गुरुपौर्णिमा भाषण मराठी (5+ सर्वोत्तम भाषणे) | Guru Purnima Speech in Marathi 2023 | Guru Purnima Bhashan Marathi


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

गुरुपौर्णिमा भाषण मराठी | Guru Purnima Speech in Marathi 2023 – नमस्कार मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूंचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरूंच्या शिक्षकांच्या प्रती कृतज्ञा व्यक्त करणे होय. आज आपण या लेखात गुरुपौर्णिमा निमित्त भाषण मराठी मध्ये बघणार आहोत.

गुरुपौर्णिमे च्या दिवशी आपल्या शाळेत विवीध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यावेळी आपण भाषणामध्ये भाग घेतो. सूत्रसंचलन करतो. अशावेळी आपल्याला जबरदस्त भाषणाची आवश्यकता असते. म्हणून आज आपण या लेखात गुरुपौर्णिमा निमित्त 5+ अतिशय सुंदर, सोपे आणि जबरदस्त भाषण मराठी मध्ये घेऊन आलो आहोत. याचा आपल्याला नक्कीच खूप उपयोग होईल. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता भाषणाला सुरुवात करुया.

गुरुपौर्णिमा भाषण मराठी | Guru Purnima Bhashan Marathi – भाषण क्र.01

गुरुपौर्णिमा भाषण मराठी 10 ओळी

  1. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो…
  2. सर्वप्रथम विश्वातील समस्त गुरुजनांना माझा प्रणाम!!
  3. भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना ईश्वराचे स्थान दिले आहे.
  4. कारण गुरु आपल्या अनमोल जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात.
  5. आषाढ शुद्ध पौर्णिमेला ‘गुरुपौर्णिमा‘ किंवा ‘व्यासपौर्णिमा’ असेही म्हणतात.
  6. आपले आई-वडील आपल्याला पंख देतात. त्या पंखात भरारी मारण्याचे बळ गुरुजन देतात.
  7. गुरूंना नेहमी देवतुल्य मानले गेले आहे.
  8. शिष्याच्या मनातील गोंधळ दूर करणारा समाजातील सकारात्मक दृष्टिकोन दाखवणारा गुरु असतो.
  9. एखाद्याच्या अंगी पशुत्व असले तरी त्याला दैवत्व व प्राप्त करण्याची ताकद गुरु मध्ये असते.
  10. गुरु हे आपल्या जीवनातील आदर्श व्यक्ती आहेत. त्यांचा आदर, सन्मान करणं, त्यांची आज्ञा पालन हे आपलं परम कर्तव्य आहे.

गुरुपौर्णिमा निमित्त भाषण | Guru Purnima Bhashan Marathi – भाषण क्र.02

गुरु म्हणजे आहे काशी,
साती तीर्थ तया पाशी !
तुका म्हणे ऐसे गुरु,
चरण त्यांचे हृदयी धरू !!

आदरणीय मुख्याध्यापक, परमपूज्य गुरुजनवर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो… सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या आजच्या या शुभ दिनी विश्वातील समस्त गुरुजनांना माझा प्रणाम…

आषाढ शुद्ध पौर्णिमेला ‘गुरुपौर्णिमा’ साजरी केली जाते. या पौर्णिमेला ‘व्यासपौर्णिमा’ असेही म्हणतात. कारण आधी गुरु व्यासांचा जन्म या पावन दिवशी झाला होता. ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडवले त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय.

गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य,
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती,
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य,
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे
मूर्तीमंत प्रतीक…

गुरु हे तेजस्वी सूर्याप्रमाणे असतात. आपल्या जीवनातील अंधार ते आपल्या ज्ञानाद्वारे दूर करतात. आपल्या संस्कृतीमध्ये गुरुचे स्थान अतिउच्च आहे.

कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर मडके बनवतो. त्याचप्रमाणे गुरु मानव रुपी व्यक्तिमत्त्वाला आपल्या संस्कारांनी आदर्श घडवतात.

गुरूंचे ज्ञान सागराप्रमाणे अथांग आहे. आपले प्रथम गुरु आपले आई वडील असतात. शालेय जीवनात आपले गुरुच आपल्या प्रगतीसाठी नवनवीन ज्ञान देतात.

आपले गुरु आपण जीवनात वाईट मार्ग निवडू नये, गैरवर्तन करू नये म्हणून चूक झाल्यावर शिक्षाही देतात.

आपण आपल्या गुरूंच्या आज्ञेचे पालन करायला हवे. त्यांच्या शब्दांचा आदर करायला हवा. चांगला अभ्यास करून आपल्या गुरूंचा, शाळेचा, आई-वडिलांचा त्याचप्रमाणे देशाचा नावलौकिक करायला हवा.

आयुष्यात जगत असताना आपल्या गुरुने शिकविलेले सदाचरण कायम लक्षात ठेवायला हवे. आणि पुढच्या पिढीकडे संस्कारातून हस्तांतरित करायला हवे. हीच आपल्या गुरुचरणी खरी गुरुदक्षिणा ठरेल! शेवटी जाता जाता एवढेच बोलेल…

गुरु विना ना मिळे ज्ञान…
ज्ञानाविना न होई जगी सन्मान…
जीवन भवसागर तराया…
चला वंदू गुरुराया…

धन्यवाद !!!

गुरु पौर्णिमा भाषण मराठी | Guru Purnima Speech in Marathi – भाषण क्र.03

माननीय मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वर्ग आणि इथे जमलेल्या माझे प्रिय मित्र मैत्रिणींनो! आज आपण ‘गुरुपौर्णिमा‘ साजरी करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. त्याविषयी मी तुम्हाला काही दोन शब्द सांगत आहेत ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी मी नम्र विनंती करते.

गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: |
गुरु: साक्षात परब्रम्ह तस्मै श्रीगुरुवे नमः

आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करतात. हाच दिवस व्यासपौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो. कारण याच दिवशी व्यास ऋषींनी महाभारताचे लेखन केले होते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु ज्ञान देतात. ते ज्ञानाचा प्रकाश आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवतात. म्हणून गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस होय.

माणूस हा सर्व प्राणीमात्रांमध्ये श्रेष्ठ समजला जातो. कारण माणसाजवळ विद्या आहे. ही विद्या देण्याचे काम गुरुच करतात. आपला पहिला गुरु म्हणजे आपले आई – वडील आणि दुसरा गुरु म्हणजे शाळेतील शिक्षक. ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देतात. तीच भूमिका शिक्षक शाळेत पार पाडतात. आई वडील देह देतात, गुरु शाश्वत ज्ञान व कीर्ती देतात.

आईच्या शब्दाप्रमाणे गुरु या शब्दालाही मर्यादा नाही. गुरुशिवाय तरुनोपाय नाही. ज्याप्रमाणे सागराच्या गलबताला योग्य दिशा दाखवण्यासाठी होकायंत्र हवे असते. जर होकायंत्र नसेल तर गलबत भरकटेल. तसेच या मायावी जगात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मानवास योग्य दिशा दाखवण्यासाठी गुरु हवाच! नाहीतर माणूस भरकटेल त्याचा जन्म वाया जाईल.

संत ज्ञानेश्वर, संत कबीर यांसारख्या थोर संतांनीही आपल्या कर्तुत्वाचे श्रेय आपल्या गुरूंना दिले आहे. वाल्मिकींचा आदर्शवाद, व्यासांचा व्यवहार वाद, द्रोणाचार्यांची कर्तव्यनिष्ठा आजही गौरवली जाते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास स्वामी, सचिन तेंडुलकर यांचे गुरु रमाकांत आचरेकर, लता मंगेशकर यांचे गुरु दिनानाथ मंगेशकर अशी भारतीय संस्कृतीतील गुरु शिष्य परंपरा आजही पाहायला मिळते.

भारतीय संस्कृतीत गुरूला अतिशय महत्त्व दिले आहे. गुरु म्हणजे निष्ठा, गुरु म्हणजे श्रद्धा, गुरु म्हणजे भक्ती, गुरु म्हणजे विश्वास, गुरु म्हणजे वात्सल्य, गुरु म्हणजे आदर्श, गुरु म्हणजे अमर्याद ज्ञान, हेच ज्ञान आपण चांगल्या प्रकारे आत्मसात करून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हाच गुरु ऋण फेडण्याचा मार्ग आहे.

आज पर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या तसेच येथील उपस्थित सर्व शिक्षकांना आजच्या गुरु पौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन!!

एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.
धन्यवाद!

गुरुपौर्णिमा भाषण मराठी | Guru Purnima Speech in Marathi – भाषण क्र.04

आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या सर्व बाल मित्रांनो! प्रथम आपण सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! आज पण येथे गुरुपौर्णिमे निमित्त जमलो आहोत. आज मी आपल्यासमोर गुरुपौर्णिमा निमित्त जे काही माझे विचार मांडणार आहे ते आपण शांतचित्ताने ऐकावे ही नम्र विनंती.

स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात,
स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते,
यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात,
त्या प्रयत्नांना बळ येण्यासाठी
गुरूंचे आशीर्वाद लागतात.

आषाढ पौर्णिमेला व्यासपौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा असे म्हणतात. गुरु या शब्दांमध्ये सगळे सामावलेले आहे. गुरूंना नेहमी देवतुल्य मानले गेले आहे. ज्या शिष्याने गुरुला देवतुल्य मानले त्याने यशाची शिखरे गाठल्याची अनेक उदाहरणे दिसतात.

योग्य गुरु भेटल्याशिवाय माणूस आयुष्यात काहीही करू शकत नाही. महर्षी व्यास, गुरु द्रोणाचार्य यांचे रामायण, महाभारतातील आदर्श आजही युवकांना नवी दिशा देतात. आई वडील पंख देतात. त्या पंखात भरारी मारण्याचे बळ गुरुजन देतात.

गुरु परमात्मा परेशु. प्रत्येक विद्या, कला, शास्त्र यांच्या निर्मितीमध्ये गुरु शिष्याची मोठी परंपरा दिसून येते. गुरु – शिष्याचे नाते हे केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसते. शिष्याच्या मनातील वैचारिक गोंधळ दूर करणारा, समाजाला सकारात्मक दिशा दाखविणारा गुरु असतो. खरंच मित्रांनो,

विद्यालय सुटतं पण,
आठवणी कधीच सुटत नाहीत.
आपल्या जीवनात,
गुरु नावाचं पान कधीच तुटत नाही.

आधुनिक काळात सर्वच क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानामुळे प्रगती झाली आहे. तरीसुद्धा वेदकाळापासून ज्ञानदानाचे कार्य व प्रसार गुरु – शिष्य परंपरेनेच झालेला आहे व आजतागायत तो सुरू आहे. संत कबीरांनी लिहून ठेवल्याप्रमाणे “गुरु बिन कौन बतावे बाट” या ओळीची प्रचिती प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला येते. गुरुच्या ज्ञानाने ज्ञानी होऊन ज्ञानाचा योग्य विनियोग शिष्याकडून होऊ शकतो व अनेक आदर्श व्यक्तिमत्व घडवून आपला देश अधिक सुखी आणि समृद्ध होऊ शकतो.

विद्यार्थी मित्रांनो गुरु म्हणजे काय? तर जगातले दुःख नाहीसे करण्याची शक्ती हिऱ्या – मोत्यात नाही. ती दुसऱ्यांचे दुःख पाहून द्रवणाऱ्या आणि अहंकार सोडून त्याच्या सेवेसाठी सज्ज होणाऱ्या मनुष्याच्या चिमुकल्या हृदयात आहे. हेच हृदय म्हणजे गुरु!

तर शिष्य म्हणजे काय? तर शिष्य म्हणजे विद्येची आस असणारा एक नायक. शिष्य ही अशी एक ‘बी’ आहे की, ज्या जमिनीत तुम्ही पेराल तिथे ती फलदायी ठरणारच. शिष्य म्हणजे ज्ञानरूपी सागरात पोहणारा राजहंस. जीवनाशी सांगड घालणारा मूकनायक.

आयुष्य जगत असताना आपल्याला गुरुने शिकविलेले सदाचरण कायम आपण लक्षात ठेवावयास हवे आणि पुढच्या पिढीकडे संस्कारातून हस्तांतरित करायला हवे. हीच आपल्या गुरुचरणी आपली खरी गुरुदक्षिणा ठरेल.

धन्यवाद !

गुरुपौर्णिमा भाषण मराठी | Guru Purnima Speech in Marathi – भाषण क्र.05

दिशादर्शक बाण असतो गुरु…
संस्काराची खाण असतो गुरु…
प्रगतीचे पंख असतो गुरु…
कर्तुत्वाच्या रणांगणांवरील शंखनाद असतो गुरु..!

आदरणीय मुख्याध्यापक, वंदनीय गुरुजन वर्ग उपस्थित मान्यवर आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र-मैत्रिणींनो…
सर्वांना माझा नमस्कार !

आज ‘गुरुपौर्णिमा’ तर आजच्या या विशेष दिवशी विश्वातील समस्त गुरुजनांना माझा प्रणाम! ज्या गुरूंनी आपली व्यक्तिमत्व घडविले त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे ‘गुरुपौर्णिमा’. आपल्या जीवनात गुरूला खूप महत्त्व आहे. ‘गु’ म्हणजे अंधार ‘रू’ म्हणजे सहार. अशा प्रकारे गुरूला अंधार दूर करणारा किंवा अंधारातून प्रकाशाकडे नेणारा असे म्हणले जाते.

आपल्या भारतीय संस्कृतीत गुरूला ईश्वराचे स्थान दिले आहे. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी आदीगुरु महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता. म्हणून या पौर्णिमेला ‘व्यासपौर्णिमा’ असेही म्हणतात.

आपले प्रथम गुरु आपले आई-वडील असतात. तर शालेय जीवनात शिक्षक प्रेरणा, नवनवीन ज्ञान देतात. आपले गुरु हे ईश्वराचे दुसरे रूप आहेत. एखाद्याच्या अंगी पशुत्व जरी असले तरी त्याला दैवत्व प्राप्त करून देण्याची शक्ती गुरूमध्ये असते.

गुरु आपल्या अनमोल जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात आईच्या शब्दाप्रमाणे गुरु या शब्दालाही मर्यादा नाही गुरुशिवाय तर उपाय नाही संत ज्ञानेश्वर संत कबीर यांसारख्या थोर संतांनीही आपल्या कर्तुत्वाचे श्रेय आपल्या गुरूंना दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास स्वामी, सचिन तेंडुलकर यांचे गुरु रमाकांत आचारेकर, लता मंगेशकर यांचे गुरु दीनानाथ मंगेशकर अशी भारतीय संस्कृतीतील गुरु शिष्य परंपरा आजही पाहायला मिळते.

आज पर्यंत जगात ज्या थोर व्यक्ती होऊन गेल्या त्यांच्यावर त्यांच्या गुरूंचाच असीम प्रभाव होता. आपल्या गुरूंचाही आपल्यावर खूप प्रभाव असतो. गुरू प्रमाणे शिष्य घडत असतो. म्हणून आपण आपल्या गुरूंच्या आज्ञेचे पालन करायला हवे. त्यांच्या शब्दांचा आदर करायला हवा. गुरूंचे महत्त्व हे शब्दात व्यक्त करता येणार नाही इतके महान आहे.

शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते –

काय कीर्ती वर्णावी,
गुरूंच्या अगम्य महतीची..!
कठीण प्रसंगीही आठवण होते,
फक्त त्यांच्याच सोबतीची..!

माझ्या सर्व गुरूंना खूप खूप धन्यवाद !! आणि गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!

सारांश | गुरुपौर्णिमा भाषण मराठी | Guru Purnima Speech in Marathi 2023

मित्रांनो वरील लेखात आपण गुरुपौर्णिमा निमित्त भाषण मराठी मध्ये बघितले. येत्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी शाळेत हे भाषण देऊन आपण आपल्या शिक्षकांचे मन नक्कीच जिंकू शकता. वरील लेखात आपण एकूण 5+ अतिशय सुंदर, सोपे आणि जबरदस्त भाषणे बघितली. ही भाषणे लहान मुलांपासून ते मोठया पर्यंत सर्वांसाठी उपयोगी आहे.

आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही मत किंवा विचार असतील तर ते ही कळवा. आपल्या गरजू विद्यार्थ्यांना, मित्रांना हा लेख नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

1 thought on “गुरुपौर्णिमा भाषण मराठी (5+ सर्वोत्तम भाषणे) | Guru Purnima Speech in Marathi 2023 | Guru Purnima Bhashan Marathi”

Leave a Comment