शेतकऱ्याची आत्मकथा निबंध मराठी (03+ सर्वोत्तम निबंध) | Shetkaryachi Atmakatha Nibandh Marathi | शेतकऱ्याचे मनोगत निबंध


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

शेतकऱ्याची आत्मकथा निबंध मराठी | Shetkaryachi Atmakatha Nibandh Marathi 2023 – नमस्कार मित्रांनो, अवघ्या जगाचा पोशिंदा, बळीराजा अशा अनेक नावांनी प्रसिद्ध असणारा शेतकरी राजा होय. आज आपण या लेखात शेतकऱ्याची आत्मकथा यावर निबंध मराठी मध्ये बघणार आहोत. आज या लेखात आपण एकूण 3+ अतिशय सुंदर आणि सोपे निबंध बघणार आहोत.

शाळेत आपल्याला शेतकऱ्याची आत्मकथा किंवा शेतकऱ्याचे मनोगत अशा विषयावर निबंध लिहिण्यासाठी सांगितले जाते. आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. त्यामुळे शेतकऱ्यनाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. शाळेत परीक्षेमध्ये शेतकऱ्याची आत्मकथा या विषयी 05 ते 10 गुणांसाठी एक प्रश्न हमखास विचारला जातो. या लेखातील निबंधांचा चांगला अभ्यास करा आणि परीक्षेत चांगले गुण मिळवा.

शेतकऱ्याची आत्मकथा निबंध मराठी – निबंध क्र.01

// मी एक प्रगतिशील शेतकरी //

माझे नाव श्री. सुनिल शिवसिंग जारवाल असे आहे. मी एक शेतकरी आहे. माझा पूर्ण पत्ता मु. पाचपिरवाडी पो. डोंनगाव ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजी नगर असा आहे. माझ्याकडे 25 एकर शेती आहे. त्यातील काही बागायती तर काही कोरडवाहू आहे.

आम्ही पाच भावंड आणि आम्हाला एक बहिण आहे. आम्ही सर्व भावंड एकत्रच राहतो. मी सर्व भावात तीन नंबरचा आहे. माझे मोठे दोन भाऊ माझ्यासोबत शेती करतात. लहान दोन भाऊ शासनात मोठ्या पदावर नौकरीला आहे. आमची एकुलती एक लहान बहीनीचे लग्न एका PSI म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक यांच्यासोबत झाले आहे. बहिणीचे लग्न आम्ही खूप धूम धडाक्यात केले. आता ती सुखाने नांदत आहे.

आमची शेती रस्त्यालगत असल्यामुळे आम्हाला शेतीत कोणतेही पीक घेणे सोपे जाते. आमच्या 25 एकर शेती पैकी पाच एकर शेतीत केशर आंब्याची बाग आहे. पाच एकर शेतीत मोसंबीची बाग आहे. पाच एकर शेतीत अंजीर ची बाग आहे. आमची स्वतःची एक सरकार मान्य भाजीपाला तसेच फळझाडे रोपवाटिका देखील आहे.

आमच्या शेतात 05 विहिरी आणि एक शेततळे आहे. संपूर्ण एका एकरात शेततळे आहे. तीन एकरात आमची भाजीपाला रोपवाटिका आहे. खरे तर मला लहानपणापासूनच रोपवाटिकेची आवड होती. आणि आपल्या शेतकरी मित्रांना मदत म्हणून आम्ही ही रोपवाटिका सुरू केली आहे. आमच्या रोपवाटिकेचे नाव माऊली रोपवाटिका असे आहे.

दरवर्षी या रोपवाटिकेतून आम्ही एक ते दीड कोटी रोपे आम्ही विकतो. यामधून आम्हाला खर्च वजा जाऊन 50 ते 70 लाख रुपये नफा राहतो. रोपवाटिकेत आम्ही टोमॅटो, वांगी, मिरची, फ्लॉवर, पत्ता कोबी, झेंडू, पपई अशा अनेक भाजीपाला रोपांची निर्मिती व विक्री करतो. तसेच फळ झाडांमध्ये आंबा, मोसंबी, सीताफळ, अंजीर, नारळ अशा झाडांची निर्मिती व विक्री आम्ही करतो. रोपवाटिकेतून दरवर्षी आम्हाला एक कोटी रुपयांचा नफा राहतो.

आमच्या शेतात असलेल्या पाच एकर केशर आंब्याच्या बागेतून दरवर्षी आम्हाला 50 ते 70 लाखांचा नफा राहतो. पाच एकर मोसंबीच्या बागेतून सरासरी तेवढाच नफा राहतो. त्याचप्रमाणे अंजीर च्या शेतीतून आम्हाला दर वर्षी एक कोटी रुपयांच्या जवळपास नफा राहतो.

कारण आम्ही अंजीर हे सरळ बाजारात विकत नाही. आम्ही आमची स्वतःची एक कंपनी बनवली आहे. त्याचे नाव आहे हरी ओम विठ्ठल. त्यामध्ये आम्ही अंजीर वर प्रक्रिया करतो. त्यावरून सुके अंजीर, जॅम असे अनेक प्रोडक्ट बनऊन बाजारात विकतो. आम्ही स्वतःचा ब्रँड बनवला आहे. आणि आम्ही गुणवतत्ते बाबत कोणतीही तडजोड करीत नाही.

आमच्याकडे 50 हजार पक्षांचे पोल्ट्री फार्म देखील आहे. ते आम्ही स्वतः बघत नाही. ते आम्ही कंपनीला भाडे तत्वावर दिलेलं आहे. त्यामधून आम्हाला वार्षिक 05 ते 10 लाख मिळतात. आमच्याकडे 10 जर्सी 05 गिर तसेच 05 गावरान गायी देखील आहे. 05 म्हशी आहेत. 04 बैल आहे. यांची देखभाल करण्यासाठीं आम्ही एक सालगडी ठेवलेला आहे. त्यांच्यासाठी एक एकर हिरवा गवत केलेला आहे.

आमच्या एकूण 25 एकर जमिनीतून फळाबग, रोपवाटिका, पोल्ट्री फार्म, कंपनी ची जागा वगळता 4 ते 05 एकर शेतात कापूस, बाजरी, गहू, व इतर भाजीपाला घेतला जातो. आमचा स्वतः चा 20 गुंठ्यांत एक बंगला आहे. तेथे आम्ही सर्व आमच्या आई सोबत एकत्रच राहतो. स्वतःच्या घरासाठी शेंद्रिय पद्धतीने पिकविलेला भाजीपाला व धान्य आम्ही खातो.

आमच्याकडे आमची एक फॉर्चूनार, एक Innova Crista, एक ट्रॅक्टर, दोन टेम्पो अशा गाड्या आहेत. आमच्या कडे एकूण 10 ते 15 लोकांना वर्षभर रोजगार असतो.

आई वडीलांच्या आशीर्वादाने, देवाच्या कृपेने आम्ही सर्व खूप सुखी आणि समाधानी आहोत. आता इथून पुढे समाजामध्ये बदल घडविण्याच्या दृष्टीने मी कार्य करीत आहे. विशेष म्हणजे शेतकरी वर्गाला आधुनिक शेती कडे वळविण्याचा तसेच त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे.

त्यासाठी मी एक संस्था देखील स्थापन केली आहे. त्यामध्ये एक WhatsApp Group बनविले आहे. त्यावर जवळपासचे सर्व शेतकरी बांधव जोडलेले आहे. शेती बद्दल आधुनिक माहिती मी व आमचे कृषी तज्ञ असलेले आमचे मित्र संदेश टाकत असतो. त्याचप्रमाणे दरमहिन्याला आमच्या शेतात किंवा गावात कृषी शाळेचे आयोजन केले जाते.

कृषी प्रयोग शाळेत आम्ही प्रगतिशील शेतकरी, कृषी तज्ज्ञ, कृषी अधिकारी यांना आमच्या शेतकरी मित्रांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करतो. यामुळे शेतकरी वर्गात एक नवचैतन्य निर्माण होते. पारंपरिक पद्धतीने शेती केल्याने फक्त खर्च वाढतो. परंतु शेतकऱ्याच्या हातात काहीच येत नाही. अशा अनेक बाबीची चर्चा या कृषी प्रयोग शाळेत होते.

शासनाकडून वेळोवेळी राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती तसेच त्या योजनेचा फायदा प्रत्येक पात्र शेतकर्याला व्हावा यासाठी मी नेहेमी प्रयत्न करतो. यासाठी मला नेहेमी आमच्या गावातील सरपंच मित्र, ग्रामसेवक मित्र, तलाठी मित्र, तहसीलदार साहेब, पंचायत समिचे सभापती व विस्तार अधिकारी साहेब, आमच्या तालुक्याचे कृषी अधिकारी साहेब तसेच तालुक्याचे आमदार साहेब यांची वेळोवेळी मोलाची मदत होते.

-: समाप्त :-

शेतकऱ्याची आत्मकथा निबंध मराठी – निबंध क्र.02

माझे नाव किसन रामराव पाटील असे आहे. मी एक शेतकरी आहे. मी राहणार मु. देऊळगाव ता. पाटण जि. सोलापूर येथील रहिवाशी आहे. मला वडिलोपार्जित 04 एकर शेती आहे. माझी सर्व शेती कोरडवाहू आहे.
माझ्याकडे दोन बैल आणि एक गाय आहे.

मी एक गरीब शेतकरी आहे. मी एका लहानशा झोपडी मध्ये राहतो. मला दोन मुली आहेत. दोघीही तालुक्याच्या ठिकाणी शिकायला आहेत. मी शेतात दिवस-रात्र मेहनत करून माझ्या कुटुंबाचे पालन पोषण करतो.

मी सकाळी लवकर उठतो. गाय, बैल यांना चारा देतो. सूर्य उगवताच मी शेताकडे निघतो. दिवसभर कडक उन्हामध्ये मी शेतात राब राब राबतो. त्यानंतर जेवण करून मी पुन्हा माझ्या कामाला लागतो. कितीही ऊन असो, थंडी असो किंवा जोरदार पाऊस मी न थकता माझे काम प्रामाणिकपणे पार पाडतो.

एवढे कष्ट करून सुद्धा मला त्याचा मोबदला मिळत नाही. मी चांगल्या शाळेमध्ये माझ्या मुलींना शिक्षण देऊ शकत नाही. शेतातील धान्य विकून थोडे फार पैसे मिळतात. त्यावरच माझा उदरनिर्वाह होतो. आज सर्वजण गाव सोडून शहराकडे जाऊ लागले आहेत. गाव ओस पडू लागली आहेत. अनियमित पाऊस दुष्काळ यामुळे शेतीचे नुकसान होत चालले आहे.

अशा परिस्थितीत माझ्या कुटुंबाचे पालन कसे करायचे? याचा मला प्रश्न पडला आहे. परंतु माझ्या आत्मविश्वास कमी झाला नाही. मी अहोरात्र मेहनत करण्यास सदैव तयार आहे. एक शेतकरी म्हणून मला निसर्गाने जे काम सोपवले आहे. ते मी प्रामाणिकपणे पूर्ण करतो. शेतकरी असल्याचा मला अभिमान आहे. देश सेवेमध्ये माझा हातभार लागतो. याचा मला अभिमान आहे. मी कायम माझ्या देशाची सेवा करत राहील.

-: समाप्त :-

शेतकऱ्याची आत्मकथा निबंध मराठी | शेतकऱ्याचे मनोगत निबंध
– निबंध क्र.03

होय मी शेतकरी आहे. माझे काम शेतीची मशागत आहे. जेणेकरून धान्य तयार करून मी लोकांना पोसण्याचे काम करतो. म्हणूनच तर मला जगाचा पोशिंदा संबोधतात. माझे संपूर्ण आयुष्य पीक वाढवणे, त्याची काळजी घेणे यासारख्या कामात घालवले जाते. मी आज माझं तुडुंब भरलेलं मन मोकळ करण्यासाठी तुमच्याशी संवाद साधत आहे.

आपल्या भारत देशाला कृषीप्रधान देश म्हणतात. शेती हा आपल्या देशाचा आर्थिक व्यवस्थेचा मुख्य आधार आहे. म्हणूनच असे ऐकले जाते की भारतातील 70% लोक शेतकरी आहेत. पण शेतकऱ्यांवर होणारे अन्याय यावर कोणीच लक्ष देत नाहीत. माझे संपूर्ण आयुष्य मोठ्या अडचणी मधून जाते. माझे काम दिसते तितके सोपे नाही. मला बारा महिने काम करावे लागते आणि त्यात सुट्टी नाही. मला माझे काम अत्यंत प्रामाणिकपणे आणि समर्पणाने करावे लागतात.

माझे जीवन खूप कठीण आहे. परंतु तरीही मी जीवनात आनंदाने जगतो. शेत हा फक्त जमिनीचा तुकडा नाही, ते माझे जीवन आहे. ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मुलाचा सांभाळ करता. त्याच प्रकारे मी माझ्या शेतांचा सांभाळ करतो. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात काम करतो. उन्हाळ्याच्या कडाक्याच्या उन्हात काम करणे सोपे नाही पण तरीही मी कठोर परिश्रम करतो. माझा घाम डोक्यापासून पायापर्यंत धबधब्यासारखा वाहतो.

जुन्या काळात माझी स्थिती चांगली होती. मी दोन वेळा अन्न गोळा करायचो. पण आजकाल माझी अवस्था वाईट झाली आहे. आज पिकांच्या पेरणीसाठी बियाणांची किंमत देखील जास्त झाली आहे. आणि खते सुद्धा दिसत नाही. तरीही मी हे सर्व विकत घेण्यासाठी मोठ्या कष्टाने इकडून तिकडून बियाणे आणि खते उधार घेतो. अतिशय कष्ट घेऊन मी पीक उभे करतो.

पण माझे नशीब इतके वाईट आहे की, कधीकधी पाऊस येत नाही आणि कधी कधी इतका पडतो की माझे संपूर्ण पीक उध्वस्त होते. तेव्हा मला नुकसान भरपाई ही मिळत नाही. आणि कर्ज इतके वाढत जाते की जगणे अवघड होते. पण कुठेतरी माझ्या मनात आशा आहे की पुढील पीक चांगले होईल. म्हणून मी पुन्हा कठोर परिश्रम करतो.

जेव्हा चांगले पीक येते तेव्हा रोग राई, कमी भाव यांसारख्या संकटांना सामोरे जावे लागते. त्यातून खर्चही भागत नाही. तेव्हा कुठेतरी आयुष्य उध्वस्त झाल्यासारखे वाटते. जगण्याची उमेद संपून जाते. निसर्गाने मला अन्न उत्पादनाचे काम सोपवले आहे. पण जेव्हा मी हे काम करण्यात अयशस्वी होतो तेव्हा मी अत्यंत निराशेमध्ये बुडतो.

शेवटी एकच सांगतो की, आम्हा शेतकऱ्यांवर अशीच वेळ कायम राहिली, तर लवकरच ती वेळ येईल जेव्हा अन्नाचा तुटवडा निर्माण होईल आणि सर्वांवर उपासमारीची वेळ येईल.

-: समाप्त :-

सारांश | शेतकऱ्याची आत्मकथा निबंध मराठी | Shetkaryachi Atmakatha Nibandh Marathi

मित्रांनो, वरील लेखात आपण शेतकऱ्याची आत्मकथा निबंध मराठी मध्ये बघितले. वरील लेखात आपण एकूण 3+ अतिशय सुंदर निबंध बघितले. ही निबंध आपल्याला शाळेत नक्कीच उपयोगी पडतील याची आम्हाला खात्री आहे. वरील लेखात आपण शेतकऱ्याचे मनोगत निबंध बघतले.

आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही मत किंवा विचार असतील तर ते ही कळवा. आपल्या मित्रांना हा लेख नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

या लेखाचे शीर्षक असेही असू शकते –

  • शेतकऱ्याचे मनोगत निबंध मराठी
  • शेतकऱ्याचे मनोगत निबंध
  • शेतकऱ्याचे आत्मवृत्त निबंध मराठी
  • शेतकऱ्याचे आत्मवृत्त निबंध
  • shetkaryache atmavrutta nibandh
  • shetkaryache atmavrutta
  • शेतकऱ्याची आत्मकथा निबंध
  • Shetkaryachi Atmakatha Nibandh
  • शेतकऱ्याचे आत्मकथन
  • शेतकऱ्याचे मनोगत आत्मकथन निबंध मराठी
  • शेतकऱ्याचे मनोगत निबंध लेखन
  • Shetkaryachi Atmakatha Nibandh Marathi
  • शेतकऱ्याचे आत्मवृत्त निबंध मराठी
  • shetkaryache atmavrutta nibandh

Leave a Comment