जागतिक पर्यावरण दिन भाषण मराठी (05+ सर्वोत्तम भाषणे)| Jagtik Paryavaran Din Bhashan Marathi 2023 | World Environment Day Speech in Marathi 2023


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

Jagtik Paryavaran Din Bhashan Marathi | जागतिक पर्यावरण दिन भाषण मराठी – नमस्कार मित्रांनो, प्रथम आपणास व आपल्या परिवारास जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! मित्रांनो दरवर्षी दिनांक 05 जून रोजी आपण आपल्या शाळेत, कार्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा करतो. अशावेळी आपल्याला भाषण द्यावे लागते.

आज आपण या लेखात जागतिक पर्यावरण दिन या विषयी 5+ अतिशय सुंदर आणि सोपे भाषण बघणार आहोत. हे भाषण लहान मुलांना तसेच मोठ्या व्यक्तींना देखील खूप उपयुक्त ठरणार आहे, याची आम्हाला खात्री आहे. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता भाषणाला सुरुवात करुया.

जागतिक पर्यावरण दिन भाषण मराठी – भाषण क्र.01

जागतिक पर्यावरण दिन भाषण 10 ओळी | World Environment Day Speech in Marathi

  1. पर्यावरण ही निसर्गाने आपल्याला दिलेली अमूल्य देणगी आहे.
  2. पर्यावरण म्हणजे आपण ज्या परिसरात राहतो, यात जैविक आणि अजैविक दोन्ही घटक असतात.
  3. जैविक घटकांमध्ये मानव, प्राणी आणि वनस्पती यांसारख्या सजीव गोष्टींचा समावेश आहे.
  4. तर अजैविक घटकांमध्ये प्रकाश, हवामान आणि पाणी यासारख्या निर्जीव गोष्टींचा समावेश होतो.
  5. मानव जातीच्या सर्वांगीण विकासात पर्यावरणाचा महत्त्वाचा वाटा आहे.
  6. वाढते प्रदूषण आणि दर दिवशी समोर येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींच्या घटना व पर्यावरणाकडे केलं जाणार दुर्लक्ष हे कारण प्रकर्षाने समोर येत आहे.
  7. लोकांना पर्यावरणाचे महत्त्व समजावे आणि जनजागृती व्हावी यासाठी 05 जून रोजी ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा केला जातो.
  8. आधुनिकीकरनामुळे ग्लोबल वार्मिंग, वायु, जल प्रदूषण तसेच ओझोन थर कमी होने, अशा अनेक समस्या उद्भवल्या आहेत. यामुळे पर्यावरणाचा ह्रास होता आहे.
  9. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी आपण अधिकाधिक झाडे लावली पाहिजेत.
  10. पर्यावरणाची काळजी घेणे व नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करणे हे मानवाचे मुख्य कर्तव्य आहे.

जागतिक पर्यावरण दिन भाषण मराठी – भाषण क्र.02

आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बाल मित्रांनो आज 05 जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिवस होय. पर्यावरण म्हणजे नेमके काय? पर्यावरणाचे आपल्या जीवनातील महत्त्व आहे तरी काय? आज मी आपल्यासमोर जागतिक पर्यावरण दिनाविषयी जे काही विचार मांडणार आहे ते आपण शांतचित्ताने ऐकावे ही नम्र विनंती.

आपले जीवन हे स्वच्छ आणि संतुलित पर्यावरणावर अवलंबून आहे. पर्यावरणातील प्रदूषणामुळे मागील काही दशकात मानवी जीवन व निसर्ग अस्वस्थ झालेले आहेत. हीच समस्या ओळखून जगभर जनजागृती होण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघाने 05 जून रोजी पर्यावरण दिन साजरा करण्याचे ठरवले.

पहिल्या महायुद्धानंतर पर्यावरणावर अत्यंत गंभीर परिणाम झाल्याने विज्ञान व पर्यावरण शास्त्र असे विषय निर्माण झाले. त्यानंतर त्याची माहिती प्रसारित होणे व लोकांना पर्यावरण विषयक जनजागृती होण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने 05 जून 1972 रोजी सर्वसाधारण सभेत पर्यावरण दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला.

दिनांक 05 जून 1974 रोजी पहिला पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. पर्यावरण संरक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने प्रत्येक देशाचा आणि तेथील प्रत्येक नागरिकाचा हातभार लागला पाहिजे. त्यासाठी पर्यावरण दिन हा प्रत्येक स्तरावर साजरा केला जातो.

मित्रहो, मानवीय कृत्यामुळे माती, जल, वायू प्रदूषण होऊन माणसाने आपल्या स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारली आहे. मानवाने प्रगती तर केली परंतु या पृत्वी तलावरील वातावरण प्रदूषित करून ठेवले आहे. या साठी आपल्यालाच काहीतरी करायला हवे.

मित्रांनो, आज या शुभ दिनी मी आपल्याला एकच संदेश देऊ इच्छितो. झाडे लावा! झाडे जगवा! कारण पावसाळा जवळ आला आहे. काही दिवसात पाऊस सुरू होईल. आणि पावसाळ्यात झाडे लावली की ती लगेच रोपतात. आपण प्रत्येकाने आपल्या आयुष्यात कमीत कमी 10 तरी झाडे लावून वाढवली पाहिजे. हीच आपली धरणी मातेला खरी आदरांजली होईल.
एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.
जय हिंद! जय भारत! जय महाराष्ट्र!

-: समाप्त :-

जागतिक पर्यावरण दिन भाषण मराठी – भाषण क्र.03

आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बाल मित्रांनो आज 05 जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिवस होय. आज मी आपल्यासमोर जागतिक पर्यावरण दिनाविषयी जे काही दोन शब्द सांगणार आहे ते आपण शांतचित्ताने ऐकावे ही नम्र विनंती.

जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी 5 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. 1972 मध्ये पर्यावरणीय समस्यांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने याची स्थापना केली होती. या ग्रहावरील निसर्गाचे संरक्षण करण्यासाठी तसेच लोकांना सकारात्मक पर्यावरणीय कार्य करण्यास हा दिवस उत्साहात साजरा केला जातो.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी पर्यावरण परिषदेच्या प्रारंभी ही मोहीम घोषित करण्यात आली. हे संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाद्वारे चालवले जाते. जागतिक पर्यावरण दिन 2015 निमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकीय निवासस्थानी एक रोपटे लावण्यात आले.

या मोहिमेची मुख्य उद्दिष्टे प्रसार माध्यमांनी आणि प्रसिद्ध व्यक्तिद्वारे या उत्साहात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यात सहभागी होणे हे आहे. युनायटेड नेशन्स पर्यावरण कार्यक्रमाचे सदिच्छा दूत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कृती करण्याचे आवाहन करणारे संदेश जगभरात पाठवतात.

ही मोहीम लोकांना खऱ्या पर्यावरणीय परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी आणि वातावरणातील बदलांना सामोरे जाण्यासाठी पर्यावरणीय समस्यांविरुद्ध प्रभावी कार्यक्रमांचे एजंट होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या उत्साहात सहभागी होण्याची आवाहन करते. आपण उत्साहात सहभागी होऊन चांगल्या भविष्यासाठी आपले पर्यावरण वाचवण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे.
एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.

जय हिंद! जय भारत!

-: समाप्त :-

जागतिक पर्यावरण दिन भाषण मराठी – भाषण क्र.04

पर्यावरणाचा समतोल काळाची गरज

Jagtik Paryavaran Din Bhashan Marathi – मानवनिर्मित कारणांनी प्रदूषण वाढवून पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. या पर्यावरण असंतुलनाला आपणच पायबंध घालायला हवा. प्रत्येकाने मनावर घेतले तर ते सहज शक्य आहे. पण तेच होत नाही.

अनेक अभियान या संदर्भात राबवली जात आहेत. प्लास्टिक पिशवी मुक्त अभियान, स्वच्छ अभियान हे अधिक कठोरपणे राबवायला हवे. फक्त दरवर्षी येणाऱ्या पर्यावरण दिनी नव्हे. तर प्रत्येक दिवशी आपण निसर्गाची काळजी घेऊ. आपण सारेच या वसुंधरेचे सेवक आहोत. याचे भान ठेवू. जागतिक पर्यावरण दिवस आपण दरवर्षी साजरा करतो व यावर्षीही साजरा करणार आहोत. पर्यावरण संवर्धनासाठी जागरूकता निर्माण करून त्याच्या समस्या जाणून पर्यावरणाची गुणवत्ता वाढावी म्हणून पोषक वातावरण निर्माण करणे हाच पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा प्रमुख हेतू असतो.

पर्यावरणाचा ऱ्हास का होतो. त्याला आपण किती जबाबदार आहोत. निसर्गातील बदल, अनियमितपणा यासाठी आपली जीवनशैली आणि विकास किती कारणीभूत आहे. या आणि अशा प्रश्नांचा विचार करावा लागेल. खरं म्हणजे पर्यावरण आणि प्रदूषण यांचा खूप जवळचा संबंध आहे. अनेक विविध प्रकारच्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असतो. मग हे प्रदूषण निसर्गनिर्मित असो वा मानवनिर्मित असो.

निसर्गनिर्मित कारणांबाबत आपण तरी काय करणार? ती एक प्रकारची आपत्तीच असते. पण आपल्याकडून ज्या ज्या कारणांमुळे प्रदूषण निर्मिती होते ती आपण नक्कीच कमी करू शकतो. दरवर्षी पर्यावरण दिवस साजरा करताना एक घोषवाक्य असते. 5 जून 2011 ला आपल्या भारताची प्रथमच यजमानपदी निवड झाली होती.

“वन निसर्ग आपल्या सेवेसी” असे घोषवाक्य त्यावेळी होते. परत दुसऱ्यांदा 5 जून 2018 मध्ये भारत यजमान बनला. मात्र तेव्हा “प्लास्टिक प्रदूषणाशी संघर्ष” असे घोषवाक्य होते. म्हणजे गेल्या काही वर्षात प्रदूषणाचा प्रवास कसा झाला आहे हे लक्षात येते.

जैवविविधता म्हणजेच जीवांची विविधता मग त्यात पशु, पक्षी, निरनिराळे प्राणी येतात. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जैवविविधता संपन्न असायला हवी. मात्र निरनिराळ्या कारनांमुळे ती कमी होत आहे. त्याच्यावर उपाययोजना करायला हव्या.

पर्यावरणाचा समतोल न राहण्याचे प्रदूषण हेच महत्त्वाचे कारण कसे आहे? हे बघू तसेच सर्वसामान्य माणसाचा त्याच्याशी काय संबंध आहे? तो काय करू शकतो? आणि काय करू शकत नाही हे पाहणेही उचित ठरेल. तसेच शासकीय व प्रशासकीय पातळीवर काय करता येईल? काय होत नाही? हे देखील पाहायला हवे. अनेक कारखाने आहेत. त्यांच्या निर्मिती प्रक्रियेतून वायु, धूर यांची निर्मिती होत असते. बऱ्याच वेळी हा वायू आरोग्यासाठी हानिकारक तर असतोच पण त्यामुळे सभोवतालचे वातावरणही प्रदूषित होते.

दुसरीकडे वाहनांची संख्या खूप वाढली आहे. जुनी वाहने, वेळीच सर्विसिंग न होणारी वाहने खूप धूर सोडतात. त्यामुळे ही मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. आपल्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे. वाहन तपासणी होते. पोलुशन प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. हे देखील खरे पण कुठेतरी या दोन्हीही प्रक्रियेत काहीतरी दोष आहेत. त्यात सुधारणा व्हायला हवी.

एका विशिष्ट मर्यादेपलीकडे निर्माण झालेले प्रदूषण म्हणजे ध्वनी प्रदूषण. कारखान्यातील यंत्रांचे आवाज, वाहनांचे कर्कश हॉर्न सायलेन्सर विना चालणाऱ्या गाड्या, मर्यादे पलीकडील डेसिबलने वाजणारी डीजे हे दोन्ही प्रदूषणासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे मानवी मानसिकतेत अस्वस्थता चिडचिड निर्माण होते.

कारखान्यातील निर्मिती प्रक्रियेतून निर्माण होणारे रसायन मिश्रित दूषित पाणी नद्या, नाले, तलावात सोडले जाते. ते आजूबाजूच्या परिसराला त्रासदायक ठरते. त्या ठिकाणी असलेले पाण्याचे स्रोत दूषित होतात. ते पाणी पिऊन मोठ्या प्रमाणात जनावरे मृत्युमुखी पडतात. अनेक मोठ्या शहरात सांडपाण्याची विल्हेवाट व्यवस्थित नसते. हे देखील एक कारण प्रदूषणासाठी आहेच.

प्लास्टिकचा कचरा, जुने इलेक्ट्रिक उपकरणे फेकून दिली जातात. ते नष्ट होत नाही. प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी येऊनही त्यांचा सर्रास वापर सुरू आहे. आपल्याला तर ते घातक आहेच मात्र जनावरांनाही ते धोकादायक आहे. प्लास्टिक खाल्ल्याने हजारो जनावरे दरवर्षी मृत्युमुखी पडतात. पशुधन नष्ट होते. निसर्गातील अर्थातच वातावरणातील बदलाचा पर्यावरणाचा समतोल ढासळण्यावर मोठा परिणाम होतो. आताचेच उदाहरण बघा चक्रीवादळ आणि मुसळधार पावसाने कोकणातील शेकडो झाडे उन्मळून पडली.

आपण शहराचे सुशोभीकरण करण्यासाठी, रस्ते रुंदीकरणासाठी हजारो वृक्षांची कत्तल करतो. म्हणजे एकीकडे वृक्षारोपण कार्यक्रम राबवतो आणि दुसरीकडे झाडे तोडतो. वाढलेले वृक्ष नष्ट झाल्याने पर्यावरणाचा समतोल ढळतो. ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. अशावेळी प्रत्येकाने एक रोप लावण्याचा आणि तेच जगण्याचा संकल्प करायला हवा. सरकारी वृक्षारोपण कार्यक्रमात पारदर्शकता हवी. नाहीतर त्याच त्या जागी दरवर्षी वृक्षारोपण केल्याच्या बातम्या आपण वाचतो.

मानवनिर्मित कारणांनी प्रदूषण वाढवून पर्यावरणाचा समतोल ढळत आहे. अर्थात ती आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. या पर्यावरण ऱ्हासाला आपणच पाय बंद घालायला हवा. प्रत्येकाने मनावर घेतले तर ते सहज शक्य आहे. पण तेच होत नाही.

तेव्हा फक्त दरवर्षी येणाऱ्या पर्यावरण दिनी नव्हे, तर प्रत्येक दिवशी आपण निसर्गाची काळजी घेऊ. आपण सारेच या वसुंधरेचे सेवक आहोत. याचे भान ठेवू माणसाने कितीही प्रगती केली, तरी निसर्गाची ताकद अफाट आहे. त्याची प्रचिती नेहमीच येत असते. आताही निसर्ग चक्रीवादळाने त्याचा प्रत्यय दिला आहे. तेव्हा आपले आयुष्यातील प्रत्येक क्षण पर्यावरण स्नेही म्हणून जगण्याचा आणि वसुंधरेच्या रक्षणाचा संकल्प करूया. पर्यावरणाचा समतोल राखणे काळाची गरज आहे. याचे भान सगळ्यांनीच ठेवायला हवे.

धन्यवाद!

जागतिक पर्यावरण दिन भाषण मराठी – भाषण क्र.05

सारांश | जागतिक पर्यावरण दिन भाषण मराठी | Jagtik Paryavaran Din Bhashan Marathi

मित्रांनो, वरील लेखात आपण जागतिक पर्यावरण दिन या विषयावर अतिशय सुंदर असे भाषण बघितले. वरील लेखात एकूण 05+ अतिशय सुंदर आणि धडाकेबाज भाषणे बघितली. मित्रहो ही नुसती भाषणे नसून सत्य परिस्थिती आहे. आपण या वसुंधरेचे, निसर्गाचे खूप काही देणे लागतो. याचे आपल्याला भान असायला हवे.

मित्रांनो, वरील भाषणे आपल्याला कशी वाटली? आम्हला Comment द्वारे नक्की कळवा. आपले काही विचार असेल तर ते ही सांगा. आपल्या मित्रांना हा लेख नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

या लेखाचे शीर्षक खालीलप्रमाणे ही असू शकतात.

  • जागतिक पर्यावरण दिन भाषण मराठी
  • Jagtik Paryavaran Din Bhashan Marathi 2023
  • World Environment Day Speech in Marathi 2023
  • जागतिक पर्यावरण दिन भाषण
  • जागतिक पर्यावरण दिन या विषयी भाषण
  • जागतिक पर्यावरण दिन या विषयावर भाषण मराठी
  • जागतिक पर्यावरण दिवस भाषण मराठी
  • Jagtik Paryavaran Din Bhashan Marathi
  • Jagtik Paryavaran Din Speech in Marathi
  • World Environment Day Speech in Marathi
  • World Environment Day Speech
  • जागतिक पर्यावरण दिन भाषण मराठी
  • Jagtik Paryavaran Din Bhashan Marathi
  • Jagtik Paryavaran Din Bhashan Marathi 2023
  • Jagtik Paryavaran Din Bhashan

Leave a Comment