मागणी पत्र मराठी [10] उत्तम नमुने | Magni Patra Lekhan in Marathi 2022


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

Magni Patra Lekhan in Marathi – नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात अगदी सोप्या भाषेत मागणी पत्र मराठी (Magni Patra Marathi) या विषयाबद्दल सखोल माहिती बघणार आहोत. या लेखात आपण मागणी पत्र म्हणजे काय? मागणी पत्र कसे लिहावे? मागणी पत्र लिहिताना घ्यावयाची काळजी, मागणी पत्राचे मुद्दे आणि मागणी पत्राचे नमुने बघणार आहोत.

या लेखाच्या शेवटी मागणी पत्राची pdf ही दिलेली आहे. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Contents hide
4 मागणी पत्र नमुने | उदाहरण

मागणी पत्र म्हणजे काय?

ज्यावेळी आपल्याला एखाद्या वस्तूची, किंवा सेवेची मागणी करावयाची असते, अशावेळी आपण मागणी पत्र लिहितो. मागणी पत्र द्वारे आपल्याला आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याची विनंतीच आपण करत असतो. मागणी पत्र हे औपचारिक पत्राचे एक प्रकार आहे.

विविध शाळा, संस्था आणि मंडळे यामध्ये विविध वस्तूंची मागणी नेहेमी करायची असते, अशावेळी मागणी पत्र लिहायचे असते.

मागणी पत्र कसे लिहावे?

मागणी पत्र लिहिताना खालील बाबी लक्षात ठेवाव्या.

 1. पत्राच्या सुरुवातीला उजव्या कोपऱ्यात पत्र लिहिणाऱ्याचे नाव, हुद्दा आणि दिनांक लिहावा.
 2. त्यानंतर डाव्या बाजूला एक ओळ सोडून ‘प्रति’ लिहावे.
 3. ज्या व्यक्तीला पत्र लिहायचे आहे त्या जबाबदार व्यक्तीचे नाव, हुद्दा आणि संस्थेचे नाव लिहावे.
 4. एक ओळ सोडून थोडक्यात विषय लिहा.
 5. आता एक ओळ सोडून ‘महोदय/महोदया’ लिहून पत्राला सुरुवात करावी.
 6. पन्हाळीकपणा न करतात तरीही सविस्तरपणे नेमके शब्दात विषय विस्तार करावा.
 7. दोन ते तीन परिच्छेदात मुद्देसुद लेखन करावे.
 8. शेवटी आपला / आपली कृपाभिलाशी / आज्ञार्थी यापैकी योग्य तो संबोधन वापरून समारोप करावा.

मागणी पत्र यावर नेहेमी विचारले जाणारे प्रश्न

इयत्ता ८वी, ९वी आणि 10वी च्या मराठी या विषयाच्या परीक्षेमध्ये मागणी पत्र यावर खालील प्रश्न विचारले जाऊ शकतात.

 • विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेत पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा.
 • शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा
 • वाचक या नात्याने व्यवस्थापकांना पुस्तकाची मागणी करणारे पत्र
 • शालेय भांडार प्रमुख या नात्याने संबंधित व्यक्तीला शाळेसाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा.
 • रोपांची मागणी करणारे पत्र
 • शालेय वस्तू मागणी पत्र
 • क्रीडा साहित्य मागणी पत्र
 • वृक्ष मित्र या नात्याने आयोजकांना वृक्ष लागवडीकरिता रोपांची मागणी करणारे पत्र लिहा.
 • शाळेकडे खताची मागणी करणारे पत्र लिहा.
 • मागणी पत्र इयत्ता दहावी

मागणी पत्र नमुने | उदाहरण

शालेय वस्तू मागणी पत्र

विद्यार्थी या नात्याने शालेय वस्तूंची मागणी करणारे पत्र लिहा.

दिपक शिंदे
इयत्ता 6 वी,
तुकडी – ब, ह. क्र. 25
श्री. गणेश विद्यालय देवगाव (रं)
ता. कन्नड, जि. औरंगाबाद
दिनांक १० फेब्रुवारी २०२२

प्रति,
मा. मुख्याध्यापक,
श्री.गणेश विद्यालय देवगाव (रं)

विषय – शालेय वस्तू मिळणे बाबत.

महोदय,

उपरोक्त विषयास अनुसरून विनंती अर्ज सादर करतो की, मी दिपक शिंदे, आपल्या शाळेत इयत्ता 6 वीत शिकत आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सारे शिकूया अभियानातंर्गत सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या आणि पुस्तके वाटप करण्यात आली आहे.

ज्या दिवशी ही शालेय वस्तू वाटप करण्यात आली त्या दिवशी मी आजारी असल्याने शाळेला येऊ शकलो नाही. तर मला शालेय वस्तू देण्यात याव्यात, ही नम्र विनंती.

आपला आज्ञाधारक
दिपक शिंदे

स्टेशनरी साहित्य मागणीसाठी भांडारपालास मागणीपत्र लिहा.

विद्यार्थी प्रतिनिधी,
सेवाभावी हायस्कूल,
वर्धा – 1100022
10 जानेवारी 2022

प्रति,
माननीय व्यवस्थापक,
विक्रम स्टेशनरी साहित्य भांडार

विषय – स्टेशनरी साहित्यांची मागणी करण्याबाबत.

महोदय,

मी सेवाभावी हायस्कूल मधील एक विद्यार्थी प्रतिनिधी आहे. शाळेसाठी आवश्यक स्टेशनरी साहित्याची मागणी करण्यासाठी पत्र लिहीत आहे.

दरवर्षी शाळेला आवश्यक असणारी प्रत्येक स्टेशनरी आम्ही तुमच्या साहित्य भंडारातूनच मागवतो. यावर्षी सुद्धा आम्हाला काही साहित्याची गरज आहे. नेहमीप्रमाणेच स्टेशनरी साहित्यावर नक्कीच तुम्ही आम्हाला सवलत देणार याची मला खात्री आहे. विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा तोंडावर आहेत त्यामुळे तुम्ही स्टेशनरी साहित्य लवकरात लवकर पाठवावे ही विनंती.

सोबत आवश्यक स्टेशनरी साहित्याची यादी जोडत आहे. स्टेशनरी साहित्याची बिलही सोबत पाठवावे.

धन्यवाद!

आपला कृपभिलाषी
विद्यार्थी प्रतिनिधी
सेवाभावी हायस्कूल

क्रीडा साहित्य मागणी पत्र

खेळाचे शिक्षक या नात्याने मुख्याध्यापकांना क्रीडा साहित्य मागणी पत्र लिहा.

अजित डोंगरे
क्रीडा शिक्षक,
सरस्वती विद्या मंदिर,
कल्याण, जि. ठाणे
१० मे २०२२

प्रति,
मा. मुख्याध्यापक साहेब,
सरस्वती विद्या मंदिर,
कल्याण, जि. ठाणे

विषय – क्रीडा साहित्य मिळणे बाबत.

महोदय,

आपल्याला माहीतच आहे की मागच्या वर्षी आपल्या शाळेतील कबड्डी संघाने जिल्हास्तरीय कबडी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्याचा आपण सर्वांना अभिमान आहे.

त्याचप्रमाणे आपल्या शाळेतील दिपक पवार याने राज्यस्तरीय भालाफेक स्पर्धेत कास्यपदक मिळवलं. सुवर्णपदक थोड्या ने राहिला. आपल्या शाळेतील विद्यार्थी हे खूप मेहेनती आहेत. परंतु विद्यार्थ्यांना सरावा साठी क्रीडा साहित्य कमी पडत आहे आणि जे साहित्य आहे ते पण जुने झाले आहे. त्यामुळे आपल्याला काही नवीन क्रीडा साहित्याची आवश्यकता आहे.

आपल्या शाळेतील होतकरू विद्यार्थ्यांसाठी ज्या क्रीडा साहित्यांची आवश्यकता आहे त्याची यादी खाली देत आहे. सदर क्रीडा साहित्य विद्यार्थ्यांसाठी तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी, ही नम्र विनंती.

आपला
अजित डोंगरे
क्रीडा शिक्षक,
सरस्वती विद्या मंदिर, कल्याण

विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने क्रीडा साहित्य मागणी पत्र लिहा.

सुनिल गावसकर,
विद्यार्थी प्रतिनिधी,
रेश्माई विद्या मंदिर,
ठाणे – 560001
17 सप्टेंबर 2022

प्रति,
मा. व्यवस्थापक
स्पोर्टस क्लब हाऊस,
ठाणे

विषय – शाळेत आवश्यक असलेल्या क्रीडा साहित्यांची मागणी करण्याबाबत.

महोदय,

मी रेश्माई विद्यामंदिर या शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी आहे. आमच्या शाळेमध्ये होणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धांसाठी क्रीडा साहित्यांची गरज आहे. शाळेमध्ये दरवर्षी क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. परंतु क्रीडा साहित्याच्या अभावी विद्यार्थी प्रॅक्टिस करू शकत नाही. त्यामुळे त्यांना स्पर्धेत सहभागी होता येत नाही.

क्रीडा साहित्याच्या वाढत्या किमतीमुळे ते विकत घेणे शाळेला शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप नुकसान होत आहे. आज अभ्यासाबरोबर खेळाला सुद्धा एवढेच महत्त्व आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या दैनंदिन जीवनात खेळाचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. कोणताही विद्यार्थी खेळापासून वंचित राहू नये, असा आमचा प्रयत्न आहे, त्यात आम्हाला तुमची गरज लागणार आहे.

कृपया सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि आमची मागणी मान्य करावी, ही विनंती.

आवश्यक साहित्यांची यादी सोबत जोडली आहे.

कळावे.

आपला कृपाभिलाषी
सुनिल गावसकर,
विद्यार्थी प्रतिनिधी,
रेश्माई विद्या मंदिर

विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेत पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा.

सुशील शर्मा
विद्यार्थी प्रतिनिधी,
गणेश विद्यालय, कल्याण
ठाणे – 131002
20 सप्टेंबर 2022

प्रति,
माननीय व्यवस्थापक,
उदय पुस्तकालय,
सोमवार नगर,
ठाणे – 131001

विषय – शालेय ग्रंथालयासाठी पुस्तकांच्या मागणी बाबत.

महोदय,

आपण आमच्या शाळेच्या ग्रंथालयासाठी नेहमीच पुस्तके पुरवत असतात. यावर्षी आमच्या शाळेत मराठी भाषा दिनाच्या दिवशी वर्गस्तरावर अवांतर पुस्तकांचे वाचन घेण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रंथालयात प्रसिद्ध लेखकाचे कथा व कादंबरीचे पुस्तक असणे आवश्यक आहे. त्यामुळे खालील यादी दिलेली पुस्तके आपल्या प्रतिनिधी बरोबर शाळेच्या कार्यालयात वेळेत पाठवण्याची कृपा करावी.

कळावे.

आपला कृपाभीलाषी
सुशील शर्मा
विद्यार्थी प्रतिनिधी,
गणेश विद्यालय, कल्याण

शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा.

नूतन पाटील
विद्यार्थी प्रतिनिधी,
धर्मराज विद्यालय,
ठाणे – 123001
05 जुलै 2022

प्रति,
मा. व्यवस्थापक,
साकेत बुक डेपो,
ठाणे

विषय – शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तक मागणी बाबत.

महोदय,

मी धर्मराज विद्यालयातील एक विद्यार्थी प्रतिनिधी आहे. आमच्या शाळेच्या ग्रंथालयामध्ये पुस्तकांचा अभाव आहे. उपलब्ध असलेली पुस्तके सुद्धा फार जुनी झाली आहेत. प्रत्येक वर्षी नवीन पुस्तक बाजारात येत असतात.

नवीन नवीन लेखकांची पुस्तकं प्रसिद्ध होत असतात. ती पुस्तक विद्यार्थ्यांना विकत घेऊन वाचणे शक्य नाही. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी व त्यांना चालू घडामोडींशी जोडण्यासाठी आपल्या संस्थेमार्फत आम्हास काही पुस्तके पाठवून मदत करावी. अशी नम्र विनंती.

धन्यवाद!

आपला कृपाभिलाषी
विद्यार्थी प्रतिनिधी,
धर्मराज विद्यालय

वाचक या नात्याने व्यवस्थापकांना पुस्तकाची मागणी करणारे पत्र लिहा.

प्रमोद चव्हाण
विद्यार्थी प्रतिनिधी,
शारदा विद्यालय,
अमरावती – 53
05 ऑगस्ट 2022

प्रति,
मा. व्यवस्थापक
आदर्श पुस्तक भांडार,
गणेश रोड, अमरावती

विषय – शालेय ग्रंथालयासाठी पुस्तकांच्या मागणी बाबत.

मा. महोदय,
सप्रेम नमस्कार,

मी प्रमोद चव्हाण शारदा विद्यालयाचा विद्यार्थी असून मी हे पत्र माझ्या विद्यालयाच्या मुख्याध्यापकांच्या संमतीने लिहीत आहे. आमच्या शालेय ग्रंथालयासाठी खालील पुस्तकांची आवश्यकता आहे. तरी खालील पुस्तके लवकरात लवकर पाठवावेत ही विनंती.

अ. क्र.पुस्तकाचे नाव पुस्तकाचे लेखक
1 शिवाजी कोण होतागोविंद पानसरे
2 अग्निपंखडॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम
3 प्रकाशवाटाप्रकाश आमटे
4 सनी डेजसुनील गावस्कर
मराठी पुस्तक व त्यांचे लेखक

वरील पुस्तकांची रक्कम आम्ही आपल्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने जमा केली आहे. सोबत पुस्तकांचे बिलही पाठवावे.

आपला विश्वासू
प्रमोद चव्हाण
शारदा विद्यालय

शालेय भांडार प्रमुख या नात्याने संबंधित व्यक्तीला शाळेसाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा.

प्रमोद पाटील
भांडार प्रमुख,
शारदा विद्यालय,
अमरावती – 53
10 जून 2022

प्रति,
मा. व्यवस्थापक
कविता पुस्तक भांडार,
गणेश रोड, अमरावती

विषय – शालेय ग्रंथालयासाठी पुस्तकांच्या मागणी बाबत.

मा. महोदय,
सप्रेम नमस्कार,

मी प्रमोद पाटील शारदा विद्यालयाचा भांडार प्रमुख असून मी हे पत्र माझ्या विद्यालयाच्या मुख्याध्यापकांच्या संमतीने लिहीत आहे. आमच्या शालेय ग्रंथालयासाठी खालील पुस्तकांची आवश्यकता आहे. तरी खालील पुस्तके लवकरात लवकर पाठवावेत ही विनंती.

अ. क्र.पुस्तकाचे नाव पुस्तकाचे लेखक
1 बनगरवाडीव्यंकटेश माडगूळकर
2 अस्पृश्यांचा मुक्ती संग्रामशंकरराव खरात
3 छत्रपती शाहू महाराजजयसिंगराव पवार
4 आय डेअरकिरण बेदी
मराठी पुस्तक व त्यांचे लेखक

वरील पुस्तकांची रक्कम आम्ही आपल्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने जमा केली आहे. सोबत पुस्तकांचे बिलही पाठवावे.

आपला विश्वासू
प्रमोद पाटील,
भांडार प्रमुख,
शारदा विद्यालय

रोपांची मागणी करणारे पत्र

शौर्य जारवाल
विद्यार्थी प्रतिनिधी,
शारदा विद्या मंदिर,
आंबिवली-102
10 जून 2022

प्रति,
मा. वनअधिकारी
ठाणे

विषय – वृक्ष रोपणासाठी रोपांची मागणी करणे बाबत.

महोदय,

मी शारदा विद्या मंदिर या शाळेतील एक विद्यार्थी प्रतिनिधी आहे. आमच्या शाळेमध्ये दरवर्षी वन महोत्सव साजरा केला जातो. विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाबद्दल ओढ व वनांचे महत्त्व निर्माण करण्यासाठी असे उपक्रम फार महत्त्वाचे आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्या खात्याकडून प्रत्येक शाळेला रोपांचा पुरवठा होणार आहे.

यावर्षी आमच्या शाळेला जास्त रोपांची गरज आहे. आमच्या शाळेला सुमारे पाचशे रोपे हवी आहेत. तरीसुद्धा तुम्ही आम्हाला रोपांचा पुरवठा कराल अशी आशा व्यक्त करतो.

कृपया सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि आमची मागणी मान्य करावी, ही नम्र विनंती.

आपला कृपाभिलाषी
शौर्य जारवाल,
विद्यार्थी प्रतिनिधी,
शारदा विद्या मंदिर

वृक्ष मित्र या नात्याने आयोजकांना वृक्ष लागवडीकरिता रोपांची मागणी करणारे पत्र लिहा.

विकास जाधव
वृक्ष मित्र,
रा. बोरगाव, ता. कन्नड
जि. औरंगाबाद,
07 जून 2022

प्रति,
मा. वनाधिकारी,
वनविभाग,
जिल्हा परिषद,
पालघर

विषय – शाळेतील परिसरात वृक्षारोपणासाठी रोपांची मागणी करण्याबाबत.

महोदय,

पुढच्या आठवड्यात आपल्या जिल्ह्यात वनमहोत्सव साजरा होत आहे. या महोत्सवात आमच्या गावातील मुले-मुली सहभागी होऊ इच्छितात. यानिमित्त आमच्या गावठाण परिसरात वृक्षारोपण केले जाणार आहे. वनमहोत्सवासाठी आपल्या खात्याकडून रोपांची विनामूल्य वाटप केले जाणार आहे. आमच्या गावाच्या मुलांसाठी काही रोपे हवी आहेत. आम्हला आवश्यक असणाऱ्या काही रोपांची नावे पुढे देत आहोत.

झाडांची नावे नग/संख्या
आंबा 50
जांभूळ 70
लिंब 60
गुलमोहर 50
बकाण 50
झाडांची नावे व संख्या

हे पत्र मी वृक्ष मित्र या नात्याने माननीय सरपंच यांच्या अनुमतीने लिहीत आहे.
तरी कृपया आपण सहकार्य करावे ही विनंती.

आपला कृपाभिलाषी
विकास जाधव,
बोरगाव

शाळेकडे खताची मागणी करणारे पत्र लिहा.

नरेंद्र मोदी,
विद्यार्थी प्रतिनिधी,
रमाई विद्यामंदिर,
औरंगाबाद – 431
30 डिसेंबर 2022

प्रति,
मा. मुख्याध्यापक,
रमाई विद्यामंदिर,
औरंगाबाद

विषय – शाळेतील झाडांसाठी खताच्या मागणीबाबत.

महोदय,

मी नरेंद्र मोदी आपल्या शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी आहे. या वर्षी आपल्या शाळेत झालेल्या वृक्षारोपण कार्य्रमाअंतर्गत 500 झाडे लावण्यात आली. ती झाडे आता व्यवस्थित रुजली आहेत.

परंतु त्यांची वाढ व्यवस्थित होत नाहीये. त्यांना खताची आवश्यकता आहे. त्यामुळे शाळेतील झाडांसाठी रासायनिक आणि शेंद्रिय खाते उपलब्ध करून देण्यात यावी ही नम्र विनंती.

आपला आज्ञाधारक
नरेंद्र मोदी,
विद्यार्थी प्रतिनिधी,
रमाई विद्या मंदिर

मागणी पत्र इयत्ता दहावी

सुशील शर्मा
विद्यार्थी प्रतिनिधी,
गणेश विद्यालय, कल्याण
ठाणे – 131002
20 सप्टेंबर 2022

प्रति,
माननीय व्यवस्थापक,
उदय पुस्तकालय,
सोमवार नगर,
ठाणे – 131001

विषय – शालेय ग्रंथालयासाठी पुस्तकांच्या मागणी बाबत.

महोदय,

आपण आमच्या शाळेच्या ग्रंथालयासाठी नेहमीच पुस्तके पुरवत असतात. यावर्षी आमच्या शाळेत मराठी भाषा दिनाच्या दिवशी वर्गस्तरावर अवांतर पुस्तकांचे वाचन घेण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रंथालयात प्रसिद्ध लेखकाचे कथा व कादंबरीचे पुस्तक असणे आवश्यक आहे. त्यामुळे खालील यादी दिलेली पुस्तके आपल्या प्रतिनिधी बरोबर शाळेच्या कार्यालयात वेळेत पाठवण्याची कृपा करावी.

कळावे.

आपला कृपाभीलाषी
सुशील शर्मा,
विद्यार्थी प्रतिनिधी,
गणेश विद्यालय, कल्याण

सारांश | Magni Patra Lekhan in Marathi

मित्रांनो आज आपण या लेखात मराठी मागणी पत्र Magni Patra lekhan in Marathi बघितले. आपण मागणी पत्र मराठीतून अगदी सोप्या भाषेत बघितली. मागणी पत्र संदर्भातील हा लेख इयत्ता 7वी, 8वी, 9वी आणि 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे, याची आम्हला खात्री आहे. जर आपल्याला हा लेख आवडला तर हा लेख आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

2 thoughts on “मागणी पत्र मराठी [10] उत्तम नमुने | Magni Patra Lekhan in Marathi 2022”

 1. सर या लेखात आपण दिलेली मागणी पत्र उदाहरण आम्हला खूप उपयोगी पडले. मागणी पत्राचे खूप उत्तम नमुने आपण दिले आहेत. अशीच माहिती नेहेमी देत रहा.

Leave a Comment