(04+) राजमाता जिजाऊ जयंती भाषण मराठी 2023 | Rajmata Jijau Speech in Marathi | Rajmata Jijau Jayanti Bhashan Marathi


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

राजमाता जिजाऊ जयंती भाषण मराठी 2023 | Rajmata Jijau Speech in Marathi | Rajmata Jijau Jayanti Bhashan Marathi – नमस्कार मित्रांनो, राजमाता जिजाऊ यांची जयंती जवळ आली आहे. सगळीकडे जयंतीची जंगत तयारी सुरू आहे. काही विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांच्यावर भाषण ही देण्याचे ठरवले आहे. आज येथे आपण राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त अतिशय सुंदर 04 भाषणे बघणार आहोत.

मित्रहो, ही भाषणे आपण अगदी सहज पाठ करू शकता. ही भाषणे आपण लिहून घेऊ शकता. ही भाषणे काही छोटी तर काही मोठी आहेत त्यामुळे सगळ्यांना याचा फायदाच होईल. ही राजमाता जिजाऊ भाषण मराठी अगदी सोपी आणि सुंदर आहेत. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालविता भाषणाला सुरुवात करुया.

राजमाता जिजाऊ भाषण मराठी 2023 | Rajmata Jijau Speech in Marathi | भाषण क्र. – 01

मी जिजाऊ बोलतेय…

जाधवांची कन्या,
भोसलेंची सून !
शिवबांची माता,
भाग्य कोणते अजून !!

हिंदवी स्वराज्याची पताका नभी अभिमानाने डोलते, लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलतेय, मी जिजाऊ बोलतेय.

आमचा जन्म जाधवांच्या घरी झाला. तेव्हा आनंदाने दारा दारात रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरणं लावली गेली, हत्तीवरून साखर वाटण्यात आली आणि आमचं नाव ‘जिजा’ असं ठेवल.

आईच्या इच्छेखातर आम्ही सहा भाषा शिकलो. शिवबाराजे हे आमचे सर्वात धाकटे रत्न. अतिशय कठीण परिस्थितीवर मात करून आम्ही शिवबा राजेंना घडविले.

अंगणातील तुळस,
गोठ्यातील गाय,
आणि घरातील माय..

यांच्याकडे जर कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्याची गाय करू नका, ही शिकवण आम्ही शिवबाराजेंना दिली. आम्ही पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न ते त्यांनी पूर्ण केलं. त्यांच्याविषयी जेव्हा बोललं जातं…

एक होते राजे शिवाजी,
भीती नव्हती जगाची,
परवा नव्हती परिणामांची,
साथ होती आई भवानी व जिजामातांची,
मुहूर्तमेढ रोवली स्वराज्याची,
म्हणूनच म्हणतात जय भवानी, जय शिवाजी!

तेव्हा आमचा उर अभिमानाने भरून येतो. म्हणूनच म्हणते बाळांनो शिवबा राजांसारखं खूप अभ्यास करा. खूप मोठा व्हा. आई बाबांचा नाव मोठा करा.

धन्यवाद!!

राजमाता जिजाऊ जयंती भाषण मराठी 2023 | Rajmata Jijau Jayanti Bhashan Marathi | भाषण क्र. – 02

राजमाता जिजाऊ यांच्यावर 10 ओळी भाषण

  1. आज 12 जानेवारी हा राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस या थोर मातेस प्रथम माझा मानाचा मुजरा.
  2. जिजाऊंचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला.
  3. जिजाऊ ह्या केवळ शहाजीराजांच्या वीर पत्नी नव्हत्या तर जगातील प्रत्येक स्त्रीने आदर्श घ्यावा अशा आदर्श माता होत्या.
  4. जिजाऊंनी शिवरायांना स्वराज्यासाठी घडविले त्यांनी शिवरायांना लहान वयात रामायण महाभारतातील शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्या.
  5. आज आपण शिवरायांना जाणता राजा संबोधतो ते केवळ आणि केवळ राजमाता जिजाऊंनी राजांवर केलेल्या संस्कारामुळेच.
  6. जिजाऊंनी फक्त शिवरायाच नाही तर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना सुद्धा घडविले.
  7. आई जिजाऊंनी शिवरायांना तसे प्रत्येक स्त्रीने आपल्या मुलांना दिले पाहिजे.
  8. म्हणूनच त्यांच्या पायाशी नतमस्तक होऊन मला एवढेच म्हणावेसे वाटते…
  9. “जिजाऊ तुम्ही नसता तर, नसते राहिले शिवबा आणि शंभूछावा! जिजाऊ तुम्ही नसता तर, नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा!!
  10. आणि म्हणूनच… “मुजरा माझा माता जिजाऊंला, जिने घडविले शूर शिवबाला.

राजमाता जिजाऊ भाषण मराठी | Rajmata Jijau Bhashan Marathi | भाषण क्र. – 03

वाघाची आई बनायला,
काळीजही वाघिणीचेच असावं लागते !
म्हणून तर जिजामाता,
तुमच्या चरणापुढे..
मान आमची सदैव झुकते !!

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी, पूज्य गुरुजन वर्ग, उपस्थित मान्यवर आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो. आज मी आपल्याला आपल्या राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त जे काही दोन शब्द सांगणार आहे ते आपण शांत चित्ताने ऐकावे ही विनंती.

मित्रहो, तो काळ होता मुघल आणि निजाम राजवटीचा. मुघल आणि निजाम यांच्यात नेहेमी युद्ध होत असायची. त्याप्रमाणेच हे शासक गरीब जनतेवर अन्याय, अत्याचार करायचे. जबरीने कर वसूल करायचे. मंदिरे पडायचे, आया बहिणींच्या आब्रू लुटायचे.

मुघल साम्राज्याच्या ताकतीपुढे कोणाचे टिकाव लागत नसे. सामान्य जनता खूप त्रासलेली होती. अशावेळी दिनांक 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेड चे लखुजी जाधव यांच्या घरी जिजाबईचा जन्म झाला.

जिजाबाई या लहानपणापासूनच धैर्यशील, चतुर आणि स्वाभिमानी होत्या. हेच गुण पुढे शिवबाराजे यांच्यात आले. जिजाऊंनी लहान असतानाचा 15 भाषा शिकल्या. त्यांना उत्कृष्ट तलवार चालविता येत होती. त्या उत्कृष्ट घोडेस्वार ही होत्या. त्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जायच्या.

पुढे चालून इ.स. 1605 मध्ये जिजाऊंचे शहाजीराजे भोसले यांच्याशी देवगिरी येथे विवाह झाला. शहाजीराजे भोसले यांच्याशी विवाह झाल्यानंतर जिजाऊंच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. शहाजीराजे हे खूप शूरवीर आणि पराक्रमी होते. रयतेवर होत असलेले अन्याय याचा त्यांनी विरोध ही केला. परंतु ते स्वतः मुघलांच्या दरबारात नोकरी करीत असल्यामुळे ते रयतेसाठी जास्त काही करू शकले नाही.

परंतु या अन्याया विरुद्ध लढण्यासाठी आई जिजाऊ आणि शहाजीराजे यांच्या पोटी महाराष्ट्राचे विरपुत्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवनेरी या किल्ल्यावर जन्म झाला. आई जिजाऊनी शिवबा राजेंना खूप चांगले संस्कार दिले. आई आणि वडील दोघांची जबाबदारी त्यांनी उत्तम पणे पार पाडली.

आपल्या पुत्रावर महान संस्कार करणारी,
जिजाऊ महान माता होती !
जगातील प्रत्येक स्त्रीने आदर्श घ्यावा,
अशी आदर्श माता होती !!

आई जिजाऊ या बाळ शिवरायांना महाभारत, रामायणातील वीर योध्यांच्या गोष्टी सांगत. त्यामुळे आपणही त्यांच्या सारखेच शूर वीर व्हावे, पराक्रमी व्हावे, असे बाळ शिवबांनाही वाटायचे. आई जिजाऊंनी शिवरायांना युध्दाचे आणि पराक्रमाचे शिक्षण दिले त्या सोबतच त्यांना नैतिक शिक्षण ही दिले.

आई जिजाऊंच्या शिकवणी मुळेच शिवराय पुढे चालून जाणता राजा, वीर छत्रपती शिवजी महाराज झाले. त्यांनी अत्याचारी निजाम आणि आदिलशहा यांचा चोख बंदोबस्त केला. मुघलांना तर सळो की पळो करून सोडले, औरंगजेब सुद्धा त्यांच्या नावाने थरथर कापायाचे.

आई जिजाऊंच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. परंतु मित्रांनो हे एवढे सोपे कार्य नव्हते. एकीकडे मुघल तर दुसरीकडे निजाम, एकीकडे आदिलशाह तर दुसरीकडे इंग्रज अशा एक सोबत चार बलाढ्य साम्राज्याशी लढा देणे हे इतके सोपे कार्य नव्हे. शिवाजी राजांकडे मूठभर मावळे होते. हे मुठभर मावळे शिवरायान खातर जीवांच्या आकांताने लढले. वेळ प्रसंगी लढता लढता आपले प्राणही सोडले.

आई जिजाऊंनी शिवरायांना गनिमी कावा ही युध्दकला शिकवली. डावपेच शिकवले. स्वराज्याचा स्वाभिमान कसा टिकवायचा हे ही शिकवले. त्यामुळेच तर शिवरायांनी अतिशय कुशलतेने अफजलखानाचा वध केला, शाहिस्तेखानाची बोटे कापली. अशी एक ना अनेक पराक्रेंमे माझ्या शिवबांनी केली.

अखेर तो दिवस उजाडला. दिनांक 06 जून 1674 या शुभ दिनी रायगड किल्ल्यांवर शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न झाला. शिवबा हे छत्रपती शिवाजी महाराज झाले. आणि आई जिजाऊंचे स्वराज्याचे स्वप्न साकार झाले. आई जिजाऊ या गरीब रयतेच्या कैवारी होत्या.

मराठवाड्याच्या होत्या त्या सून,
विदर्भाच्या होत्या लेक !
रयतेच राज्य उभ राहण्यासाठी त्यांच्याच
उपस्थितीत झाला स्वराज्याचा राज्याभिषेक !!

अखेर, दिनांक 17 जून 1674 रोजी वयाच्या 76 व्या वर्षी आई जिजाऊंची प्राणज्योत मावळली. शेवटी मी जाता जाता येथे उपस्थित महिला आणि मुलींना एवढेच म्हणेन की आजकालच्या हिरोईन आणि Instagram वरच्या महिलांचे आदर्श घेण्यापेक्षा आई जिजाऊंचा आदर्श घ्या. आपल्या मुलांना शिवरायांन सारखे संस्कार द्या. आपल्या मुलांच्या योग्य मार्गदर्शिका व्हा. आई जिजाऊ व्हा. आई जिजाऊ व्हा.

एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.
जय जिजाऊ! जय शिवराय! जय महाराष्ट्र!

राजमाता जिजाऊ भाषण मराठी भाषण क्र. – 04

सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो… आज 12 जानेवारी हा राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस या थोर मातेस प्रथम मानाचा मुजरा….

संघर्षांची चेतना तूच दिली राजमाता !
भल्याभल्या शत्रूंनी टेकला महाराष्ट्र भूमीवर माथा !
तुझ्यामुळेच घडली स्वराज्याची सुवर्ण गाथा !
इतिहासात तुझे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले राजमाता !

राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील तर आईचे नाव म्हाळसाबाई जाधव असे होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. 1605 मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजे भोसले यांच्याशी विवाह झाला.

महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला, त्या म्हणजे राजमाता जिजाऊ. ज्यांनी आपल्या स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त बघितलेच नाही तर ते सत्यात देखील उतरविले, त्या म्हणजे राजमाता जिजाऊ.

राजमाता जिजाऊ यांनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवराय यांना ज्ञान, चातुर्य, चारित्र्य संघटन व पराक्रम अशा राजस व सत्व गुणांचे बाळकडू पाजले. त्यांनी प्रत्येक मावळ्यांच्या रक्तामध्ये स्वाभिमान भिनवला. त्यांनी प्रत्येक मावळ्यात शिवबा घडविला.

राजमाता जिजाऊ शिवरायांना थोर, पराक्रमी पुरुषांच्या गोष्टी सांगत असत. सीतेचे हरण करणाऱ्या रावणाचा वध करणारा ‘राम’ किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या गरीब लोकांची सुटका करणारा ‘भीम’ किती पराक्रमी होता, दुष्ट कंसाचा नाश करणारा :कृष्ण’ किती पराक्रमी होता. अशा प्रत्येक पराक्रमी पुरुषांच्या जीवनाचे ध्येय एकच असते, ते म्हणजे पारतंत्र्यात असणाऱ्या लोकांना स्वातंत्र्य मिळवून देणे. अशी शिकवण राजमाता जिजाऊंनी शिवरायांना दिली.

राजमाता जिजाऊंच्या अशा शिकवणीच्या आणि संस्काराच्या जोरावर छत्रपती शिवरायांनी हजारो वर्षाची गुलामगिरी मोडून काढली आणि राजमाता जिजाऊ यांचे स्वप्न साकार करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.

अशा या महान राजमाता जिजाऊ यांचे 17 जून 1674 रोजी निधन झाले. मित्रांनो राजमाता जिजाऊ यांच्या विषयी बोलावे तितके थोडेच आहे. शेवटी मी एवढेच म्हणेन…

मुजरा माझा माता जिजाऊ ला,
घडविले तिने शूर शिवबाला !
साक्षात होती ती आई भवानी,
जन्म घेतला तिच्या पोटी शिवबांनी !!
इतिहास, तू वळूनी पहा,
पाठीमागे जरा..
झुकवुनी मस्तक करशील,
जिजाऊंना मानाचा मुजरा..

जय जिजाऊ! जय शिवराय! जय महाराष्ट्र!

सारांश | राजमाता जिजाऊ जयंती भाषण मराठी 2023 | Rajmata Jijau Speech in Marathi

राजमाता जिजाऊ जयंती भाषण मराठी 2023 | Rajmata Jijau Speech in Marathi | Rajmata Jijau Jayanti Bhashan Marathi – मित्रांनो, वरील लेखात आपण राजमाता जिजाऊ भाषण मराठी तून पाहिले. ही 04 भाषणे अगदी छोटी, सोपी आणि सुंदर आहेत. ही भाषणे तुम्हाला लगेच पाठ होतील अशी आहेत. तुम्ही ही भाषणे लिहून ही घेऊ शकता. राजमाता जिजाऊ यांच्या बद्दल बोलावे तितके थोडेच आहे. तरी पण आम्ही वरील भाषणात खारीचा वाटा उचलन्याचा प्रयत्न केला आहे.

आपल्याला आमचे हे प्रयत्न कसे वाटले, आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. ही भाषणे आपल्या गरजू विद्यार्थ्यांना, मित्रांना नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

राजमाता जिजाऊ जयंती भाषण मराठी 2023 | Rajmata Jijau Speech in Marathi | Rajmata Jijau Jayanti Bhashan Marathi

राजमाता जिजाऊ भाषण मराठी 2023 | Rajmata Jijau Speech in Marathi | Rajmata Jijau Jayanti Bhashan Marathi

Leave a Comment