राजर्षी शाहू महाराज चारोळ्या मराठी (100+ सर्वोत्तम चारोळ्या) | Rajarshi Shahu Maharaj Charolya in Marathi 2023 | राजर्षी शाहू महाराज चारोळी 2023


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

राजर्षी शाहू महाराज चारोळ्या मराठी | Rajarshi Shahu Maharaj Charolya in Marathi 2023 – नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रानो, आज आपण या लेखात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी चारोळ्या मराठी मध्ये बघणार आहोत. आज या लेखात आपण एकूण 100+ अतिशय सुंदर चारोळ्या बघणार आहोत.

लोकनायक, लोकराजा म्हणून ज्यांची ओळख असलेले कोल्हापूर संस्थानाचे राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची 26 जून रोजी जयंती आपण मोठ्या उत्साहात साजरी करतो. शाळेत, कार्यालयात विवीध कार्यक्रम आयोजित करतात. अशा वेळी भाषण सूत्रसंचालन करताना चारोळ्या चा वापर केल्यास भाषणाला सुंदरता येते. या चारोळ्या आपल्याला नक्कीच खूप उपयोगी पडतील.

छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती चारोळी

जातीभेदाविरुद्ध दिला लढा,
शिक्षणाचे केले कार्य महान !
छत्रपती शाहू महाराज आपण,
सदैव आमच्या हृदयी विराजमान !!

ओम बोलल्याने मनाला शक्ती मिळते
साई बोलल्याने मनाला शांती मिळते
राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते
जय शाहूजी बोलल्याने आम्हाला
शंभर वाघाची ताकद मिळते

करवीर नगरीचे प्रागतिक अधिपती !
संगीत, नाट्य, कला, मल्लविद्येला दिली गती !!
अस्पृश्यता निवारक, शिक्षण प्रसारक, रयतेचा सांगती !
प्रजाहितदक्ष, लोकनायक राजर्षी शाहू छत्रपती !!

कोल्हापूरचे राजर्षी काय वर्णू त्यांचे गुणगान !
महाराष्ट्राच्या मातीत त्यांनी घडविले पैलवान !!
सामाजिक चळवळींना, सुधारणांना दिले मानाचे स्थान !
अशा थोर छत्रपतींचा आम्हा सार्थ अभिमान !!

मानवी मनावर चढलेले अस्पृश्यतेच्या धुळीस पुसून काढले !
अशिक्षित समाजाच्या दिव्यात शिक्षणाचे तेल टाकले !!
कितीही आला विरोध समोर तरीही हात ना टेकले !
राजर्षी शाहूंनी समाजाला दिले अनेक दाखले !!

शिक्षणाच्या लढ्यात
दिले गोरगरिबांना
शिष्यवृत्तीचे वरदान !
छत्रपती शाहू महाराज
तर महाराष्ट्राची शान !!

अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत
व स्फूर्तीस्थान छत्रपती शाहू महाराज
यांना त्रिवार मानाचा मुजरा…

इतिहासा तू वळूनी,
पहा पाठी मागे जरा !
झुकवून मस्त करशील,
राजर्षी शाहूंना मानाचा मुजरा !!

हिरे, माणिक, सोने उधळा जयजयकार करा,
सुखदुःखांच्या वादळात हा गरिबांचा वाली,
महाराष्ट्राचा उद्धारक तू, जनतेचा राजा तू,
राजर्षी शाहू महाराज तुम्हाला मानाचा मुजरा.

छत्रपती राजर्षी शाहू महाराज चारोळ्या मराठी

वसा घेतला समाजसुधारणेचा
ठाव घेतला बहुजनांच्या मनाचा
प्रतिकार केला दुष्ट जातीभेदाचा
अभिमान वाटतो महान आमच्या राजाचा

सिंहाची चाल,
गरुडाची नजर,
महिलांचा आदर,
शत्रूचे मर्दन,
असेच असावे मावळ्याचे वर्तन,
ही छत्रपती शाहू महाराजांची शिकवण..

दीनदुबळ्यांचा आधार,
केला शिक्षणात सुधार !
राजर्षी शाहू महाराज,
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार !!

आरक्षणाचे शाहू महाराज प्रणेते,
दुःखीपिढतांचे ते तारण हारते,
होतकरूंच्या कार्याला दिला त्यांनी आधार !!

जाती भेदाची तोडूनी भिंत,
जनता ठेवली त्यांनी सुखात !
समाज रचनेस दिला राजांनी आकार,
मल्लविद्द्येस दिले प्रोत्साहन !
अनेकांचे राजेंनी केले शिक्षण,
आजच्या या दिनी राजर्षी शाहू
महाराज यांना मी प्रणाम करते त्रिवार !!

शिक्षणाचे महत्त्व जाणूनी त्यांनी
बहुजनांना शिक्षित केले
अज्ञानाच्या काळया छायेतूनी
ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेले

शेतीला दिले सर्वोच्च प्राधान्य
दीनदुबळ्यांची दूर केली लाचारी
रयतेचे शोभतात राजे खरे
बहुजनांचे खरे कैवारी.!!

राजर्षी शाहू महाराज चारोळी मराठी | Rajarshi Shahu Maharaj Charoli in Marathi

तळागाळातील लोकांसाठी लढणाऱ्या,
बहुजनांना ज्ञानाचा अधिकार मिळवून देणाऱ्या,
अंधश्रद्धा आणि जातीभेदावर कडाडून प्रहार करणाऱ्या,
शेतीला सुजलाम – सुफलाम करण्यासाठी विविध उपाय योजना राबवणाऱ्या,
अशा या रयतेच्या महान राजाला राजश्री छत्रपती शाहू राजांना
त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

राजर्षी छत्रपती
शाहू महाराज
मानवतावादी राजे
लोकहितवादी राजे
न्यायी राजे
ज्ञानहितवादी राजे
आपले राजे
लोक राजे
असे राजे होणे नाही
त्यांना जयंतीनिमित्त
त्रिवार वंदन

सारांश | राजर्षी शाहू महाराज चारोळ्या मराठी | Rajarshi Shahu Maharaj Charolya in Marathi

मित्रांनो वरील लेखात आपण छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त चारोळ्या मराठी मध्ये बघितल्या. वरील लेखात आपण एकूण 100+ अतिशय सुंदर आणि सोप्या चारोळ्या बघितल्या. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त भाषण देताना ह्या चारोल्यांचा नक्की वापर करा. सूत्रसंचालन करताना देखील या चारोळ्या वापरल्यास आपण श्रोत्यांची मने नक्कीच जिंकू शकता.

आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही मत, विचार किवा मार्गदर्शन असतील तर ते ही कळवा. हा लेख आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

Rajarshi Shahu Maharaj Jayanti Charolya in Marathi

Rajarshi Shahu Maharaj Jayanti Charoli in Marathi
छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती चारोळी

Leave a Comment