राजर्षी शाहू महाराज जयंती भाषण मराठी (04+ सर्वोत्तम भाषणे) | Rajarshi Shahu Maharaj Jayanti Bhashan Marathi 2023 | राजर्षी शाहू महाराज भाषण मराठी


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

राजर्षी शाहू महाराज जयंती भाषण मराठी | Rajarshi Shahu Maharaj Jayanti Bhashan Marathi 2023 – नमस्कार मित्रांनो, 26 जून रोजी आपण छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो. अशावेळी आपल्या शाळेत, कार्यालयात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशा कार्यक्रमात आपण भाषणामध्ये भाग घेतो किंवा कार्यक्रमात भाषण सूत्रसंचालन करावे लागते.

आज आपण या लेखात छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त भाषण मराठी मध्ये बघणार आहोत. आज या लेखात आपण एकूण 4+ अतिशय सुंदर आणि धडाकेबाज भाषणे बघणार आहोत. ही भाषणे आपल्याला खूप उपयोगी पडतील याची आम्हाला खात्री आहे. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालविता भाषणाला सुरूवात करूया.

राजर्षी शाहू महाराज जयंती भाषण मराठी | Rajarshi Shahu Maharaj Bhashan Marathi – भाषण क्र.01

आरक्षण देणारा पहिला राजा, जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना एक रुपये दंड ठोटावणारा राजा, कला, क्रीडा, शिक्षण यांना राजाश्रय देणारा राजा, अंधश्रद्धा, कर्मकांडे, दैववाद यावर प्रहार करणारा राजा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जाऊन सन्मान करणारा राजा, सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारा राजा…

प्रथम आपणं सर्वांना छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथील ‘घाटगे’ घराण्यात झाला. त्यांचे पूर्ण नाव ‘यशवंत जयसिंगराव घाडगे’ असे होते. त्यांच्या आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतला दत्तक घेतले. त्यांचे ‘शाहू’ असे नामकरण करण्यात आले.

शाहू महाराज लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे आणि न्यायप्रिय होते. 01 एप्रिल 1891 मध्ये बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या मुलीशी शाहू महाराजांचे लग्न झाले. शाहू महाराजांनी समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणावर विशेष भर दिला.

06 जुलै 1902 रोजी कोल्हापूर संस्थानातील मागास जातींना 50 टक्के जागा राखीव करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. समाजातील सर्व घटकांना समानतेची वागणूक मिळावी म्हणून त्यांनी शाळा, दवाखाने, पानवटे, विहिरी, सार्वजनिक इमारती सर्वांसाठी खुल्या केल्या. डेक्कन रयत असोसिएशन ही देखील शाहू महाराजांची देण आहे. 1917 साली त्यांनी विधवा पुनर्विवाहाचा कायदा संमत करून घेतला.

राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर आणि बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीरांना वेळोवेळी आर्थिक आणि इतर मदत देखील केली. महाराजांनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रातील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले.

अशा या थोर राजाने 06 मे 1922 रोजी अखेरचा श्वास घेतला. शेवटी मी जाता जाता एवढेच म्हणेन की,

हिरे माणिक सोने उधळा जय जय कर करा
सुख दुःखाच्या वादळात हा गरीबाचा वाली
महाराष्ट्राचा उद्धारक तू जनतेचा राजा तू
जय राजश्री शाहू राजा तुला हा मानाचा मुजरा

-: समाप्त :-

राजर्षी शाहू महाराज जयंती भाषण मराठी | Rajarshi Shahu Maharaj Jayanti Bhashan Marathi – भाषण क्र.02

जातीभेदा विरुद्ध दिला लढा,
शिक्षणाचे केले कार्य महान !
छत्रपती शाहू महाराज आपण,
सदैव आमच्या हृदयी विराजमान…

सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो…

‘महाराजांचे महाराज’ अशी आपल्या कार्यकर्तृत्वाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथे झाला. त्यांच्या आईचे नाव राधाबाई तर वडिलांचे नाव जयसिंगराव घाटगे असे होते. ते दहा वर्षाचे असताना कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी यांची राणी आनंदीबाई यांनी त्यांना दत्तक घेतले व ते कोल्हापूर संस्थानाची राजे झाले.

1894 मध्ये राज्यकारभाराची सूत्रे आपल्या हातात घेतल्यानंतर अनेक लोकोपयोगी कामे त्यांनी सुरू केली. शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यांनी आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. सरकारी नोकरीत मागासवर्गीयांसाठी 50% जागा राखीव ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. वाघ्या मुरळी प्रतिबंधक कायदा केला.

अस्पृश्यता व जातीभेद निर्मूलनासाठी त्यांनी आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा केला. कोल्हापूर येथे ‘शाहूपुरी’ ही गुळाची बाजारपेठ सुरू केली. ‘राधानगरी’ धरणाची उभारणी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना परदेशातील शिक्षणासाठी त्यांनी मदत केली. चित्रकार आबालाल रहिमान सारख्या कलाकारांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले.

त्यांनी शिक्षण, कला, क्रीडा, कृषी, आरोग्य, समाज सुधारणा, व्यवसाय अशा सर्वच क्षेत्रांसाठी दिलेलं योगदान अनमोल आहे. राजर्षी शाहू महाराजांनी एकूण 28 वर्षे केलेल्या लोकहितवादी राज्यकारभाराची दखल घेत कानपूरच्या ‘कुर्मी’ समाजाने त्यांना ‘राजर्षी’ ही पदवी दिली. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून 26 जून हा त्यांचा जन्मदिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा केला जातो.

शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते.-

करवीर नगरीचे प्रागतिक अधिपती,
संगीत, नाट्य, कला, मल्लविद्येला दिली गती..
अस्पृश्यता निवारक, शिक्षण प्रसारक, रयतेचा सांगती,
प्रजाहितदक्ष, लोकनायक राजर्षी शाहू छत्रपती…

राजर्षी शाहू महाराजांच्या कार्यास व पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो.

जय हिंद ! जय महाराष्ट्र ! धन्यवाद !

-: समाप्त :-

छत्रपती राजर्षी शाहू महाराज भाषण मराठी | Rajarshi Shahu Maharaj Jayanti Speech in Marathi – भाषण क्र.03

जातीभेदा विरुद्ध दिला लढा,
शिक्षणाचे केले कार्य महान !
छत्रपती शाहू महाराज आपण,
सदैव आमच्या हृदयी विराजमान !!

आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींनो !! आज आपण येथे सर्व जण राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त जमलेलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

राजर्षी शाहू महाराज हे एक थोर भारतीय समाज सुधारक व कोल्हापूर संस्थांचे छत्रपती होते. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे संपूर्ण नाव यशवंत जयसिंगराव घाटगे हे होते. शाहू राजांच्या आईचे नाव राधाबाई तर वडिलांचे नाव जयसिंगराव हे होते.

कोल्हापूर संस्थांचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतला दत्तक घेतले. त्यांचे ‘शाहू’ असे नामकरण करण्यात आले.

शाहू महाराज हे लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे व लोकप्रिय होते. सन 1889 ते 1893 या काळात त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. 01 एप्रिल 1891 रोजी शाहू महाराज लक्ष्मीबाईंची विवाहबद्ध झाले. इसवी सन 1894 साली शाहू राजांनी संस्थानाच्या राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या कार्याचा उद्देश्य हा समाज परिवर्तन घडवणे हा होता.

त्यांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांनी सोनतळी येथे भटक्या विमुक्त जातीच्या मुलांसाठी पहिली शाळा काढली.

सन 1896 मध्ये पडलेला दुष्काळ व त्यानंतर प्लेगची साथ अशा संकटकाळी त्यांनी अनेक दुष्काळी कामे हाती घेतली. स्वस्त धान्य दुकाने, निराधार आश्रम स्थापना, विहिरी खणणे, घरकुल बांधणे, राधानगरी धरण उभारणी इत्यादी अनेक समाज उपयोगी कार्ये त्यांनी केली.

शाहू महाराजांनी आपल्या कारकिर्दीत शिक्षण, आरोग्य, कृषी, उद्योग, कला, क्रीडा अशा सर्व क्षेत्रात महत्त्वपूर्ण असे योगदान दिले. आपण सर्व शाहू राजांना ‘लोककल्याणकारी’ राजा म्हणूनही ओळखतो.

दुर्दैवाने 06 मे 1922 रोजी मुंबई येथे शाहू महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. अशा महान राजा बद्दल जाता जाता एवढेच म्हणेन –

ओम बोलल्याने मनाला शक्ती मिळते
साई बोलल्याने मनाला शांती मिळते
राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते
जय शाहू बोलल्याने आम्हाला
शंभर वाघांची ताकद मिळते..

जय हिंद! जय महाराष्ट्र! जय भारत!

-: समाप्त :-

छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती भाषण मराठी | Rajarshi Shahu Maharaj Speech in Marathi- भाषण क्र.04

इतिहासातून वळूनी,
पहा पाठीमागे जरा…
झुकवून मस्तक करशील,
राजर्षी शाहूंना मानाचा मुजरा…

आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो! सर्वांना माझा नमस्कार.

आज 26 जून! राजर्षी शाहू महाराज यांची जयंती! सर्वप्रथम बहुजनांचा आधार, कर्तव्यदक्ष, आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना माझा मानाचा मुजरा!

राजर्षी शाहू महाराज हे विशाल मनाचे, लोकराजा तसेच कोल्हापूर संस्थानचे छत्रपती होते. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांच्या आईचे नाव राधाबाई आणि वडिलांचे नाव जयसिंगराव घाटगे हे होते. राजर्षी शाहू महाराज यांचे मूळ नाव यशवंत होते. कोल्हापूर संस्थांनाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1884 रोजी यशवंत याला दत्तक घेतले आणि नव्याने शाहू असे नामकरण केले.

राजर्षी शाहू महाराज यांचे कर्तृत्व विशाल आणि नेतृत्व आजोळ होते. ते राजघराण्यात राहूनही लोकांसाठी जगले. आणि रयतेचा राजा लोक राजा ठरले. छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणून जगताना छत्रपती ही बिरुदावली त्यांनी नुसती लावली नाही तर खऱ्या अर्थाने ती कर्तुत्वाने सार्थ केली.

छत्रपती शाहू महाराज यांनी समाजातील बहुजन, मागासलेल्या, तळागाळातील वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. त्यांनी जातीप्रथेला विरोध, कोल्हापुरात मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा, विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन, आंतरजातीय विवाह प्रोत्साहन, शिष्यवृत्ती योजना, पाणी व्यवस्था, वसतिगृह उभारनी इत्यादी अनेक समाजसुधारणा केल्या.

राजश्री शाहू महाराज यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी सहकार्य केले. चित्रकार आबालाल रहिमान यांसारखे अनेक कलावंतास राजाश्रय दिला. कोल्हापूर येथे शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ सुरू केली. त्यांना राजर्षी ही उपाधी कानपूरच्या कुरमी समाजाने दिली. त्यांनी कृषी, शिक्षण, उद्योग, कला, क्रीडा अशा क्षेत्रात लोक कल्याणकारी कार्य केले.

अशा या थोर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी 06 मे 1922 रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे कार्य आणि विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात. या लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना माझे कोटी कोटी प्रणाम.

धन्यवाद !
जय हिंद! जय महाराष्ट्र! जय छत्रपती शाहू महाराज!

-: समाप्त :-

सारांश | राजर्षी शाहू महाराज जयंती भाषण मराठी | Rajarshi Shahu Maharaj Jayanti Bhashan Marathi

मित्रांनो वरील लेखात आपण छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त भाषण मराठी मध्ये बघितले. वरील लेखात आपण 4+ अतिशय सुंदर आणि जबरदस्त असे भाषणे बघितली. राजर्षी शाहू महाराजांची थोरवी कितीही गायली तरी कमीच आहे. आम्हाला अशाच नाही तर खात्री आहे की आपल्याला वरील भाषणे नक्कीच आवडली असतील.

आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपल्या मित्रांना, विद्यार्थ्यांना हा लेख जरूर शेअर करा. त्यांनाही याचा फायदाच होईल. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

राजर्षी शाहू महाराज जयंती भाषण मराठी

Rajarshi Shahu Maharaj Jayanti Bhashan Marathi

राजर्षी शाहू महाराज भाषण मराठी

Rajarshi Shahu Maharaj Jayanti Bhashan Marathi

Rajarshi Shahu Maharaj Bhashan Marathi

राजर्षी शाहू महाराज भाषण मराठी

छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती भाषण मराठी

छत्रपती राजर्षी शाहू महाराज भाषण मराठी

राजर्षी शाहू महाराज भाषण मराठी

Rajarshi Shahu Maharaj Bhashan Marathi

Rajarshi Shahu Maharaj Jayanti Bhashan Marathi

Leave a Comment