तक्रार पत्र मराठी (06 नमुने) | Takrar Patra in Marathi 2023 | Complaint Latter in Marathi 2023


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

तक्रार पत्र मराठी 2023 | Takrar Patra in Marathi | Complaint Latter in Marathi 2023 – नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या लेखात तक्रार पत्र मराठी मध्ये बघणार आहोत. त्यासोबतच आपण या लेखात तक्रार पत्र म्हणजे काय? तक्रार पत्र कसे लिहावे? तक्रार पत्र लिहिताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे आणि तक्रार पत्राचे नमुने/उदाहरण बघणार आहोत.

मित्रांनो तक्रार पत्र हा औपचारिक पत्राचाच एक उप-प्रकार आहे. परीक्षेमध्ये यावर तुम्हाला 5 ते 10 गुणांचा एक प्रश्न हमखास विचारला जातो. हा लेख आपल्या इयत्ता 7 वी ते 12 वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. चला तर मित्रांनो तक्रार पत्र मराठीतून पाहूया.

Contents hide

तक्रार पत्र म्हणजे काय?

मित्रांनो आपण इतरांकडून काही समान खरेदी करतो, किंवा काही सेवा विकत घेतो. अशावेळी समोरच्या व्क्तीकडून आपल्याला योग्य ती सेवा पुरविली जात नाही त्यावेळी आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल आपण संबंधीत व्यक्तीला जे पत्र लिहितो लिहतो त्याला तक्रार पत्र असे म्हणतात.

कधी कधी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनेमुळे आपल्याला जर त्रास होत असेल तर आपण संबंधीत व्यक्तीला तक्रार पत्र लिहितो.

तक्रार पत्र कसे लिहावे?

मित्रांनो, तक्रार पत्र कसे लिहावे? तक्रार पत्र लेखनाचे स्वरूप कसे असू शकते या बाबी आपण खालीलप्रमाणे पाहूया.

 • तक्रार पत्र लिहिताना प्रथम डाव्या बाजूला दिनांक लिहावा.
 • त्यानंतर आपण ज्या व्यक्तीला पत्र लिहीत आहोत त्या व्यक्तीचे नाव, हुद्दा, कार्यालयाचे नाव, आणि पत्ता सविस्तर लिहावा.
 • त्याखाली एक ओळ सोडून विषय लिहावा.
 • विषय हा थोडक्यात व मुद्देसुद लिहावा.
 • त्यानंतर महोदय/महोदय, आदरणीय सर, सप्रेम नमस्कार अशा शब्दांनी पत्राला सुरूवात करावी.
 • आता पत्रामध्ये प्रथम आपला स्वतःचा परिचय द्यावा.
 • त्यानंतर आपल्याला होत असलेल्या त्रासाची तपशीलवार व नम्रपणे माहिती लिहावी.
 • त्यानंतर सदर तक्रारीवर उपाय करून देण्यास सांगावे.
 • पत्र संपल्यावर एक ओळ सोडून उजव्या बाजूला आपला/आपली असे लिहून आपली सही करावी.
 • त्याखाली आपले संपूर्ण नाव व हुद्दा लिहावा.

तक्रार पत्र लेखनाचे मुद्दे

तक्रार पत्र लिहिताना आपण कोणत्या बाबी विचारात घेतल्या पाहिजे? तक्रार पत्र लेखनाचे मुद्दे काय काय असू शकतात? या सर्व बाबी आपण खाली पाहूया.

 • तक्रार पत्र लिहिताना आपण योग्य व्यक्तीलाच पत्र लिहीत आहोत की नाही याची खात्री करावी.
 • तक्रार पत्र हे शक्यतोवर विनंती पूर्वकाच लिहावी.
 • तक्रार पत्र लिहिताना सौम्य भाषेचा वापर करावा.
 • तक्रार पत्र लिहिताना कायदे, नियम याचाही उल्लेख करावा जेणेकरून समोरचा व्यक्ती तुमचे म्हणणे विचारात घेईल.
 • तक्रार पत्र थोडक्यात परंतु मुद्देसुद लिहावे.
 • काही वस्तू व समान खरेदी केले असेल तर त्याच्या पावती, बिलाची झेरॉक्स कॉपी सोबत नक्की जोडावी.
 • आपल्या तक्रारीची दखल लवकरात लवकर घेण्यास सांगावे.

तक्रार पत्र लेखनाचे नमुने/उदाहरण

मित्रांनो तक्रार पत्र लेखनाचे काही उत्तम नमुने, उदाहरण आम्ही तुमच्या अभ्यासासाठी खाली देत आहोत, त्यांचा अभ्यास करा.

दूषित पाणी येण्याबाबत तक्रार पत्र.

तुमच्या सोसायटीत /कॉलणीत दूषित पाणी येत आहे, एक जबाबदार नागरिक म्हणून महानगर पालिकेस याबद्दल तक्रार पत्र लिहा.

दिनांक – 10 जानेवारी 2022
प्रति,
माननीय,
पाणीपुरवठा अधिकारी,
पुणे महानगरपालिका, पुणे.

विषय – दूषित पाणी येण्याबाबत तक्रार पत्र.

माननीय महोदय, सप्रेम नमस्कार.
मी रोहीत मुरलीधर जाधव, आपल्या विभागातील रहिवासी असून गेल्या दोन आठवड्यापासून आमच्याकडे दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. परिणामी दोन आठवड्यापासून आम्हा रहिवाशांचे फारच हाल होत आहेत. पाणी अतिशय दूषित असल्यामुळे त्याचा वापरही करता येत नाही. दोन दिवसांपूर्वी पाण्यात जंतूही आढळून आले. त्यामुळे त्यांचा आरोग्यावर घातक परिणाम होत आहे. बऱ्याच जण उलटी, जुलाब यासारख्या रोगांना बळी पडले आहे. स्त्रियांना यामुळे घरगुती कामात फारच त्रास होत आहे.
तरी कृपया या गोष्टीकडे आपण वैयक्तिक लक्ष देऊन या त्रासापासून आमची मुक्तता करावी ही नम्र विनंती.
कळावे. तसदीबद्दल क्षमस्व.

आपला नम्र
रोहीत जाधव,
सोमवार पेठ, पुणे

शाळेच्या वृक्षारोपणासाठी मागविलेली रोपे खराब निघाल्याबद्दल तक्रार पत्र.

वृक्षारोपण कार्यक्रमासाठी मागवलेली रोपांमधील अर्धी रोपे खराब निघाल्याबद्दल शाळेच्या विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने वन अधिकाऱ्यांना तक्रार पत्र लिहा.

दिनांक – 07 जून 2022
प्रति,
वन अधिकारी,
भंडारदरा उद्यान,
अहमदनगर.

विषय – शाळेच्या वृक्षारोपणासाठी मागवलेली रोपे खराब निघाल्याबद्दल.

माननीय वनाधिकारी सर,
माझे नाव कु. सुनिल चंद्रकांत पाटील असून मी सरस्वती विद्यालय, भंडारदरा येथे इयत्ता 8वी मध्ये शिकत असून माझ्या वर्ग शिक्षकांच्या परवानगीने शाळेच्या विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपणास लक्षात आणू इच्छितो की, आम्ही आमच्या शाळेतील वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी आपल्या उद्यानातून काही रोपे मागवली होती. परंतु आपल्याकडून मागवलेली रोपे जेव्हा मिळाली तेव्हा त्या रोपांपैकी अर्धी रोपे खराब झालेली आढळली आहे व प्राप्त रोपांचा दर्जा निकृष्ट असल्याचे दिसण्यात आले आहे.

आम्ही प्रत्येक वेळी आपल्याकडूनच रोपे विकत घेतो व कधीही अशा प्रकारच्या दर्जाची रोपे आम्हाला आढळून आली नाही. परंतु यावेळी मात्र रोपांचा दर्जा खराब आहे. तरी आपण यावर त्वरित लक्ष देऊन आम्हास उत्तम प्रकारची नवीन रोपे लवकरात लवकर पाठविणे.
आपण माझ्या तक्रारीकडे सकारात्मक दृष्टीने पाहून आम्हास खराब रोपे बदलून दुसरी नवीन रोपे त्वरित पाठवाल असे मी आशा करतो.

आपला विश्वासु
सुनिल पाटील,
सरस्वती विद्यालय,
भंडारदरा

शहरातील पसरलेल्या घाणीच्या साम्राज्याबाबत तक्रार.

शहरात जागोजागी पसरलेल्या घाणीच्या साम्राज्याबाबत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला पत्र लिहून तक्रार करा.

दिनांक – १० सप्टेंबर २०२२
प्रति,
मा. आरोग्य अधिकारी,
आरोग्य विभाग,
संभाजीनगर महानगरपालिका,
संभाजीनगर.

विषय – शहरातील पसरलेल्या घाणेच्या साम्राज्याबाबत चिंता.

मा. महोदय,
मी, भूषण पाटील, संभाजीनगर शहरातील ज्येष्ठ नागरिक या नात्याने आपणाला हे पत्र लिहीत आहे. मी रोज संध्याकाळी व्यायामासाठी नारायण नगर ते रेल्वे स्टेशन हे अंतर चालत असतो. चालताना या रस्त्यावर जागोजागी मनपाने कचराकुंड्या ठेवलेल्या दिसून येतात.

दुर्दैव असे की या भागातील सर्व लोक सुज्ञ व सुशिक्षित असूनही कचरा टाकताना तो कचराकुंडीत पडेल, याबाबत काळजी घेत नाहीत. त्यामुळे बराचसा कचरा कुंडी बाहेर पडलेला असतो. अशामुळे तेथून जाणे येणे अशक्य होऊन बसले आहे.

दुसरी बाब अशी की कचरा उचलणारी गाडी येथे दररोज येत नाही. त्यामुळे येथे भयंकर दुर्गंधी सुटलेली आहे. अशा परिस्थितीत या परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रोग पसरण्याची भीती वाटते.

आपण याबाबतीत लक्ष घालून चौकशी करावी आणि दररोज किंवा एक दिवसाआड कचरा गाडी येथे येईल, अशी व्यवस्था करावी. याशिवाय परिसरात औषधाची फवारणी करावी. ही विनंती.
कळावे. तसदीबद्दल क्षमस्व.

आपला कृपाभिलाषी
भूषण नारायण पाटील
१०२, नारायण नगर,
गारखेडा परिसर, औरंगाबाद

वाढीव वीज बिलाच्या संदर्भात तक्रार पत्र.

तुमच्या घराचे मागील महिन्याचे वीज बिल खूपच वाढून आले आहे, त्याबद्दल महावितरण कार्यालयाला तक्रार पत्र लिहा.

प्रति,
मा. मुख्य अभियंता,
महावितरण विभाग,
वैजापूर, ता. वैजापूर,
जि. संभाजीनगर
दिनांक – १२ जानेवारी २०२३

विषय – वाढीव वीज बिलाच्या संदर्भात तक्रार पत्र.

महोदय,
मी सुनील शंकर पाटील, आपणास कळवू इच्छितो की, मला चालू महिन्याचे वीज बिल वाढून आले आहे. मला शंका आहे की या मीटरमध्ये काहीतरी समस्या असावी. कारण मागील महिन्याच्या रिडींग मध्ये व चालू महिन्याच्या रिडिंगमध्ये बराच फरक आहे.

तरी आपणास विनंती आहे की, संबंधित मीटरची तपासणी करून योग्य बिल मिळावे, ही विनंती.
अर्जासोबत मागील दोन महिन्यांचे विज बिल झेरॉक्स प्रति जोडलेल्या आहेत.

आपला विश्वासू
सुनिल शंकर पाटील
२१, पांडुरंग गल्ली, वैजापूर

तक्रार पत्र लेखन मराठी 9वी | Takrar Patra in Marathi Class 9th

लाऊड स्पीकर चा आवाज कमी करण्यासाठी तक्रार पत्र.

लाऊड स्पीकर चा आवाज कमी करण्यासाठी पोलीस अधिकारी यांना तक्रार पत्र लिहा.

प्रति,
पोलीस अधिकारी,
सिडको पोलीस स्टेशन,
औरंगाबाद, शहर
दिनांक – 25 जुलै 2022

विषय – लाऊड स्पीकर चा आवाज कमी करणे बाबत.

मा. महोदय,
वरील विषय आपणास तक्रार करण्यात येते की, मी सूरज राजपूत, N-11, टीव्ही सेंटर, सिडको येथील रहिवाशी असून, आमच्या घरासमोरील चौकात ईद निमित्त डिजे व लाऊड स्पीकर लावण्यात आला आहे. येथील काही लढ मुलं रात्री दोन वाजेपर्यंत लाऊड स्पीकर व डीजे मोठ्याने लाऊन नाचत आहेत. त्यांचा आम्हा नागरिकांना खूप त्रास होत आहे. आमच्या कॉलनीतील लहान मुले, विद्यार्थी व आजारी ज्येष्ठ नागरिक यांना आवाजाचा खूप त्रास होत आहे. तरी संबंधित व्यक्तींवर योग्य ती कारवाई व्हावी. ही नम्र विनंती.

आपला विश्वासू
सूरज राजपूत,
N-11, टीव्ही सेंटर,
औरंगाबाद 40002

तक्रार पत्र लेखन मराठी 10वी | Takrar Patra in Marathi Class 10th

शाळेभोवती होणाऱ्या फेरीवाल्यांच्या गर्दी हटवणे बाबत तक्रार पत्र.

तुम्ही एक विद्यार्थी असून तुमच्या शाळेभोवती होणाऱ्या फेरीवाल्यांच्या गर्दी हटवण्याबाबत पोलीस निरीक्षक यांना तक्रार पत्र लिहा.

प्रति,
मा. पोलीस निरीक्षक साहेब,
वाळूज पोलीस स्टेशन,
औरंगाबाद शहर.
दिनांक – 05 नोव्हेंबर 2022

विषय – शाळेभोवती होणाऱ्या फेरीवाल्यांच्या गर्दी हटवणे बाबत.

मा. महोदय,
मी कु. दिपाली शिंदे, श्री. गणेश विद्या मंदिर या शाळेतील एक विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणास हे तक्रार पत्र लिहीत आहे. रांजणगाव फाट्याच्या जवळच आमची शाळा आहे. आमच्या शाळेजवळ नेहमीच फेरीवाल्यांची गर्दी असते. विशेषतः शाळा भरण्यापूर्वी, शाळेच्या मधल्या सुट्टीत व शाळा सुटन्याच्या वेळी फेरीवाल्यांची जास्त गर्दी असते. त्यामुळे शाळेत प्रवेश करताना व शाळेतून बाहेर पडताना आम्हा विद्यार्थ्यांना खूप त्रास होतो. रस्ता ओलांडताना अपघात होण्याची भीती वाटते. इतरही वेळी विक्रीसाठी आरडाओरडा करतात. कधी कधी तर आपापसात भांडण नाही करतात. यामुळे शाळेत अभ्यासात आमचे लक्ष लागत नाही.

कृपया आपण यात लक्ष घालून शाळेला होणारा त्रास दूर करावा, ही नम्र विनंती.

आपली विश्वासू
दिपाली एकनाथ शिंदे,
श्री. गणेश विद्या मंदिर,
रांजणगाव, वाळूज,
जि. औरंगाबाद 400023

या लेखाचे खालील शीर्षक असू शकतात.

 • Takrar Patra in Marathi
 • Complaint Latter in Marathi
 • तक्रार पत्र लेखन मराठी 9वी
 • तक्रार पत्र लेखन मराठी 10वी
 • Complaint Latter in Marathi 09th
 • Complaint Latter in Marathi 10th
 • Takrar Patra Lekhan in Marathi
 • Takrar Patra in Marathi 2022
 • Takrar Patra in Marathi Class 10th
 • Takrar Patra in Marathi Class 9th

सारांश | तक्रार पत्र मराठी 2022 | Takrar Patra in Marathi | Complaint Latter in Marathi 2022

विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या लेखात तक्रार पत्र मराठी 2022 | Takrar Patra in Marathi | Complaint Latter in Marathi 2022 तक्रार पत्र मराठीतून बघितली. ही तक्रार पत्र इयत्ता 9वी व 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ही तक्रार पत्राची अती उत्तम नमुने, उदाहरण आहेत. या तक्रार पत्रांचा सराव करून तुम्ही परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवू शकता याची मला खात्री आहे.

मित्रांनो आम्हाला अशा आहे की तुम्हाला तक्रार पत्र मराठी हा लेख आवडला असेल. हा लेख आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. आपल्या काही शंका किंवा सूचना असतील तर comment द्वारे नक्की कळवा. आमच्या ordar.in या मराठी ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

2 thoughts on “तक्रार पत्र मराठी (06 नमुने) | Takrar Patra in Marathi 2023 | Complaint Latter in Marathi 2023”

Leave a Comment