मराठवाडा मुक्ती संग्राम दिन भाषण मराठी (04+ सर्वोत्तम भाषणे) | Marathwada Mukti Sangram Din Bhashan Marathi 2023 | 17 सप्टेंबर भाषण मराठी 2023


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन भाषण मराठी | 17 सप्टेंबर भाषण मराठी 2023 | Marathwada Mukti Sangram Din Bhashan Marathi 2023 – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्ता भाषण मराठी (17 सप्टेंबर चे भाषण) मराठी मध्ये बघणार आहोत. 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा निझामाच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन स्वतंत्र भारतात विलीन झाले. त्यामुळे हा दिवस संपूर्ण मराठवाड्यात ‘मराठवाडा मुक्ती संग्राम दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

या दिवशी शाळेत, शासकीय कार्यालयात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. अशावेळी आपल्याला भाषण, सूत्रसंचालन करावे लागते. आणि म्हणूनच आज आपण या लेखात 4+ अतिशय सुंदर आणि धडाकेबाज भाषणे बघणार आहोत. 17 सप्टेंबर रोजी ही भाषणे आपल्याला खूप उपयोगी पडतील याची आम्हाला खात्री आहे.

17 सप्टेंबर भाषण मराठी | 17 September Bhashan Marathi – भाषण क्र.01

17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन भाषण मराठी लहान मुलांसाठी

  1. सर्वप्रथम सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
  2. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बाल मित्रांनो.
  3. आज मी आपल्याला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त दोन शब्द सांगणार आहे. ते आपण शांतचित्ताने ऐकावे ही नम्र विनंती.
  4. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला.
  5. परंतु मराठवाडा अजूनही हैदराबादच्या निजामांच्या गुलामगिरीत खितपत पडला होता.
  6. त्यावेळी श्री. रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली चळवळ सुरू झाली.
  7. या चळवळीत अनेक शूर वीरांनी, स्वतंत्र सैनिकांनी नेटाने लढा दिला. काहींना वीरमरण आले.
  8. शेवटी भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी ऑपरेशन पोलो अंतर्गत हैद्राबाद संस्थानावर सशस्त्र लष्करी कारवाई केली.
  9. 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामानी शरणागती पत्करली.
  10. आणि याच दिवशी मराठवाडा हैदराबाद या संस्थानातून मुक्त झाला.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन भाषण मराठी | Marathwada Mukti Sangram Din Bhashan Marathi – भाषण क्र.02

निजाम तोंडघशी पडला !
मराठवाडा भारताचा झाला !!
हजारो सलाम या दिवसाला !
महाराष्ट्राचा एक राष्ट्रीय सण झाला !!

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, पूज्य गुरुजन वर्ग, येथे जमलेले मान्यवर आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो…
सर्वांना माझा नमस्कार..!

सर्वप्रथम सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.!

आपला भारत देश जरी 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला असला तरी भारतात अनेक संस्थाने होती. त्यामध्ये हैदराबाद हे एक निजामाचे संस्थान होते. ते भारतात सामील होण्यास तयार नव्हते.

स्वामी रामानंद तीर्थ‘ यांनी हैदराबाद संस्थान भारतात सामील व्हावे म्हणून प्रयत्न केले. तसेच “वंदे मातरम चळवळी द्वारे” अनेक विद्यार्थ्यांनी मराठवाडा निजाम मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु निजाम ऐकत नव्हते.

शेवटी भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी 13 सप्टेंबर 1948 रोजी ऑपरेशन पोलो ही लष्करी कारवाई केली. यामध्ये निजामाचा पराभव झाला.

17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम शरण आले. भारतातील मराठवाडा स्वतंत्र झाला आणि भारताचे अखंड भारताचे स्वप्न पूर्ण झाले.

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढाईत अनेक लोक सहभागी झाले. तसेच महिलांनी ही महत्त्वाची कामगिरी बजावली. अशा प्रकारे मराठवाडा मुक्ती संग्राम यशस्वी झाला.

धन्यवाद!

जय हिंद! जय महाराष्ट्र! जय भारत!

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन भाषण PDF

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन भाषण मराठी | Marathwada Mukti Sangram Din Bhashan Marathi – भाषण क्र.03

मराठवाडा मुक्ती संग्राम आहे,
इतिहासातील एक सोनेरी पान !
ज्यांनी दिले प्राणांचे बलिदान,
त्यांच्या प्रति आमच्या मनात आहे सन्मान.!!

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या मित्र-मैत्रिणींनो आज मी तुमच्यासमोर मराठवाडा मुक्ती संग्रामाची यशोगाथा सांगण्यासाठी उभी आहे.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा महाराष्ट्रातील एक राजकीय उत्सव आहे. हा उत्सव दरवर्षी 17 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो.

15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. त्यावेळी भारतात लहान मोठी अशी 565 संस्थाने होती. सर्व संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली. पण काही संस्थानांनी भारतात विलीन होण्यास नकार दर्शवला. त्यातील एक म्हणजे हैदराबाद संस्थान.

या संस्थानावर मीर उस्मान अली खान या निजामाची सत्ता होती. त्याला त्याचे स्वतंत्र राज्य हवे होते. पण संस्थानातील प्रजेला स्वतंत्र भारतात सामील व्हायचे होते. तेव्हा स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मुक्तिसंग्राम उभा राहिला.

याला विरोध करण्यासाठी निजामाचा सेनापती कासिम रजवी याने रझाकार ही संघटना स्थापन करून त्यात मुस्लिम स्वयंसेवकांची भरती केली. या रझाकारांनी प्रजेवर अनन्वित अत्याचार केले. जबरदस्तीने धर्मांतर, अत्याचार अशा घटनांनी प्रजा त्रासून गेली होती.

स्वामी रामानंद तीर्थ, गोविंद भाई श्रॉफ, पानसरे व इतर अनेक थोर स्वातंत्र सैनिकांनी आपल्या प्राणांची परवा न करता निजामा विरुद्ध संघर्ष सुरू ठेवला. प्रत्येक गावागावांमध्ये या संघर्षाची ज्योत पेटत राहिली. प्रसंगी अनेकांना वीरमरणही आले.

या सर्व हुतात्म्यांनी आणि स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या संग्रामाचे मोल काढणे शक्य नाही. सरते शेवटी भारताचे त्या वेळेचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी ऑपरेशन पोलो अंतर्गत निजामाविरुद्ध लष्करी कार्यवाही सुरू केली.

११ सप्टेंबर १९४८ रोजी कारवाई सुरुवात झाली. सर्व बाजूंनी निजाम संस्थानावर कारवाई करण्यात आली. शेवटी निजामास माघार घ्यावी लागली. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबादच्या सेनाप्रमुखांनी शरणागती पत्करली आणि निजामाचा पराभव झाला.

हैदराबाद संस्थानावर भारताचा तिरंगा डौलाने फडकू लागला. लोकांच्या आनंदाला उधाण आले. जनतेने त्यांचा स्वातंत्र्य दिन गावागावात पेढे वाटून साजरा केला.

शेवटी मला जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटते –

निधडी छाती, नि:स्पृह बाणा,
लववी न मान!
अशा आमच्या मराठवाड्याचा,
आम्हास अभिमान !!

जय हिंद! जय महाराष्ट्र! जय भारत!

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन भाषण PDF DOWNLOAD

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विषयी भाषण मराठी | Marathwada Mukti Sangram Din Bhashan Marathi – भाषण क्र.04

आदरणीय व्यासपीठ, ईश्वरतुल्य गुरुजन वर्ग, उपस्थित मान्यवर आणि माझ्या बाल मित्रांनो. मी कविता जाधव आपल्या सर्वांना माझा नमस्कार! आज आपण येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. सर्वप्रथम आपल्या सर्वांना माझ्याकडून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

समोर होता एकच तारा
अन पायदळी अंगार
स्वप्न पडली जरी उषःकाळाची
हाती मात्र अंधकार
देश सारा उजळला जरी
मराठवाड्याची काजळ रात
तेव्हा पेटली अग्नीज्वाला
सर्व दूर अंगार मनात

मित्रांनो, दीडशे वर्षाच्या गुलामगिरीनंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. परंतु आपला वनवास काही संपला नाही. मराठवाड्यावर अजूनही निजामाची सत्ता होती. ते स्वतंत्र भारताचे अस्तित्व मान्य करत नव्हते.

निजामाच्या अन्याय व अत्याचाराला जनता आता फार कंटाळली होती. या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली एक चळवळ उभारण्यात आली.

तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आदेशावरून हैदराबाद संस्थानावर सशस्त्र पोलीस बळाचा वापर करण्यात आला. त्यानुसार १३ सप्टेंबरला ऑपरेशन पोलो सुरू करण्यात आले. त्यामुळे हार पत्करत निजामांनी माघार घेतली.

या मुक्ती संग्रामातील नेत्यांच्या अथक प्रयत्नानंतर व अनेक शूरवीरांच्या हुतात्म्यानंतर 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. त्यामुळे दरवर्षी 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो.

मित्रांनो मराठवाडा मुक्ती संग्राम यज्ञात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या व या संग्रामात मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व शूर सेनानींना मी वंदन करते. आणि माझे दोन शब्द संपवते.

झेलत छातीवर वार
देह जिजवला मातीसाठी
कित्येकांनी प्राण अर्पिले
मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी
त्या शूरवीरांना
माझे कोटी कोटी प्रणाम
ज्यांनी रक्त सांडले आपल्यासाठी

जय हिंद! जय महाराष्ट्र! जय मराठवाडा!

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन भाषण मराठी PDF DOWNLOAD

सारांश | मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे भाषण मराठी | Marathwada Mukti Sangram Din Speech in Marathi

मित्रहो, वरील लेखात आपण 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे भाषण मराठी मध्ये बघितले. वरील सर्व भाषणे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी खूप उपयोगी पडतील. 17 सप्टेंबर हा दिवस आपण सर्वांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे. त्यामुळे आपण सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही मत किंवा मार्गदर्शन असतील तर ते ही कळवा. आपल्या गरजू विद्यार्थ्यांना, मित्रांना हा लेख नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला जगभरातून भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

1 thought on “मराठवाडा मुक्ती संग्राम दिन भाषण मराठी (04+ सर्वोत्तम भाषणे) | Marathwada Mukti Sangram Din Bhashan Marathi 2023 | 17 सप्टेंबर भाषण मराठी 2023”

Leave a Comment