गणेश उत्सव निबंध मराठी (05+ सर्वोत्तम निबंध) | Ganesh Utsav Nibandh in Marathi 2023 | गणेशोत्सव निबंध मराठी


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

गणेश उत्सव निबंध मराठी 2023 | Ganesh Utsav Nibandh in Marathi 2023 – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात श्री गणेश उत्सव निमीत्त निबंध मराठी मध्ये बघणार आहोत. दरवर्षी आपण गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करतो. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा सण खूप आनंदाचा सण असतो. शाळेत किंवा परीक्षेत गणेश उत्सव या सणवार निबंध लिहिण्यासाठी सांगितले जाते.

आज आपण या लेखात एकूण 05+ अतिशय सुंदर आणि जबरदस्त निबंध बघणार आहोत. ही निबंध इयत्ता 01 ली ते 10 वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील. चला तर मित्रांनो या लेखाचा श्रीगणेशा करुया आणि लेखाला सुरुवात करुया.

गणेशोत्सव निबंध मराठी | Ganeshotsav Nibandh in Marathi – निबंध क्र.01

गणेश उत्सव निबंध मराठी 10 ओळी

  1. सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
  2. दरवर्षी आपण सर्जन गणपती बाप्पा ची मोठ्या आतुरतेने वाट पाहात असतो.
  3. गणेश चतुर्थी म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमनाचा दिवस आहे.
  4. भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी गणपती देवाचा जन्म झाला होता म्हणून या दिवशी गणेश चतुर्थी साजरी केली जाते.
  5. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत सुमारे अकरा दिवस हा सण साजरा केला जातो.
  6. गणेश चतुर्थीला गणपतीची मूर्ती घरी व मंडळामध्ये वाजत गाजत स्थापित केली जाते.
  7. दहा दिवस गणरायाची रोज सकाळ व संध्याकाळी आरती करून दूर्वा, फळे, मोदक व नैवेद्य इत्यादी बाप्पांना अर्पण करतात.
  8. लोकमान्य टिळक यांनी पुणे येथून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली.
  9. गणेशोत्सवाच्या काळात अनेक सार्वजनिक मंडळांमार्फत मनोरंजनात्मक व सामाजिक संदेश देणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
  10. अनंत चतुर्दशीला गणपतीची मिरवणूक काढत आणि “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” असे म्हणत मूर्तीचे विसर्जन करतात.

गणेश उत्सव निबंध मराठी | Ganesh Utsav Nibandh in Marathi – निबंध क्र.02

भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थीला गणेशोत्सव सुरू होतो. त्या दिवशी घरोघर गणेशाच्या म्हणजेच गणपतीच्या मूर्तीची स्थापना करतात. सकाळी व संध्याकाळी गणपतीची पूजा करतात. गणपतीला मोदक प्रिय असतात. म्हणून त्याला मोदकांचा नैवेद्य दाखवतात. या दिवसात घरातील वातावरण प्रसन्न असते.

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव हा उत्सव सुरू केला. हा उत्सव दहा दिवसांचा असतो. सभासद घरोघर जाऊन वर्गणी गोळा करतात. गणपतीची मूर्ती आणून तिची सार्वजनिक ठिकाणी स्थापना करतात. मूर्तीभोवती आरास करतात. मोठ्या जोरात संध्याकाळची आरती होते. करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.

अनंत चतुर्दशीला वाजत, गाजत मिरवणूक काढून मूर्तीचे नदीत, विहिरीत किंवा समुद्रात विसर्जन करतात. महाराष्ट्रातील लहान थोर मंडळींचा हा आवडता सण आहे. मला देखील हा सण खूप खूप आवडतो.

-: समाप्त :-

गणेश उत्सव निबंध मराठी | Ganesh Utsav Essay in Marathi – निबंध क्र.03

माझे नाव सुनिल आहे. मी इयत्ता 7वी त शिकत आहे. सर्वप्रथम आपण सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. दरवर्षी आपण सर्जन गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात स्वागत करतो. गणपती बाप्पा हा लहान मुलांचा लाडका देव होय. खरतर लहान मुलेच बाप्पाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात.

साधारणतः गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागताच त्याच्या स्वागताची तयारीला आपण लागतो. आपण संपूर्ण घर धुवून साफ करतो. इतरही आजूबाजूची साफसफाई करतो. गणपती बाप्पा कुठे बसवणार ती जागा फिक्स करतो. सर्वात महत्वाचे म्हणजे गणपती बाप्पाच्या मूर्तीची ऑर्डर देतो.

बाप्पांच्या स्वागतासाठीच्या सजावटीसाठी संपुर्ण बाजारपेठा गजबजलेल्या असतात. मी माझा बाबांसोबत बाजारात जातो. बाप्पांच्या सजावटीसाठी खूप सामान घेतो. जसे की पाठ, रंगेबेरंगी फुगे, चमक्यांच्या माळा, फुलांच्या माळा, तोरण, गोल चक्र्या, लाईटींग, असे अनेक प्रकारचे साहित्य घेतो.

गणेश चतुर्थीच्या दिवशी आम्ही सर्व मित्र मिळून गणपती बाप्पाचे आसन सजवतो. गणपती बाप्पाची आरती पाठ करतो. बाप्पांना नैवेद्य दाखवन्यासाठी आई मोदक लाडू बनवते. मोदक हे बाप्पांचे सर्वात आवडते पदार्थ होय. संध्याकाळी आम्ही सर्व मित्र मिळून गणपती बाप्पाला घरी आणतो. “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया” असे जयघोष देत बाप्पांचे स्वागत करतो.

आमच्या घरी 10 दिवसांचा गणपती असतो. ही दहा दिवस आमच्यासाठी खूप खूप आनंदाची असतात. या दहा दिवसात आम्ही खूप मजा करतो. विविध खेळ खेळतो, स्पर्धा आयोजित करतो, नाटक आयोजीत करतो. खरंच ते दिवस आम्ही कधीच विसरू शकत नाही.

दहाव्या दिवशी अनंत चतुर्दशी असते. या दिवशी आपल्या लाडक्या गणरायाला पाण्यात विसर्जीत करून आपण निरोप घेतो. हा दिवस आमच्यासाठी खूप दुःखाचा असतो. असे वाटते की बाप्पांनी जावूचा नये. खूप जड अंतःकरणाने आम्ही बाप्पाला निरोप देतो. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अशा घोषणा देत गणरायाला विसर्जीत करतो.

-: समाप्त :-

गणेश उत्सव निबंध मराठी | Ganesh Utsav Nibandh Marathi- निबंध क्र.04

गणेश उत्सव हा भारतातील एक लोकप्रिय सण आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. हा उत्सव गणपतीचा जन्मदिन म्हणून सर्वत्र मोठ्या आनंदाने व उत्साहात साजरा केला जातो.

गणेश उत्सवाची सुरुवात गणेश चतुर्थीने होते. या दिवशी घरी किंवा सार्वजनिक ठिकाणी गणेश मूर्तीची स्थापना केली जाते. या उत्सवा दरम्यान सर्वत्र भक्तीमय वातावरण असते. गणेश मूर्ती समोर नेत्र दीपक आरास केली जाते. दररोज सकाळी व संध्याकाळी गणपतीची आरती केली जाते. गणरायास प्रिय असणारा मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो.

गणेश उत्सवाचा शुभारंभ हा लोकमान्य टिळकांनी समाजात एकी निर्माण करण्यासाठी केला. महाराष्ट्रात हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गणेश उत्सव हा साधारणपणे दहा ते अकरा दिवस चालणारा उत्सव आहे. सार्वजनिक गणेश मंडळ या उत्सवाप्रसंगी खूप सुंदर व आकर्षक असे देखावे तयार करतात.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी ढोल, ताशे, लेझीम इत्यादीच्या तालात गणेश मूर्तीचे विसर्जन नदी, तलाव, विहीर किंवा समुद्रात केले जाते. भक्तगण “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” असे म्हणत लाडक्या गणरायाला निरोप देतात.

असा हा गणेश उत्सव आपणास एकता बंधुभावाची महत्त्वाची शिकवण देतो. म्हणून हा सण मला खूप खूप आवडतो.

-: समाप्त :-

गणेश चतुर्थी निबंध मराठी | Ganesh Chaturthi Nibandh Marathi – निबंध क्र.05

भारतामध्ये वर्षभर खूप उत्साहाने सण साजरे केले जातात. मग तो दहीहंडी असो, दिवाळी असो, होळी असो, किंवा गणेशोत्सव असो, परंतु प्रत्येकाला एक ना एक सण खूप प्रिय असतो. जसा मला गणेश उत्सव हा सण प्रिय आहे.

गणेश चतुर्थी ज्याला विनायक चतुर्थी ही म्हटले जाते. त्या दिवसाला गणेश उत्सव या स्वरूपाने साजरे केले जाते. गणेश उत्सव सार्वजनिकपणे साजरा करण्याची पद्धत श्री. बाळ गंगाधर टिळक म्हणजे लोकमान्य टिळक यांनी दिली होती. गणेश चतुर्थी सार्वजनिकरित्या साजरी करण्यामागे टिळकांचे हेतू होता की, सर्व लोकांनी या सणानिमित्त कोणतेही मतभेद न ठेवता एकत्र यावे आणि सण साजरा करावा जेणेकरून लोकांमध्ये एकता राहील.

गणेशोत्सव हा दहा ते अकरा दिवसांचा सण असतो. पण त्याचा उत्साह तर महिनाभर आधीच सुरू होतो. कारण आपले विघ्नहर्ता गणेश सर्वांचे लाडके आहेत. विनायक चतुर्थीच्या एक दिवस आधीच बाप्पांची मूर्ती आणली जाते. त्यांना आणताना खूप वाजत गाजत आणतात. सर्वांमध्ये खूप उत्साहाचे वातावरण असते.

गणेश चतुर्थीच्या दिवशी मुहूर्तानुसार गणपतीची पूजा अर्चना करून मूर्तीची स्थापना करतात. गणेश चतुर्थीत मित्र मैत्रिणी सोबत खूप मज्जा येते. गणेश चतुर्थी निमित्त शाळेला दोन-तीन दिवसाची सुट्टी मिळते. घरी स्वादिष्ट असे मोदक बनवले जातात. कारण मोदक गणपती बाप्पांना खूप आवडतात आणि आम्हा मुलांना सुद्धा आवडतात.

आमच्या गावात आमचे एक छोटे गणेश मंडळ आहे. तेथे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जाते. वकृत्व स्पर्धा, कधी नृत्य, नाटक, चित्रकला स्पर्धा केल्यावर विजेत्यांना बक्षीस दिले जातात.

आम्ही गणपतीला आमच्या सार्वजनिक जागेवर स्थापित करतो. सर्व गावकरी खूप उत्साहाने सर्व कामे करतात. परंतु काही दिवसांनी सर्वांच्या चेहऱ्यावर नाराजी येते. कारण आता बाप्पांच्या विसर्जनाचा वेळ आलेला असतो. बाप्पांची मिरवणूक काढली जाते. त्यांची गाडी मस्त सजवली जाते.

वाजत – गाजत गणपतीचे विसर्जन होते. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद असतो. परंतु मनात दुःख असण्यास बाप्पांचे जाणे कारणीभूत असते. बाप्पा आता पुढच्या वर्षी येणार म्हणून तर म्हणतात – “गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला”, “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” असा हा गणेशोत्सव आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.

-: समाप्त :-

सारांश | Ganesh Utsav Essay in Marathi | गणेश उत्सव निबंध मराठी

मित्रहो, वरील लेखात आपण गणेश उत्सव या सणानिमित्त निबंध मराठी मध्ये बघितले. वरील लेखात आपण एकूण 05+ अतिशय सुंदर आणि जबरदस्त निबंध बघितले. गणेश उत्सव हा सण महाराष्ट्रातीलच नाही तर, भारतातील देखील खूप महत्त्वाचा सण आहे. हा सण दहा दिवसांचा असतो. या दिवसात उत्साही वातावरण असते. गणेश उत्सव हा माझा आवडता सण आहे.

मित्रांनो आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही मत किंवा मार्गदर्शन असतील तर ते ही कळवा. आपल्या गरजू मित्रांना हा लेख नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला जगभरातून भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

या लेखाचे शीर्षक असेही असू शकतात –

  • गणेश उत्सव निबंध मराठी
  • Ganesh Utsav Nibandh in Marathi
  • गणेशोत्सव निबंध मराठी
  • गणेश चतुर्थी निबंध मराठी
  • Ganesh Chaturthi Nibandh Marathi
  • गणेशोत्सव निबंध मराठी
  • Ganeshotsav Nibandh in Marathi
  • माझा आवडता सण गणेश उत्सव
  • माझा आवडत सण गणेशोत्सव
  • Maza Avadta San Ganesh Utsav
  • Majha Avadta San Ganesh Utsav

Leave a Comment