माझा आवडता ऋतू हिवाळा निबंध मराठी (05+ सर्वोत्तम निबंध) | Majha Avadta Rutu Hivala Nibandh Marathi 2023 | हिवाळा ऋतू निबंध मराठी


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

माझा आवडता ऋतू हिवाळा निबंध मराठी | हिवाळा ऋतू निबंध मराठी | Majha Avadta Rutu Hivala Nibandh Marathi 2023 – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात माझा आवडता ऋतू हिवाळा निबंध मराठी मध्ये बघणार आहोत. आज आपण या लेखात एकूण 05+ अतिशय सुंदर आणि सोपे निबंध बघणार आहोत. शाळेत गुरुजी आपल्याला माझा आवडता ऋतू हिवाळा या विषयावर निबंध लिहिण्यासाठी सांगतात. किंवा परीक्षेतही 05 ते 10 गुणासाठी एक प्रश्न हमखास विचारला जातो.

मित्रहो प्रत्येकाला कोणता न कोणता तरी ऋतू आवडतोच आणि काही आवडत नाही. मला हिवाळा हा ऋतू खरंच खूप आवडतो. या लेखातील निबंध आपल्याला नक्कीच खूप उपयोगी पडतील याची आम्हाला खात्री आहे. कारण ही निबंध आम्ही खूप अभ्यास करून लिहिली आहे. या निबंधाचा अभ्यास करा आणि परीक्षेत यशस्वी व्हा. चला तर मित्रांनो निबंधाला सुरुवात करुया.

माझा आवडता ऋतू हिवाळा निबंध मराठी – निबंध क्र.01

माझा आवडता ऋतू हिवाळा निबंध मराठी 10 ओळी

 1. हिवाळा हा माझा आवडता ऋतू आहे.
 2. पावसाळा संपला की हिवाळा ऋतू येतो.
 3. त्यामुळे हिवाळ्यात सर्वत्र नदी नाले पाण्याने वाहत असतात.
 4. सर्वत्र हिरवळ पसरलेली असते.
 5. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हिवाळ्यात खूप थंडी वाजते.
 6. हिवाळ्यात वातावरण खूप ताजे तवाने असते.
 7. हिवाळ्यात अन्नपचन व्यवस्थित होते.
 8. त्यामूळे हिवाळ्यात आपली प्रकृती सुधारते.
 9. हिवाळ्यात दिवाळी हा सण सुध्दा असतो.
 10. हिवाळ्यात पर्यटक सर्वत्र फिरायला जातात.

माझा आवडता ऋतू हिवाळा निबंध मराठी – निबंध क्र.02

मित्रांनो, माझे नाव सुनिल आहे. मी इयत्ता सातवीत शिकत आहे. मला हिवाळा हा ऋतू फार आवडतो. तसे पाहता मला सर्वच ऋतू आवडतात. परंतु हिवाळा हा ऋतू मला जास्त आवडतो. याची कारणे खूप सारी आहेत.

पावसाळा संपला की हिवाळा हा ऋतू येतो. त्यामुळे हिवाळ्यात सर्वत्र हिरवळ पसरलेली असते. सर्व नदी नाले भरभरून वाहत असतात. परंतु चिखल नसतो. मला चिखल आवडत नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हिवाळ्यात थंडी खूप वाजते.

हिवाळ्यात थंड वातावरण असल्याने सर्वत्र प्रसन्न वाटते. थंड वातावरण असल्याने अन्नपचन व्यवस्थित होते. त्यामुळे हिवाळ्यात मेथीचे, डिंकाचे लाडू बनवतात. हिवाळ्यात तब्बेत सुधारते. आम्ही व्यायामशाळेत व्यायाम करण्यासाठी जातो.

हिवाळ्यात खूप सारे सण साजरे करतात. त्यापैकी महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी होय. हिवाळ्यात दिवाळीची शाळेला सुट्टी असते. दरवर्षी या सुट्टीत आम्ही सर्व मामाच्या गावाला जातो. मामाच्या गावाला आम्ही खूप धमाल करतो. दिवाळीला खूप सारे फटाके फोडतो.

हिवाळ्यात आम्ही गावाकडील विविध मनमोहक पर्यटन स्थळांना भेट देतो. तेथील सुंदर वातावरण मनाला भुरळ घालते. अशाप्रकारे आम्ही हिवाळ्यात खूप मजा करतो. या अशा सर्व बाबींमुळे मला हिवाळा हा ऋतू फार आवडतो.

-: समाप्त :-

माझा आवडता ऋतू हिवाळा निबंध मराठी – निबंध क्र.03

भारतात उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तीन मुख्य ऋतू आहेत. या सर्व ऋतूंमध्ये माझा आवडता ऋतू म्हणजे हिवाळा. पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर ते जानेवारी या चार महिन्यांसाठी हिवाळा ऋतू येतो. हिवाळ्यात वातावरण थंडीचे असते.

हिवाळ्यात दिवस लहान तर रात्र मोठी असते. सकाळच्या वेळी सर्वत्र पांढरी शुभ्र धुक्याची मलमली चादर पसरलेली असते. हिवाळ्यात झाडांची पाने गळू लागतात. त्यामुळे या ऋतूचे वर्णन पानगळीचा ऋतू असे करतात. पाने गळाल्यानंतर झाडांना नवीन पालवी फुटते. या ऋतूत बरेच पक्षी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. काही प्राण्यांच्या अंगावरील केस दाट होतात. त्यामुळे त्यांचे थंडीपासून संरक्षण होते.

हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक स्वेटर, कानटोपी, हातमोजे व पायमोजे असा पोशाख करतात. काहीजण तर शेकोटेही करतात. हा ऋतू मला खूप आवडतो. कारण या ऋतूत मला माझ्या आवडीचे गोड पदार्थ खायला मिळतात. दिवाळी, ख्रिसमस, मकर संक्रांत हे सण याच ऋतूत येतात.

हिवाळ्यात गावोगावी जत्रा भरतात. सण साजरे करतात. हिवाळ्यात वातावरण आल्हाददायक असल्याने शाळा कॉलेजच्या सहलींचे बेत याच ऋतूत ठरतात.

निसर्गातील अत्यंत महत्त्वाचा ऋतू म्हणजे हिवाळा. जीवनातील कठीण प्रसंगाला शक्ती प्रदान करणारा हा ऋतू आपल्या सर्वांच्या जीवनात आनंद, उत्साह द्विगुणीत करतो. म्हणून मला हा ऋतू खूप खूप आवडतो.

-: समाप्त :-

माझा आवडता ऋतू हिवाळा निबंध मराठी – निबंध क्र.04

मंद गार हवेची झुळूक,
त्यात जाणवे शरीर नाजूक !
थंडीची लाटती साजूक,
हिवाळ्याची जाणवे चुणूक !!

अशा या आरोग्यदायी आणि सुंदर ऋतूचा भारतातील कालावधी ऑक्टोबर पासून ते जानेवारी पर्यंत असतो. पावसाळा संपला की हिवाळा येतो.

नोव्हेंबर महिन्यात कमी वाटणारी थंडी डिसेंबर मध्ये कडाक्याची बनते. हिवाळ्यात रात्री मोठ्या असतात तर दिवस लहान असतात. सर्वत्र प्रसन्न वातावरण असते.

या काळात पर्वती भागात पडणारा बर्फ मला फार आवडतो. हिवाळ्यात झाडाची वाढ मंदावते. झाडाच्या पानांची गळ होते. सकाळच्या वेळी धुक्याची चादर पसरते. दिवसभर थंड वारे वाहतात.

हिवाळा हा माझा आवडता ऋतू आहे. कारण या ऋतूत वातावरण एकदम थंड असते. तापत्या सूर्याच्या उष्णतेपासून सुटका मिळालेली असते. मला गर्मी बिलकुल आवडत नाही. मला थंडी खूप आवडते.

याचबरोबर दिवाळी, ख्रिसमस नाताळ, मकर संक्रांति सारखे सण या काळात असतात. गरम अन्न, मिठाई, लाडू, स्वादिष्ट व्यंजन या ऋतूत खाल्ले जातात. बाजारात रंगीबेरंगी फळे आणि भाज्यांची अगदी रेलचेल असते.

आई आरोग्यदायी हिवाळी लाडू बनवते. गूळ, काजू, बदाम, खारीक, सुकामेवा, खोबरे असे अतिशय आरोग्यदायी पदार्थ वापरते. खरोखर हिवाळा हा माझा अतिशय आवडता ऋतू आहे.

-: समाप्त :-

माझा आवडता ऋतू हिवाळा निबंध मराठी – निबंध क्र.05

मुळात आमच्या मुंबईत फार हिवाळा पडतच नाही. त्यातच हल्ली वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारीत थोडीशी हवा चांगली असते. परंतु मी पुण्याला मामाकडे किंवा नाशिकला मावशीकडे डिसेंबरच्या सुट्टीत जातो. तिथे मात्र पहाटे आणि संध्याकाळी चांगली थंडी असते. तेव्हा मला माझ्या आईने माझ्यासाठी विणलेला स्वेटर घालता येतो.

आपल्या देशात कश्मीर, हिमाचल प्रदेश, दिल्ली आणि पंजाबचे काही भाग या ठिकाणी हिवाळ्यात भरपूर थंडी पडते. कश्मीरमध्ये तर बर्फच पडतो.

हिवाळ्यात झाडांची पानेही गळून पडतात. सायबेरिया सारख्या उत्तर ध्रुवा जवळील भागात तेव्हा एवढी थंडी असते की सजीव प्राण्यांना राहणे अवघड होते. त्यामुळे या भागातील अनेक पक्षी आपल्या भारतात स्थलांतर करून आलेले आपल्याला दिसतात. ते ह्या हिवाळ्यातच बरे का! कारण आपल्याकडचा उन्हाळा त्यांना नक्कीच सोसतो.

आपला मकर संक्रांत हा सण हिवाळ्यातच येतो. त्यावेळेस तिळगुळ आणि गुळाच्या पोळ्या बनवण्याची प्रथा आहे. कारण गुळ आणि तीळ हे स्निग्ध पदार्थ आहेत. आणि त्याच्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. हिवाळ्यातील थंड वातावरनामुळे अन्नपचन चांगले होते. त्यामुळे हिवाळ्यात गरम पदार्थ, मेथीचे, डिंकाचे, तिळाचे लाडू बनवतात.

हिवाळ्यात लोकांना थंडी वाजते. म्हणून ते गरम कपडे, स्वेटर, कानटोपी, हातमोजे विकत घेतात. त्यामुळेच आपल्याला मुंबईत आणि पुणे येथे गरम कपड्यांची गाठोडी घेऊन विकायला आलेले तिबेटी लोक दिसतात. दिवाळी, नाताळ आणि संक्रांत हे सनही हिवाळ्यातच येतात. तसेच हिवाळ्याच्या काळात मुंबईची हवा नेहमीपेक्षा बरीच चांगली असते. म्हणून मला हिवाळा हा ऋतू खूप आवडतो.

-: समाप्त :-

सारांश | Majha Avadta Rutu Hivala Nibandh Marathi | माझा आवडता ऋतू हिवाळा निबंध मराठी

मित्रहो, वरील लेखात आपण माझा आवडता ऋतू हिवाळा निबंध मराठी मध्ये बघितले. वरील लेखात आपण एकूण 05+ अतिशय सुंदर आणि सोपे निबंध बघितले. ही निबंध लहान मुलांसाठी तर आहेच त्याचप्रमाणे मोठ्यांसाठी देखील खूप उपयोगी आहे. ही निबंध नक्कीच आपल्याला खूप उपयोगी पडतील याची आम्हाला खात्री आहे.

आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही मत किंवा विचार असतील तर ते ही आम्हला कळवत जा. आपल्या मित्रांना हिवाळा निबंध नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला जगभरातून भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

या लेखाचे शीर्षक असेही असू शकते –

 • हिवाळा ऋतू निबंध मराठी
 • Maza Avadta Rutu Hivala Nibandh Marathi
 • Majha Avadta Rutu Hivala Nibandh Marathi
 • Majha Avadta Rutu Hivala Essay in Marathi
 • Maza Avadta Rutu Hivala Marathi Nibandh
 • Winter essay in marathi

Leave a Comment