माझा आवडता खेळ लपाछपी निबंध मराठी | Maza Avadta Khel Lapachhapi Nibandh in Marathi 2023


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

माझा आवडता खेळ लपाछपी निबंध मराठी | Maza Avadta Khel Lapachhapi Nibandh in Marathi – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात माझा आवडता खेळ लपाछपी या विषयावर निबंध मराठीतून बघणार आहोत. लपाछपी या खेळाला आपण लपंडाव असेही म्हणतो. मित्रांनो या लेखात लपाछपी या खेळाविषयी माहिती देखील सांगणार आहोत. परीक्षेत लपाछपी किंवा लपंडाव यावर निबंध असा प्रश्न 5 ते 10 गुणांसाठी एक प्रश्न नक्की विचारला जाऊ शकतो. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता निबंधाला सुरुवात करुया.

माझा आवडता खेळ लपाछपी निबंध मराठी 10 ओळी

  1. लपाछपी हा माझा आवडता खेळ आहे.
  2. लपाछपी या खेळाला लपंडाव असेही म्हणतात.
  3. लपाछपी या खेळात खूप मजा येते.
  4. लपाछपी हा खेळ खेळण्यासाठी कोणत्याही साधनांची आवश्यकता नसते.
  5. मी व माझे मित्र शाळेत रोज दुपारच्या सुट्टीत हा खेळ खेळतो.
  6. लपाछपी खेळामध्ये लपण्यासाठी चांगली जागा पाहिजे.
  7. या खेळात एकावर राज्य असते त्याने डोळ्यावर हात ठेवून 10, 20, 30… अशाप्रकारे 100 पर्यंत म्हणायचे असते.
  8. बाकीचे तोपर्यंत लपतात.
  9. त्यानंतर ज्यावर राज्य असते तो सगळ्यांना शोधून काढतो.
  10. असा हा लपाछपी खेळायला मला खूप मजा येते, म्हणून हा खेळ मला खूप आवडतो.

माझा आवडता खेळ लपाछपी निबंध मराठी 150 शब्द

माझे नाव शाम आहे. मी इयत्ता 5 वीत शिकत आहे. मला खेळ खेळायला खूप आवडतात. परंतु मला लपाछपी हा खेळ खेळायला खूप आवडतो. लपाछपी या खेळाला लपंडाव असेही म्हणतात. मला लपाछपी या खेळामध्ये खूप मजा येते.

आम्ही सर्व मित्र मिळून आमच्या सोसायटीत दर शनिवारी आणि रविवारी लपाछपी हा खेळ खेळतो. शाळेत देखील दुपारच्या सुट्टीत आम्ही हा खेळ खेळतो. हा खेळ खेळताना खूप मजा येते.

या खेळामध्ये कितीही खेळाडू भाग घेऊ शकतात. यामध्ये किती खेळाडूंनी भाग घ्यावा असे काही नियम नाही. मुख्यतः या खेळामध्ये खूप जास्त नियम नाही. त्याचप्रमाणे लपाछपी हा खेळ खेळण्यासाठी कोणत्याही साधनांची आवश्यकता नसते.

या खेळामध्ये कोणा एकावर राज्य असते आणि इतर सर्वांनी लपायचे असते. ज्या खेळाडूवर राज्य असते तो आपले डोळे बंद करून 10,20,30… अशा प्रकारे 100 पर्यंत म्हणतो. तोपर्यंत इतर खेळाडूंनी लपयाचे असते.

त्यानंतर ज्या खेळाडूवर राज्य असते त्याने सर्वांना शोधून काढायचे असते. त्याने ज्या खेळाडूला प्रथम शोधले असेल त्या खेळाडूवर राज्य येते. परंतु त्यासाठी पाहिले त्याने सर्वांना शोधून काढणे गरजेचे असते.

अशाप्रकारे हा खेळ खेळला जातो. या खेळामध्ये खूप मजा येते. आम्हा सर्व मित्रांना हा खेळ खेळायला खूप आवडतो.

-: समाप्त :-

माझा आवडता खेळ लपाछपी निबंध मराठी 250 शब्द

मला लपाछपी हा खेळ खूप आवडतो. माझ्या मित्रांनाही हा खेळ खूप आवडतो. आम्ही दररोज हा खेळ संध्याकाळी बागेमध्ये खेळतो. तसेच शाळेत देखील आम्ही हा खेळ खेळतो. याला लपंडाव असेही म्हणतात.

लपाछपी हा खेळ अत्यंत सोपा खेळ आहे. या खेळात एका मुलावर राज्य असते. तो डोळे झाकून घेतो आणि बाकीचे लपतात. मग तो डोळे उघडतो आणि लपलेल्यांना शोधून काढतो.

जो पहिल्यांदा सापडतो. त्याच्यावर राज्य येते. परंतु त्यासाठी पाहिले सर्वांना शोधून काढायचे असते. त्यानंतर तो मग डोळे झाकून घेतो आणि बाकीचे लपतात. असा हा खेळ कितीही वेळा खेळता येतो.

लपाछपी खेळात खूप मजा येते. एकाच वेळी अनेक मुले हा खेळ खेळू शकतात. या खेळासाठी कोणतेही साहित्य लागत नाही. फक्त लपण्यासाठी जागा लागते.

या खेळाचा कोणालाही त्रास होत नाही. या खेळाला काही भागात लपंडाव असे म्हणतात. लहान मुलांना ज्यांना बोलताही येत नाही, त्यांना सुद्धा हा खेळ खूप आवडतो. म्हणून हा खेळ मला खूप खूप आवडतो.

या खेळामध्ये फक्त काही काळजी घ्यावी. जसे की लपतांना जागा व्यवस्थित बघावी. कारण आपण लपण्यासाठी काना कोपऱ्यात बसतो. तेथे जंगली प्राणी जसे की साप, विंचू, पाल किंवा उंदीर असू शकतात. अशा प्राण्यांपासून आपल्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे जागा व्यवस्थित बघावी.

इतर बघता हा खेळ खूप छान खेळ आहे. शून्य खर्चात जास्त मजा असे या खेळाचे वैशिष्ट्य आहे. सर्वांनाच हा खेळ खूप आवडतो. त्याचप्रमाणे मलाही हा खेळ खूप आवडतो.

-: समाप्त :-

लपाछपी/लपंडाव या खेळाविषयी माहिती

मित्रांनो लपाछपी हा खेळ जगात सर्वत्र प्रसिद्ध आहे. या खेळाचा उगम महाराष्ट्रत झाला. या खेळाला लपंडाव, लुक्का-छुपी असेही म्हणतात. हा खेळ खेळायला कोणत्याही साधन सामग्रीची आवश्यकता नसते. याला फक्त लपण्यासाठी जागा पाहिजे.

या खेळाचे जास्त नियम नाहीत. यामध्ये कितीही खेळाडू भाग घेऊ शकतात. यामध्ये एका मुलावर राज्य असते. तो डोळे झाकून घेतो आणि बाकीचे लपतात. मग तो डोळे उघडतो आणि लपलेल्यांना शोधून काढतो. जो पहिल्यांदा सापडतो. त्याच्यावर राज्य येते. असा हा खेळ कितीही वेळा खेळता येतो.

या लेखाचे शीर्षक खालीलप्रमाणे असू शकतात:-

  • माझा आवडता खेळ लपाछपी
  • Maza Avadta Khel Lapachhapi
  • माझा आवडता खेळ लपाछपी निबंध
  • Maza Avadta Khel Lapachhapi Nibandh
  • माझा आवडता खेळ लपाछपी निबंध मराठी
  • Maza Avadta Khel Lapachhapi Nibandh in Marathi
  • माझा आवडता खेळ लपंडाव
  • Maza Avadta Khel Lapandav
  • माझा आवडता खेळ लपंडाव निबंध
  • Maza Avadta Khel Lapandav Nibandh
  • माझा आवडता खेळ लपंडाव निबंध मराठी
  • Maza Avadta Khel Lapandav Nibandh in Marathi
  • लपाछपी या खेळाविषयी माहिती
  • लपंडाव या खेळाविषयी माहिती

सारांश | Maza Avadta Khel Lapachhapi Nibandh in Marathi | माझा आवडता खेळ लपाछपी निबंध मराठी

मित्रांनो या लेखात आपण माझा आवडता खेळ लपाछपी निबंध मराठी मध्ये बघितले. मित्रांनो लपाछपी हा खेळ खूप छान खेळ आहे. आज या लेखात आपण अगदी सोप्या आणि सुंदर भाषेत माझा आवडता खेळ लपाछपी निबंध मराठी बघितला. आम्हला आशा आहे की तुम्हाला हा लेख नक्की आवडला असेल.

माझा आवडता खेळ लपाछपी निबंध मराठी | Maza Avadta Khel Lapachhapi Nibandh in Marathi – जर तुम्हाला हा लेख आवडला तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. आपल्या काही शंका किंवा सूचना असतील तर आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आमच्या ordar.in या मराठी ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

Leave a Comment