जागतिक योग दिन भाषण मराठी 2023 (03+ सर्वोत्तम भाषणे) | International Yoga Day Speech in Marathi | Yoga Day Speech in Marathi 2023


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

जागतिक योग दिन भाषण मराठी 2023 | International Yoga Day Speech in Marathi 2023 – नमस्कार मित्रांनो, 21 जून रोजी आपण जागतिक योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतो. आपल्या भारतीय संस्कृतीने जगाला ‘योग’ ही एक अनमोल देणगी दिलेली आहे. आपण आपल्या शाळा, कॉलेज, कार्यालयामध्ये जागतिक योग दिन साजरा करतो. अशावेळी आपल्या भाषण, सूत्रसंचालन करावे लागते.

आज आपण या लेखात जागतिक योग दिनाविषयी भाषण मराठी मध्ये बघणार आहोत. आज आपण या लेखात एकूण 03+ अतिशय सुंदर आणि सोपे जागतिक योग दिन भाषण (International Yoga Day Speech in Marathi) बघणार आहोत. ही भाषणे आपल्याला नक्कीच उपयोगी पडतील याची आम्हाला खात्री आहे. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता भाषणाला सुरुवात करुया.

जागतिक योग दिन भाषण मराठी | Yoga Day Speech in Marathi – भाषण क्र.01

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सन्माननीय व्यासपीठ, प्रमुख पाहुणे आणि उपस्थित सर्व माझ्या मित्रांनो! आज 21 जून म्हणजेच जागतिक योग दिवस होय. आपले आरोग्य जर चांगले असेल तर आपण आयुष्यातील सर्व गोष्टीचा आनंद घेऊ शकतो. आणि आरोग्य चांगले राहण्यासाठी योगा करणे हे खूप महत्त्वाचे आहे. आज मी आपल्यासमोर जागतिक योग दिवस आपण का साजरा करतो? योगाचे आपल्या जीवनातील महत्त्व काय आहे? योगाची उत्पत्ती आपल्या भारतात कशी झाली? योगाचा इतिहास अशा सर्व बाबींची माहिती आपल्याला सांगणार आहे. ती माहिती आपण शांत चित्ताने ऐकावी ही नम्र विनंती.

पहिला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ 21 जून 2015 रोजी जगभरात साजरा करण्यात आला. भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत केलेल्या भाषणात आंतरराष्ट्रीय योग दिनाची घोषणा केली. ही भारत देशासाठी अभिमानाची बाब ठरली.

भारत देशात प्राचीन काळी योगाचा जन्म झाला. भारतीय संस्कृतीत योगास खूप महत्त्वाचे स्थान आहे. योगामुळे आपले शरीर व मन निरोगी ठेवले जाते. योगामध्ये अनेक असाध्य रोग बरे करण्याची अद्भुत क्षमता आहे. योग्य केवळ व्यायाम नाही. तर तो शरीर व मन एकत्र जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतो. योगाचे दोन अर्थ आहेत. (1) समाधी व (2) जोडणे. म्हणजेच जोपर्यंत आपण स्वतःचा स्वतःशी संपर्क साधत नाही तोपर्यंत आपण समाधीवर खऱ्या अर्थाने पोहोचत नाही.

आजच्या आधुनिक बदलत्या जीवनशैलीत योगाचे स्थान मोलाचे आहे. आज आपणांसमोर कोरोना सारखी महामारी, कित्येक प्रकारचे शारीरिक, मानसिक आजार, अनेक प्रकारची आव्हाने, वाढत्या जबाबदाऱ्या, प्रत्येक क्षेत्रातील वाढत्या स्पर्धा, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वाढता वापर अशा अनेक समस्या आ वासून आहेत.

यामुळे आपले शारीरिक तसेच मानसिक संतुलन धोक्यात आले आहे. आपण निसर्गापासून दूर चाललो आहोत. यावर योगासारखे प्रभावी दुसरे औषध नाही. योग एक विज्ञान, औषध आणि शिस्तबद्ध जीवनशैली आहे. 21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे. त्याप्रमाणे योगामुळे माणसाला दीर्घ आयुष्य लाभते. नियमित योग केल्याने आपण सुखी आरोग्यदायी जीवन जगू शकतो. त्यासाठी गरज आहे योगाची व योगाभ्यासाची.

2023 च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला संयुक्त राष्ट्र संघ कमिशनने ‘Yoga for Vasudhaiva Kutumbkam’ असे नाव दिले आहे. आजच्या या पावन दिनी आपण स्वतःशी संकल्प करूया. की आपल्या आयुष्यात नियमित योग करून आपले आरोग्य सुधारुया. आणि योगाचे महत्त्व इतरांनाही पटवून देऊ. पुन्हा एकदा आपण सर्वांना माझ्याकडून जागतिक योग दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.
जय हिंद! जय महाराष्ट्र! जय योग!

जागतिक योग दिन भाषण मराठी | Yoga Day Speech in Marathi – भाषण क्र.02

तुमचे यश तीन गोष्टींनी मोजले जाते.
धन, प्रसिध्दी आणि मन शांती.
धन व प्रसिद्धी तर कोणीही मिळवून घेतो
परंतु मनाची शांती फक्त योग केल्यानेच प्राप्त होते.

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सन्माननीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग, आणि माझ्या बाल मित्रांनो, आज मी आपल्यासमोर जागतिक योग दिनाविषयी दोन शब्द सांगणार आहे ते आपण शांतचित्ताने ऐकावे ही नम्र विनंती.

नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! मित्रांनो आज संपूर्ण विश्व कोरोना रुपी राक्षसाच्या कचाट्यातून नुकतेच बाहेर पडले आहे. मित्रांनो पण हे नक्की, ज्याचे शरीर चांगले, ज्याची रोगप्रतिकारशक्ती चांगली, तो या कोरोना सारख्या कितीही मोठ्या राक्षसाशी दोन हात करू शकतो.

आजवर आपण उठल्यापासून तर झोपेपर्यंत पैशांच्या मागे धाव धाव धावत होतो. या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी नुसतीच धावपळ सुरू असते. पण कोरोनाने शिकवले की आपल्या निरोगी शरीराशिवाय कोणतीच संपत्ती मोठी नाही.

म्हणून मित्रांनो आपल्या शरीराची काळजी घ्या. आणि आपले शरीर निरोगी आणि स्वस्त ठेवण्यासाठी योगा हा अतिशय उत्तम पर्याय आहे.

दुनिया को खुशाल बनाये!
चलो चले योग अपणाये!!

मित्रांनो योगा करण्यामुळे आपल्या शरीराबरोबर आपले मनही निरोगी राहते. आणि डिप्रेशन, बीपी, शुगर सारखे आजार आपल्या जवळही फिरकत नाही.

मित्रांनो सुशांत सिंह राजपूत सारखा प्रसिद्ध कलाकारही डिप्रेशन मुळे आत्महत्या करतो. अहो काय कमी होते त्याला? प्रसिद्धी, पैसा, सुदृढ शरीर सर्व काही होते त्याच्याजवळ. फक्त आणि फक्त एकाच गोष्टीची कमी होती ती म्हणजे सुदृढ मन! आणि हो मित्रांनो तुम्हाला जर शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या निरोगी व्हायचे असेल तर दररोज न चुकता एक तास योगा करायचाच…

तर मित्रांनो आज 21 जून म्हणजेच जागतिक योगा दिन या दिवशी आपण सर्वांनी शपथ घेऊया की रोजचा एक तास आपल्या शरीरासाठी देणार. रोज एक तास न चुकता योगा करणार. शरीर व मनाला स्वस्थ ठेवणार.

जय हिंद! जय महाराष्ट्र! जय योग!

जागतिक योग दिवस भाषण मराठी | Yoga Day Bhashan Marathi – भाषण क्र.03

शरीराशी प्रेम आहे तर आसन करा
श्वासांशी प्रेम आहे तर प्राणायाम करा
आत्म्याशी प्रेम आहे तर ध्यान करा
आणि परमात्म्याशी प्रेम आहे तर समर्पण करा

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सन्माननीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग, आणि माझ्या बाल मित्रांनो, आज मी आपल्यासमोर जागतिक योग दिनाविषयी दोन शब्द सांगणार आहे ते आपण शांतचित्ताने ऐकावे ही नम्र विनंती.

21 जून हा दिवस संपूर्ण विश्वभरात योगा दिवस म्हणून साजरा केला जातो. निरोगी शरीर तसेच स्वस्थ मनासाठी योगा अतिशय आवश्यक आहे. दररोज योगा केल्याने शरीराला ऊर्जा तसेच मनाला शांती मिळते. सन 2015 पासून हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो.

भारतीय संस्कृतीमध्ये योगाला खूप महत्त्व आहे. आजच्या धावपळीच्या काळात आपण योगाच्या माध्यमातून आपले शरीर आणि मन निरोगी ठेवू शकतो. आपल्या रोजच्या जीवनात दैनंदिन कार्य करण्यासाठी स्वस्थ शरीराची गरज असते. योगामुळे आपण मोठ्या मोठ्या आजारावर मात करू शकतो. तसेच मानसिक ताणतणाव सुद्धा दूर करू शकतो. शरीर आणि मन दोन्ही सशक्त आणि सक्षम करण्यासाठी योगासन हे रामबाण उपाय आहे.

योगा ही भारतीय संस्कृतीची जगाला दिलेली अनमोल देणगी आहे. योगाचे महत्त्व भारताने संपूर्ण विश्वाला पटवून दिले आहे. त्यामुळेच हा दिवस जागतिक पातळीवर साजरा केला जातो. आपण आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे नेऊन योगाचा प्रसार आणि प्रचार केला पाहिजे.

आज 21 जून रोजी आपण सर्व प्रतिज्ञा करुया. रोज एक तास तरी योगासन करून शरीर व मन निरोगी ठेवू. आणि इतरांनाही योग करण्यासाठी प्रवृत्त करू. सर्वांचे आरोग्य निरोगी ठेवू. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.

जय हिंद! जय महाराष्ट्र! जय भारत!

सारांश | International Yoga Day Speech in Marathi | जागतिक योग दिन भाषण मराठी

मित्रांनो वरील लेखात आपण जागतिक योग दिनाविषयी भाषण मराठी मध्ये बघितले. वरील लेखात आपण एकूण 03+ अतिशय सुंदर आणि सोपे भाषण बघितले. आपल्याला जागतिक योग दिनाविषयी भाषण, सूत्रसंचालन करताना ही भाषणे खूप उपयोगी पडतील याची आम्हाला खात्री आहे.

आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न कसा वाटला? आम्हला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही मत किंवा मार्गदर्शन असतील तर ते ही कळवा. आपल्या मित्रांना हा लेख नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

या लेखाचे शीर्षक असेही असू शकते –

  • International Yoga Day Speech in Marathi
  • जागतिक योग दिन भाषण मराठी
  • आंतरराष्ट्रीय योग दिवस भाषण मराठी
  • आंतरराष्ट्रीय योगा दिवस भाषण मराठी
  • आंतरराष्ट्रीय योग दिवस भाषण
  • आंतरराष्ट्रीय योग दिन भाषण मराठी
  • International Yoga Day Speech in Marathi
  • International Yoga Day Bhashan in Marathi
  • International Yoga Day Bhashan Marathi

2 thoughts on “जागतिक योग दिन भाषण मराठी 2023 (03+ सर्वोत्तम भाषणे) | International Yoga Day Speech in Marathi | Yoga Day Speech in Marathi 2023”

Leave a Comment