(04 निबंध) माझा आवडता छंद चित्रकला निबंध मराठी | Maza Avadta Chand Chitrakala Essay in Marathi 2022


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

Maza Avadta Chand Chitrakala Essay in Marathi | माझा आवडता छंद चित्रकला मराठी निबंध – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात माझा आवडता छंद चित्रकला यावर मराठीतून निबंध बघणार आहोत. माझा आवडता छंद चित्रकला या विषयावर एकूण 04 निबंध आपण बघणार आहोत.

विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेत आपल्याला माझा आवडता छंद निबंध या विषयावर 5 ते 10 गुणांसाठी एक प्रश्न नक्की विचारला जातो. तर आपण हे निबंध लिहून चांगले गुण मिळवू शकतात. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता निबंधाला सुरुवात करुया.

माझा आवडता छंद चित्रकला निबंध मराठी – निबंध क्र.01

माझा आवडता छंद चित्रकला

माझे नाव गिरीराज आहे. मी इयत्ता सातवीत शिकत आहे. मला चित्र काढायला आणि त्यात रंग भरायला खूप आवडतात. मला निसर्गाची चित्रे काढायला जास्त आवडतात. चित्रकला हा माझा आवडता छंद आहे.

प्रत्येकाला काही ना काही छंद असतो. काहींना पुस्तके वाचण्याचा छंद असतो, तर काहींना गायनाचा, तर काहींना नृत्य, तर काहींना भटकंती आवडते. त्याचप्रमाणे मला चित्र काढण्याचा छंद आहे.

मागच्या वर्षी तालुका स्थरावर झालेल्या चित्रकला स्पर्धेत मला सुवर्णपदक मिळाले. त्यावेळी माझा सत्कार आमच्या तालुक्याचे आमदार श्री. प्रशांत बंब यांच्या हस्ते झाला. विजयाची पारितोषिक स्वीकारताना मला खूप खूप आनंद झाला.

याचे श्रेय फक्त माझ्या चित्रकलेच्या छंदाला आणि मला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमचे चित्रकलेचे शिक्षक श्री. पवार सर यांना जाते. पवार सर मला चित्र काढताना नेहेमी मार्गदर्शन करतात. त्यांनीच माझ्यातल्या चित्र कलेच्या छंदाला ओळखलं आणि माझ्या या सुप्त गुणांना खतपाणी घालून मोठे केले.

मी रोज सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास चित्र काढण्याचा सराव करतो. ज्यावेळी मी चित्र काढायला बसतो त्यावेळी मी तासनतास एकाच जागी बसतो. चित्र काढताना माझी तहानभूक हरपून जाते. चित्र काढताना मला कशाचेच भान राहत नाही. मी वेगळ्याच दुनियेत असतो.

मला निसर्गाचे चित्र काढायला जास्त आवडतात. त्यात रंग भरताना जणू मी तेथेच गेलो आहे असे वाटते. मला रंग देखील खूप आवडतात. चित्र काढताना रंगाचे महत्त्व खूप असते. रंग हे व्यवस्थित भरता यायला हवे. त्यांचे शेड व्यवस्थित देता यायला हवे. चित्रकला हा आपल्या कल्पना शक्तीचा खेळ आहे. यामध्ये तुमची कल्पना शक्ती मजबूत होते.

पुढे मला चित्रकलेतच करीयर करायचे आहे. ‘3 idiots‘ चित्रपटात खूप छान म्हंटले आहे, “जे तुम्हाला करायला आवडते तेच करा, यश तुमच्या मागे येईल.” मला फाईन आर्टस् मध्ये करीयर करायचे आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगतो. मला चित्रकला खूप खूप आवडते.

-: समाप्त :-

माझा आवडता छंद चित्रकला निबंध मराठी – निबंध क्र.02

माझा आवडता छंद चित्रकला

मला चित्रे काढून त्यात वेगवेगळे रंग भरायला खूप आवडते. प्रत्येक माणसाची छंद वेग वेगळे असतात. कुणाला पुस्तक वाचायला तर काहींना खेळायला आवडते. एखाद्याला सहजासहजी कुठे पाहायला न मिळणाऱ्या वस्तू गोळा करायला आवडते.

छंद ही एक अशी गोष्ट आहे की तिच्यात माणूस मनापासून सहभागी असतो व त्याला त्या गोष्टीतून आनंद मिळत असतो. रोजच्या धावपळीतून थोडा वेळ काढून माणसाने कुठलातरी छंद जोपासायला हवा. कारण यामुळे माणसाचे मन आनंदी व ताजेतावाने होते. म्हणून मी चित्रकला हा छंद जोपासला आहे.

चित्रकला हा छंद माझ्या मनाला आनंद देतो. मला जेव्हा कधीही रिकामा वेळ मिळतो. तेव्हा मी आवर्जून चित्रे काढतो. सर्वप्रथम मी निसर्ग चित्र काढले होते. ते चित्र पाहून माझ्या आई-वडिलांनी माझे खूप कौतुक केले होते. तेव्हापासून माझे आई-वडील मला चित्र काढायला प्रोत्साहन देतात.

चित्रे काढण्यासाठी माझ्या वडिलांनी माझ्यासाठी घरात एक छोटीशी खोली बनवली आहे. चित्रकलेच्या वस्तू खेरीज त्या खोलीत मी काहीही ठेवत नाही. चित्रकलेच्या सर्व वस्तू मी खूप काळजीपूर्वक ठेवतो.

माझ्या शाळेतील गुरुजींना सुद्धा माझी चित्रे खूप आवडतात. शाळेतील चित्रकला स्पर्धेत ते मला भाग घ्यायला सांगतात. मी मन लावून चित्र काढतो, म्हणून माझा स्पर्धेत पहिला नंबर येतो. चित्रकला स्पर्धेत मला ब्रश, रंग व चित्रकला वही बक्षीस म्हणून मिळतात.

पुढे भविष्यात मी एक खूप मोठा चित्रकार बनावे. जगभरात चित्रकार म्हणून माझी कीर्ती व्हावी. अशा शुभेच्छा देखील आवर्जून मला देतात. सर्वांचा आपल्याला पाठिंबा आहे. हे पाहून मला खूप हिम्मत मिळते व मी अधिकाधिक मन लावून चित्रे काढण्याचा प्रयत्न करतो.

मोठमोठ्या लेखकांनी चित्रकलेला एक श्रेष्ठ कला म्हणून उल्लेख केला आहे. चित्रकला हा एक असा छंद आहे जो संपूर्ण जगाला खूप काही शिकवतो. सर्व कलांमध्ये चित्रकला ही सर्वश्रेष्ठ कला समजली जाते. नुसते चित्र पाहूनच माणसाला त्यातून खूप काही शिकायला मिळत असते.

चित्रकाराचे सर्व भाव त्या एका चित्राच्या माध्यमातून लोकांपर्यंत सहजच पोहोचतात. चित्र पाहून माणसाला आनंद मिळतो. त्यासोबत एक चांगली शिकवण सुद्धा मिळत असते. म्हणून मी अभ्यासासोबत माझा आवडता छंद चित्रकला हा ही मी कायम असाच जोपासत राहील.

-: समाप्त :-

माझा आवडता छंद चित्रकला निबंध मराठी – निबंध क्र.03

माझा आवडता छंद चित्रकला

मला चित्र काढायला खूप आवडतात. माझा आवडता छंद चित्रकला हा आहे. प्रत्येक व्यक्तीला काही ना काही तरी करण्यात आवड असते. काहींना खेळायला आवडते. काहींना पुस्तके वाचायला आवडते. काहींना गाणे गायला आवडते. त्याचा प्रमाणे मला सुद्धा चित्र काढायला आवडते.

मला व्यक्तींचे हुबेहूब चित्रे काढण्यात रस आहे. मी रोज संध्याकाळी एक तरी चित्र काढतो. निसर्गाचे सौंदर्य चित्रात काढणे व त्याला निरखून बघणे आणि खुश होणे हाच माझा छंद आहे.

पावसाळ्यात निसर्गाचे सौंदर्य मन मोहुन टाकते. चित्र काढल्याने मला तर आनंद मिळतोच. पण दुसऱ्यांना सुद्धा चित्र बघून आनंद होतो. ही गोष्ट मला समाधान देऊन जाते.

माझ्या शाळेत दरवर्षी चित्रकला प्रतियोगिता होते. मागच्या वर्षी मी चित्रकला प्रतियोगिता मध्ये डोंगर, आकाशाला स्पर्श करणारे उंच उंच विशाल काय खडक, हिरव्यागार घाटी, स्वच्छंद उडणारे पक्षी आणि वेगाने वाहणाऱ्या नद्या हे चित्र काढून पर्यावरणाचे मानवाशी संबंध दाखवले होते. त्यात मला पहिलं बक्षीस मिळालं होतं. माझा हा छंद माझ्यासाठी नव्हे तर समाजाला सुद्धा प्रेरणादायी आहे.

-: समाप्त :-

माझा आवडता छंद चित्रकला निबंध मराठी – निबंध क्र.04

माझा आवडता छंद चित्रकला

जेव्हा मी बालवाडीत होतो, तेव्हा माझ्या शिक्षकांनी काही साध्या रेषांचा वापर करून ब्लॅक बोर्डवर गुलाब काढला. मला आश्चर्य वाटले की गुलाब काढणे इतके सोपे आहे तर मी सुद्धा असेच काहीतरी काढू शकतो. मी माझ्या पुस्तकात ते रेखाटण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा मी काढलेले छोटे त्रिकोण फुलासारखी दिसू लागले तेव्हा मला खूप आनंद झाला.

लहानपणी पहिल्याच प्रयत्नात मला चित्रकला चांगली येते. हे समजल्यावर मी माझे चित्रकला अजून कशी सुधारू शकतो? याविषयी मी मासिकातील सूचनांचे पालन करू लागलो. अलीकडे माझ्या बहिणीने मला युट्युब ड्रॉइंग टुटोरियल ची ओळख करून दिली आहे. या व्हिडिओद्वारे मी विविध प्रकारची चित्रे काढायला शिकलो आहे.

मला शाळेत कला वर्ग दरम्यान क्रेयान आणि पेन्सिल रंग वापरायला शिकवले गेले. नंतर मी ऑइल पेस्टल वापरण्यास सुरुवात केली. कारण हे रंग इतरांपेक्षा खूपच उजळ आहेत. जगात असे अनेक कलाकार आहेत जे ऑइल पेंस्टलसह चित्रकला करण्यात खूप हुशार आहेत. या कलाकृती देखील तैलचित्रांसारख्या दिसतात.

जेव्हा मी चित्रकला पूर्ण करतो आणि माझे मित्र माझ्या कामाची प्रशंसा करतात तेव्हा मला खूप आनंद होतो. माझ्या सरांनी मला सांगितले आहे की मी खूप चांगले चित्र काढतो. त्यांनी मला शाळेचा प्रतिनिधी म्हणून अनेक चित्रकला स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. त्यामुळे माझा छंद चित्र काढणे आहे, हे सांगण्यात मला खूप आनंद होतो.

माझ्या चित्रकलेच्या प्रेरणेचे सर्वात मोठे स्रोत म्हणजे माझी आई जी स्वतः एका व्यावसायिक कलाकाराप्रमाणे चित्र बनवते. ती तिच्या बहुतेक चित्रांमध्ये वॉटर कलर वापरते. मी अलीकडेच वॉटर कलर वापरण्यास सुरुवात केली आहे. एकमेकांमध्ये मिसळणाऱ्या रंगांचे सौंदर्य सहज शब्दात व्यक्त करता येत नाही. मी सूर्यास्त रंगवण्यासाठी वॉटर कलरचा वापर केला आहे.

आज-काल अनेक लोक चित्रकलेचे कार्यक्रम आयोजित करत आहेत. काही लोक आपली स्वतःची चित्रे सोशल मीडियावर सुद्धा टाकून प्रसिद्ध होत आहेत. आमच्या शाळेत दरवर्षी चित्रकलेचे एक मोठे प्रदर्शन आयोजित केले जाते. मी या वर्षीचा कार्यक्रमाचा संचालक आहे. सर्व येणारे चित्रकार एकाच कोणत्यातरी गोष्टीवर चित्रे काढणे आणि ते रेखाचित्रे काढणे हे मजेदार असेल.

आता माझा मंडला चित्रकला, डूडलिंग आणि ऑइल पेंटिंग सारखी नवीन प्रकार शिकत राहण्याचा हेतू आहे. तेथे बरेच काही शिकण्यासारखे आहे. माझ्या आईने सुद्धा मला वचन दिले आहे की, ती मला अशा चित्रकला वर्गात दाखल करेल जिथे मी माझ्या छंदात, चित्रकलेमध्ये माझी कौशल्य सुधारू शकेल. मला समजते की येथे सराव महत्त्वाचा आहे आणि माझे काम सुधारण्यासाठी मी दररोज किमान एक चित्र काढण्याचा प्रयत्न करेल.

-: समाप्त :-

हे देखील वाचा >> माझा आवडता खेळ लपाछपी निबंध मराठी

सारांश | माझा आवडता छंद चित्रकला मराठी निबंध | Maza Avadta Chand Chitrakala Essay in Marathi

Maza Avadta Chand Chitrakala Essay in Marathi – मित्रांनो, वरील लेखात आपण माझा आवडता छंद चित्रकला यावर मराठीतून 4 अगदी सोपे आणि सुंदर निबंध बघितले. हे निबंध इयत्ता 5 वी ते 12वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

आम्हाला अशा नाही तर खात्री आहे की आपल्याला हे निबंध नक्की आवडतील. आपले काही मत किंवा सूचना असतील तर आम्हला Comment द्वारे नक्की कळवा. आपल्या गरजू मित्रांना हे निबंध नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

Leave a Comment