदान आपण भारतीय नागरिक कधीच विसरू शकणार नाही. अशा या थोर नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम.!

जय हिंद! जय महाराष्ट्र! जय भारत!
धन्यवाद..!

लालबहादूर शास्त्री भाषण मराठी PDF DOWNLOAD

FAQs

 1. लालबहादूर शास्त्री यांचा जन्म कधी झाला?

  02 ऑक्टोबर 1904 रोजी

 2. लालबहादूर शास्त्री यांनी कोणती घोषणा दिली?

  जय जवान जय किसान

सारांश | लाल बहादूर शास्त्री जयंती भाषण मराठी | Lal Bahadur Shastri Bhashan Marathi

मित्रहो, वरील लेखात आपण लालबहादुर शास्त्री जयंती निमित्त भाषण मराठी मध्ये बघितले. वरील लेखात आपण एकूण 03+ अतिशय सुंदर, सोपे आणि धडाकेबाज भाषणे बघितली. ही भाषणे स्पर्धेत दिल्यास प्रथम क्रमांक तुमचाच समजावा. लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त च्या भाषण स्पर्धेत भाग घेतला असेल तर एकदा ही भाषणे नक्की अभ्यासावी.

आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही मत किंवा मार्गदर्शन असतील तर ते ही कळवा. आपल्या गरजू विद्यार्थ्यांना, मित्रांना ही भाषणे नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला जगभरातून भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

या लेखाचे शीर्षक असेही असू शकते –

 • लालबहादुर शास्त्री भाषण मराठी
 • लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त भाषण मराठी
 • Lal Bahadur Shastri Speech in Marathi
 • लालबहादूर शास्त्री जयंती भाषण मराठी
 • Lal Bahadur Shastri Bhashan in Marathi
 • Lal Bahadur Shastri Jayanti Bhashan Marathi
 • Lal Bahadur Shastri Jayanti Bhashan
 • Lal Bahadur Shastri Bhashan Marathi

Leave a Comment