माझी शाळा निबंध 20 ओळी (03+ अतिशय सुंदर व सोपे निबंध) | 20 Lines On My School in Marathi | माझी शाळा निबंध मराठी 20 ओळी


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

माझी शाळा निबंध मराठी 20 ओळी | 20 Lines On My School in Marathi – नमस्कार मित्रांनो, उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या आहेत. आता शाळा सुरू झाल्या आहेत. शाळेत गुरुजी आपल्याला माझी शाळा या विषयावर निबंध लिहिण्यासाठी सांगतात. तर आज आपण या लेखात माझी शाळा निबंध मराठी 20 ओळी यावर 03+ अतिशय सुंदर निबंध बघणार आहोत.

ही 20 ओळीची निबंध आपल्याला नक्कीच उपयोगी पडतील याची आम्हाला खात्री आहे. शाळेत परीक्षेत देखील यावर 5 ते 10 मार्क साठी प्रश्न नक्की विचारले जातात. हा लेख आपल्या खूप उपयोगी पडेल. चला तर मित्रांनो निबंधाला सुरुवात करुया.

माझी शाळा निबंध मराठी 20 ओळी | 20 Lines On My School in Marathi – निबंध क्र. 01

 1. माझ्या शाळेचे नाव श्री. गणेश विद्यालय देवगाव रंगारी हे आहे.
 2. माझी शाळेत पहिली ते बारावी पर्यंत चे वर्ग आहेत.
 3. माझ्या शाळेला खूप मोठे मैदान आहे.
 4. माझ्या शाळे भोवती खूप मोठी झाडे आहेत.
 5. आमच्या शाळेत एक मोठे गार्डन सुधा आहे.
 6. आमचे सर्व शिक्षक वृंद हे खूप हुशार आहेत.
 7. ते आम्हाला खूप चांगले शिकवतात तसेच योग्य मार्गदर्शन देखील करतात.
 8. शाळेत माझे खूप सारे मित्रही आहेत.
 9. आम्ही रोज दुपारच्या सुट्टीत खेळ खेळतो.
 10. आमच्या शाळेचे मुखयाध्यापक हे श्री. चोपडे गुरुजी आहेत.
 11. ते खूप हुशार आणि शिस्तप्रिय शिक्षक आहेत.
 12. माझ्या शाळेची इमारत खूप भव्य आणि सुंदर आहे.
 13. माझ्या शाळेत सभागृह, वाचनालय, संगणक कक्ष, प्रयोगशाळा, स्वच्छतागृह आणि खेळाचे मोठे मैदान आहे.
 14. माझ्या शाळेचा परिसर नेहमी स्वच्छ व सुंदर असतो.
 15. माझ्या शाळेत सर्व शिक्षक प्रेमळ प्रतिभावान आहेत.
 16. ते आम्हाला फक्त शिक्षणाच नाही तर चांगले संस्कार व मार्गदर्शनही देतात.
 17. माझ्या शाळेत शिस्तीला फार महत्त्व आहे.
 18. माझ्या शाळेत मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून अनेक स्पर्धा, राष्ट्रीय सण, जयंती असे कार्यक्रम आयोजित केले जातात.
 19. माझ्या शाळेत शिक्षणाबरोबरच विद्यार्थी हा भारताचा सुजाण नागरिक कसा तयार होईल याकडे लक्ष दिले जाते.
 20. या सर्व वैशिष्ट्यांमुळेच माझी शाळा आदर्श शाळा आहे. मला माझ्या शाळेचा खूप अभिमान वाटतो.

माझी शाळा निबंध मराठी 20 ओळी | 20 Lines On My School in Marathi – निबंध क्र. 02

 1. माझी शाळा ज्ञानाचे मंदिर आहे.
 2. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा पाचपीरवाडी हे आहे.
 3. माझी शाळा तालुक्यातील एक आदर्श शाळा आहे.
 4. माझ्या शाळेची इमारत खूप प्रशस्त आणि सुंदर आहे.
 5. माझ्या शाळेत आठ वर्ग खोल्या, सुसज्ज संगणक कक्ष, क्रीडांगण, सभागृह, वाचनालय, प्रयोगशाळा इत्यादी सोई सुविधा आहेत.
 6. माझ्या शाळेचा परिसर नेहमी स्वच्छ असतो.
 7. माझ्या शाळेचे शिक्षक खूपच प्रेमळ आहेत.
 8. ते आम्हा सर्व मुलांना खूप छान शिकवतात.
 9. माझे शिक्षक माझे खरे मित्र व मार्गदर्शक आहेत.
 10. माझी शाळा खेळ तसेच इतर सर्व उपक्रमात नेहमी आघाडीवर असते.
 11. मी शाळेतील सर्व उपक्रमात सहभागी होतो.
 12. माझ्या शाळेत सर्व थोर नेत्यांच्या जयंती, पुण्यतिथी इ. साजरी केल्या जातात.
 13. मला माझ्या शाळेचा अभिमान वाटतो.
 14. कारण माझी शाळा फक्त शिकवण्याचे काम करीत नाही तर आम्हा मुलांवर उत्तम संस्कार करते.
 15. माझ्या शाळेत विविध स्पर्धाही आयोजित केल्या जातात.
 16. मला चित्रकलेची स्पर्धा खूप आवडते.
 17. आम्हीं सर्व मित्र मिळून शाळेत खूप मजा करतो.
 18. आम्ही शाळेत विविध खेळ खेळतो.
 19. मला माझी शाळा माझे दुसरे घर वाटते.
 20. मला माझी शाळा खूप आवडते.

माझी शाळा निबंध मराठी 20 ओळी | My School Essay in Marathi 20 Lines – निबंध क्र. 03

 1. माझ्या शाळेचे नाव रेश्माई विद्यामंदिर असे आहे.
 2. शाळा माझ्या घराच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे मी रोज शाळेत चालत जातो.
 3. आमच्या शाळेची इमारत चार मजली आहे.
 4. तिथे सकाळची आणि दुपारची अशी दोन सत्रे भरतात.
 5. शाळेत भोवती मोठे मैदान आहे. ते आम्हाला खूप आवडते. कारण तिथे खेळायला मिळते.
 6. तसेच शाळेने एक छोटी बागही केली आहे.
 7. त्या बागेत वेगवेगळी औषधी वनस्पती लावलेली आहेत.
 8. तिथे आम्हाला बागकाम करायला नेतात.
 9. आमच्या शाळेतले ग्रंथ संग्रहालय मोठे आहे.
 10. आम्हाला मोकळ्या तासाला तिथून पुस्तके वाचायला देतात. घरीही न्यायला देतात.
 11. शाळेतील प्रयोगशाळा, चित्रकला वर्ग आणि संगणक कक्ष सुद्धा खूप आधुनिक आहे.
 12. आमचे शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रशांत थोरात सर खूप उत्साही आहेत.
 13. सगळीकडे ज्या काही अंतरशालेय स्पर्धा भरतात, त्या सर्व स्पर्धा मध्ये भाग घ्यायला ते आम्हाला पाठवतात.
 14. खेळातही आमची शाळा पुढे आहे.
 15. आंतर शालेय खो-खोचा फिरता चषक गेल्या वर्षी आम्हालाच मिळाला.
 16. आमचे शिक्षकही खूप मनमिळावू असल्यामुळे शाळेत जाणे हा आनंदाचा अनुभव होतो.
 17. आमचे सर्व शिक्षक प्रेमळ आहेत पण तेवढेच शिस्तप्रिय देखील आहे.
 18. शिक्षक आम्हाला खूप चांगले शिकवतात. त्याच बरोबर आमच्यावर चांगले संस्कार देखील करतात.
 19. आम्ही सर्व मिञ मिळून शाळेत खूप धम्माल करतो.
 20. माझी शाळा एक आदर्श शाळा आहे. त्यामुळे मला माझी शाळा खूप आवडते.

सारांश | 20 Lines On My School in Marathi | माझी शाळा निबंध 20 ओळी

मित्रांनो आपल्याला आपल्या शाळेचे अभिमान असते. शाळा ही विद्येचे मंदिर असते. वरील लेखात आपण माझी शाळा निबंध मराठी यावर 20 ओळी बघितल्या. वरील लेखात आपण माझी शाळा निबंध मराठी 20 ओळी यावर 03+ अतिशय सुंदर आणि सोपे निबंध बघितले. ही निबंध आपल्याला खूप उपयोगी पडतील.

आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही विचार किंवा मत असतील तर ते ही कळवा. आपल्या मित्रांना हा लेख नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

1 thought on “माझी शाळा निबंध 20 ओळी (03+ अतिशय सुंदर व सोपे निबंध) | 20 Lines On My School in Marathi | माझी शाळा निबंध मराठी 20 ओळी”

Leave a Comment