मराठवाडा मुक्ती संग्राम दिन चारोळ्या मराठी (50+ BEST) | Marathwada Mukti Sangram Din Charolya Marathi 2023


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन चारोळ्या मराठी 2023 | Marathwada Mukti Sangram Din Charolya Marathi 2023 – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त चारोळ्या मराठी मध्ये बघणार आहोत. दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आपण मोठ्या जल्लोषात साजरा करतो. या दिवशी आपल्या शाळेत विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

या कार्यक्रमात जर आपण भाषणात भाग घेतला असेल तर चारोळ्या शिवाय पर्याय नाही. कारण जर आपण भाषणात चारोळ्या वापरल्या तर भाषणाला एक वेगळेच आकर्षण निर्माण होते. भाषणात चारोळ्या वापरल्यास आपण श्रोत्यांची मने जिंकू शकता. आज आपण या लेखात 50+ अतिशय सुंदर आणि धडाकेबाज चारोळ्या बघणार आहोत.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन चारोळ्या मराठी | Marathwada Mukti Sangram Din Charolya Marathi

निजाम तोंडघशी पडला…
मराठवाडा भारताचा झाला …!
हजारो सलाम या दिवसाला…
महाराष्ट्राचा हा एक राष्ट्रीय सण झाला…!!

अखंड महाराष्ट्राची, मीच शान आहे!
मराठी भाषेचा, मी अभिमान आहे!!
मराठवाडा मी, आलीशान आहे!
आघात किती झाले, तरी पाषान आहे!!

भेटले होते स्वातंत्र्य, तरी होतो आम्ही पारतंत्र्यात !
झाला चोहीकडे प्रकाश, तरी मराठवाडा अंधकारात !!
पेटले ते पुन्हा पेटले स्वातंत्र्यासाठी, निधड्या छातीचे रणात !
देश सारा उजळे मराठवाडा, जिंकला भारताच्या हृदयात !!

महाराष्ट्राच्या शिरपेचात रोवून मानाचा तुरा
मराठवाडा गातो गुलामगिरी मुक्ततेची गाथा !
निजामशाहीला दाखवून दिला लढवय्या बाणा
लोहपुरुषांच्या चरणी झुकवू आदराने माथा !!

थोर संतांचा येथे निवारा!
त्यात निजामाचा बसला डेरा !!
क्रांतीची ही धगधगती ज्वाला !
मराठवाडा सोडुनि निजाम पळाला !!

जरी जाहला स्वतंत्र भारत देश !
मराठवाडा होता निजामाचा प्रदेश !!
लोहपुरुषाने फौजेला दिला आदेश !
मराठवाडा मुक्तीसंग्राम देतो राष्ट्रीय एकतेचा संदेश !!

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या अथक संघर्षाने
मराठवाडा मुक्त झाला,
अभिमानाने अखंड भारतात सामील झाला.

स्वामी रामानंद तीर्थ
यांचे कार्य आहे अनमोल
त्यांचे उपकराचे
कधी ना फिटणार मोले

होती संतांची भूमी
निजामाची लागली नजर
सरदार वल्लभभाई पटेलांनी
उतरवली निजामाची नजर

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन
चिरायू होवो,
भारत माता की जय! वंदे मातरम् !

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन चारोळी मराठी | Marathwada Mukti Sangram Din Charoli Marathi

मराठवाडा आमुचा मान,
सन्मान अन अभिमान
म्हणून तर उत्साहाने साजरा करू
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन !!

सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपले
कणखर नेतृत्व दाखविले !
जुलमी निजामशाहीस देशबांधवा
समोर झुकविले !!

मराठवाड्यातून वाहतात पूर्णा, पैनगंगा
मांजरा, सिंधफना गोदावरी !
हिऱ्या मोत्यांनी बहरली
आमची शिवार सारी !!

माझ्या मराठवाड्यात यादवांची राजधानी !
जगप्रसिद्ध इथली अजिंठा वेरूळ लेणी !!
साऱ्या जगात नावलौकीक आहे
आमची पैठणी !!

अशा या संपन्न मराठवाड्याचा मला
आहे अभिमान !
म्हणून तर गातो मी मराठवाड्याचे
गुणगान !!

स्वप्ने पडली उषःकाळाची
हाती मात्र अंधकार
देश सारा उजळला जरी
मराठवाड्याची काजळ रात

स्वामी रामानंद तीर्थांनी
मराठवाड्याच्या मुक्तीसाठी
केले जीवनाचे रान
असे या वीर पुत्राचा
आम्हा सदैव वाटतो सन्मान

भारतीय इतिहासात
तो दिवस अमर झाला
17 सप्टेंबरला
आमुचा मराठवाडा मुक्त झाला

सारांश | Marathwada Mukti Sangram Din Charolya Marathi | मराठवाडा मुक्ती संग्राम दिन चारोळ्या मराठी

मित्रहो वरील लेखात आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन चारोळ्या मराठी मध्ये बघितल्या. वरील लेखात आपण एकूण 50+ अतिशय सुंदर आणि धडाकेबाज चारोळ्या बघितल्या. भाषण देताना या चारोळ्या नक्की वापरा. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त भाषण करताना या चारोळ्या आपल्याला खूप उपयोगी पडतील याची आम्हाला खात्री आहे.

आपल्याला आमचा हा लेख कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही मत किंवा मार्गदर्शन असतील तर ते ही कळवा. आपल्या मित्रांना हा लेख नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला जगभरातून भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

या लेखाचे शीर्षक असेही असू शकते –

  • Marathwada Mukti Sangram Din Shayari in Marathi
  • Marathwada Mukti Sangram Din Shayari
  • Marathwada Mukti Sangram Din Wishes in Marathi
  • Marathwada Mukti Sangram Din Quotes in Marathi
  • मराठवाडा मुक्ती संग्राम दिन शायरी मराठी
  • मराठवाडा मुक्ती संग्राम दिन शायरी
  • मराठवाडा मुक्ती संग्राम दिन शुभेच्छा मराठी
  • Marathwada Mukti Sangram Din Status in Marathi
  • Marathwada Mukti Sangram Din Quotes
  • Marathwada Mukti Sangram Din Massage in Marathi

Leave a Comment