आत्मनिर्भर भारत निबंध मराठी | Best Essay on Atmanirbhar Bharat in Marathi 2023


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

आत्मनिर्भर भारत निबंध मराठी | Best Essay on Atmanirbhar Bharat in Marathi 2023 – नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात आत्मनिर्भर भारत यावर निबंध बघणार आहोत. आपले सर्वांचे आवडते पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांनी दिलेली आत्मनिर्भर भारत ची घोषणा ही आपल्या देशासाठी खूप अभिमानाची बाब आहे.

शाळेत आत्मनिर्भर भारत यावर निबंध लिहिण्यास सांगितले जाते. परीक्षेत आत्मनिर्भर भारत या विषयावर 5 ते 10 गुणांचा एक प्रश्न नक्की विचारला जातो. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता निबंधाला सुरुवात करुया.

आत्मनिर्भर भारत निबंध मराठी 150 शब्द | Essay on Atmanirbhar Bharat in Marathi 150 words

मित्रांनो आत्मनिर्भर भारत या मराठी निबंधाला सुरुवात करण्यापूर्वी मला आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे. मित्रांनो ही गोष्ट दुसऱ्या विश्व युद्ध नंतरची आहे. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात दोन जपानी विद्यार्थी शिकत होते. त्यावेळी जपान वर अनेक बंधन घातली गेली होती. ते दोघे ज्या काही इलेक्ट्रोनिक्स वस्तू घ्यायचे ते जपानी कंपनीचेच घ्यायचे. त्यांच्या कडे सर्व वस्तू या त्यांच्या जपान देशा मध्ये निर्मित केलेल्याच असायच्या.

त्या काळी जपानी कंपनीच्या वस्तू या जास्त टिकाऊ नसायच्या, त्या वस्तू लगेच खराब व्हायच्या. परंतु हे दोघे त्याच वस्तू नेहेमी दुरुस्त करून वापरायचे. त्यांना त्यांच्या सोबतचे अमेरिकन विद्यार्थी हसायचे.

तेव्हा हे त्यांना सांगायचे की एक दिवस असा येईल की तुम्ही देखील आमच्या या वस्तू विकत घेणार आणि तुमच्याकडे दुसरा पर्यायच नसेल. केवढा तो आपल्या देशाबद्दल अभिमान हा.

आणि बघा मित्रांनो आज आपण वापरत असालेल्या 80% टक्के इलेक्ट्रॉनिक वस्तू या जपानी SONY, PANASONIC, KAWASAKI यांच्या आहेत.

हीच शिकवण आपल्या देशाच्या जनतेने घेणे गरजेचे आहे. आपल्या देशात निर्माण झालेली वस्तूच खरेदी करावी.

आपल्या देश जगातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ आहे. जर आपण बाहेरील वस्तू खरेदी न करता आपल्या देशात निर्मित वस्तू घेतल्यास, आपले पैसे आपल्या देशातच राहील, आपल्या कंपन्यांना फायदा होईल. आपल्या देशातील उद्योगामुळे रोजगार निर्माण होईल व बेरोजगारी नष्ट होईल. गरीबी, दरिद्री आपल्या देशात राहणार नाही.

मित्रांनो आपले आवडते पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी खूप चांगला संदेश आपल्या देशासाठी दिला आहे. ‘MAKE IN INDIA, आत्मनिर्भर भारत‘ यामुळे आपला देश भविष्यात नक्कीच महासत्ता होईल याची मला खात्री आहे.

-: समाप्त :-

आत्मनिर्भर भारत निबंध मराठी 250 शब्द | Essay on Atmanirbhar Bharat in Marathi 250 words

आत्मनिर्भर म्हणजे स्वतःवर अवलंबून असणे होय. स्वावलंबनाचे खरे महत्त्व असे की कोणत्याही खेड्याने किंवा देशाने दुसऱ्यावर किंवा कोणावरही अवलंबून राहू नये. यासाठी आपल्या भारत देशाच्या नागरिकांचाही काही जबाबदाऱ्या आहेत. जसे की आपल्या देशात तयार झालेल्या वस्तू प्राधान्याने खरेदी करणे.

स्वतःसाठी आपले गाव, शहर, जिल्हा आणि देश स्वयंपूर्ण असणे खूप महत्त्वाचे आहे. जर आपले शहर किंवा देश स्वावलंबी राहिले, तर आपल्याला इतर कोणत्याही देशावर अवलंबून राहण्याची गरज नाही.

जर एखादी व्यक्ती दुसऱ्यावर अवलंबून असेल. प्रत्येक काम किंवा इतर गरजा, मदतीसाठी विनवणी करीत असेल, तर ही त्याच्यासाठी मोठी कमतरता आहे. त्याने स्वतःवर अवलंबून असावे आणि दुसऱ्या कोणावरही अवलंबून राहू नये.

जर एखादी व्यक्ती स्वावलंबी असेल तर कोणत्याही वेळी त्याच्यावर कोणतीही अडचण किंवा समस्या उद्भवली तर तो स्वतःहून त्या समस्या सोडवू शकतो. त्यावेळी त्याला इतर कोणाचीही गरज लागणार नाही.

या सर्व गोष्टी व्यक्तीशिवाय राज्य आणि देशाला लागू होतात. जर देशाकडे संसाधने उपलब्ध नसेल तर दुसऱ्या देशाला संसाधनांची कमतरता भागवावी लागेल. जर सर्व संसाधन आपल्या स्वतःकडे उपलब्ध असेल तर तो देश आपल्या गरजा स्वतः भागवू शकतो.

आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनांचा योग्य वापर केला, आपल्या कडील कच्चा मालाचे रूपांतर आपणच पक्क्या मालात केला तर आपल्याकडे उद्योग धंदे वाढेल. त्यामुळे ते स्वयंपूर्णही होईल आणि इतर कोणत्याही देशावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.

आपल्या देशात प्रत्येक स्त्रोत उपलब्ध आहे. जर त्या स्रोतांचा योग्य वापर करून देशात वस्तू तयार होऊ लागल्या तर आपल्या देशाचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. यामुळे देशातील उद्योगांची प्रगती होईल. देशाच्या प्रत्येक तरुणांना रोजगार मिळेल आणि देशातील नागरिकांना आवश्यक वस्तू मिळतील.

-: समाप्त :-

आत्मनिर्भर भारत निबंध मराठी 500 शब्द | Essay on Atmanirbhar Bharat in Marathi 500 words

आत्मनिर्भरता ही प्रत्येक व्यक्तीसाठी सर्वात मोठी आणि सर्वोत्तम गुणवत्ता आहे. यासह तो स्वतःसाठी एक मोठा आधार बनतो. जर एखादी व्यक्ती स्वावलंबी असेल तर त्याला दुसऱ्याची फार क्वचितच गरज भासेल. येणाऱ्या प्रत्येक मोठ्या अडचणीवर तो सहज मात करू शकेल.

स्वावलंबी असणे निश्चितच एखाद्या देशाच्या विकासासाठी व अभिमानाची गोष्ट आहे. आपला भारत एक मोठा आणि संसाधित देश आहे. भारतात प्रत्येक स्रोत पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. आपण भारतातच प्रत्येक प्रकारच्या वस्तू किंवा सामग्रीचे उत्पादन स्वतःच करू शकतो. यासाठी आपल्याला इतर कोणत्याही देशावर अवलंबून राहण्याची गरज नाही.

हे करण्यासाठी देशातील प्रत्येक तरुणांमध्ये इच्छाशक्ती आणि कामात कौशल्य असणे खूप महत्त्वाचे आहे. असे नाही की आपल्या देशात अशा लोकांची कमतरता आहे. आपल्या देशात असे बरेच लोक आहेत, जे देशासाठी काहीही करू शकतात.

आत्मनिर्भर भारत योजनेत भारताला प्रत्येक क्षेत्रात सक्षम असणे आवश्यक आहे. ज्या क्षेत्रामध्ये आपला देश इतर देशावर अवलंबून असते त्या क्षेत्रात आपण उतरले पाहिजे व इतर देशांवरचे अवलंबित्व संपुष्टात आणले पाहिजे.

स्वावलंबी भारत मोहिमेचे उद्दिष्ट म्हणजे भारतातील संसाधने वापरणे. भारतातील अधिकाधिक उद्योगांचे प्रवाह वाढविणे. इथल्या प्रत्येक तरुणाला रोजगारक्षम व स्वावलंबी बनविणे हे आहे.

स्वयंपूर्ण भारतात, ज्या क्षेत्रात भारत दुसऱ्या देशाची मदत घेतो, त्या प्रत्येक क्षेत्राकडे लक्ष दिले जाईल. मग आपल्याला त्या क्षेत्रात सक्षम बनले पाहिजे. यामुळे देशाच्या विकासात मोठा फायदा होईल आणि भारत एक स्वावलंबी राष्ट्र होईल.

आपल्या सर्वांना माहीत आहे की सध्या आपला देश कोरोना विषाणू सारख्या भयंकर साथीच्या आजारातून बाहेर पडला आहे. या संकटामुळे आपल्या देशाला स्वावलंबी होण्याची संधी मिळाली आहे. या भीषण साथीमुळे आम्ही हे सिद्ध केले आहे, की आपल्या देशात कोणत्याही प्रकारची परिस्थिती उद्भवली, तरी आपण देशाबरोबर आहोत.

देशाला इतर कोणत्याही देशावर अवलंबून राहण्याची परवानगी दिली जाणार नाही. कोरोना सारख्या साथीच्या आजाराशी लढण्यासाठी आम्ही आतापर्यंत देशात पीपीइ किट्स, व्हेंटिलेटर आणि सॅनिटायझर्स इत्यादी वस्तू तयार केल्या आहेत.

आपल्या भारत देशामध्ये कोणत्याही स्रोतांची कमतरता नाही. यापूर्वी आपल्या देशात पीपीई किट्स, व्हेंटिलेटर आणि सॅनिटायझर्स इत्यादी फारच कमी प्रमाणात तयार केल्या गेल्या. परंतु अशा भयानक परिस्थितीत आम्ही स्वतःवर अवलंबून राहण्यासाठी खूप मोठी उदाहरणे दिली आहेत.

वस्तूंचे व सामान स्वतःचे उत्पादन करणे ही स्वावलंबी भारताच्या दृष्टीने महत्त्वाची आणि पहिली पायरी आहे. आणि ती यशस्वी झाली आहे. यामुळे आपला देश अन्य देशाच्या दृष्टीने आणखी उच्च झाला आहे

आत्मनिर्भरती चे फायदे

जर आपला देश आत्मनिर्भर असेल तर त्याचे बरेच फायदे आहेत.

 • इतर कोणत्याही देशासमोर आपल्याला हात पसरण्याची गरज नाही.
 • देशात उद्योगांची वाढ होईल.
 • देशातील प्रत्येक तरुण यशस्वी सक्षम आणि स्वावलंबी असेल.
 • देश बेरोजगारासह गरिबीपासून मुक्त होईल.
 • देशात अधिक पैसा असेल आणि त्याची आर्थिक व्यवस्था अधिक मजबूत होईल.
 • आयातीच्या ठिकाणी निर्यात वाढेल ज्यामुळे परकीय चलन साठा होईल.
 • कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या वेळी देशात अन्नधान्याची मागणी वाढते. जर देश स्वावलंबी असेल तर त्याला इतर कोणत्याही देशावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.

इतरांवर अवलंबून राहण्याचे तोटे

जर आपला देश कोणत्याही संसाधनासाठी इतर कोणत्याही देशावर अवलंबून असेल तर आपल्याला ही त्या देशानुसार काम करावे लागेल. आपल्यास ते मान्य नसेल तरीही त्या देशाची प्रत्येक परिस्थिती मान्य करावी लागेल.

यामुळे इतर देशांची आर्थिक स्थिती मजबूत होते. आपल्या देशाचा पैसा इतर देशांच्या विकासासाठी खर्च केला जातो. आपला देश बऱ्याच वेळा मागे राहतो. आपल्या देशाला दारिद्र्य, बेरोजगारी सारख्या भयंकर समस्यांचा सामना करावा लागु शकतो.

आपण आणि आपला देश प्रत्येक क्षेत्रात स्वयंपूर्ण झाला पाहिजे. हे आपण ठरविल्यास आपला देश विकसित देश होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. जेव्हा आपला देश पूर्णपणे स्वयंपूर्ण होईल तेव्हा तो योग्य मार्गाने आणि खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य होईल.

-: समाप्त :-

आत्मनिर्भर भारत भाषण मराठी | Speech on Atmanirbhar Bharat in Marathi

नमस्कार, सुप्रभात माझ्या शिक्षक वृंद व मित्र-मैत्रिणींना आज मी माझ्या आत्मनिर्भर भारत यावर काही माहिती सांगणार आहे. आपले लाडके पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘आत्मनिर्भर भारत ‘ ही संकल्पना मांडली आहे.

स्वदेशी म्हणजे स्वतःचा देश, आत्मनिर्भर म्हणजे स्वतःवर निर्भर असणे हे होय. आत्मनिर्भर हा शब्द जिंकणे एक व्यक्तीला खूप महत्त्वाचा असतो, तेवढाच महत्त्वाचा एका देशाला किंवा गावाला ही महत्त्वाचा असतो.

जर देश व गाव स्वतःहून निर्भर झाला, तर दुसऱ्यावर निर्भर होणे लागत नाही. जर आपला देश आत्मनिरर्भर झाला तर कोणत्याही परिस्थितीत आपण कोणत्याही संकटाला तोंड देऊ शकतो व त्या संकटावर मात करू शकतो.

आपल्या देशामध्ये असे काही संसाधने आहेत की जे दुसऱ्या देशात उपलब्धही नाहीत. पण आपण त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे करत नाहीत. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनांचा चांगल्या प्रकारे उपयोग केला तर लवकरच आपला देश आत्मनिर्भर होईल आणि आपल्याला दुसऱ्या देशाला मदतही मागावी लागणार नाही.

जर आपला भारत देश आत्मनिर्भर झाला तर आपल्या देशातून बेरोजगारी, शिक्षा व गरिबी अशा समस्या दूर जातील व देशातील सर्व लोक शांतीने जगतील. यासाठी आपणास आत्मनिर्भर व्हावे लागेल.

सर्व देशातील बहिणी, बांधवांवर प्रेम राहायला पाहिजे. सर्व बालकांनी आणि तरुणांनी शिक्षण घेतले पाहिजे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले, भगतसिंग, राजगुरू, छत्रपती शिवाजी महाराज, यांच्या सारखे चांगले काम करून भारताला पुढे नेले पाहिजे. जर आपण देहाबद्दल निष्ठा ठेवली तर आपल्या देशाची खूप प्रगती होईल व आपला देश भविष्यात नक्कीच एक महासत्ता होईल असे बोलून मी माझ्या वाक्याला इथेच पूर्णविराम देतो.

जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम्.

-: समाप्त :-

सारांश | आत्मनिर्भर भारत निबंध मराठी | Best Essay on Atmanirbhar Bharat in Marathi 2022

मित्रांनो आज आपला भारत देश आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे. आपल्या भारत देशाच्या अभिमानासाठी आपण स्वावलंबी होणे अत्यंत गरजेचे आहे. आज आपण या लेखात आत्मनिर्भर भारत निबंध मराठी | Essay on Atmanirbhar Bharat in Marathi बघितले.

आम्हाला खात्री आहे की आपल्याला हा लेख नक्की आवडला असेल. या लेखाबद्दल आपल्या काही शंका असतील तर आम्हाला comment द्वारे नक्की कळवा. हा लेख आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

या लेखाचे खालील शीर्षक असू शकते :-

 • आत्मनिर्भर भारत निबंध मराठी
 • Essay on Atmanirbhar Bharat in Marathi
 • आत्मनिर्भर भारत भाषण मराठी
 • Speech on Atmanirbhar Bharat in Marathi
 • Best Essay on Atmanirbhar Bharat in Marathi
 • Essay on Atmanirbhar Bharat in Marathi 2022
 • आत्मनिर्भर भारत निबंध मराठी २०२२

Leave a Comment