माझा आवडता खेळ निबंध खो खो 2023 | Maza Avadta Khel Kho Kho Nibandh Marathi


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

Maza Avadta Khel Kho Kho Nibandh Marathi | माझा आवडता खेळ निबंध खो खो – नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या लेखात माझा आवडता खेळ खो खो यावर निबंध मराठी मध्ये बघणार आहोत.

आपल्याला परीक्षेमध्ये माझा आवडता खेळ निबंध खो खो या विषयावर एक प्रश्न नक्की विचारला जातो. आज या लेखामध्ये आपण माझा आवडता खेळ खो खो या विषयावर अगदी सोप्या भाषेत निबंध बघणार आहोत.

चला तर मित्रांनो वेळ वाया न घालविता निबंधाला सुरुवात करुया.

माझा आवडता खेळ निबंध खो खो 10 ओळी | Maza Avadta Khel Kho Kho Nibandh 10 Lines

  1. खो खो हा माझा सर्वात आवडता खेळ आहे.
  2. खो खो हा एक पारंपारिक भारतीय मैदानी खेळ आहे.
  3. आम्ही सर्व वर्ग मित्र रोज दुपारच्या सुट्टीत खो खो खेळतो.
  4. खो खो खेळताना खूप मजा येते.
  5. आमच्या शाळेत दरवर्षी खो खो खेळाची स्पर्धा होते.
  6. खो खो हा खेळ दोन संघाद्वारे खेळाला जातो.
  7. या खेळासाठी 111 फूट लांब आणि 51 फूट रुंद मैदानाची आवश्यकता असते.
  8. या खेळात मैदानात केवळ दोन बाजूला दोन खांब उभे करायचे असतात.
  9. एका संघामध्ये 15 खेळाडू असतात त्यापैकी बारा खेळाडू खेळतात.
  10. यातले नाव खेळाडू मैदानात दोन्ही खांबाच्या दरम्यान गुडघ्यावर बसतात.

माझा आवडता खेळ निबंध खो खो 100 शब्द | Maza Avadta Khel Kho Kho Nibandh 100 Words

माझा आवडता खेळ खो खो

खो खो हा खेळ खूप लोकप्रीय भारतीय मैदानी खेळ आहे. या खेळाला खेळण्यासाठी दोन संघाची आवश्यकता असते. मैदानात दोन खांब रोवून हा खेळ खेळला जातो.

प्रत्येक संघाला खेळण्यासाठी सात मिनिटे दिली जातात. दोन्ही संघांना पाठलाग व बचाव करण्याची संधी मिळत असते.

दोन खांबांच्या मध्ये पाठलाग करणाऱ्या संघाचे आठ खेळाडू शिवण्यासाठी धावणार असतात. विरोधी संघातील तीन खेळाडू स्वतःच्या बचाव करण्यासाठी धावत असतात.

पकडणारा खेळाडू हा आपल्या संघातील बसलेल्या खेळाडूंना पाठीवर थाप मारून ‘खो’ असे म्हणतो. खो मिळालेला खेळाडू आता पकडण्यासाठी धावणार असतो.

एका खेळाडूला शिवल्यास एक गुण अशाप्रकारे संघाची गुणांची मोजणी केली जाते. दोन्ही डावांच्या शेवटी ज्या संघाचे गुण जास्त असतील तो संघ विजयी ठरतो.

शाळांमध्ये हा खेळ खेळण्यास मुलांना प्रोत्साहन दिले जाते. खो खो खेळ खेळल्याने पूर्ण शरीर तंदुरुस्त राहते. सोबतच विचार करण्याची क्षमता देखील वाढते. शरीर स्वस्त राहते. म्हणून मला हा खेळ खूप आवडतो.

माझा आवडता खेळ निबंध खो खो 400 शब्द | Maza Avadta Khel Nibandh Kho Kho 400 Words

माझा आवडता खेळ खो खो

शरीर सुदृढ, निरोगी ठेवण्यासाठी खेळ खेळणे अतिशय महत्त्वाचे आहे. सर्व खेळांमध्ये मला खो-खो हा खेळ खूप आवडतो. जेव्हा मी खूप थकतो, कंटाळतो तेव्हा मी माझ्या मित्रांबरोबर शाळेच्या मैदानावर खो-खो खेळायला जातो.

तिथे पहिलेपासूनच खो-खो चे मैदान बनवलेले आहेत. तेथे दोन लाकडी खांब रोवलेले आहेत. आम्ही रोज शाळेच्या दुपारच्या सुट्टीत खो खो खेळतो.

अगदी कमी खर्चात भरपूर आनंद देणारा हा खेळ आहे. खो खो हा एक पारंपारिक भारतीय मैदानी खेळ आहे.

खो खो हा खेळ दोन संघाद्वारे खेळला जातो. एका संघामध्ये 15 खेळाडू असतात त्यापैकी बारा खेळाडू खेळतात.

या खेळासाठी 111 फूट लांब आणि 51 फूट रुंद मैदानाची आवश्यकता असते.

खो खो या खेळासाठी जास्त साधनांची आवश्यकता नसते. या खेळात मैदानात केवळ दोन बाजूला दोन खांब उभे करायचे असतात.

12 पैकी नऊ खेळाडू मैदानात दोन्ही खांबांच्या दरम्यान गुडघ्यावर बसतात. ते सर्व खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध बाजूला तोंड करून बसतात.

बसलेले खेळाडू हे दुसऱ्या संघाच्या खेळाडूला शिवण्याचा प्रयत्न करतात तर तीन खेळाडू विरोधी संघाच्या सदस्यांचा स्पर्श टाळण्याचा प्रयत्न करतात.

दोन्ही संघांना एक एक खेळाकरिता सात मिनिट वेळ देण्यात येतो. या वेळेत एका खेळाडूला शिवले तर एक गुण अशाप्रकारे गुण मिळत असतात.

दोन्ही डावांच्या शेवटी ज्या संघाला जास्त गुण असतील तो संघ विजयी घोषित होतो.

खो खो हा खेळ खेळाडूंमध्ये स्व-रक्षण आणि सांघिक भावना निर्माण करतो. त्याचप्रमाणे निर्णय क्षमता वाढते.

खो खो या खेळाचा महाराष्ट्रातच झाला. भारता व्यतिरिक्त हा खेळ दक्षिण आशिया व दक्षिण आफ्रिकेत खेळाला जातो.

खो खो खेळाची थोडक्यात माहिती.

आपल्या सर्वांना परिचित असलेला असा हा खो खो खेळ फार पूर्वीपासून खेळला जातो. हा खेळ शहरात व खेड्यात गावागावातून खेळला जातो.

पूर्वी या खेळासाठी काही नियम नव्हते परंतु आधुनिक काळात या खेळासाठी काही नियम तयार केले आहेत. हा मैदानी खेळ आहे.

या खेळासाठी मैदान आयताकृती असावी लागते. या मैदानाची लांबी साधारणपणे 25 ते 27 मीटर असते. या मैदानाची रुंदी 13 ते 15 मीटर असते.

मैदानातील लांबीच्या बाजूच्या रेषेला बाजू रेषा व रुंदीच्या बाजूच्या रेषांना अंतिम रेषा म्हणतात. अंतिम रेषेपासून 2.70 मीटर मैदानाच्या आत दोन्ही बाजूंना दोन खांब रोवलेले असतात.

मध्य रेषेची लांबी साधारणपणे 22.60 मीटर असते. मध्यरेषेवर आठ क्रॉस रेषा असतात खो-खोच्या मैदानात दोन खांबांमधील अंतर 18 मीटर असते व खांबाची उंची एक मीटर असते.

हा खेळ दोन संघात खेळला जातो. प्रथम पंच नाणेफेक करण्यास सांगतात. नाणेफेक जिंकणारा संघ पळती किंवा पाठलाग याची निवड करतो.

पाठलाग करणारे खेळाडू बसलेल्या खेळाडूस खो देतात. मात्र खो हा शब्द उच्चारने आवश्यक असते. जर एखाद्या खेळाडूंनी विनयभंग केला तर त्याला बाद ठरविले जाते.

या खेळात बारा खेळाडू असतात. त्यातील नऊ खेळाडू प्रत्यक्ष खेळांमध्ये भाग घेतात व तीन खेळाडू राखीव असतात.

टी-शर्ट, हाफ पॅन्ट, पायमोजे आणि बूट असा हा खेळ खेळणाऱ्या खेळाडूंचा पोशाख असतो.

हा खेळ खेळण्यासाठी वयाचे बंधन नसते. महिला, पुरुष, मुले, मुली सारे जण हा खेळ खेळू शकतात.

हा खेळ घरासमोरील अंगणात, बागेमध्ये व पळण्यासाठी जिथे जागा असेल तेथे हा खेळ खेळला जातो. परंतु अलीकडे शाळा व कॉलेजमध्ये खो-खोच्या स्पर्धा घेतल्या जातात. खेळाचे राज्यस्तरीय सामने पण खेळले जातात.

या खेळात दोन पंच असतात. एक वेळ अधिकारी असतो. दोन अधिकारी गुण लिहीत असतात. ज्या संघाचे गुण अधिक होतात तो संघ जिंकतो. अशा प्रकारे हा खेळ खेळला जातो.


खो खो मध्ये किती खेळाडू असतात?

खो-खोमध्ये दोन संघ असतात. प्रत्येक संघात १२ खेळाडू असतात. परंतु एका वेळेस ९ खेळाडू खेळतात.

सारांश | Maza Avadta Khel Kho Kho Nibandh in Marathi | माझा आवडता खेळ निबंध खो खो

मित्रांनो आज आपण या लेखात माझा आवडता खेळ निबंध खो खो – Maza Avadta Khel Nibandh Kho Kho या बद्दल अगदी सोप्या भाषेत निबंध बघितला. हा लेख इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

आम्हाला खात्री आहे की आपल्याला माझा आवडता खेळ निबंध खो खो | Maza Avadta Khel Nibandh Kho Kho हा लेख नक्की आवडला असेल. आपल्या प्रतिक्रया आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आमच्या ordar.in या ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

माझा आवडता खेळ निबंध खो खो 2022 | Maza Avadta Khel Kho Kho Nibandh Marathi