महात्मा गांधी निबंध मराठी (05+ सर्वोत्तम निबंध) | Mahatma Gandhi Essay in Marathi 2023 | Mahatma Gandhi Nibandh Marathi 2023


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

महात्मा गांधी निबंध मराठी | Mahatma Gandhi Essay in Marathi 2023 – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात महात्मा गांधी यांच्यावर निबंध मराठी मध्ये बघणार आहोत. आपल्या भारत देशाचे राष्ट्रपिता म्हणून आपण महात्मा गांधीजींना ओळखतो. दरवर्षी 02 ऑक्टोबर रोजी आपण महात्मा गांधी जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करतो. यानिमित्ताने शाळेत महात्मा गांधी यांच्याविषयी निबंध स्पर्धा आयोजित केल्या जातात.

आपल्याला या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवायचा असेल तर या लेखात दिलेल्या निबंधाचा अभ्यास करा. या लेखात आपण एकूण 05+ अतिशय सुंदर आणि धडाकेबाज निबंध बघणार आहोत. ही निबंध इयत्ता 01ली ते 10वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील याची आम्हाला खात्री आहे. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालविता निबंधाला सुरुवात करुया.

महात्मा गांधी निबंध मराठी | Mahatma Gandhi Essay in Marathi – निबंध क्र.01

महात्मा गांधी निबंध मराठी 10 ओळी

  1. महात्मा गांधी हे एक महान स्वातंत्र्यसैनिक होते.
  2. महात्मा गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 869 रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला.
  3. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते.
  4. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद तर आईचे नाव पुतळाबाई व पत्नीचे नाव कस्तुरबा गांधी होते.
  5. आपण त्यांना प्रेमाने ‘बापू’ तसेच ‘राष्ट्रपिता’ असे म्हणतो.
  6. त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अतोनात कष्ट केले.
  7. महात्मा गांधीजींची साधी राहणी व उच्च विचारसरणी होती.
  8. त्यांनी जनतेला सत्य व अहिंसेचा महान संदेश दिला.
  9. चले जाओ, भारत छोडो अशा घोषणा देत त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले.
  10. या महान नेत्याने 30 जानेवारी 1948 रोजी अखेरचा श्वास घेतला.

महात्मा गांधी निबंध मराठी | Mahatma Gandhi Essay in Marathi – निबंध क्र.02

भारत मातेचे थोर सुपुत्र, भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार तसेच जगाला अहिंसेचा महान संदेश देणारे गांधीजी हे वंदनीय युगपुरुष होते. ते आपल्या कर्तृत्वामुळे महात्मा, राष्ट्रपिता अशा पदापर्यंत पोहोचले.

महात्मा गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे होते. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद तर आईचे नाव पुतळाबाई हे होते. गांधीजींनी मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर पुढील शिक्षण इंग्लंडमध्ये घेतले. तिथे ते खूप अभ्यास करून बॅरिस्टर बनले. पुढे ते भारत मातेची सेवा करण्यासाठी आपल्या मायदेशी परतले.

एकदा गांधीजी जेव्हा एका खटल्यासाठी दक्षिण आफ्रिकेत गेले, तेव्हा तिथे मोठ्या संख्येने भारतीय मजूर हजर होते. त्यांना इंग्रज लोक अपमानास्पद वागणूक देत होते. गांधीजींनाही अशीच वागणूक इंग्रजांनी दिली. त्यामुळे गांधीजींनी अन्यायाविरुद्ध लढण्याचे ठरविले. त्यासाठी सत्य व अहिंसेचा चातुर्याने त्यांनी वापर केला. साधी राहणी व उच्च विचार या तंत्राचा वापर करून गांधीजींनी गोरगरीब जनतेच्या मनात आदराचे स्थान मिळवले. खेड्याचा विकास, सुतकताई, स्वदेशी, दलितांचा उद्धार, स्वच्छता, स्वावलंबन याकडे त्यांनी अधिक लक्ष दिले.

सत्याग्रह, निशस्त्र प्रतिकार आणि असहकार आंदोलनाचा स्वीकार करून गांधीजींनी भारतीय जनतेचे ऐक्य बळ वाढवले. इंग्रजांसमोर आव्हान निर्माण केले. त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. पण गांधीजींनी हार मानली नाही. आपला लढा चालूच ठेवला. चले जाव, भारत छोडो अशा घोषणा देत इंग्रजांना त्यांनी सळो की पळो करून सोडले.

पुढे गांधीजींच्या सत्य व अहिंसेपुढे मान झुकवून इंग्रजांनी हार पत्करली. सत्य व अहिंसा हाच माझा धर्म मानणाऱ्या गांधीजींचा विजय झाला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. गांधीजींचे स्वतंत्र भारत देशाचे स्वप्न साकार झाले. पण दुर्दैवाने 30 जानेवारी 1948 रोजी एका असंतुष्टाने या थोर महात्म्याची गोळी घालून हत्या केली. गांधीजी जरी आज आपल्यात नसले तरी त्यांचे कार्य, विचार प्रत्येक भारतीयास सदैव प्रेरणा देत राहील, हे मात्र नक्की.!

महात्मा गांधी निबंध मराठी PDF Download

-: समाप्त :-

महात्मा गांधी निबंध मराठी | Mahatma Gandhi Essay in Marathi – निबंध क्र.03

महात्मा गांधी हे एक स्वतंत्र सैनिक होते. जगाला अहिंसेचा संदेश देणारे हे एक वंदनीय युगपुरुष होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वतंत्र चळवळीसाठी खर्च केले.

महात्मा गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला. त्यांच्या आईचे नाव पुतळाबाई असे होते तर, त्यांचे वडील करमचंद गांधी हे पोरबंदर मध्ये दिवाण म्हणून काम करत असत.

गांधीजी हे लहानपणी शांत आणि संयमी प्रवृत्तीचे होते. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण हे राजकोट मध्ये पूर्ण केले. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचे कस्तुरबा यांच्याशी लग्न झाले. गांधीजींनी मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर पुढील शिक्षण हे इंग्लंडमध्ये घेतले. तिथे ते भरपूर अभ्यास केल्यानंतर बॅरिस्टर बनले.

गांधीजींनी आपल्या आयुष्याची 21 वर्षे दक्षिण आफ्रिकेत घालवली. तिथे त्यांनी भारतीयांना मिळणारी असमान वागणूक अनुभवली. म्हणून गांधीजींनी असहकार व हिंसेच्या तत्त्वावर आधारलेल्या सत्याग्रहाचा उपयोग प्रथम दक्षिण आफ्रिकेत भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला.

गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर इंग्रज सरकार विरुद्ध आवाज उठविण्याचे ठरले. त्यासाठी त्यांनी समाजातील विविध वर्गातील लोकांना एकत्रित करण्याचे काम सुरू केले. महात्मा गांधींनी इंग्रज सरकार विरुद्ध अनेक आंदोलने केली. गांधीजींनी आपले संपूर्ण आयुष्य स्वातंत्र चळवळीसाठी खर्च केले. नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी गांधीजींना महात्मा ही उपाधी दिली. गांधीजींनी खेड्यांचा विकास, सुतकताई, स्वच्छता, स्वावलंबन, दलितांचा उद्धार या गोष्टींवर विशेष लक्ष दिले.

महात्मा गांधींनी सत्य व अहिंसा या दोन गोष्टींचा पुरस्कार केला. इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी सत्याग्रह व असहकार ही आंदोलने केली. 1920 मध्ये ‘सविनय कायदेभंग’ आंदोलन सुरू करून त्यांनी इंग्रजांविरुद्ध अहिंसक व कायदेशीर लढा सुरू केला. 1942 मध्ये त्यांनी भारत छोडो आंदोलन सुरू केले. त्यामुळे इंग्रजांना आपला देश सोडणे भाग पडले. अशाप्रकारे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. अशा प्रकारे गांधीजींनी स्वतंत्र्याच्या लढाईमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले.

-: समाप्त :-

महात्मा गांधी यांच्याविषयी निबंध मराठी | Mahatma Gandhi Nibandh Marathi – निबंध क्र.04

महात्मा गांधीजी हे भारताचे महान स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांना आपण ‘बापू’ तसेच ‘राष्ट्रपिता’ असेही म्हणतो. महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे होते. त्यांचा जन्म 02 ऑक्टोबर 1969 रोजी गुजरात मधील पोरबंदर या गावी झाला. त्याच्या वडिलांचे नाव कर्मचंद गांधी व आईचे नाव पुतळाबाई हे होते.

त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पोरबंदर येथे व माध्यमिक शिक्षण राजकोट येथे पूर्ण केले. वयाच्या तेराव्या वर्षी गांधीजींचा विवाह कस्तुरबा गांधी यांच्याशी झाला. ते इंग्लंडला जाऊन वकिलीची परीक्षा पास झाले.

पुढे ते भारतात परतले. त्यावेळी भारतात इंग्रजांची सत्ता होती. महात्मा गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम केले. त्यांनी इंग्रजांविरुद्ध असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, दांडी येथील मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन इत्यादी महत्त्वपूर्ण आंदोलने केली. चले जाव, भारत छोडो अशा घोषणा देत इंग्रजांना सळो की पळो करून सोडले.

अखेर अनेक प्रयत्नांमुळे महात्मा गांधीजींच्या नेतृत्वामुळे भारत देश स्वतंत्र झाला. महात्मा गांधीजींनी देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी सत्य व अहिंसेचा मार्ग निवडला. ते फक्त देश स्वतंत्र करण्यासाठीच झटले नाहीत तर देशाला स्वावलंबी बनवण्यावर त्यांनी भर दिला. त्यांचे राहनी साधी व विचार उच्च होते. त्यांनी परकीय वस्तूंवर बहिष्कार घातला. स्वदेशी वस्तूंच्या वापरावर भर दिला.

दुर्दैवाने 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधीजींनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. महात्मा गांधींचे संपूर्ण जीवन आदर्श होते. त्यांनी जगाला सत्य व अहिंसेची मोलाची शिकवण दिली. महात्मा गांधीजींचे कार्य आजही प्रत्येकाला प्रेरणादायी आहे.

महात्मा गांधी निबंध मराठी PDF Download

-: समाप्त :-

महात्मा गांधी यांच्यावर निबंध मराठी | Mahatma Gandhi Nibandh in Marathi- निबंध क्र.05

आपल्या देशाचे महान स्वतंत्र सेनानी ‘राष्ट्रपिता’ मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच महात्मा गांधी होय. गांधीजींचा जन्म 02 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात येथील पोरबंदर या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळाबाई होते.

इ.स. 1888 मध्ये मॅट्रीकची परीक्षा पास झाल्यावर ते इंग्लंडमध्ये वकिलीचे शिक्षण घेण्यास गेले. इंग्लंडमध्ये कायद्याचा अभ्यास करून ते बॅरिस्टर झाले. सन 1891 मध्ये भारतात परत येऊन वकिली करू लागले. दोन वर्षांनी इ.स. 1893 मध्ये पुढील व्यवसायासाठी दक्षिण आफ्रिकेला गेले. गांधीजींच्या आयुष्याची 21 वर्षे दक्षिण आफ्रिकेत गेली.

दक्षिण आफ्रिकेत भारतीयांना दिली जाणारी असमान वागणूक गांधीजींनी अनुभवली. पहिल्या वर्गाचे तिकीट असताना सुद्धा त्यांना रेल्वे अधिकाऱ्यांनी तिसऱ्या वर्गाच्या डब्यात बसण्यास सांगितले. गांधीजींनी नकार देताच त्यांचा अपमान करून त्यांना गाडीतून ढकलून देण्यात आले.

गांधीजींनी ठरवले असते तर त्या रेल्वे अधिकाऱ्यास अद्दल घडवू शकले असते. पण सूड भावनेने कुणाला शिक्षा करणे हा त्यांचा स्वभाव नव्हता. तर अहिंसेच्या मार्गाने अन्यायकार व्यवस्था बदलवणे हा त्यांचा हेतू होता.

इ.स. 1915 मध्ये भारतात परत आल्यावर गांधीजींनी स्वातंत्र्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यावेळी भारताचे राजकारण व समस्या यांचा परिचय त्यांना ‘गोपाळ कृष्ण गोखले’ यांनी करून दिला. गांधीजींनी असहकार, अहिंसा आणि शांततामय विरोध यांचा शस्त्र म्हणून इंग्रजांविरुद्ध वापर केला.

सत्याग्रह व असहकाराच्या चळवळीमुळे पूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा राहिला. 1917 मध्ये त्यांनी चंपारण्यातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन केले. 1930 मध्ये मिठावरील कराच्या विरोधात सत्याग्रह केला आणि त्याची परिणीती प्रसिद्ध दांडीयात्रेत झाली.

1942 मध्ये भारत छोडो आंदोलनात त्यांनी मुंबईत “करा किंवा मरा” असे आवाहन जनतेला केले. स्वातंत्र्याची लढाई लढताना महात्मा गांधींना अनेकदा तुरुंगात जावे लागले. त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला.

रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना “महात्मा” ही उपाधी दिली. लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत. सुभाष चंद्र बोस यांनी इ.स. 1944 मध्ये पहिल्यांदा त्यांना राष्ट्रपिता म्हणून संबोधले असे म्हणतात.

अहिंसात्मक मार्गांनी स्वतंत्र मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. म्हणून गांधीजींचा जन्मदिवस ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ म्हणून साजरा केला जातो.

जगाला अहिंसेचा संदेश देणाऱ्या या महात्म्याचे स्वातंत्र्यानंतर लगेचच एक वर्षांनी 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे यांनी हत्या केली. महात्मा गांधीजींचे संपूर्ण आयुष्य भारतातील प्रत्येक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

-: समाप्त :-

महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव काय?

महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे होते.

महात्मा गांधींचा जन्म दिवस कधी असतो?

दरवर्षी 02 ऑक्टोबर रोजी.

महात्मा गांधी कोणाला आपले गुरू मानत?

श्री. गोपाळ कृष्ण गोखले.

सारांश | Mahatma Gandhi Essay in Marathi | महात्मा गांधी निबंध मराठी

मित्रहो, वरील लेखात आपण महात्मा गांधी यांच्याविषयी निबंध मराठी मध्ये बघितले. वरील लेखात आपण एकूण 05+ अतिशय सुंदर आणि धडाकेबाज निबंध बघितले. ही निबंध आपल्याला नक्कीच खूप उपयोगी पडतील याची आम्हाला खात्री आहे. निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी या निबंधाचा अभ्यास करा.

आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही मत किंवा विचार असतील तर ते ही कळवा. आपल्या गरजू मित्रांना विद्यार्थ्यांना हा लेख नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला जगभरातून भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

या लेखाचे शीर्षक असेही असू शकते –

  • माझा आवडता नेता महात्मा गांधी निबंध मराठी
  • माझा आवडता नेता महात्मा गांधी निबंध
  • माझा आवडता नेता महात्मा गांधी
  • माझा आवडता नेता निबंध मराठी
  • महात्मा गांधी निबंध मराठी 1000 शब्द
  • महात्मा गांधी निबंध मराठी pdf
  • महात्मा गांधी निबंध marathi
  • महात्मा गांधी निबंध मराठी

Leave a Comment