प्रसंग लेखन मराठी | Prasang lekhan in marathi | Prasang lekhan in marathi topics


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

Prasang lekhan in marathi | प्रसंग लेखन मराठी – मित्रांनो या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण प्रसंग लेखन या बद्दल माहिती पाहणार आहोत. प्रसंग लेखनाचे विविध नमुने पाहणार आहोत. प्रसंग लेखनाच्या नावातच आहे एखाद्या प्रसंगाचे हुबेहुब वर्णन करणे म्हणजेच प्रसंग लेखन होय.

या निबंध प्रकारात आपण एखाद्या घटनेचा किवा एखाद्या प्रसंगाचा आपल्याला आलेला अनुभव आपण अशा प्रकारे लिहितो की ते प्रसंग लेखन वाचनार्या समोर हुबेहूब चित्र उभे रहाते.

प्रसंग लेखन म्हणजे काय?

एखाद्या घटनेचा आपल्याला आलेला अनुभव लेखन म्हणजेच प्रसंग लेखन होय. एखाद्या घटनेचे दृष्य स्वरूपात वर्णन करणे म्हणजेच प्रसंग लेखन होय. प्रसंग लेखन हा एक निबंधाचाच प्रकार आहे.

प्रसंग लेखनविषयी शाळेत काही मुद्द्यावर नेहेमी प्रश्न विचारले जातात, जसे की कौतुक सोहळा, मी पाहिलेला अपघात, निरोप समारंभ, मी पाहिलेला पुर इत्यादी.

अशा प्रकारचे प्रसंग लेखन करताना काही महत्त्वाचे मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजे.

प्रसंग लेखनाचे मुद्दे | Prasang Lekhan in marathi Tips

आता आपण प्रसंग लेखनाचे मुद्दे | Prasang Lekhan Tips बघणार आहोत. प्रसंग लेखन करताना आपण कोणकोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजे त्याचा अभ्यास आपण खाली करूया.

प्रसंग लेखनाचे मुद्दे

  • प्रसंग लेखन करताना ठिकाणाचा उल्लेख करावा.
  • कोणत्या वेळेला घटना घडली? सकाळी, दुपारी किंवा संध्यकाळी त्याचा उल्लेख करावा.
  • घडलेल्या घटनेचे हुबेहूब वर्णन करावे.
  • घटना घडली त्या वेळी उपस्थित असलेल्या व्यक्तींचा प्रसंग लेखनात उल्लेख करावा.
  • प्रसंग लेखन करताना योग्य प्रकारे शब्दांचा वापर करावा.
  • संवेदनशील लेखन असावे.
  • भाषेचा सहज, योग्य वापर आपल्याला करता आले पाहिजे.

प्रसंग लेखन मराठी नमुना | prasang lekhan in marathi topics

आता आपण प्रसंग लेखनाचे मराठीत काही नमुने पहाणार आहोत. विविध प्रकारचे प्रसंग लेखन मराठी नमुना | prasang lekhan in marathi topics खालीलप्रमाणे दिले आहेत. त्यांचा अभ्यास करा.

  • prasang lekhan in marathi topics
  • prasang lekhan marathi maze balpan
  • prasang lekhan in marathi 9th class
  • prasang lekhan in marathi 10th class
  • prasang lekhan in marathi example
  • प्रसंग लेखन इयत्ता नववी
  • प्रसंग लेखन इयत्ता दहावी

प्रसंग लेखन मी पाहिलेला पूर

ते पावसाळ्याचे दिवस होते. मी आणि माझी मोठी बहीण आम्ही दोघे मामाच्या गावी आलो होतो. मामा कोल्हापूर जवळ असलेल्या खेरवाडी गावात राहतात. तेथे मामाचे खूप मोठे शेत आहे.

मामाच्या घरी आजी – आजोबा, मामा – मामी आणि मामाचा मुलगा श्रीराम असे आमच्या मामाचे कुटुंब आहे. श्रीराम च्या वाढदिवसानिमित्तच आम्ही गावी आलो होतो.

आम्ही गावी आलो तेव्हापासूनच धो-धो पाऊस पडत होता. विजा कडकडत होत्या. मामाचे गाव कृष्णा नदीच्या काठी वसलेले आहे.

आता गावी आम्हाला येऊन एक आठवडा झाला होता. पाऊस देखील आठ दिवसांपासून सारखा पडत होता. एक दिवस रात्री अचानक लाईट गेली. घरात पूर्ण काळोख पसरला. मामीने दिवा लावला. कशीबशी ती रात्र आम्ही काढली.

सकाळी गावात पोलीस व तलाठी अप्पा आले व त्यांनी गावाला सतर्क राहण्याचे सांगितले. कृष्णा नदीने त्याची धोक्याची पातळी ओलांडली आहे. तिने तिचा पात्र सोडला आहे. गावात कधीही पुराचे पाणी येऊ शकते असे त्यांनी सगळ्या गावकऱ्यांना सांगितले. एवढे सांगून ते पुढच्या गावात जाण्यासाठी निघून गेले.

साधारण दुपारची 3.20 वाजताची वेळ होती. बाहेर धो-धो पाऊस पडत होता. अचानक जोरजोरात दरवाजा वाजू लागला.मामाने दरवाजा उघडला तर समोर मामाचा मित्र रामभाऊ उभा होता. तो पूर्ण पावसात ओला चिंब भिजलेला होता. ते म्हणाले “दीपक गावात पुराचे पाणी शिरले आहे, चल आवर लवकर सगळ्यांना घेऊन आपण समोरच्या टेकडीवरच्या मंदिरात जाऊ, पूर्ण गावात कधीही पुराचे पाणी येऊ शकते.” त्यांनी घाबरलेल्या आवाजातच सांगितले. असे सांगून ते निघून गेले.

मामाने आमच्याकडे बघितेल व ते आजोबांना सांगत होते आपल्याला निघायला पाहिजे पुराचे पाणी कधीही पूर्ण गावात येऊ शकते. मग आम्ही सर्व जण व गावातील इतर सर्व लोकांसमोर पडत्या पावसात गावा शेजारच्या उंच टेकडीवरच्या मंदिराकडे निघालो.

आता NDRF च्या दोन तुकड्याही आमच्या मदतीला आल्या होत्या. त्या पुरात अडकलेल्या लोकांना खूप मेहनतीने सुखरूप बाहेर काढत होत्या.

टेकडीवरच्या मंदिरात पोहोचल्यावर आम्ही वरून आम्हाला कृष्णा नदीचे ते रूप दिसले. समोर जणू समुद्रच दिसत होता. गाव अर्धे पाण्यात गेले होते. अजूनही मुसळधार पाऊस पडतच होता. आभाळ दाटून आले होते, जोराचा वारा देखील चालू होता.

दुसऱ्या दिवशी पाऊस थांबला व हळूहळू पुराचे पाणी कमी होऊ लागले होते. तसे गावकरी परत गावात आपापल्या घरी जायला लागले. आम्ही सुधा घरी आलो. देवाच्या कृपेने मामाच्या घरात पाणी शिरले नाही. दुसऱ्या दिवशी आम्हाला मामाने बस मध्ये बसवले व आम्ही आमच्या घरी कोल्हापूरला आलो.

असा हा आमचा आम्ही पाहिलेला पूर! देवाच्या कृपेने आम्ही सुखरूप आलो. हा अनुभव आम्ही आयुष्यात कधीच विसरणार नाही.

प्रसंग लेखन माझ्या शाळेतील एक समारंभ

आमच्या शाळेत नुकताच दहावीचा निकाल लागला होता. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी आमच्या शाळेत सत्कार समारंभ ठेवला होता.

शाळेत बस एकच धूम चालली होती. आमचे सर्व शिक्षक आणि शिपाई काका समारंभाच्या तयारीत मग्न झाले होते. समारंभ उद्या सकाळी 8.00 वाजता ठेवण्यात आला होता.

सत्कार समारंभासाठी स्टेज खूप छान सजवले होते. माईक आणि स्पीकर लावले होते. आम्हा विद्यार्थांना बसण्यासाठी मंडप लावला होता.

आज समारंभाचा दिवस होता. आम्ही सर्व 7.30 वाजताच शाळेत आलो. शिक्षकांनी मुलांना लगेच मंडपात बसण्यास सांगितले. तसे आम्ही सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने मंडपात बसलो.

सत्कार समारंभ सुरु झाले सर्व शिक्षक जमा झाले. आमच्या शाळेचे प्राचार्य देखील आले. प्रमुख पाहुणे म्हणून शहराचे पोलीस आयुक्त यांना बोलावले होते. तेही आले.

प्रथम सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून आलेले पोलीस आयुक्त साहेबांनी आम्हाला खूप प्रेरणादायी भाषण दिले. त्यांना बघून माझ्याही मनात त्यांच्यासारखे मोठे पोलीस अधिकारी व्हावे या धेयाने जन्म घेतला आहे. आणि मी हे माझे ध्येय आयुष्यात सध्या करणारच.

प्रसंग लेखन मराठी कौतुक सोहळा

आज PSI-STI-ASO परीक्षेचा अंतिम निकाल लागला. माझ्या मोठ्या भावाचा मित्र रमेश PSI झाला. हे ऐकून मला खूप आनंद झाला. गावात एकाच बातमी पसरली की रमेश फौजदार झाला.

रमेश हा आमच्या गावातील पहिलाच अधिकारी आणि तो पण पोलीस अधिकारी झाल्यामुळे गावात सगळीकडे फक्त त्याचीच चर्चा होत होती.

त्याच्या आई वडिलांना जेव्हा ही बातमी कळली तर त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. रमेशने खूप मेहनत घेतली होती. त्याला आमच्या गावाच्या सरपंचांनी फोन करून शूबेच्छा दिल्या व त्याला उद्या सत्करासाठी गावात बोलावलं.

तो यायला तयार झाला. तो येणार हे ऐकून सर्वांना खूप आनंद झाला. आज रमेश चा कौतुक सोहळा होता. तो बस मधून उतरताच त्याच्या मित्रांनी त्याला खांद्यावर उचलला त्याला फुलाच्या माळा घातल्या. गुलाल उधळला. तसेच रेशाला गावातल्या कौतुक सोहळा ज्या ठिकाणी होता तेथे आणला.

प्रथम रमेश त्याच्या आई बाबांचे पाया पडला व इतर मोठ्या ग्रामस्थांचे नमस्कार केले. प्रथम सरपंचांनी रमेश भरभरून कौतुक केले व गावातल्या पुढच्या पिढीने रमेशचे आदर्श घ्यावा असे भाषणात सांगितले.

रमेशचे व त्याच्या आई बाबांचे सरपंचांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. रमेशनेही आम्हला खूप प्रेरणादायी भाषण केले. रमेशचे खरेच आम्हा सर्वांना कौतुक वाटत होते. आणि अशाप्रकारे रमेशचा कौतुक सोहळा पार पडला.

प्रसंग लेखन मराठी मी पाहिलेला अपघात

दुपारची वेळ होती मी व माझा मित्र आम्ही दोघे माझ्या मोटासायकलवर गावी चाललो होतो. गावी जाताना आम्हाला घाट लागतो. घाटातून जात असताना समोर गर्दी जमलेली दिसली.

मी गाडी गर्दीच्या थोडी लांब उभी केली व माझा मित्र आणि मी गर्दीच्या जवळ गेलो तर बघतो तर काय? एक कार घाटातून सरळ खाली गेलेली. गाडी खालच्या जंगलात पडली होती. तेथे पोलीस ही पोहोचले होते व त्यांना वाचवण्याचा कसोशीने प्रयत्न करत होते.

गाडी वर काढण्यासाठी क्रेनही आणला होता. अंबुलेंस आली होती. गाडीतल्या लोकांचा जीव वाचायला हवा म्हणून सगळे लोक देवाला प्रार्थना करत होते.

तेवढे बघून माझ्या अंगाला शहारा आला व मला कसे तरी व्हायला लागले. मग मी व माझा मित्र तिथून निघून आलो. असा मी पाहिलेला अपघात मी कधीही विसरणार नाही. तेवढे बघून मला एक शिकवण मिळाली की गाडी सावकाश व व्यवस्थित चालवावी.

प्रसंग लेखन माझे बालपण

प्रसंग लेखन माझे बालपण | prasang lekhan majhe balpan– बालपण म्हंटले की समोर दृश्य उभे राहते. खेळणारी बागडणारी लहान मुले आणि त्यांचा किलबिलाट. मित्रहो आज मी तुम्हाला प्रसंग लेखन माझे बालपण याबद्दल माझ्या बालपणातील आठवणी सांगणार आहे.

बालपणाची आठवण काढली तर असे वाटते की तेच दिवस बरे होते. माझे बालपण गावीच गेले आहे. लहानपणी आम्ही लपंडाव, लगोरी, गोट्या आणि लंगडी असे अनेक खेळ खेळायचो. हे खेळ खेळताना खूप मजा यायची. खेळ खेळताना पूर्ण दिवस कसा जायचा काही कळायचच नाही.

आमचे मित्र खूप छान होते. जीवाला जीव देणारे होते. आजही आमची मैत्री खूप घट्ट आहे. मी गावातल्या माझ्या मित्रांना नेहेमी मोबाईल वर बोलत असतो. दिवाळीच्या सुट्टीत आम्ही गावी जातो. त्यावेळी आम्ही खूप मजा करतो. जुन्या आठवणी काढतो. आता सर्व जण मोठी झाली आहेत.

माझ्या बालपणी आम्ही जिल्हा परिषद शाळेत शिकायचो. त्यावेळी अशी बेंच नव्हती. खालीच फरशीवर बसावे लागत. कधी कधी तर आमची शाळा झाडाखाली भरायची. त्यावेळी आमचे जास्त लाड नसायचे. काळी पाटी आणि लेखणी हेच आमचं दप्तर असायचे. वडिलांनी वही आणि पेन घेऊन दिला की आमच्या आनंदाला उधळण यायचे.

आमचे शाळेतील शिक्षक ही कडक होते. मी काळे सरांना आणि चोपडे सरांना खूप घाबरायचो. ते खूप मारायचे. त्यांच्या भीतीपोटी कधी कधी मी शाळेत जायचोच नाही. कधी कधी आम्ही दुपारच्या सुट्टीत पळून जायचो आणि क्रिकेट खेळायचो.

आम्ही तीन भावंडं होतो. सर्वात मोठा मी होतो. त्यामुळे मला जास्त खेळायला मिलायच नाही. आईचा मी खूप लाडका होतो. परंतु वडील माझे खूप कडक होते. मी त्यांनाही खूप घाबरायचो. शाळेतून आल्यावर मी शेतात आई वडिलांना मदत करायचो. कापूस वेचायाचो. भाजीपाला काढायचो. जनावरांना चारा पाणी करायचो.

आमच्याकडे एक गाय आणि एक म्हैस होती. त्यांचे दूध काढायचे काम माझ्याकडेच होते. मलाही दुधाच्या धारा काढायला खूप मजा यायची. दूध काढून मग मी एक प्याला दूध प्यायचो आणि व्यायाम करायचो. त्यामुळे माझे शरीर आजही सुदृढ आहे.

आम्ही शनिवारी आणि रविवारी नदीत पोहायला जायचो. मासे पकडायचो. तेव्हा खूप मजा येत असत. ते दिवस आठवले तर लगेच डोळ्यात पाणी येते. मित्रहो, जर तुम्ही लहान असाल तर शेवटी जाता जाता मी एवढेच म्हणेन की तुम्ही तुमचे लहानपण बालपण पूर्ण आणि आनंदात जागा. बालपणात खूप मजा करा. आनंदी राहा. कारण हे दिवस पुन्हा येणार नाही.

सारांश | प्रसंग लेखन मराठी | prasang lekhan in marathi

आज या लेखात आपण प्रसंग लेखन मराठी | Prasang lekhan in marathi याबद्दल जाणून घेतले. तसेच प्रसंग लेखनाचे मुद्दे | Prasang Lekhan Tips, प्रसंग लेखन मराठी नमुना | prasang lekhan in marathi topics याबद्द्ल सविस्तर माहिती जाणून घेतली. आम्हाला आशा आहे आपल्याला ही माहिती आवडली असेल. आमच्या ordar.in या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

6 thoughts on “प्रसंग लेखन मराठी | Prasang lekhan in marathi | Prasang lekhan in marathi topics”

Leave a Comment