गुरुपौर्णिमा कविता मराठी (5+ सर्वोत्तम कविता) | Guru Purnima Kavita Marathi 2023 | Guru Purnima Poem in Marathi


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

गुरुपौर्णिमा कविता मराठी | Guru Purnima Kavita Marathi 2023 – नमस्कार मित्रांनो, येत्या 03 जुलै रोजी गुरुपौर्णिमा आपण मोठ्या उत्साहात साजरी करतो. या दिवशी शाळेत अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यात तुम्ही भाषणात भाग घेता किंवा कवितेत भाग घेतात. भाषण करताना किंवा सूत्रसंचालन करताना आपल्याला कवितेची गरज लागतेच. भाषणात कविता वापरल्यास आपल्या भाषणाला एक वेगळेच आकर्षण निर्माण होते व श्रोत्यांकडून टाळ्यांचा कडकडाट मिळू शकतो.

आज या लेखात आपण गुरुपौर्णिमा कविता मराठी मध्ये बघणार आहोत. आज या लेखात आपण एकूण 5+ अतिशय सुंदर आणि सोप्या कविता बघणार आहोत. या कविता आपल्याला नक्कीच खूप उपयोगी पडतील याची आम्हाला खात्री आहे. चला तर मित्रांनो कवितेला सुरुवात करुया.

गुरुपौर्णिमा कविता मराठी – कविता क्र.01

// गुरुपौर्णिमा //

ज्यांनी माझे ज्ञान वाढविले !
ज्यांनी माझे जीवन घडविले !!

शिक्षणाच्या त्या महामेरुला !
प्रणाम माझा सर्व गुरूला !!

आई वडील माझे पहिले गुरु !
जीवनाचे शिक्षण तिथे होते सुरू !!

प्राथमिक शिक्षणास केले पदार्पण !
गुरुने दिले मूलभूत शिक्षण !!

माध्यमिकच्या गुरुने सांगितली
शिक्षणाची महती !
तिथून पुढे घेतली शिक्षणाने गती !!

महाविद्यालयीन गुरुने दाविले
नोकरीचे विविध मार्ग !
त्यामुळे जीवन बनले
एक आनंददायी स्वर्ग !!

मित्र नावाच्या गुरुने खूप उपकार केले !
न मागता जीवनाचे खरे शिक्षण दिले !!

जीवनाची तुम्ही वाढवली गती !
तुम्हामुळेच आहे आज जगती कीर्ती !!

जन्मभर विसरणार नाही मी गुरुचे ऋण !
गुरुपौर्णिमेला सर्व गुरूस प्रणाम करतो
मी कवी गोवर्धन !!

महाराष्ट्राची माती YT

गुरु पौर्णिमा कविता मराठी – कविता क्र.02

// गुरु //

आदी गुरुसी वंदावे !
मग साधनं साधावे !!

गुरु म्हणजे मायबाप !
नाम घेता हरतील पाप !!

गुरु म्हणजे आहे काशी !
साती तीर्थ तया पाशी !!

तुका म्हणे ऐसे गुरु !
चरण त्यांचे ह्रदयी धरू !!

संत तुकाराम महाराज

गुरुपौर्णिमा कविता मराठी | Guru Purnima Poem – कविता क्र.03

// गुरु //

जगात सर्व नात्याहून न्यारे,
असते नाते गुरु शिष्यांचे !
झुकून नमन करतात सारे,
जिथे इतिहास लिहिले जातात भविष्याचे !!

सजीव निर्जीवांकडून मिळालेली
प्रेरणा ही गुरुच असते !
मनामध्ये उठलेला आशेचा ध्यास
अन नवनिर्मितीची आसही गुरुच असते !!

काय कीर्ती वर्णावी,
गुरूंच्या अगम्य महतीची !
कठीण प्रसंगीही आठवण होते,
फक्त त्यांच्याच सोबतीची !!

दिशादर्शक बाण असतो गुरु,
संस्काराची खाण असतो गुरु,
प्रगतीचे पंख असतो गुरु,
कर्तुत्वाच्या रणांगणांवरील,
शंखनाद असतो गुरु !

गुरु असतो ध्यास कीर्तीचा,
गुरु असतो श्वास पूर्तीचा,
गुरु असतो मार्ग यशाचा,
गुरु असतो किरण आशेचा.!

शीतल कदम.

गुरुपौर्णिमा कविता मराठी | Guru Purnima Kavita – कविता क्र.04

// गुरुजी //

मातीचा लहानसा गोळा होते,
सुंदर आकाश दिला तुम्ही !
निस्तेज अशा तार्‍यांना,
स्वतःचा प्रकाश दिला तुम्ही !!

हाताला धरून अक्षरे,
गिरवायला शिकवले तुम्ही !
पंख होते कमजोर,
उडायला बळ दिले तुम्ही !!

कधी रागीट नजर,
कधी प्रेमळ स्वर !
कधी शाबासकीची थाप,
पाठीवर दिली तुम्ही !!

अज्ञानाचा अंधकार,
दाटला होता घनघोर !
मार्ग सापडत नव्हता तेव्हा,
दिशा दाखवली तुम्ही !!

ओळखत नव्हते स्वतःला,
मला ओळखले तुम्ही !
संकटांना सामोरे जाण्याचे,
धाडस दिले तुम्ही !!

स्पर्धेचा सागर होता,
स्पर्धक अमाप होते !
बुडण्याची भीती मनात,
पोहायला शिकवले तुम्ही !!

शिकवलेल्या गोष्टीतून,
आजही दिसता तुम्ही !
तुम्ही नसता गुरुजी तर,
घडलोच नसतो आम्ही !!

सविता काळे YT

गुरुपौर्णिमा कविता | Guru Purnima Poem in Marathi – कविता क्र.05

// जीवनाचा शिल्पकार //

कुंभार घडवतो ते मातीचे घडे,
देऊन त्यास विशिष्ट आकार !
आपल्या आयुष्यातील स्वप्ने,
करतो गुरु साकार !!

चढावी कशी वाट काटेरी,
गाठावी कशी आयुष्याची दोरी !!
मदतीस असतो गुरु,
सोपतो आपल्या हाती ज्ञानाची शिदोरी !!

गुरु हा मार्ग दाता खरा,
ज्ञान भंडाराचा !
झळझळ वाहणारा झरा !!

ज्यांच्या पाठी असतो गुरु अवतार,
त्यास नको अजून कुठला आधार !
देतो हा मातीच्या गोळ्यासही आकार,
गुरु हाच खरा जीवनाचा शिल्पकार !!

कृत्तिका दाभाडे

सारांश | गुरुपौर्णिमा कविता मराठी | Guru Purnima Kavita Marathi

मित्रांनो वरील लेखात आपण गुरुपौर्णिमा निमित्त कविता मराठी तून पाहिल्या. वरील लेखात आपण एकूण 5+ अतिशय सुंदर आणि सोप्या कविता बघितल्या. वरील कविता या आमच्या नाहीत. या कविता ज्यांच्या आहेत त्याचे क्रेडिट आम्ही कवितेच्या शेवटी दिलेले आहे. ह्या कविता फक्त शैक्षणिक दृष्टीकोनातून येथे दिलेल्या आहेत.

मित्रांनो आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही मत किंवा विचार असतील तर ते ही कळवा. आपल्या मित्रांना ह्या कविता नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

1 thought on “गुरुपौर्णिमा कविता मराठी (5+ सर्वोत्तम कविता) | Guru Purnima Kavita Marathi 2023 | Guru Purnima Poem in Marathi”

Leave a Comment