[50+] 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन) चारोळ्या मराठी & हिन्दी | 26 January Charoli | Prajasattak Din Charoli Marathi & Hindi 2023


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

26 January Charoli Marathi & Hindi | Prajasattak Din Charoli | 26 जानेवारी चारोळी | प्रजासत्ताक दिन चारोळी मराठी आणि हिंदी – मित्रांनो भाषण देताना श्रोत्यांकडून जर आपल्याला टाळ्यांचा कडकडाट ऐकून घ्यायचा असेल, तर चारोळ्या शिवाय पर्याय नाही. सूत्रसंचालन करताना सुधा आपल्याला चारोळ्याची नितांत आवश्यकता असते.

नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात 26 जानेवारी चारोळ्या मराठी आणि हिंदी तसेच प्रजासत्ताक दिन चारोळ्या मराठी आणि हिंदी बघणार आहोत. आज आपण या लेखात एकूण 50 मराठी आणि हिंदी मध्ये अतिशय सुंदर चारोळ्या बघणार आहोत.

26 जानेवारी चारोळी मराठी | प्रजासत्ताक दिन चारोळी मराठी

सलाम करा या तिरंग्याला,
जी तुमची शान आहे…
मान नेहेमी वर उंच ठेवा,
जो पर्यंत प्राण आहे…

लहर तो आहे तिरंगा अभिमानाने
उंच आज या आकाशी
उजळत ठेवू सारे रंग त्याचे
घेऊया प्रण हा एक मुखाने

चला सारे करूया,
आपल्या संविधानाचा आदर
ज्याने दिला जगण्याचा,
शिकण्याचा अधिकार

उत्सव तीन रंगाचा,
आभाळी आज सजला..
नतमस्तक मी त्या सर्वांचा,
ज्यांनी भारत देश घडवला…

मतभेद सारे विसरूया,
बंधने सारे तोडूया…
एकमनाने, एक भावनेने,
आज पुन्हा एक होऊया…

तनी मनी बहरू दे नवजोम,
होवू दे पुलकीत रोम रोम…
घे तिरंगा हाती नभी लहरू दे उंच उंच,
जयघोष मुखी जय भारत, जय हिंद…

टिकून राहो एक्य भारताचे
येवो समृद्धी अंगणी
वाढो आनंद जीवनी
फडकत राहो सदा विजयी पताका,
गणराज्य दिनाच्या मंगलक्षणी,
तुम्हासाठी हा स्वागत सोहळा…

शाळा सजवा, काढा रांगोळ्या
चला करूया तयारी
आली हो आली 26 जानेवारी…

विविधतेत एकता,
आहे आमची शान
म्हणूनच आहे अवनी राहणार
आमचा भारत देश महान..

भारत देश, आमुचा महान
स्फूर्ती देते आमचे संविधान..

देश विविध रंगांचा,
देश विविध ढगांचा
हा देश आहे
विविधता जपणाऱ्या आमुच्या एकात्मतेचा

मतभेद सारे विसरूया,
बंधने सारे तोडूया,
एक मनाने, एकजुटीने
कायम एकत्र राहू या

असंख्यांनी केले तुझ्यासाठी बलिदान !
गाऊ त्या भारत मातेचे गुणगान !!

स्वर्गाहूनी प्रिय आम्हाला
आमुचा सुंदर देश,
आम्ही सारे एक,
जरी नाना जाती, नाना वेश.

असंख्यांनी केले सर्वस्व त्याग तुजसाठी
अनेकांनी दिले बलिदान…
वंदन तयांसी करूनिया आज
गाऊ भारत मातेचे गुणगान…

भारत देश महान आमुचा,
भारत देश महान
स्फूर्ती देतील हेच आमचे
राम, कृष्ण, हनुमान !!

26 जानेवारीच्या चारोळ्या मराठी | प्रजासत्ताक दिनाच्या चारोळ्या मराठी

उजाडली आज प्रजासत्ताक दिनाची
मंगलमय प्रभात.
देशभक्ती, देशप्रेम संचारले आज चराचरात
भारत मातेला वंदन करूनी
करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात.

पाहुनी त्यांचा पराक्रम
इंग्रजांचे काळीज ही भीतीने धडधडले रे
त्या स्वतंत्र वीरांमुळेच
भारत भूमीवर तिरंगा ध्वज फडफडले रे

शाळा सजवा, काढा रांगोळ्या करूया तयारी !
आली हो आली 26 जानेवारी !!
वाजत गाजत साजरा करू हा राष्ट्रीय सण !
कारण आहे तो आपला प्रजासत्ताक दिन !!

झेलल्या स्वातंत्र्यवीराने गोळ्या आपल्या निधड्या छातीवर !
म्हणून तर आज आपण अभिमानाने उभे आहोत या मातीवर !!

न नातालगांची आस, न संसाराची कास
होता फक्त स्वातंत्र्यप्राप्तीचा ध्यास !!
म्हणून तर त्यांनी हसत हसत स्वीकारले
मृत्यूचे फास !!

जगले ते देशासाठी अन देशासाठीच हुतात्मा झाले !
भारत मातेला त्यांनी गुलामीतून मुक्त केले!!

प्रत्येक मनोमनी आणि प्रत्येक क्षणोक्षणी
ठेवा तुम्हीही आठवण !!
तरच सार्थकी ठरेल
आजचा हा प्रजासत्ताक दिन !!

गणराज्य दिनाला
ध्वजवंदन हे
अखंडतेची ही महती
व्यक्त करतो आदर आम्ही
भारतीय संविधाना प्रति

विविधतेतून एकता
वैशिष्ट्य आहे भारताचे
शुभेच्छांचा वर्षाव हा
अवचित्य आहे
गणराज्य दिनाचे

देशभक्तीपर गीत गाऊनी
वंदन करतो राष्ट्रध्वजाला
मातृभूमीची गौरव गाथा
गर्वाने गातो
गणराज्य दिनाला

स्वातंत्र्य, समता, बंधुता
हाच आहे घटनेचा पाया
लोकशाही बळकट करण्या
संविधान जागर करूया
संविधान जागर करूया

आम्ही सारे भारतवासी
एवढं एकच भान राखू
असू कुठेही जगावरती
तिरंग्याची शान राखू

हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई
जिथे बंधू भावाचे व्रत आहे
त्या सुंदर देशाचे नाव
फक्त भारत आहे
फक्त भारत आहे

तिरंगा आमचा भारतीय झेंडा
उंच उंच फडकवू
प्राण पणाने लढून आम्ही
शान याची वाढवू

ज्या भूमीवर वाहते
गोदावरी, कृष्णा, यमुना, गंगा,
हिमालयाच्या शिखरावर सदैव फडकतो
अभिमानाने तिरंगा..

निळ्याभोर आकाशात
फडकवली तिरंग्यांनी शान,
साऱ्या जगात मिरवूणी
भारत माझा महान.

देश आपला सोडो न कुणी,
नातं आपलं तोडो न कुणी
भारत देश आपली शान आहे
ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे.

रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा
उत्साह देश प्रेमाचा अंगी संचारावा
जयघोष भारताचा आसमंती गुंजावा
सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा.

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो.

26 जानेवारी चारोळ्या हिंदी | प्रजासत्ताक दिन चारोळ्या हिंदी

मुस्कुराती है आज दिशाए
गुंगुनाती है हवाए !
तहे दिल से देता हु सबको
गणतंत्र दिन की
शुभकामनाए!!

सागर जिसके पाव पखारे
हिमालय जिसका सरताज है !
गुंज रहा दुनिया मे डंका भारत का
खुशियों का दिन आज है
खुशियो का दिन आज है !!

स्वतंत्रता असे खुशाली है
समता से सब एकसमान !
बंधुता हमको बांधे रखती
गणतंत्र होता बलवान !!

पंछी कलकल करते जाते
झरझर झरते झरनो पर !
शीश झुकाकर नमन करे हम
भारत माँ के चरणोपर !!

आंधीयो को रोक के
मोड के दिखायएंगे !
जलते है जो हमसे
उनको और भी जलायेंगे !!
शान से हम ये तिरंगा
चांद पर फहराएंगे !!!
हम आगे बढते जायेंगे
हम आगे बढते जायेंगे…

हे भारत माँ,
धरती से अंबर तक
हम तेरी जय जय कार करेंगे
अमर रहेगा नाम तुम्हारा
युगोयुगोतक दुनिया मे
कुछ ऐसा काम करेंगे
कुछ ऐसा काम करेंगे..

नही करेंगे नही झुकेंगे
बढते जाए आगे हम
परिवर्तन की पावन आधी
लाकर ही हम लेंगे दम
अब हो रहा सवेरा है
अब हो रहा सवेरा है
चलो जलाये दीप वहा
जहा अभी भी अंधेरा है…

न जाने कितनो ने जान गवाई, न जाने कितनी खून की नदिया बहाई !
तब जाके भारत हो आजादी मिल गई !!

वह शाम जो काम आये अंजुमन के लिये,
वो जजबा जो कुर्बान हो जाये वतन के लिए
रखते है हम हौसले भी जो मर मिटे हिंदुस्तान के लिए.

चलो फिरसे खुद को जगाते है
अनुशासन का दंडा फिर से घुमते है
याद करें उन शूर वीरो की कुर्बानी
जिनके कारण
हम इस लोकतंत्र का आनंद उठाते है.

हम खुशी बाटते दुनिया को
हम हसते और हसाते है !!
सारे जग मे सबसे अच्छे,
हम भारतीय कहलाते है
हम भारतीय कहलाते है !!

अनेकता मे एकता,
ही हमारी शान है !
अनेकता मे एकता,
ही हमारी शान है !!
इसलिये सारे जग मे
मेरा भारत महान है
मेरा भारत महान है !!

सारांश | 26 January Charoli Marathi and Hindi

मित्रांनो, वरील लेखात आपण 26 जानेवारी निमीत्त चारोळी मराठी आणि हिंदी मध्ये बघितल्या. सूत्रसंचालन करताना किंवा भाषण देताना चारोळ्या यांना खूप महत्त्व आहे. आपण सूत्रसंचालन करताना चारोळ्या वापरल्या तर श्रोत्यांमध्ये याची छाप पडते. आणि आपले सुंत्रासंचलन आणि भाषण अगदी बहारदार होते यात शंकाच नाही.

मित्रांनो, वरील लेखात आपण प्रजासत्ताक दिनाच्या चारोळ्या | 26 जानेवारीच्या चारोळ्या मराठी आणि हिंदी मध्ये अतिशय सोप्या आणि सुंदर भाषेत बघितल्या. मित्रांनो हा लेख आपल्या गरजू विद्यार्थ्यांना, मित्रांना नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

26 जानेवारी चारोळी मराठी | प्रजासत्ताक दिन चारोळी मराठी 26 जानेवारीच्या चारोळ्या मराठी | प्रजासत्ताक दिनाच्या चारोळ्या मराठी 26 जानेवारी चारोळ्या हिंदी | प्रजासत्ताक दिन चारोळ्या हिंदी 26 January Charoli Marathi & Hindi | Prajasattak Din Charoli | 26 जानेवारी चारोळी | प्रजासत्ताक दिन चारोळी मराठी आणि हिंदी 26 January Charoli Marathi & Hindi | Prajasattak Din Charoli | 26 जानेवारी चारोळी | प्रजासत्ताक दिन चारोळी मराठी आणि हिंदी 26 January Charoli Marathi and Hindi

Leave a Comment