विनंती पत्र मराठी [५] सर्वोत्तम नमुने | vinanti patra in marathi 2023 | विनंती पत्र इयत्ता दहावी


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

विनंती पत्र मराठी | Vinanti Patra in marathi – नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या शाळेत किंवा महाविद्यालयात विविध कारणांमुळे विनंती अर्ज लिहावा लागतो किंवा 8वी, 9वी, आणि 10वी मध्ये मराठी विषयाच्या परीक्षेमध्ये पाच किंवा दहा गुणांसाठी विनंती पत्र लेखन यावर प्रश्न हमखास विचारला जातो.

तर मित्रांनो आज आपण या लेखात विनंती पत्र लेखन मराठी vinanti patra in marathi 2023 या विषयाबद्दल सखोल आणि अगदी सोप्या भाषेत माहिती बघणार आहोत. आज आपण या लेखात विनंती पत्र म्हणजे काय? विनंती पत्राचे मुद्दे आणि विनंती पत्राचे काही उत्कृष्ठ नमुने बघणार आहोत. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता या विषयाला सुरुवात करुया.

Contents hide
4 विनंती पत्राचे नमुने | उदाहरण | vinanti patra in marathi 2022

विनंती पत्र म्हणजे काय?

विनंती पत्र हा औपचारिक पत्र लेखनाचा एक भाग आहे. शाळेमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी आपल्याला काही मागणी करावयाची असेल किंवा वरिष्ठांकडून काही परवानगी घ्यावयाची असेल अशा वेळी आपण त्यांना जे पत्र लिहितो ते पत्र म्हणजेच विनंती पत्र होय.

विनंती पत्र कसे लिहावे?

  • सर्वप्रथम वर उजव्या कोपऱ्यात आपले संपूर्ण नाव लिहावे.
  • त्यानंतर आपला निवासी पत्ता लिहावा. तुम्ही शाळेत शिकत असाल तर आपल्या शाळेचे नाव, पत्ता व आपली इयत्ता व हजेरी क्रमांक लिहावा.
  • त्यानंतर दिनांक लिहावा.
  • आता डाव्या कोपऱ्यात एक ओळ सोडून प्रति लिहावे.
  • त्यांनतर ज्यांना आपण पत्र लिहीत आहे त्यांचे नाव किंवा त्यांचा हुद्दा लिहावा. जसे की तुम्ही शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहीत असाल तर ‘ मा. मुख्याध्यापक’ असे लिहावे.
  • त्यानंतर संस्थेचे नाव लिहावे व शेवटी दिनांक लिहावे.
  • आता एक ओळ सोडून विषय लिहावा.
  • त्यानंतर एक ओळ सोडून महोदय लिहावे.
  • त्याखाली एक ओळ सोडून सविस्तर आपली मागणी मांडवी. परंतु लक्षात ठेवा अशी मागणी मांडताना विनम्र भाषेचा वापर करावा.
  • आता हे लिहून झाल्यानंतर शेवटी आपला किंवा आपली व स्वतः चे नाव लिहून विनंती पत्राची समाप्ती करावी.

विनंती पत्र या विषयावर नेहेमी विचारले जाणारे प्रश्न.

  • तुम्ही राहता त्या भागात बस थांबा नाही परिवहन मंडळाच्या वरिष्ठ व्यवस्थापकांना तुमच्या भागात नवीन बस थांबा करावा याबाबत विनंती पत्र लिहा.
  • विद्यार्थी या नात्याने या शिबिरात प्रवेश घेण्यास संबंधित व्यक्तीला विनंती पत्र लिहा.
  • नेटवर्क नसल्यामुळे तुम्ही शाळेच्या ऑनलाईन क्लासला हजर राहू न शकल्याची मुख्याध्यापिकांना सुचित करणारे विनंती पत्र लिहा.
  • शाळेत अभ्यासिकेची व्यवस्था व्हावी असे शाळेच्या मुख्याध्यापकांकडे विनंती पत्र लिहा.
  • मुख्याध्यापकांना विनंती पत्र लिहा.
  • मावस भावाचे लग्न असल्यामुळे रजा मिळण्याबद्दल गुरुजींना विनंती पत्र लिहा.

विनंती पत्राचे नमुने | उदाहरण | vinanti patra in marathi 2022

तुम्ही राहता त्या भागात बस थांबा नाही परिवहन मंडळाच्या वरिष्ठ व्यवस्थापकांना तुमच्या भागात नवीन बस थांबा करावा याबाबत विनंती पत्र लिहा.

रचना रानडे,
२३, स्वागत निवास,
आनंदनगर, राजगड रस्ता,
अहमदनगर – ४२.
दि. 05.08.2022

प्रति,
वरिष्ठ व्यवस्थापक,
परिवहन मंडळ,
स्वारगेट बस आगार,
अहमदनगर.

विषय – आनंदनगर, राजगड रस्ता, अहमदनगर – 41 या भागात नवीन बस थांबा सुरू करण्याबाबत.

महोदय,

मी, रचना रानडे राजगड रस्त्यावरील आनंदनगर या भागात गेली चार वर्षे राहत आहे. रोज बसने प्रवास करणाऱ्यांपैकी मी एक नागरिक आहे या नात्यानेच आनंदनगर भागातली परिस्थिती तुमच्यासमोर मांडत आहे.

आनंदनगर हा भाग राजगड रस्त्यावरील हिंगणे आणि माणिकबाग या भागांचे मध्ये येतो. हिंगणे व माणिकबाग येथे बस थांबे आहेत. या दोन बस थांब्यातील अंतर साधारण 2.5 कि. मी. ते 03 कि. मी. आहे. पण या दोन भागांच्या मध्ये असणाऱ्या आनंदनगर भागात मात्र बस थांबा नाही. राजगड रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आनंद नगरचा विस्तार मोठा आहे. मुख्य रस्त्यापर्यंत येण्यासाठी सुद्धा बरेच अंतर पायी चालत यावे लागते. आनंदनगर भागात राहणाऱ्या रहिवाशांना बससाठी दीड ते दोन किमी अंतर पायी जावे लागते.

या भागात लोकसंख्येची घनता ही जास्त आहे. आनंदनगर मधील नेहमी बस स्टॉप वर येणाऱ्या विविध वयोगटातील व्यक्तींशी बोलताना आनंदनगर मध्ये बस थांबा असण्याची निकडं लक्षात आली. शिवाय याआधी या भागात बस थांबा असल्याचेही काही व्यक्तींनी सांगितले. मध्यंतरीच्या काळात हा बस थांबा का काढण्यात आला याचे कारण समजत नाही. परंतु आता नागरिकांची वाढती मागणी आग्रह लक्षात घ्यावा, ही विनंती.

तरी आपण या प्रकरणी लक्ष घालून आनंदनगर भागात लवकरात लवकर बस थांबा होईल असे पहावे ही विनंती.
कळावे.

आपली
रचना रानडे
बससेवेचा लाभ घेणारी एक ग्राहक

विद्यार्थी या नात्याने या शिबिरात प्रवेश घेण्यास संबंधित व्यक्तीला विनंती पत्र लिहा.

सागर पवार,
ह. क्र. 9, इयत्ता 10वी
श्री गणेश विद्यालय, देवगाव,
ता. गंगापूर, जि. औरंगाबाद.
दि. 10 मे 2022

प्रति,
माननीय श्री. जितंद्र आव्हाड,
शिबीर संयोजक, प्रशिक्षक,
कन्नड, जि. औरंगाबाद.

विषय – योगासन व प्राणायाम प्रशिक्षण वर्गात प्रवेश मिळण्याबाबत.

महोदय,

मी सागर पवार श्री. गणेश विद्यालय, देवगाव रंगारी या शाळेचा विद्यार्थी आहे. श्री. गणेश योगसाधना या संस्थेमार्फत आयोजित आपल्या योगासन व प्राणायाम प्रशिक्षण वर्गात सहभागी होण्यासाठी मी इच्छुक आहे.

खास शालेय विद्यार्थ्यांकरीता आयोजित करण्यात आलेल्या या निशुल्क योगासन व प्राणायाम प्रशिक्षण वर्गाला इतर शाळातील विद्यार्थ्यांचाही प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे नाव नोंदणी करून सुद्धा माझा प्रवेश निश्चित झाला नाही. कारण विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे मला या वर्गात बसण्याची संधी मिळाली नाही.

मी या प्रशिक्षण वर्गात सहभागी होण्यासाठी खूप उत्सुक आहे. मला योगासनाची खूप आवड आहे. एक होतकरू व प्रामाणिक विद्यार्थी या नात्याने आपण मला या प्रशिक्षण वर्गात प्रवेश मिळवून द्यावा ही नम्र विनंती.

आपला विश्वासू,
सागर पवार
श्री. गणेश विद्यालय,
देवगाव रंगारी.

नेटवर्क नसल्यामुळे तुम्ही शाळेच्या ऑनलाईन क्लासला हजर राहू न शकल्याची मुख्याध्यापिकांना सुचित करणारे विनंती पत्र.

सुजाता जाधव,
रेशमाई विद्यामंदिर,
टिटवाळा,
दि. 10 जुलै 2022.

प्रति,
मा. मुख्याध्यापक,
रेशमाई विद्यामंदिर,
टिटवाळा.

विषय – नेटवर्क नसल्यामुळे शाळेच्या ऑनलाईन क्लासला हजर राहू न शकल्याबाबत.

महोदय,

मी सुजाता जाधव आपल्या रेशमाई विद्यामंदिर, टिटवाळा या शाळेत इयत्ता आठवीत शिकत आहे. माझा हजेरी क्रमांक 25 आहे. सद्या कोरोणा असल्यामुळे शाळा बंद आहे. त्यामुळे आपल्या शाळेत ऑनलाईन शिक्षणाचे वर्ग घेतले जात आहेत. मी रोज या वर्गाना हजर असते. परंतु काल इकडे खूप पाऊस पडला त्यामुळे मी राहत असलेल्या या भागात मोबाईल चे नेटवर्कच गेले आणि लाईट ही गेली. त्यामुळे काल मी ऑनलाईन क्लासला हजर राहू शकले नाही. त्यामुळे मला खूप दुःख होत आहे.

काल शिकवलेल्या वर्गाची माहिती किंवा नोट मला मिळाली तर मी लवकरच त्याचेही अभ्यास करून टाकेल. कारण मी या वर्षी शाळेत प्रथम क्रमांक पटकावन्याचा निर्धार केला आहे. तरी कृपया माझी कालची रजा मंजूर करण्यात यावी व कालच्या नोट्स मला देण्यात याव्या ही नम्र विनंती.

आपली आज्ञाधारक विद्यार्थी
सुजाता र. पवार
इयत्ता आठवी, रेशमाई विद्यामंदिर,
टिटवाळा.

शाळेत अभ्यासिकेची व्यवस्था व्हावी असे शाळेच्या मुख्याध्यापकांकडे विनंती पत्र लिहा.

विजय कारंडे,
रमाई विद्यामंदिर,
टिटवाळा,
दि. 12 जुलै 2022.

प्रति,
मा. मुख्याध्यापक,
रमाई विद्यामंदिर,
टिटवाळा.

विषय – शाळेत अभ्यासिकेची व्यवस्था होण्याबाबत.

महोदय,

मी विजय कारंडे आपल्या रमाई विद्यामंदिर, टिटवाळा या शाळेत इयत्ता दहावीत शिकत आहे. माझा हजेरी क्रमांक 25 आहे. आपल्या शाळेमध्ये दुपारच्या सुट्टीत अभ्यास करण्यासाठी आम्हला शाळेच्या पटांगणात बसावे लागते. मला विविध कथा व कादंबरी वाचण्याची आवड आहे. माझ्यप्रमाणेच इतरही माझ्या विद्यार्थी मित्रांना देखील पुस्तके वाचण्याची आवड आहे. इतर विद्यार्थ्यांशी चर्चा करून असे समजले की आपल्या शाळेत एका अभ्यासिकेची आवश्यकता आहे.

कारण जे विद्यार्थ्यांना खेळांची आवड आहे त्या विद्यार्थ्यांना शाळेचे मैदान आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची आवड आहे त्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका नाही. तरी एक होतकरू विद्यार्थी या नात्याने मी आपणास विनंती करतो की आपल्या शाळेत एक अभ्यासिका असावी. आणि आम्हाला खात्री आहे की आपण याबाबतीत लवकरात लवकर निर्णय घेतील.

आपला आज्ञाधारक विद्यार्थी
विजय कारंडे
इयत्ता दहावी, रमाई विद्यामंदिर,
टिटवाळा.

मुख्याध्यापकांना विनंती पत्र.

सपना महेर,
रेशमाई विद्यामंदिर,
कल्याण,
दि. 12 जुलै 2022.

प्रति,
मा. मुख्याध्यापक,
रेशमाई विद्यामंदिर,
कल्याण.

विषय – नेटवर्क नसल्यामुळे शाळेच्या ऑनलाईन क्लासला हजर राहू न शकल्याबाबत.

महोदय,

मी सपना महेर आपल्या रेशमाई विद्यामंदिर, कल्याण या शाळेत इयत्ता आठवीत शिकत आहे. माझा हजेरी क्रमांक 25 आहे. सद्या कोरोणा असल्यामुळे शाळा बंद आहे. त्यामुळे आपल्या शाळेत ऑनलाईन शिक्षणाचे वर्ग घेतले जात आहेत. मी रोज या वर्गाना हजर असते.

परंतु काल इकडे खूप पाऊस पडला त्यामुळे मी राहत असलेल्या या भागात मोबाईल चे नेटवर्कच गेले आणि लाईट ही गेली. त्यामुळे काल मी ऑनलाईन क्लासला हजर राहू शकले नाही. त्यामुळे मला खूप दुःख होत आहे.

काल शिकवलेल्या वर्गाची माहिती किंवा नोट मला मिळाली तर मी लवकरच त्याचेही अभ्यास करून टाकेल. कारण मी या वर्षी शाळेत प्रथम क्रमांक पटकावन्याचा निर्धार केला आहे. तरी कृपया माझी कालची रजा मंजूर करण्यात यावी व कालच्या नोट्स मला देण्यात याव्या ही नम्र विनंती.

आपली आज्ञाधारक विद्यार्थी
सपना महेर
इयत्ता आठवी, रेशमाई विद्यामंदिर,
कल्याण.

मावस भावाचे लग्न असल्यामुळे रजा मिळण्याबद्दल गुरुजींना विनंती पत्र.

सुनील तटकरे,
जि. प. प्रा. शाळा,
डोनगाव.
दि. 10.12.2022

प्रति,
मा. वर्ग शिक्षक,
इयत्ता 7वी,
जि. प. प्रा. शाळा,
डोनगाव.

विषय – मावस भावाचे लग्न असल्यामुळे रजा मिळणे बाबत.

महोदय,

मी, सुनील प्रभाकर तटकरे आपल्या जि. प. प्रा. शाळा, डोनगाव या शाळेत इयत्ता 7वीत शिकत आहे. माझे हजेरी क्रमांक 15 हा आहे.
उपरोक्त विषयास अनुसरून विनंती अर्ज सादर करतो की माझ्या मावस भावाचे उद्या दिनांक 11 डिसेंबर 2022 रोजी माझ्या मावस भावाचे लग्न असल्यामुळे मी उद्या शाळेत येऊ शकणार नाही.

तरी माझी उद्या दिनांक 11 डिसेंबर 2022 रोजीची एक दिवस रजा मंजूर करण्यात यावी ही नम्र विनंती.

आपला आज्ञाधारक विद्यार्थी
सुनील तटकरे
इयत्ता 7वी
जि. प. प्रा. शाळा,
डोनगाव.

सारांश | vinanti patra in marathi

मित्रांनो आज आपण या लेखात vinanti patra in marathi, विनंती पत्र म्हणजे काय?, विनंती पत्र कसे लिहावे? याबद्दल सखोल माहिती जाणून घेतली आहे. ही माहिती इयत्ता 08 वी, 09 वी व इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. विनंती पत्राचे विविध नमुने आपल्याला हे समजण्यासाठी उपयुक्त ठरेल. आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेल. आमच्या ordar.in या ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

vinanti patra in marathi 2022, vinanti patra in marathi, vinanti patra in marathi 2022

3 thoughts on “विनंती पत्र मराठी [५] सर्वोत्तम नमुने | vinanti patra in marathi 2023 | विनंती पत्र इयत्ता दहावी”

Leave a Comment