महात्मा गांधी जयंती भाषण मराठी (05+ सर्वोत्तम भाषणे) | Mahatma Gandhi Jayanti Speech in Marathi 2023 | महात्मा गांधी जयंती निमित्त भाषण मराठी 2023


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

महात्मा गांधी जयंती भाषण मराठी | Mahatma Gandhi Jayanti Speech in Marathi 2023 – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात महात्मा गांधी जयंती निमित्त भाषण मराठी मध्ये बघणार आहोत. दरवर्षी आपण 02 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधीजींची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करतो. या दिवशी आपल्या शाळेत, कार्यालयात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. अशावेळी भाषण स्पर्धा आयोजित केली जाते. किंवा आपल्याला कर्याक्रमात भाषण सूत्रसंचालन करावे लागते.

या लेखात आम्ही आपल्या मदतीसाठी महात्मा गांधी यांच्यावर भाषणे घेऊन आलो आहोत. या लेखात आपण एकूण 05+ अतिशय सुंदर आणि धडाकेबाज भाषणे बघणार आहोत. ही भाषणे इयत्ता 01 ली ते 12 पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील याची आम्हाला खात्री आहे. परमपूज्य, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा देतो आणि आपल्याला भाषणाला सुरुवात करतो.

महात्मा गांधी जयंती भाषण मराठी | Mahatma Gandhi Jayanti Speech in Marathi – भाषण क्र.01

महात्मा गांधी भाषण मराठी 10 ओळी

  1. सर्वांना माझा नमस्कार.
  2. माझे नाव सुजाता आहे.
  3. आज 02 ऑक्टोबर, आपण महात्मा गांधी जयंती साजरी करीत आहोत.
  4. प्रथम सर्वांना गांधी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!
  5. महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर या गावी झाला.
  6. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे होते.
  7. आपण त्यांना प्रेमाने बापू आणि राष्ट्रपिता असेही म्हणतो.
  8. त्यांची राहणी साधी आणि विचार उच्च होते.
  9. गांधीजींनी सत्य आणि अहिंसा मार्ग स्वीकारून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.
  10. या महान नेत्याने 30 जानेवारी 1948 रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम.!

महात्मा गांधी जयंती भाषण मराठी | Mahatma Gandhi Jayanti Speech in Marathi – भाषण क्र.02

सत्य, अहिंसेचे धडे दिले जगतास !
कोटी कोटी वंदन करतो मी बापू तुम्हास !!

सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या मित्र-मैत्रिणींनो.! आपण दरवर्षी 02 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती मोठ्या उत्साहात, आनंदात साजरी करतो. या दिवशी आपले थोर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिवस असतो. त्यांचा जन्म 02 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला. लोक त्यांना प्रेमाने बापूजी म्हणत.

महात्मा गांधीजींनी सत्य अहिंसेचा मार्ग अवलंबून भारतीय स्वातंत्र्य चळवळीत खूप मोलाचे योगदान दिले. त्यांनी जातीभेद, अस्पृश्यता न मानता सामाजिक समानतेला जास्त महत्त्व दिले. साधी राहणी व उच्च विचार यास प्राधान्य दिले.

जगाला अहिंसेची शिकवण गांधीजींनी दिल्याने जगभर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ म्हणून साजरा केला जातो. धन्यवाद!

जय हिंद! जय भारत!

महात्मा गांधी जयंती भाषण मराठी PDF DOWNLOAD

महात्मा गांधी जयंती भाषण मराठी | Mahatma Gandhi Jayanti Speech in Marathi – भाषण क्र.03

जीवन जगले देशासाठी…
देशच होता त्यांचा प्राण !
स्वतंत्र केली भारतमाता…
ते गांधीजी फार महान !!

सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्राचार्य साहेब, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींना.!
मी सावित्री…
सर्वांना माझा नमस्कार !

आज मी आपणांसमोर भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील प्रमुख नेते, सत्य व हिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या विषयी दोन शब्द सांगणार आहे, ते आपण शांतचित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती.

महात्मा गांधी हा शब्द कानावर पडताच आपल्याला आठवते ते म्हणजे डोळ्यावर चष्मा, हातात काठी आणि अंगावर पांढरे शुभ्र वस्त्र.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद तर आईचे नाव पुतळाबाई असे होते.

महात्मा गांधी हे वकील होते. महात्मा गांधीजींचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर, माध्यमिक शिक्षण राजकोट, वकिलीचे शिक्षण इंग्लंडला झाले.

त्यावेळी भारतावर इंग्रजांचे राज्य होते. ते भारतीयांना अपमानास्पद वागणूक देत होते. गरीब जनतेवर अनन्य असे अत्याचार करीत होते. म्हणून गांधीजींनी अन्यायविरुद्ध लढण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी सत्य, अहिंसा या तंत्राचा वापर केला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले.

त्यांनी इंग्रजांविरुद्ध असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, दांडी येथील मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन इत्यादी आंदोलने केली. चले जाओ, भारत छोडो अशा घोषणा देत इंग्रजांना पळवून लावले. अखेर अनेक प्रयत्नांमुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला.

महात्मा गांधीजींची साधी राहणी व उच्च विचारसरणी होती. त्यांनी देशवासीयांना सत्य, अहिंसा व मानवतेची शिकवण दिली. त्यांनी महात्मा व राष्ट्रपिता अशा पदव्या प्राप्त केल्या. लोक प्रेमाने त्यांना बापू म्हणत.

दुर्दैवाने 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधीजींची प्राणज्योत मालवली. परंतु आजही त्यांचे कार्य व विचार आपणास प्रेरणा देतात.

शांततेच्या मार्गाने लढा देणाऱ्या अशा या थोर देशभक्तास माझे कोटी कोटी प्रणाम!
जय हिंद! जय भारत!

महात्मा गांधी जयंती भाषण मराठी PDF DOWNLOAD

महात्मा गांधी जयंती निमित्त भाषण मराठी | Mahatma Gandhi Jayanti Bhashan Marathi – भाषण क्र.04

सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपस्थित गुरुजन वर्ग तसेच माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींना माझा सप्रेम नमस्कार.! आजच्या दिवशी मी तुम्हाला आपले सर्वांचे लाडके असे ज्यांना आपण बापू म्हणून ओळखतो, यांच्या विषयी माझे विचार व्यक्त करणार आहे. तरी ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी अपेक्षा…!

अहिंसा आणि सत्याच्या मार्गाने बलाढ्य शत्रूला आणि कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन त्यावर विजय मिळवणाऱ्या महात्मा गांधीजींना माझा शतशत प्रणाम.!

आधुनिक काळातील युगप्रवर्तक नेते म्हणून महात्मा गांधीजी यांचे नाव घेतले जाते. भारतीय जनमानसात त्यांचा खूप मोठा प्रभाव होता. हे आपल्याला गांधीयुगावरून दिसून येते.

महात्मा गांधीजी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात राज्यातील पोरबंदर या गावी झाला. महात्मा गांधी यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी तर आईचे नाव पुतळाबाई असे होते.

त्यांची आई ही धार्मिक प्रवृत्तीची होती. त्यांचे बालपण हे धार्मिक वातावरणात गेले. म्हणूनच गांधीजी लहानपणापासूनच धार्मिक विचाराचे होते. हे आपल्याला दिसून येते. त्यांचे वडील पोरबंदर येथे दिवाण म्हणून कार्यरत होते. त्या काळात बालवयातच लग्न करण्याच्या प्रथेमुळे महात्मा गांधी यांचे लग्न वयाच्या तेराव्या वर्षी झाले.

गांधीजींचा कस्तुरबा कपाळ यांच्याशी बालविवाह झाला. महात्मा गांधीजी हे लहानपणापासूनच लाजाळू स्वभावाचे व हुशार होते महात्मा गांधी 1887 मध्ये मॅट्रिक ची परीक्षा उत्तीर्ण झाले व शालेय शिक्षण संपवून वयाचे एकोणिसाव्या वर्षी 1888 मध्ये उच्च शिक्षणासाठी इंग्लंड येथे गेले व तिथे त्यांनी बॅरिस्टर पदवी संपादन केली.

उच्च शिक्षण संपादन करून 1891 मध्ये ते भारतात परतले. त्यांनी प्रथमच भारतामधील राजकोट येथे वकिली सुरू केली. पुढे लवकरच ते एका हिंदी कंपनीचे वकील म्हणून 1893 मध्ये दक्षिण आफ्रिका येथे गेले.

व्यापार व कामधंदा निमित्त अनेक भारतीय लोक दक्षिण आफ्रिकेमध्ये स्थायिक झालेले होते. परंतु तेथील गोऱ्या लोकांनी भारतीय लोकांवर वर्णभेदाच्या आधारे अत्यंत अन्याय, जुलूम चालवला होता. ते सर्व लोक अतिशय कठीण अवस्थेत हालाखीचे जीवन जगत होते. याच प्रकारची वागणूक गांधीजी यांच्यासोबत सुद्धा घडली होती.

त्यांच्यावर होत असलेला हा अन्याय महात्मा गांधींना कळताच त्यांनी त्याच्याविरुद्ध आवाज उठवण्याचे ठरवले. या सरकारी अन्यायाविरुद्ध व जुलामशाही विरुद्ध त्यांनी अहिंसक मार्गांनी लढत दिली. त्यांनी प्रथमच सत्याग्रहाचा प्रयोग करण्याचे ठरवले.

गांधीजींच्या सत्याग्रह आंदोलनात अनेक भारतीय सहभागी झाले. त्यांच्या आंदोलनामुळे दक्षिण आफ्रिकेचे सरकार सुद्धा झुकले होते. भारतीयांना मानवी हक्क देण्यात आले. अशा प्रकारे महात्मा गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये सत्याग्रहाचा प्रथम प्रयोग करून अहिंसक मार्गाने अत्याचारी व जुलमी सत्तेला नमवले.

01 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतील विजय संपादन करून भारतात परतले. यानंतर 1917 मध्ये त्यांनी बिहारमधील चंपारण्य येथील शेतकऱ्यांना त्यांचे हक्क व जुलमी कर यांच्याविरुद्ध तसेच मजुराची होणारी पिळवणूक याच्या विरुद्ध गांधीजींनी सत्याग्रहाचा मार्गाने लढा देऊन तो जिंकला.

गुजरात मधील खेडा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या समस्येवर त्यांनी सत्याग्रहाच्या मार्गाने लढा दिला. या दोन सत्याग्रहांमुळे त्यांना देशभर प्रसिद्धी मिळाली. याप्रमाणे त्यांनी ब्रिटिश सरकार विरुद्ध ‘भारत छोडो, सायमन गो बॅक’ असे अनेक सत्याग्रह केले. 1942 च्या ‘चले जाव’ या स्वातंत्र्य आंदोलन चळवळीचे नेतृत्व महात्मा गांधीजींनी केले होते.

महात्मा गांधीजी आणि भारतातील अनेक स्वातंत्र सैनिक यांच्या प्रयत्नांना अखेर यश येऊन 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले. अशा प्रकारे भारतीय स्वातंत्र्यामध्ये एक गांधीजींनी योगदान दिले.

नोबल पुरस्कार विजेते ‘रवींद्रनाथ टागोर‘ यांनी गांधीजी यांना ‘महात्मा’ ही उपाधी दिली. तसेच ‘सुभाषचंद्र बोस’ यांनी गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले. भारतातील जनता त्यांना प्रेमाने बापू असे म्हणत.

गांधीजी हे सत्य व अहिंसेचे पुजारी होते. आज परमेश्वर सत्य आहे, असे त्यांचे म्हणणे होते. सत्याचा शोध घेणे म्हणजेच परमेश्वराचा शोध घेणे होय, असे त्यांनी म्हटले होते. सत्याग्रह हे गांधीजींचे शस्त्र होते. सत्याग्रह ही गांधीजींनी संपूर्ण जगाला दिलेली महत्त्वाची देणगी आहे.

अन्याय, शोषणाविरुद्ध केलेल्या आत्मिक शक्तीचा वापर म्हणजे सत्याग्रह होय, असे त्यांनी म्हटले आहे. गांधीजी म्हणतात अहिंसेच्या आणि प्रेमाने शत्रूलाही जिंकता येते. अहिंसा हे अन्याय व असत्य याविरुद्ध लढण्याची सर्वात प्रभावी साधन आहे. सर्व जगाला गांधीजींनी अहिंसेचा मार्ग दाखवला. म्हणून 02 ऑक्टोबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

30 जानेवारी 1948 रोजी देशसेवा करीत असताना नथुराम गोडसे या माथेफिरूने महात्मा गांधी यांना गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली. यातच त्यांचा मृत्यु झाला. या थोर राष्ट्रीय युगप्रवर्तक नेत्याला आदरांजली देण्यासाठी दरवर्षी 30 जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून देशभर पाळला जातो.

शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की –

बापू सन्मान करतो आम्ही,
तुमच्या महान नेतृत्वाचा..!
भारत देश गुलामगिरीतून मुक्त झाला,
हा दाखला आहे तुमच्या कर्तुत्वाचा..!!

आजच्या या दिवशी गांधीजींच्या पावन प्रतिमेला व त्यांच्या कार्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो.

जय हिंद! जय महाराष्ट्र!

महात्मा गांधी भाषण मराठी PDF DOWNLOAD

महात्मा गांधी जयंती विषयी भाषण मराठी | Mahatma Gandhi Jayanti Bhashan Marathi – भाषण क्र.05

ज्यांनी लिहिली
पारतंत्र्य मुक्तीची गाथा !
त्या राष्ट्रपिताच्या चरणी
विनम्र माझा माथा !!

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सन्माननीय व्यासपीठ, परम पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो.! मी सूरज, सर्वांना माझा नमस्कार!

आज 02 ऑक्टोबर, आज मी आपणांसमोर भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील प्रमुख नेते सत्य व अहिंसेची पुजारी राष्ट्रपिता, महात्मा गांधी यांच्या विषयी आपणास समोर दोन शब्द बोलणार आहे, ते आपण शांतचित्ताने ऐकावे ही नम्र विनंती.

धोती वाले बापू की
ये ऐसी लढाई थी!
न गोले बरसाये उन्होंने
न बंदूक चलाई थी!!
सत्य अहिंसा के बल पर ही
दुश्मन को धुल चटाई थी !!!

महात्मा गांधी हा शब्द कानावर पडतात आपल्याला आठवते ते म्हणजे डोळ्यावर चष्मा, हातात काठी आणि अंगावर पांढरे शुभ्र वस्त्र.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद व आईचे नाव पुतळाबाई असे होते.

महात्मा गांधीजींचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर येथे झाले. तर त्यांचे माध्यमिक शिक्षण राजकोट येथे झाले. त्यांचे वकिलीचे शिक्षण इंग्लंडला झाले.

त्यावेळी भारतात इंग्रजांचे राज्य होते. ते भारतीयांना अपमानास्पद वागणूक देत होते. म्हणून गांधीजींनी अन्यायाविरुद्ध लढण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी सत्य व अहिंसा या तंत्राचा वापर केला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले.

त्यांनी इंग्रजांविरुद्ध असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, दांडी येथील मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन इत्यादी आंदोलने केली. चले जावो, भारत छोडो या घोषणा दिल्या. त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. अखेर अनेक प्रयत्नांमुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला.

महात्मा गांधीजींची साधी राहणी व उच्च विचारसरणी होती. त्यांनी देशवासीयांना सत्य, अहिंसा व मानवतेची शिकवण दिली. त्यांना जनतेने महात्मा व राष्ट्रपिता अशा पदव्या बहाल केल्या. लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत.

दुर्दैवाने 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधीजींची प्राणज्योत मालवली. परंतु आजही आपणास त्यांचे कार्य व विचार प्रेरणा देतात.

शांततेच्या मार्गाने लढा देणाऱ्या अशा या थोर देशभक्तास माझे कोटी कोटी प्रणाम.!!

जय हिंद! जय भारत! जय महाराष्ट्र!

महात्मा गांधी भाषण मराठी PDF DOWNLOAD

सारांश | Mahatma Gandhi Jayanti Speech in Marathi | महात्मा गांधी जयंती भाषण मराठी

मित्रहो, वरील लेखात आपण महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त भाषण मराठी मध्ये बघितले. वरील लेखात आपण एकूण 05+ अतिशय सुंदर आणि धडाकेबाज भाषणे बघितली. ही भाषणे आपल्याला महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त भाषण करण्यासाठी नक्कीच खूप उपयोगी पडतील याची आम्हाला खात्री आहे. या लेखात लहान भाषणे आहेत तशी मोठी भाषणे देखील आहे. म्हणून ही भाषणे सर्वांसाठी उपयुक्त आहेत.

मित्रांनो आपल्याला आमची वरील भाषणे कशी वाटली? यावर आपले काय विचार आहेत? ते आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले आमच्यासाठी काही मार्गदर्शन असतील तर ते ही कळवा. आपल्या गरजू मित्रांना, विद्यार्थ्यांना ही भाषणे नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला जगभरातून भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

Leave a Comment