संत ज्ञानेश्वर निबंध मराठी (04+ सर्वोत्तम निबंध) | Sant Dnyaneshwar Nibandh in Marathi 2023 | माझा आवडता संत ज्ञानेश्वर निबंध मराठी 2023


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

संत ज्ञानेश्वर निबंध मराठी 2023 | Sant Dnyaneshwar Nibandh in Marathi 2023 – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात संत ज्ञानेश्वर यांच्याविषयी निबंध मराठी मध्ये बघणार आहोत. सर्व संतांमध्ये संत ज्ञानेश्वर माउलींचे स्थान सर्वात वर आहे. शाळेत गुरुजी आपल्याला माझा आवडता संत ज्ञानेश्वर निबंध किंवा संत ज्ञानेश्वर निबंध मराठी मध्ये लिहिण्यासाठी सांगतात.

आज आपण या लेखात 04+ अतिशय सुंदर आणि धडाकेबाज निबंध बघणार आहोत. शाळेत, परीक्षेत माझा आवडता संत या विषयी निबंध लिहिण्यासाठी 05 ते 10 मार्क साठी एक प्रश्न नक्की विचारला जातो. या लेखातील निबंध इयत्ता 3री ते 10वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील याची आम्हाला खात्री आहे. चला तर मित्रांनो निबंधाला सुरुवात करुया.

संत ज्ञानेश्वर निबंध मराठी | Sant Dnyaneshwar Nibandh in Marathi – निबंध क्र.01

संत ज्ञानेश्वर यांना महाराष्ट्रात भक्ती भावाने ‘माऊली’ म्हटले जाते. ते एक थोर संत व प्रतिभा संपन्न कमी होते. त्यांचा जन्म आजच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आपेगाव येथे सन 1275 मध्ये झाला. संत ज्ञानेश्वर यांचे पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठल पंत कुलकर्णी असे होते. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते.

विठ्ठलपंतांनी लग्नानंतर काही दिवसातच संन्यास घेतला होता. मात्र गुरूंच्या आज्ञेनुसार ते संसारात परतले. त्यानंतर त्यांना निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई अशी चार आपत्ते झाली.

मात्र संन्याशाची मुले म्हणून या चारही भावंडांना आळंदीकरांनी वाळीत टाकले. मात्र पैठण येथील धर्म सभेसमोर ज्ञानेश्वरांनी रेड्या मुखी वेद वदविले आणि त्यानंतर लोकांना या भावंडांची दिव्यत्वाची त्याची प्रचिती झाली.

संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका, अमृतानुभव, चांगदेवपासष्टी, हरिपाठ इत्यादी काव्य स्वरूपात लिहिले. त्यांनी भागवत गीता प्राकृत मराठीत लिहून ज्ञानाचे दरवाजे सर्वांसाठी खुले केले. ज्ञानेश्वरीत त्यांनी नऊ हजार ओव्या लिहिल्या आहेत. त्यांनी वयाच्या 21 व्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदी काठावर संजीवन समाधी घेतली.

-: समाप्त :-

संत ज्ञानेश्वर निबंध मराठी | Sant Dnyaneshwar Nibandh in Marathi – निबंध क्र.02

“हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा,
पुण्याची गणना कोण करी !”

हरीचं नामस्मरण करण्यासाठी ‘राम कृष्ण हरी’ हा मंत्र देणारे संत ज्ञानेश्वर यांचा जन्म तेराव्या शतकात आताच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आपेगाव येथे श्रावण कृष्ण अष्टमी ला झाला.

ते भारतातील एक महान संत आणि एक प्रसिद्ध कवी होते. त्यांचे सुरुवातीची जीवन बऱ्याच संकटातून गेले. संन्याशाची पोर म्हणून त्यांना अपमानित केले गेले. यातच संत ज्ञानेश्वर अनाथ झाले. परंतु ते न घाबरता धैर्याने आयुष्य जगले.

वयाचे अवघे 15 वर्षाचे असताना ते देवाचे महान उपासक आणि योगी बनले. त्यांनी आपल्या थोरल्या भावाला गुरु मानले आणि त्यांच्याकडून दीक्षा घेतली.

लहान असताना त्यांनी रेड्याच्या तोंडून वेद वधविले. प्रत्यक्ष पितर मंत्राद्वारे उपस्थित केले. आपल्या पाठीवर अग्नी निर्माण करून त्यावर संत मुक्ताबाई यांना मांडे भाजण्यास सांगितले. मृत माणूस जिवंत केला. अर्धवट बांधलेली भिंत चालवली. अशा अनेक आख्यायिका सांगितल्या जातात.

‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथाच्या रूपाने संत ज्ञानेश्वर यांनी भागवत गीतेचे संस्कृत भाषेतील ज्ञान प्राकृत भाषेत आणले. भागवत गीतेतील ज्ञान सर्वांसाठी खुले केले. कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीत सुमारे 9000 ओव्या आहेत.

‘अमृतानुभव’ हा त्यांचा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा जीव – ब्रह्म ऐक्याचा दुसरा ग्रंथ आहे. ‘चांगदेवपासष्टी’ या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवाचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला आहे.

वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे कार्तिक वद्य त्रयोदशीला त्यांनी संजीवन समाधी घेतली. धन्यवाद!

-: समाप्त :-

माझा आवडता संत ज्ञानेश्वर निबंध मराठी | Maza avadta sant dnyaneshwar nibandh in marathi – निबंध क्र.03

आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हंटले जाते. आपल्या महाराष्ट्रात तसे पाहता अनेक थोर संत होऊन गेले. जसे की संत तुकाराम, संत रामदास, संत नामदेव, संत एकनाथ, संत मुक्ताबाई, संत जनाबाई इत्यादी. परंतु या सर्वात माझे आवडते संत हे संत ज्ञानेश्वर महाराज हे आहेत. त्यांना आपण प्रेमाने ‘माऊली’ देखील म्हणतो.

संत ज्ञानेश्वर हे तेराव्या शतकातील अलौकिक प्रतिभा व अद्वितीय व्यक्तिमत्त्व असणारे सर्वश्रेष्ठ संत आणि कवी होते. संत ज्ञानेश्वर यांचा जन्म इसवी सन 1275 मध्ये माता रुक्मिणी बाईंच्या पोटी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आपेगाव येथे झाला.

ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे संन्यास घेऊन पुन्हा गृहस्थाश्रमात परतले होते. गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर त्यांना निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई ही चार मुले जन्मली. त्यावेळेसच्या समाजाने विठ्ठलपंत तसेच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा अतोनात छळ केला. सन्याशाची मुले म्हणून त्यांना समाजाने वाळीत टाकले. संत ज्ञानेश्वरांनी लहान वयापासून लोकनिंधेकडे लक्ष न देता अध्यात्मिक प्रगती केली.

संत ज्ञानेश्वर हे ज्ञानाचे प्रतीक होते. संत ज्ञानेश्वर विठ्ठलाचे परमभक्त होते. ज्ञानेश्वरांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी मराठीतील सर्वश्रेष्ठ अद्वितीय ग्रंथ ज्ञानेश्वरीची रचना केली. ज्ञानेश्वरीला भावार्थदीपिका असेही म्हणतात. ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेतील ज्ञान ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून प्राकृत भाषेत आणले. ज्ञानेश्वरी सर्व स्तरातील लोकांना भुरळ घालते. ज्ञानेश्वरीतील सुमारे 9000 ओव्या मधील भक्तीचा ओलावा विचारांची संपन्नता अतुलनीय आहे.

ज्ञानसूर्य संत ज्ञानेश्वरांच्या तत्त्वज्ञानातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ ‘अमृतानुभव’ हा स्वरचित ग्रंथ आहे. त्यामध्ये 800 ओव्या त्यांच्या प्रतिभेची खोली व्यक्त करतात. संत ज्ञानेश्वरांनी असे संपन्न व प्रत्यक्ष अनुभूती संपन्न अभंग हरीपाठाची रचना करून मराठीचा अभिमान वाढवला. ज्ञानेश्वरांचा हरिपाठ हा उत्कृष्ट ईश्वरी नाम स्मरणाचा नाम पाठ आहे.

ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या अध्यायात ज्ञानदेवांनी विश्व कल्याणासाठी प्रार्थना अर्थात ‘पसायदान’ लिहिलेले आहेत. संत ज्ञानेश्वरांच्या कोणत्याही रचनेत त्यांच्या कुटुंबावर समाजाने केलेले अत्याचार जाणवत नाहीत. अशा या महान विभूतीनी वयाच्या सोळाव्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदीतीरी संजीवन समाधी घेतली. तेराव्या शतकातील ज्ञानेश्वरांचे कार्य पाहून आज प्रत्येकाचे मन अचंबित होते.

संत ज्ञानेश्वर यांच्या नावाने आजच्या काळात शिक्षण संस्था, शाळा, आश्रम शाळा काढल्या आहेत. संत ज्ञानेश्वर यांच्या जीवनावर प्रभात कंपनीने चित्रपट काढून ज्ञानेश्वरांचे कार्य जगभर पसरविले आहेत. संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील थोर संत आणि त्यांची महती वर्णन करण्यास शब्द भांडार अपुरे पडतील. आणि म्हणूनच संत ज्ञानेश्वर हे माझे आवडते संत आहे.

-: समाप्त :-

संत ज्ञानेश्वर महाराज निबंध मराठी | Sant Dnyaneshwar Maharaj Nibandh in Marathi – निबंध क्र.04

आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे!
तोशोनी मज द्यावे, पसायदान हे.!!

अखिल विश्वाच्या कल्याणासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करणारे महान संत म्हणजेच संत ज्ञानेश्वर हे होय. संत ज्ञानेश्वरांचा जन्म महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण येथे झाला.

त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी बाई तर वडिलांचे नाव विठ्ठलपंत असे होते. विठ्ठलपंत यांनी सन्यास घेतला होता. परंतु आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसार ते पुन्हा आपल्या सांसारिक जीवनात परतले. त्यांना चार आपत्ये झाली. ते म्हणजे संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव आणि संत मुक्ताबाई हे होय.

एकदा सन्यास घेतलेल्या व्यक्तीला पुन्हा सांसारिक जीवनात येणे म्हणजे पाप समजले जाई. त्यामुळे समाजाने विठ्ठलपंत आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकले. समाजकंटकांनी त्यांना अतोनात छळले. या जाचाला कंटाळून विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी आपली जीवयात्रा संपवली.

आई-वडिलांच्या मृत्यूनंतर समाजाने या मुलांना वाळीत टाकले. अमानुष अत्याचार केले. हे सर्व सहन करतच मुले मोठी झाली. सर्वांमध्ये सहनशीलता, सत्यवचनीपणा आणि सदाचारी वृत्ती अतिशय खचून भरली होती.

आपले वडील बंधू संत निवृत्तीनाथ यांना संत ज्ञानेश्वर यांनी आपली गुरू मानले होते. त्यांच्या आज्ञप्रमाणे जनसामान्यांना संस्कृत मध्ये लिहिलेली भागवत गीतेचा बोध व्हावा म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वरीत एकूण 9000 श्लोक आहेत.

ज्ञानेश्वरीचा अध्ययन आजही संपूर्ण जगात सुरू आहे. इतक्या लहान वयात इतकी मोठी काव्यरचना करणे ही आजही अचंबित करणारी गोष्ट आहे. यानंतर ज्ञानदेवांनी अमृतानुभव लिहिण्यास घेतला. अमृतानुभव लिहिल्यानंतर इंद्रायणी नदीच्या काठी आळंदी येथे वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली.

-: समाप्त :-

 1. संत ज्ञानेश्वर यांचे गुरु कोण होते?

  संत निवृत्तीनाथ

 2. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोठे लिहिली?

  अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे गावात ज्ञानेश्वरी हा मूळ मराठी ग्रंथ लिहिला.

सारांश | Sant Dnyaneshwar Essay in Marathi | संत ज्ञानेश्वर निबंध मराठी

मित्रहो, वरील लेखात आपण संत ज्ञानेश्वर निबंध मराठी मध्ये बघितले आहे. वरील लेखात आपण संत ज्ञानेश्वर माऊली बद्दल इतर माहितीही जाणून घेतली. माझा आवडता संत ज्ञानेश्वर हे आहेत. वरील लेखात आपण एकूण 04+ अतिशय सुंदर आणि धडाकेबाज निबंध बघितले. वरील निबंध आपल्याला नक्कीच खूप उपयोगी पडतील अशी अपेक्षा करतो.

आपल्याला आमचा हा छोटासा प्रपंच कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही मत किंवा विचार असतील तर ते ही कळवा. आपल्या गरजू मित्रांना हा लेख नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला जगभरातून भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

या लेखाचे शीर्षक असेही असू शकते –

 • sant dnyaneshwar nibandh in marathi
 • sant dnyaneshwar essay in marathi
 • sant dnyaneshwar maharaj nibandh marathi
 • Maza avadta sant dnyaneshwar nibandh in marathi
 • Maza avadta sant dnyaneshwar essay in marathi
 • माझा आवडता संत ज्ञानेश्वर महाराज निबंध मराठी
 • माझा आवडता संत ज्ञानेश्वर निबंध मराठी
 • संत ज्ञानेश्वर महाराज निबंध मराठी
 • Majha Avadta Sant Dnyaneshwar Nibandh Marathi

Leave a Comment