विज्ञान दिन भाषण मराठी 2023 (05+ सुंदर भाषणे) | National Science Day Speech in Marathi | राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

National Science Day Speech in Marathi | राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण मराठी – नमस्कार मित्रांनो, 28 फेब्रुवारी रोजी विज्ञान दिन संपूर्ण देशात साजरा करण्यात येत आहे. आज आपण या लेखात विज्ञान दिन या विषयी 05 अतिशय सुंदर भाषण बघणार आहोत.

विज्ञान दिनानिमित्त आपल्याला शाळा, कॉलेज किंवा आपल्या कार्यालयात भाषण द्यावे लागते. त्याचप्रमाणे विज्ञान दिनानिमित्त सूत्रसंचालन करावे लागते. त्यासाठी ही 05 विज्ञान दिन भाषणे आपल्याला नक्कीच उपयोगी पडतील. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता भाषणाला सुरुवात करुया.

विज्ञान दिन भाषण मराठी | Science Day Speech in Marathi – भाषण क्र.01

सुखामागे धावता धावता
विवेक पडतो गहाण !
पाण्यात राहूनही भागत नाही
माशाची तहान !!

नमस्कार मित्रांनो आज 28 फेब्रुवारी म्हणजे विज्ञान दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

विज्ञान हा मानवाला मिळालेला
एक प्रभावी डोळा आहे,
ज्याचा वापर जो आयुष्यात
करत नाही, तो खरोखरच
आंधळा आहे.

मित्रांनो, माणसाला असे स्वप्नात देखील वाटले नसेल की, तो पक्षांप्रमाणे आकाशात उडू शकतो, माशाप्रमाणे पाण्यात होऊ शकतो किंवा प्राण्यांच्या बरोबरीने पळू शकतो. परंतु हे सर्व शक्य झाले, ते विज्ञानामुळेच! तरीही मनात एक प्रश्न नेहमी पडतो की विज्ञान शाप की वरदान ?

मित्रांनो विज्ञानाचा आपण जर डोळसपणे आणि योग्य वापर केला तर विज्ञान हे आपल्यासाठी वरदान आहे. मित्रांनो कोणीतरी भोंदू बाबा येतो आणि काहीतरी चमत्कार दाखवून आपल्याला वेड बनवतो. आणि आपणही अंधश्रद्धेच्या आहारी जातो. म्हणूनच मला म्हणावेसे वाटते.

अंधश्रद्धा, अज्ञानाने झाले वाटोळे !
दे विज्ञाना सर्व जगाला ज्ञानाचे डोळे !!

मित्रांनो तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की, विज्ञान दिवस 28 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो? कारण 28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकवादी शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरमण यांनी भारतातील रमण परिणामाचा शोध लावला. तेव्हापासून 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.

आजच्या या विज्ञानदिनी
चला आपण संकल्प करूया
विज्ञानाची कास धरूया
कविता आकाश घेऊया.
एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.
जय हिंद! जय महाराष्ट्र! जय भारत!

विज्ञान दिन भाषण मराठी | Science Day Speech in Marathi – भाषण क्र.02

विज्ञान आणि केली क्रांती
विज्ञानाने केली प्रगती
विज्ञानाने दिला एक नवा ध्यास
विज्ञानाने झाला संपूर्ण देशाचा विकास.

आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि भारताचे भविष्य उज्वल करणाऱ्या माझ्या मित्र-मैत्रिणींनो.

आज 28 फेब्रुवारी !! आज आपण इथे सर्वजण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

शून्याचा शोध लावणारे आर्यभट्ट, अनुशास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा, संगणकाची निर्मिती करणारे डॉ. विजय भटकर, नोबेल पारितोषिक विजेते, भौतिक शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमण, ए.पी.जे. अब्दुल कलाम, अंतराळवीर कल्पना चावला या सर्वांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो.

मित्रांनो आपल्या दिवसाची सुरुवात आणि शेवट कुणापासून होत असेल तर ते विज्ञान. आजच्या आधुनिक युगात दिवसेंदिवस तयार होणारे अभियंता, डॉक्टर्स, शास्त्रज्ञ यांनी विज्ञान तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली आहे.

विज्ञान तंत्रज्ञानातील नवीन शोधांमुळे वेगवेगळी यांत्रिक उपकरणे निर्माण झाली आहेत. आणि त्यामुळे माणसाचे जीवन सोपे झाले आहे. मित्रांनो हा राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहित आहे का?

तर सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर वसंतराव गोवारीकर हे भारताच्या विज्ञान तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांना विज्ञान दिन साजरा करण्याची कल्पना सुचली. भारत देशांमध्ये लोकांना विज्ञानाचे महत्त्व कळावे. तरुण पिढीला विज्ञानाकडे प्रेरित करण्यासाठी त्यांनी “डॉ. सी. व्ही. रमण” यांच्या स्मरणार्थ 28 फेब्रुवारी हा दिवस “राष्ट्रीय विज्ञान दिन” म्हणून साजरा करण्याचे ठरविले.

डॉ. सी. व्ही. रमण यांनी 28 फेब्रुवारी 1928साली प्रकाश किरणांचा शोध जाहीर केला. हा शोध त्यांनी नेचर या ब्रिटिशन नियतकालिकास पाठविला आणि त्यांना या शोधा करिता नोबेल पारितोषिकाचा सन्मान प्राप्त झाला. त्यामुळे दरवर्षी 28 फेब्रुवारीला भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.

प्रत्येक शाळेत, महाविद्यालयांमध्ये, प्रशिक्षण संस्थेत विज्ञान आधारित उपक्रमांचे आयोजन केले जाते. भाषण, नाटक, विज्ञान प्रदर्शन, स्पर्धा यांचे आयोजन करून विज्ञानाची लोकप्रियता वाढविण्यासाठी विशेष बक्षिसे ही ठेवली जातात. तरुण पिढीला विज्ञानाचे महत्त्व कळावे आणि विज्ञानाबद्दल आवड निर्माण व्हावी हाच त्यामागचा मुख्य उद्देश आहे.

विज्ञानामुळे आपली प्रगती खूप वेगाने होत आहेच, शिवाय आपल्या समाजातील अंधश्रद्धा या विज्ञानामुळेच नष्ट झाले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन हे विज्ञानामुळे झालेले चांगल्या प्रगतीचे लक्षण आहे. विज्ञानामुळे तरुण पिढीला नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लोकांना आर्थिक दृष्टिकोनातून विज्ञानाचा चांगला फायदा होत आहे.

एकविसावे शतक हे विज्ञान-तंत्रज्ञानाचे मानले जाते आणि ते सिद्ध ही होत आहे. विज्ञान दिवस आपल्याला अनेक शास्त्रज्ञांची आणि त्यांनी लावलेल्या शोधांची आठवण करून देतो. त्या शोधाचा अभ्यास केल्यानंतर त्या शोधाचे खरे महत्त्व आपल्याला प्रकर्षाने जाणवते.

शेवटी मी एवढेच म्हणेन की, प्रत्येक माणसाने विज्ञानाचा जरूर उपयोग करावा पण त्याचा अतिवापर करून विज्ञानाच्या हातातील खेळणी होऊ नये. आपण प्रत्येक वेळी वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करणे गरजेचे आहे. तरच विज्ञान दिन साजरा केल्याचे सार्थक होईल असे मला वाटते.

एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.
जय हिंद! जय महाराष्ट्र! जय विज्ञान!

विज्ञान दिवस भाषण मराठी | Science Day Speech in Marathi – भाषण क्र.03

आजच्या या विज्ञान सोहळ्याचे, कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष, व्यासपीठावरील मान्यवर, ईश्वरतुल्य गुरुजन वर्ग व माझ्या विज्ञान प्रेमी मित्र-मैत्रिणींनो !

सर्वप्रथम थोर गणिती भास्कराचार्य, शून्याचा शोध लावणारे आर्यभट्ट, शस्त्रक्रियेचे जनक शुश्रुत, वनस्पती शास्त्रज्ञ जगदीश चंद्र बोस, नोबल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमन, रसायनशास्त्रज्ञ शांतीस्वरूप भटनागर, अनुशास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा, डॉ. विक्रम साराभाई, महासंगणकाची निर्मिती करणारे डॉ. विजय भटकर, डॉ. जयंत विष्णू नारळीकर आणि अग्निबान निर्मिती तज्ञ माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम या सर्वांना स्मरण करून, सर्वांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो.

मित्रांनो, दरवर्षी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस डॉ. सी. व्ही. रमण यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. ज्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो त्या महान शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमण यांच्या विषयी आज आपण जाणून घेऊया…

डॉ. सी. व्ही. रमण यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर वेंकट रमण. त्यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1888 रोजी तमिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव चंद्रशेखर अय्यर तर आईचे नाव पार्वती होय.

सी. वी. रमन यांचे शिक्षण चेन्नई येथे झाले. सी. वी. रमण हे लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. केवळ बाराव्या वर्षीच ते उच्च माध्यमिक परीक्षा आणि अठराव्या वर्षी पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले.

रमण यांचा विवाह 06 मे 1907 रोजी लोकसुंदरी अंमल यांच्याशी झाला. त्यांनी कोलकाता विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून 1917 ते 1933 पर्यंत जवळपास 17 वर्षे काम केले 1947 आली ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चे संचालक झाले.

डॉ. सी. व्ही. रमण यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना त्यांच्या रमन इफेक्ट या शोधासाठी 1930 या वर्षाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. 1954 साली त्यांना भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न पुरस्कार मिळाला. तसेच 1957 मध्ये लेनिन शांतता पुरस्कार देण्यात आला.

सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर 1987 साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांनी विज्ञान विषयक जागृती आणि आवड निर्माण होण्यासाठी 28 फेब्रुवारीला डॉ. सी.व्ही. रमण यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करणचे ठरविले.

28 फेब्रुवारी हाच दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवसासाठी निवडण्यात आला कारण की, डॉक्टर सी. व्ही. रमण यांनी 28 फेब्रुवारीला त्यांचा शोधनिबंध नेचर या मासिकात प्रसिद्धीसाठी पाठवला होता. त्यांचा शोध म्हणजे रमण इफेक्ट यालाच 1930 या वर्षाचे नोबेल पारितोषिक मिळाले. म्हणून हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवसासाठी निवडण्यात आला.

आपल्या भारत देशाने विज्ञानासंबंधी केलेली प्रगती वाखानण्याजोगी आहे. त्यातील इस्त्रो अर्थात भारतीय अंतराळ संस्था नवनवीन क्षितिजे पदक्रांत करताना दिसत आहे. भारतीय अंतराळ संस्थेने एकाच वेळी 104 उपग्रह अंतराळात सोडून नवा विश्वविक्रम केला आहे.

आजचे हे एकविसावे शतक, आजचे हे युग विज्ञान युग म्हणून ओळखले जाते. आपल्या दिवसाची सुरुवात मुळी विज्ञानातूनच होत असते. तो मग घड्याळाचा अलार्म असो की, आपल्या मोबाईलचा अलार्म. सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत विज्ञान आपल्या सोबत असते. किंबहुना विज्ञान आपल्या जीवनात सोबतच चालत आहे.

विज्ञानाने आपल्याला नक्कीच फायदा झालेला आहे. पण त्याचबरोबर आपली शारीरिक क्षमता कमी होत चालली आहे. आपण आळशी बनत चाललोय. विज्ञान उपयोगी नक्कीच आहे, परंतु त्याचा वापर आपण गरजेपुरता मर्यादित करणे आवश्यक आहे. आपण विज्ञानाचे गुलाम बनता कामा नये. शेवटी मी एवढेच म्हणेन की…

आजच्या या विज्ञानदिनी
चला आपण संकल्प करूया
विज्ञानाची कास धरूया
कवेत आकाश घेऊया !!

जय जवान !
जय किसान !
जय विज्ञान !

विज्ञान दिन भाषण मराठी | National Science Day Speech in Marathi – भाषण क्र.04

प्रश्न कितीही गहन असो उत्तर देते विज्ञान,
तर्काच्या सुगंधाचे अंतर देते विज्ञान,
अंधश्रद्धेच्या पलीकडचे पाहू शकते विज्ञान,
तुमच्या माझ्या श्रद्धे सोबत राहू शकते विज्ञान.

सन्माननीय व्यासपीठ, आम्हाला विज्ञानवादी दृष्टिकोन देणारे आदरणीय गुरुजन वर्ग आणि नव्या विज्ञान युगाचे पाईक असणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो…

28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस आपण साजरा करीत आहोत. कारण सर अल्फ्रेड नोबेल या महान शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ जगातला सर्वात मानाचा असा नोबेल पुरस्कार दिला जातो.

डॉ. चंद्रशेखर वेंकटरमन म्हणजेच सी. वी. रमण या वैज्ञानिक असलेल्या भारत मातेच्या महान सुपुत्राने 28 फेब्रुवारी 1930 रोजी आपल्या प्रकाश किरणांच्या संशोधनासाठी हा पुरस्कार पटकावला. म्हणूनच या दिवशी आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करीत असतो. तसे भारत देशाला महान वैज्ञानिक परंपरा लाभली आहे. वैदिक काळापासून भारतीय लोक कालगणना करू शकत होते.

आर्यभट्ट यांच्यासारखे खगोल तज्ञ, महर्षी चरकांसारखे आयुर्वेद विशारद, नागार्जुन यांच्यासारखे रसायनशास्त्री आणि महर्षी कणाद यांच्यासारखे भौतिकशास्त्री हे महापुरुष भारतानेच विश्वाला दिले आहेत. भारतीय अनुषक्तीचे जनक डॉ. होमी भाभा, भारतीय अवकाश संशोधनाचे पिताश्री डॉ. विक्रम साराभाई, हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. स्वामीनाथन, डॉ. वर्गीस कुरियन, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. जगदीश चंद्र बोस अशा कितीतरी भारतीय शास्त्रज्ञांनी विज्ञानाच्या क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. या सर्वांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचा आजचा दिवस होय.

आपणा सर्वांना ज्यांचा सार्थ अभिमान वाटतो. ते मिसाईल मॅन म्हणजेच भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे देखील एक वैज्ञानिक होते. मित्रहो आज विश्वात त्याच राष्ट्राला मान आहे, ज्या राष्ट्राकडे प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे.

देशाला संरक्षण क्षेत्रात मजबूत बनविण्यासाठी, कृषी तसेच औद्योगिक उत्पादने वाढविण्यासाठी, देशाच्या उर्जेची गरज भागविण्यासाठी आणि महान स्वयंपूर्ण राष्ट्राच्या निर्मितीसाठी विज्ञानाची कास धरण्याशिवाय इतर कुठलाही पर्याय उपलब्ध नाही.

आज संपूर्ण विश्वात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचा आणि भारतीय तरुणांचा बोलबाला आहे. यातून प्रचंड रोजगार निर्मिती होत आहे आणि भारताला परकीय चलन मिळत आहे. ही प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची बाब म्हणावी लागेल.

परंतु आजही आपल्या देशातील काही भागात अंधश्रद्धा आणि रूढी परंपरांचा पगडा तसाच पाहायला मिळतो. अज्ञानी लोकांची फसवणूक आणि शोषण पाहायला मिळते. हे चित्र बदलणेही प्रत्येक भारतीय नागरिकांची जबाबदारी आहे. तेव्हा आपण सारे नव्या शतकातील भारतीय नागरिक आजच्या विज्ञान दिनी हा संकल्प करूयात नव्या युगासाठी विज्ञानाची साथ घेऊयात आणि प्रगतीचे पाईक होऊयात. तेव्हाच जय जवान जय किसान आणि जय विज्ञान हा नारा खरा ठरू शकेल.

जय हिंद! जय भारत!

राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण मराठी | Science Day Speech in Marathi – भाषण क्र.05

आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि समाजविघातक अंधश्रद्धांना मूठ-माती देत वैज्ञानिक दृष्टिकोन मनात रुजवून 21व्या शतकात देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावणाऱ्या बंधू आणि भगिनींनो…

आज 28 फेब्रुवारी अर्थातच राष्ट्रीय विज्ञान दिन आपल्या भारतात विज्ञान आहे पण भारतीय समाजात विज्ञान हवे तितके नाही. म्हणून सर्वसामान्यांपर्यंत विज्ञान पोहोचावे हा उद्देश्य आहे या विज्ञान दिनाचा.

विज्ञानाचा अविष्कार घड्याळ आणि अलार्म माणसाला झोपेतून उठवते. मोबाईल तर सावलीप्रमाणे माणसाचा सोबतीच झालाय. टीव्हीने माणूस समाजाशी जोडला गेलाय. खरं तर सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत क्षणोक्षणी विज्ञानाचा आधार घेत आपण जगतो.

भारत देशातील नोबेल पुरस्कार प्राप्त थोर शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण म्हणजेच डॉ. सी. व्ही. रमण यांच्या सन्मानार्थ हा दिवस आपण साजरा करत असतो. पण विज्ञान दिन आणि डॉक्टर सी. व्ही. रमण यांची माहिती किती जणांना असेल? हा ही संशोधनाचा विषय आहे.

विज्ञानाने तयार केलेल्या असंख्य गोष्टींशी माणूस घट्टपणे जोडलेला आहे. पण विज्ञानाच्या जवळ जाण्यास माणूस धजत नाही. आजही अनेक प्रश्न अनुत्तरीतच आहेत. समाजाला कीड लावणाऱ्या, समाजविघातक असंख्य अंधश्रद्धांना माणूस केव्हा सोडणार? दर्ग्यामध्ये, मंदिरांमध्ये, यात्रांना चमत्कार पाहण्यासाठी चेंगराचेंगरी होईपर्यंत गर्दी करणारा माणूस विज्ञान प्रदर्शनांनाही गर्दी केव्हा करणार?

आभासी जगात वावरणाऱ्या अभिनेत्यांना, आश्वासने देणाऱ्या नेतामंडळींना प्रोत्साहन देणारे लोक वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञ यांना सन्मान कधी देणार? नक्कीच या प्रश्नांची उत्तरे आपण शोधली पाहिजे.

एकविसावे शतक हे विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचे आहे आणि हे सिद्धही होत आहे. विज्ञानाने माणसाची प्रचंड प्रगती केली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे माणसाने आपले जीवन खूपच सुकर केले आहे. तसेच माणूस विज्ञानाचा गुलामही बनला आहे. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अचानक लाईट गेली, अचानक गाडी बंद पडली, अचानक मोबाईल बंद पडला तर माणूस बेचैन होतो. दुःखी होतो. म्हणून माणसाने विज्ञानाचा उपयोग नक्कीच करावा पण विज्ञानाच्या हातातील खेळणे होऊ नये.

माणसाने वैज्ञानिक दृष्टिकोन मनात रुजवून जगले पाहिजे. तर आणि तरच विज्ञान दिन साजरा करण्याचा हेतू सफल होईल. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी विज्ञानाचे महत्त्व ओळखून घोषणा केली. “जय जवान! जय किसान! जय विज्ञान!” चला तर विज्ञानाला, वैज्ञानिकांना आणि वैज्ञानिक ज्ञानाचा सन्मान करूया. धन्यवाद!!

जय हिंद! जय महाराष्ट्र! जय भारत!

सारांश | विज्ञान दिन भाषण मराठी | Science Day Speech in Marathi

विज्ञान दिन भाषण मराठी 2023 | Science Day Speech in Marathi | राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण – मित्रहो, वरील लेखात आपण विज्ञान दिनानिमित्त 05 अतिशय सोपे आणि सुंदर भाषणे पहिली. आम्हला आशा नाही तर खात्री आहे की आपल्याला वरील विज्ञान दिन भाषण मराठी नक्की आवडली असतील. आपल्या गरजू विद्यार्थ्यांना आणि मित्रांना ही भाषणे नक्की शेअर करा.

वरील भाषणे आपण लिहून देखील घेऊ शकता. ही भाषणे तुम्हाला लगेच पाठ होतील अशा प्रकारे लिहिली आहेत. आपल्याला विज्ञान दिन भाषण मराठी हा लेख कसा वाटला आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

विज्ञान दिन भाषण मराठी 2023 | Science Day Speech in Marathi | राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण मराठी | National Science Day Speech in Marathi विज्ञान दिन भाषण मराठी 2023 | Science Day Speech in Marathi | राष्ट्रीय विज्ञान दिन भाषण मराठी | National Science Day Speech in Marathi

Leave a Comment