शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी (05+ सर्वोत्तम निबंध) | Shikshana Shivay Tarnopay Nahi Nibandh Marathi 2023 | शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही निबंध मराठी


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही निबंध मराठी | Shikshana Shivay Tarnopay Nahi Nibandh Marathi – नमस्कार मित्रानो आज आपण या लेखात शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी 300 शब्दामध्ये बघणार आहोत. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि जो हे दूध पितो तो गुर्गुरल्या शिवाय राहणार नाही असे शिक्षणाचे महत्व आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर 50 वर्षांपूर्वी सांगून गेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श तसेच लोकराजे राजर्षी शाहू महाराजांनी देखील शिक्षणाचे महत्व जनतेला सांगितले आहे. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे राजर्षी शाहू महाराज यांना त्यावेळी कळून चुकले होते.

तालुका स्तरीय होणाऱ्या निबंध स्पर्धेत शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही – राजर्षी शाहू महाराज या विषयावर निबंध लिहिण्यासाठी सांगितले जाते. या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी आज आम्ही या लेखात खास तुमच्यासाठी 5+ अतिशय सुंदर आणि धडाकेबाज निबंध आणली आहेत. ही निबंध 300 ते 500 शब्दात आहेत.

म्हणून आज आपण या लेखात शिक्षणाचे महत्व सांगण्यासाठी 05+ अतिशय सुंदर आणि धडाकेबाज निबंध बघणार आहोत. शाळेत किंवा परीक्षेत या विषयावर निबंध लिहिण्यासाठी सांगितले जाते. या लेखातील निबंध आपल्याला नक्कीच खूप उपयोगी पडतील याची आम्हाला खात्री आहे. चला तर मित्रांनो सुरूवात करूया.

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही निबंध मराठी | Shikshana Shivay Tarnopay Nahi Nibandh Marathi – निबंध क्र.01

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही निबंध मराठी 10 ओळी

  1. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही.
  2. कोणत्याही प्रकारचे ज्ञान आत्मसात करण्यासाठी शिक्षण हे हवेच.
  3. जर तुम्ही शिकलेले नसाल तर तुमच्या इतका अज्ञानी कोणी नाही.
  4. आणि तुम्ही जर अज्ञानी असाल तर चांगले काय आणि वाईट काय यातला फरक तुम्ही समजू शकत नाही.
  5. अज्ञानी लोकांवर जास्त अन्याय व अत्याचार होतात.
  6. जर तुम्ही सुशिक्षित झालात तर समाजात ताठ मानेने जगू शकतात.
  7. तुमच्या नादाला देखील कोणी लागू शकत नाही.
  8. समाज कंठकाना तुम्ही विरोध करू शकता.
  9. समजतील अनिष्ट रूढी परंपरांना तुम्ही विरोध करू शकता.
  10. महात्मा फुले, शाहू, आंबेडकर यांच्या सारखे समाज परिवर्तनाचे कार्य तुम्ही करू शकता.

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही निबंध मराठी | Shikshana Shivay Tarnopay Nahi Nibandh Marathi – निबंध क्र.02

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही राजर्षी शाहू महाराज निबंध 300 शब्द

विद्ये विनामती गेली !
मतीविना नीती गेली !
नितीविना गती गेली !
गती विना वित्त गेले !
एवढे सारे अनर्थ अविद्येने केले !

शिक्षण हे ज्ञान मिळवण्याचे माध्यम आहे आणि ज्ञान ही शक्ती आहे. ज्याच्याजवळ ज्ञान नसते, ते गुलाम बनतात आणि ज्यांच्याजवळ ज्ञान असते ते जगावर प्रभुत्व गाजवतात. भारतात स्त्रियांना व बहुजन समाजाला शिक्षण घेण्याची बंदी होती. म्हणून ते अज्ञानाच्या अंधारात आंधळे होते.

ब्रिटिशांनी शिक्षण घेतले. ज्ञान मिळवले आणि त्या बळावर भारतावर अधिराज्य गाजवले. हा इतिहास शिक्षणाचे व ज्ञानाचे सामर्थ्य दाखवतो. शिक्षणाने मनाचा विकास घडून येतो. अशिक्षित गुराख्याला गाई, म्हशी व चाऱ्याचे शेत या पलीकडे काहीच दिसत नाही. देश म्हणजे काय? राष्ट्रीय समस्या कोणत्या? यातले त्याला काहीच कळत नाही.

गुलामगिरी, पारतंत्र्य आणि दारिद्र्य यात तो सुख मानतो. सुशिक्षित माणसाच्या मनाचा विकास झाल्यामुळे तो अन्यायाविरुद्ध पेटून उठतो. तो समाजासाठी क्रांती करू शकतो. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महर्षी शिंदे, महर्षी कर्वे हे सारे समाज सुधारक सुशिक्षित होते. म्हणूनच क्रांतीच्या दिशेने वाटचाल करून शकले.

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो हे प्राशन करील तो गुर्गुरल्याशिवाय राहणार नाही, हे बाबसाहेब आंबेडकरांचे वाक्य अगदी खरे आहे. एरवी थंड गोळ्याप्रमाणे निर्जीव असलेला समाज शिक्षण मिळताच सजीव होऊन उठतो.

जेथे जेथे अन्याय आहे, विषमता आहे, दडपशाही आहे तेथे न्याय समता आणि स्वातंत्र्य निर्माण करायला माणूस लढा द्यायला सिद्ध होतो. शिक्षणामुळेच माणसाच्या मनात क्रांतीचे बीज अंकुरतात. जगातील क्रांतीचे उगमस्थानही शिक्षण हेच आह रुसो, वॉल्टेयर इत्यादी लोकांनी शिक्षण घेतले. आपले अनुभव लिहून काढले. फ्रान्सची जनता यांचे विचार वाचून सजीव झाली.

शिक्षणाचे व्यक्तीवर आणि समाजावर अतिशय दूरगामी परिणाम होतात. शिक्षणाने अंधश्रद्धा दूर होतात. नरबळींची प्रथा अशिक्षित समाजातच दिसून येते. शिक्षणाने विज्ञान निष्ठा बळावते. म्हणूनच आजारांवर मंत्रद्वारे उपचार करणाऱ्यांची संख्या नष्टप्राय होत असून आरोग्य संवर्धन होत आहे.

शिक्षणाने सामाजिक शोषनालाही पायबंद बसतो. कारण शिक्षणाने हक्क समजतात. विद्रोहाचे सामर्थ्य येते. शिक्षण म्हणजे मानवी जीवनातील दीपज्योतच ! आणि म्हणूनच म्हणतो शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही.

-: समाप्त :-

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी – निबंध क्र.03

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही राजर्षी शाहू महाराज मराठी निबंध 300 शब्द

गोरगरिबांच्या झोळीत दिले शिक्षणाचे दान,
गाऊ किती मी तुमचे गुणगान ?
छत्रपती शाहू महाराज तुम्ही,
अवघ्या महाराष्ट्राची शान !
अवघ्या महाराष्ट्राची शान !!

शिक्षणाची गंगा बहुजनांच्या गोरगरिबांच्या घरादारापर्यंत पोहोचवणारे महामानव म्हणजे राजर्षी शाहू महाराज होत !

बहुजनांची परिस्थिती सुधारायची असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे ओळखून छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण सर्वसामान्य बहुजन व दलित बांधवांसाठी खुले केले. समाजातल्या शोषित व मागासवर्गाला आरक्षण देण्याची कल्पना सर्वप्रथम जर कोणी मांडली असेल, तर ती छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी.

प्रभावी शिक्षणासाठी त्यांनी चतुसूत्री कार्यक्रम राबवला. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणे. ज्यामुळे उच्च शिक्षण घेणे सहज शक्य होईल. त्याकाळी शिक्षण घेणे ही केवळ एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती. त्यासाठी शिक्षणाची ज्ञानगंगा महाराजांनी गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत आणली.

शिक्षण हा माणसाच्या जीवनाचा आधार आहे. याचमुळे शाहू महाराजांनी जर विद्यार्थी शाळेपर्यंत येऊ शकत नसेल तर, शाळा विद्यार्थ्यांच्या दारापर्यंत न्यावी या उक्तीप्रमाणे त्यांनी गावोगावी शाळा सुरू केल्या. आज बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम देशात 2009 मध्ये लागू झाला.

मात्र राजर्षी शाहू महाराजांनी तर 1917 मध्येच मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा आपल्या संस्थानात केला होता. यावरूनच त्यांची दूरदृष्टी दिसून येते. राजर्षी शाहू महाराज हे काळाच्या पुढे पाहण्याची दृष्टी लाभलेले महामानव होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

ग्रामीण भागातील मुलांना उच्च शिक्षणाची सुविधा मिळावी म्हणून राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये मराठा, लिंगायत, जैन, मुस्लिम, सुतार, महार, चांभार अशा अनेक धर्म, जाती जमातींच्या मुलांसाठी वस्तीगृह स्थापन केली. मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.

मुलींचे शाळेतील प्रमाण कमी आहे, हे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी सर्व मुलींना उपस्थिती भत्ता सुरू केला. राजा असूनही राजे पण न बघणाऱ्या आणि आपल्या प्रजेवर जीवापाड प्रेम करून त्यांच्या जीवनामध्ये समृद्धी यावी, यासाठी सतत झटणाऱ्या राजश्री शाहू महाराजांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य नक्कीच आजच्या शासन प्रशासन व्यवस्थेला, आजच्या तरुणाईला प्रेरणादायी आहे.

-: समाप्त :-

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी – निबंध क्र.04

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही राजर्षी शाहू महाराज निबंध 300 शब्दात

शिक्षणाच्या लढ्यात
दिले गोरगरिबांना
शिष्यवृत्तीचे वरदान !
छत्रपती शाहू महाराज
तर महाराष्ट्राची शान !!

राजश्री शाहू महाराज हे काळाच्या पुढे पाहण्याची दृष्टी लाभलेले महामानव होते. हे आपणास त्यांनी केलेल्या कार्यातून दिसून येईल.

राजश्री शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी आबासाहेब व राधाबाई यांच्या पोटी झाला. त्यांचे मूळ नाव ‘यशवंत’ होते. हाच यशवंत पुढे राजश्री शाहू महाराज म्हणून नाव रूपास आला.

समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, भेदाभेद, अन्याय याचे मूळ कारण अज्ञान आहे. यावर मात करायची असेल तर शिक्षण हे समाजातील तळागाळापर्यंत गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचायला हवे. असा विचार मांडणारे व प्रत्यक्षात त्याकरिता विविध प्रयोग राबवणारे एक लोकनेते महाराष्ट्राच्या भूमीवर जन्माला आले ते होते – राजश्री शाहू महाराज!

राजर्षी शाहू महाराजांचा काळ हा सामाजिक परिवर्तनाचा महत्त्वाचा काळ म्हणावा लागेल. त्यावेळी समाज अनेक अनिष्ट रूढी व परंपरांनी पोखरून गेलेला होता. यावर एकच उपाय म्हणजे सार्वजनिक शिक्षणाचा प्रसार व प्रचार असे शाहू महाराजांना वाटे. ते केवळ बोलण्यावरच थांबले नाही, तर “बोले तैसा चाले” या उक्तीप्रमाणे प्रत्यक्षात करूनही दाखवले.

महाराजांच्या काळातच महात्मा फुलेंनी शिक्षण समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू केलेला होता. परंतु भारतीय समाजव्यवस्था त्याला पाहिजे तशी साथ देत नव्हती. ही बाब शाहू महाराजांनी हेरली इथूनच कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या प्राथमिक शिक्षणासाठी हालचाली सुरू झाल्या.

दुर्बल व मागासवर्गीयांची मानसिक गुलामगिरी नाहीशी करण्याकरिता त्यांना किमान प्राथमिक शिक्षण तरी दिले गेले पाहिजे. असे मत शाहू महाराजांनी मांडले. यावर सखोल मंथन करून 24 जुलै 1917 रोजी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण तरी दिले गेले पाहिजे. याबाबत त्या दिवशी मोफत व सक्तीच्या शिक्षणाबाबत कायदा करण्यात आला.

या कायद्यान्वये शिक्षणास योग्य वयाची मुले शाळेत पाठविण्याची आई वडिलांवर सक्ती करण्यात आली. त्यांनी तशी पाठवली नाहीत तर त्यांना प्रत्येकी एक रुपया दर महिना दंड करण्याची तरतूद करण्यात आली. प्रत्येक गावात शाळा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले.

सुरुवातीला गावातीलच चावडी, देवळे, धर्मशाळा आदी इमारतीत शाळा सुरू केल्या. एका वर्षभरात संस्थानातील खेड्यापाड्यात अशा 86 नव्या शाळा सुरू झाल्या. पुढे या योजनेवरील खर्च एक लाखावरून तीन लाखांवर नेण्यात आला. पगारी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली. छत्रपती शाहू महाराजांनी मुलींच्या शिक्षणासाठी देखील विशेष प्रयत्न केले.

शाळेत मुलांच्या प्रमाणात मुलींचे प्रमाण खूप कमी आहेत हे शाहू महाराजांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी मुलींना शाळेत येण्यासाठी विशेष भत्ता सुरू केला. त्यामुळे शाळेत मुलींची संख्या झपाट्याने वाढली.

राजर्षी शाहू महाराजांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य नक्कीच आजच्या या युगात देखील सर्वांसाठी प्रेरणादायी असे आहे. अशा महान राजश्री शाहू महाराजांना माझा मानाचा मुजरा ! आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते –

जातीभेदाविरुद्ध दिला लढा,
शिक्षणाचे केले कार्य महान !
छत्रपती शाहू महाराज आपण,
सदैव आमच्या हृदयी विराजमान !!

-: समाप्त :-

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही राजश्री शाहू महाराज निबंध मराठी – निबंध क्र.05

राजर्षी शाहू महाराज यांचे शैक्षणिक कार्य 300 शब्द

शिक्षण अज्ञान दूर करी,
पसरावे ते घरोघरी !
ज्ञानाचा दिवा पेटेल जेव्हा,
विकास येईल दारोदारी !!

राजर्षी शाहू महाराज एक अत्यंत द्रश्टे राजे होते. कोल्हापूर सारख्या अन्य संस्थानाच्या तुलनेत छोट्या असणाऱ्या संस्थानाला केवळ राजर्षी शाहू महाराजांच्या कार्यामुळे देशपातळीवर लौकिक प्राप्त झाला. रयतेच्या कल्याणाचा हिताचा सदोदित विचार करणारा आणि त्यासाठी विविध योजना आखून त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी झटणारा अत्यंत सहृदयी व लोककल्याणकारी राजा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

21 सप्टेंबर 1917 रोजी कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या शिक्षणाचा कायदा खास जाहीरनामा काढून प्रसिद्ध करण्यात आला. त्याच्या उद्देशात करवीर इलाख्यातील आमच्या सर्व प्रजाजणांना लिहिता वाचता येऊन आपली स्थिती ओळखून सुधारणे समर्थ व्हावे म्हणून हा कायदा केल्याचे म्हटले होते. या कायद्यान्वये शिक्षणास योग्य वयाची मुले शाळेत पाठविण्याची आई-बाबांवर सक्ती करण्यात आली. त्यांनी तशी पाठवली नाहीत तर त्यांना प्रत्येकी एक रुपया दर महिन्यात दंड करण्याची तरतूद करण्यात आली.

राजर्षी शाहू महाराजांच्या कालखंडात अस्पृश्यतेची भावना तीव्र होती. त्यामुळे सर्वत्रच अस्पृश्य व अस्पृश्यांच्या शाळा स्वतंत्र होत्या. कायद्याने ही भावना लगोलग दूर करणे शक्य नव्हते. अनुकूल परिस्थिती निर्माण होण्यासाठी प्रबोधनाची गरज होती. मात्र तोपर्यंत अस्पृश्य वर्गाला शिक्षणासारख्या मूलभूत हक्कापासून वंचित राखणेही चुकीचे होते. त्यामुळे शाहू महाराजांनी या संदर्भात थोडे सौम्य धोरण स्वीकारले.

दि. 07 एप्रिल 1919 च्या आदेशान्वये अस्पृश्यातील दैन्यावस्था लक्षात घेऊन त्यांच्या शिक्षणास उत्तेजन देण्यासाठी त्यांना पाट्या, पेन्सिली व पुस्तके मोफत देण्यासाठी अडीच हजार रुपये मंजूर केले. त्याच महिन्यात तलाठी वर्गातील अस्पृश्य वर्गासाठी दरमहा साठ रुपये प्रमाणे खास शिष्यवृत्ती जाहीर केल्या.

महाराजांनी केवळ आपल्या संस्थानातीलच अस्पृश्यांचे काळजी वाहिली; असे नव्हे तर, संस्थांना बाहेरील अनेक अस्पृश्य विद्यार्थी वस्तीगृहांना सढळ हस्ते अर्थसहाय्य केले. अस्पृश्यांचे पुढारी कालीचरण नंदा गवळी यांना 20 जुलै 1920 रोजी पाठवलेल्या पत्रानुसार अस्पृश्य वस्तीगृहासाठी महाराजांनी आर्थिक मदत पाठविण्याची दिसून येते.

शाहू महाराजांनी करवीर संस्थानात स्त्री शिक्षण विषयक अत्यंत पुरोगामी धोरण स्वीकारले होते. संस्थानातील स्त्री शिक्षणाची व्यवस्था पाहण्यासाठी त्यांनी स्त्री शिक्षणाधिकाऱ्याचे विशेष पद निर्माण केले होते. ही जबाबदारी रखमाबाई केळवकर यांच्याकडे होती. संस्थानात मुला मुलींसाठी शाळा होत्याच पण मुलींसाठी स्वतंत्र शाळा निर्माण केल्या.

मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण वाढावे म्हणून त्यांच्या पास होण्याच्या प्रमाणात शिक्षकांना विशेष इनाम ठेवले. हुशार मुलींना पुढील शिक्षणात प्रोत्साहन मिळावे म्हणून दरबाराने खास शिष्यवृत्ती ठेवल्या. राजकन्या अक्कासाहेब महाराज यांच्या विवाहप्रीत्यर्थ प्रत्येकी 40 रुपयांच्या एकूण पाच शिष्यवृत्ती इयत्ता चौथीच्या वार्षिक परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थिनींना देण्यात येत.

मुलींच्या उच्च शिक्षणाच्या बाबतीतही शाहू महाराजांनी उदार दृष्टिकोन ठेवला. राजाराम कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सर्व मुलींना त्यांनी शिक्षण मोफत केले. रखमाबाई यांच्याच मुलीला कृष्णाबाई यांना महाराजांनी वैद्यकीय शिक्षणासाठी मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये पाठविले व डॉक्टर बनविले आणि परतल्यानंतर कोल्हापूरच्या एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त केले.

पुढे उच्च वैद्यकीय शिक्षणासाठी त्यांना इंग्लंडला पाठवले आणि उच्चविद्याभूषित होऊन पुन्हा संस्थानाच्या सेवेत रुजू झाल्या. अशाप्रकारे देश परदेशात वैद्यकीय उच्च शिक्षण घेऊन मायेदेशी परतणाऱ्या कृष्णाबाई या दुसऱ्या महाराष्ट्र कन्या होत. पहिल्या अर्थातच आनंदीबाई जोशी या होत.

शाहू महाराजांच्या या कार्याला स्वतंत्र भारतामध्ये अधिक सार्वत्रिक व राष्ट्रीय स्वरूप देण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले सामाजिक शैक्षणिक कारकीर्द तसेच अंतिमतः राज्यघटनेच्या माध्यमातून केले. शिक्षणाचा अधिकार राष्ट्रीय स्तरावर प्रस्थापित करण्याबाबत ते आग्रही राहिले.

अखेरीस सन 2010 मध्ये शिक्षणाच्या अधिकाराच्या रूपाने त्यास मूर्त स्वरूप प्राप्त झाले. तथापि त्यापूर्वी सुमारे 100 वर्षांपूर्वी 24 जुलै 1917 रोजी आपल्या संस्थानात या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या या लोकराज्याचे दृष्टे पण आणि शैक्षणिक कार्य या दोघांचे महत्त्व या ठिकाणी अधिक प्रकर्षाने अधोरेखित होते.

-: समाप्त :-

सारांश | शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी | Shikshana Shivay Tarnopay Nahi Nibandh Marathi

मित्रहो, वरील लेखात आपण शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही राजर्षी शाहू महाराज याविषयी निबंध मराठी मध्ये बघितले. वरील लेखात आपण एकूण 5+ अतिशय सुंदर आणि धडाकेबाज निबंध बघितले. वरील निबंध ही 300-500 शब्दात आहेत. ही निबंध इयत्ता 1 ले 10 वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल अशी आम्हाला खात्री आहे.

तालुकास्तरीय होणाऱ्या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी या निबंधाचा अभ्यास करा. आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा? आपले काही मत किंवा विचार असतील तर ते ही कळवा. आपल्या मित्रांना, विद्यार्थ्यांना ही निबंध नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला जगभरातून भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

  • शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी
  • Shikshana Shivay Tarnopay Nahi Nibandh Marathi
  • शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही निबंध मराठी
  • राजर्षी शाहू महाराज यांचे शैक्षणिक कार्य 300 शब्द
  • शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही राजर्षी शाहू महाराज निबंध 300 शब्दात
  • शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही राजर्षी शाहू महाराज मराठी निबंध 300 शब्द
  • शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी
  • Shikshana Shivay Tarnopay Nahi Nibandh Marathi
  • शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही निबंध मराठी
  • राजर्षी शाहू महाराज यांचे शैक्षणिक कार्य 300 शब्द
  • शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही राजर्षी शाहू महाराज निबंध 300 शब्दात
  • शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही राजर्षी शाहू महाराज मराठी निबंध 300 शब्द
  • शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी
  • Shikshana Shivay Tarnopay Nahi Nibandh Marathi
  • शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही निबंध मराठी

Leave a Comment