माझा आवडता खेळ लगोरी निबंध मराठी | Maza Avadta Khel Lagori Nibandh in Marathi 2023

माझा आवडता खेळ लगोरी निबंध मराठी | Maza Avadta Khel Lagori Nibandh in Marathi 2023 – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात माझा आवडता खेळ लगोरी निबंध मराठी मध्ये बघणार आहोत. अतिशय मनोरंजक खेळ म्हणून लगोरी या खेळाची ओळख आहे.

आज या लेखात आपण लगोरी या खेळाची थोडक्यात माहिती देखील बघणार आहोत. मित्रांनो परीक्षेत माझा आवडता खेळ निबंध या विषयावर एक प्रश्न नेहमी विचारला जातो. आज या लेखात आपण अगदी सोप्या आणि सुंदर भाषेत माझा आवडता खेळ लगोरी निबंध बघणार आहोत. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता निबंधाला सुरुवात करुया.

माझा आवडता खेळ लगोरी निबंध मराठी 10 ओळी

  1. लगोरी हा भारतातील पारंपरिक खेळ आहे.
  2. लगोरी हा माझा आवडता खेळ आहे.
  3. हा खेळ खेळायला लगोऱ्या, रबरी चेंडू आणि मोकळे मैदान लागते.
  4. यामध्ये 7 किंवा 9 खेळाडूंचे दोन संघ असतात.
  5. यामध्ये प्रथम टॉस केले जाते. जो संघ टॉस जिंकतो तो प्रथम लगोऱ्या फोडायला येतो.
  6. दुसरा संघातील एक खेळाडू रचलेल्या लगोऱ्यांच्या मागे चेंडू पकडण्यासाठी उभा राहतो.
  7. लगोरी फोडल्यावर चेंडूने लगोरी फोडणाऱ्या संघातील खेळाडूंना मारायचे असते.
  8. त्याचप्रमाणे लगोरी फोडणाऱ्या संघाला पुन्हा चेंडू न स्पर्श करता लगोऱ्य जोडायचा असतात.
  9. लगोर्या फोडणाऱ्या संघातील एका खेळाडूला जरी चेंडू लागला तर तो संघ बाद होतो.
  10. अशाप्रकारे हा खेळ खेळला जातो. या खेळामध्ये खूप मजा येते. म्हणून हा खेळ मला खूप आवडतो.

माझा आवडता खेळ लगोरी निबंध मराठी 250 शब्द

माझा आवडता खेळ लगोरी

मित्रांनो मी इयत्ता 7 वी मध्ये शिकत आहे. मला खेळ खेळायला खूप आवडतात. मला क्रिकेट, फुटबॉल, खो खो आणि लंगडी हे खेळ खेळायला आवडतात. परंतु या सर्वांपेक्षा ही मला लगोरी हा खेळ जास्त आवडतो. लगोरी खेळामध्ये खूप मजा येते.

आम्ही सर्व मित्र मिळून रोज शाळेच्या दुपारच्या सुट्टीत लगोरी हा खेळ खेळतो. त्याचप्रमाणे सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी बागेमध्ये आम्ही सर्व मित्र मिळून हा खेळ खेळतो. माझ्या मित्रांना ही हा खेळ खूप आवडतो.

या खेळामध्ये 7 किंवा 9 खेळाडूंचे दोन संघ असतात. हा खेळ खेळण्यासाठी मोकळे मैदान लागते. त्याचप्रमाणे हा खेळ खेळण्यासाठी 7 ते 9 चपट्या लगोऱ्या आणि एक चेंडू असे साहित्य लागते. पूर्वी लगोऱ्या या फर्शीच्या तुकड्यांच्या किंवा विटांच्या असायच्या आणि चेंडू हे कापडाचे बनवलेले असायचे. परंतु आता बाजारात लाकडी लगोऱ्यांचा संच आणि रबरी चेंडू मिळतो.

या खेळात टॉस होऊन जो संघ टॉस जिंकतो तो पाहिले लगोरी फोडतो. लगोरी फोडणाऱ्या संघाने लगोरी फोडून पुन्हा एकमेकांवर रचने महत्त्वाचे असते. या दरम्यान विरोधी संघाने लगोरी फोडणाऱ्या संघाच्या कोणत्याही एक संघाला चेंडू मारून बाद करावयाचे असते. संघातील कोणत्याही एका खेळाडूला लगोरी रचण्याअगोदर चेंडू लागला तर संपूर्ण संघ हरतो आणि दुसऱ्या संघाला लगोरी फोडण्याची संधी मिळते.

अशाप्रमाणे हा खेळ खेळला जातो. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त आनंद अशी या खेळाची ओळख आहे. या खेळात चेंडू पासून आपला बचाव करत पळत लागोऱ्या जोडाव्या लागतात. मित्रांनो या खेळात खूप मजा येते. म्हणून मला लगोरी हा खेळ खूप खूप आवडतो. मित्रांनो तुम्ही सुद्धा हा खेळ एकदा नक्की खेळून बघा. खूप मजा येईल.

-: समाप्त :-

माझा आवडता खेळ लगोरी निबंध मराठी 300 शब्द

माझा आवडता खेळ लगोरी निबंध

मित्रांनो आपल्या देशात विविध खेळ खेळले जातात. त्यातील काही खेळ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले जातात. परंतु काही खेळ असे आहेत की त्यांना राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय खेळात स्थान मिळाले नसले तरी ते ग्रामीण भागात खूप आवडीने खेळले जातात.

अशा खेळांपैकीच एक खेळ आहे लगोरी. लगोरी हा माझा आवडता खेळ आहे. लगोरी हा भारतातील पारंपरिक खेळ आहे. या खेळात वापरल्या जाणाऱ्या चपट्या व लाकडी गोल ठोकळ्यांना लगोरी म्हणतात.

पूर्वी ही लगोरी फरशीच्या किंवा विटांच्या तुकड्यांची असायची. मात्र आता बाजारात रंगीत गोल आकारांचा लगोरी संच मिळतो. लघोऱ्या आणि चेंडू एवढेच साहित्य, साधे सोपे नियम व छोटेसे मैदान यामुळे हा खेळ तुम्हा मुलांना खेळण्यास आवडतो.

07 किंवा 11 असे खेळाडूंचे दोन संघ असतात. प्रत्येक संघातील एक एक खेळाडू लगोरी फोडण्यासाठी येतो. लगोरी फोडण्यासाठी तीन वेळा चेंडू मारण्याची संधी मिळते. लगोरी फोडण्यासाठी फेकलेला चेंडू अडवण्यासाठी रचलेल्या लगोरीच्या मागे विरुद्ध संघाचा एक प्रमुख क्षेत्ररक्षक व इतर दहा क्षेत्ररक्षक आखलेल्या मोठ्या वर्तुळात लगोरी नसणाऱ्या खेळाडूंचा विचार करून उभी केलेली असतात.

लगोरी फोडणारा लगोरी फोडतानाही बाद होऊ शकतो. तो लगोरी फोडण्याचा प्रयत्न करीत असताना जमिनीवर टप्पा पडून उडालेला चेंडू जर लगोरी मागील क्षेत्ररक्षकाने किंवा इतर क्षेत्ररक्षकांनी वरचेवर झेलला तर लगोरी फोडणारा बाद होतो.

ज्यांनी लगोरी फोडली आहे, त्याच संघातील खेळाडूंनी पुन्हा लगोऱ्या एकावर एक रचने महत्त्वाचे असते. क्षेत्ररक्षकांचे अशावेळी काम असते लगोरी लावणाऱ्याला चेंडू मारणे. असा चेंडू एकाला जरी लागला तरी सर्व संघ बाद होतो व दुसऱ्या संघ खेळण्यास येतो.

मात्र क्षेत्ररक्षकांकडून चेंडू न लागता जर लगोरी रचली गेली, तर त्या संघास एक गुण मिळतो. प्रत्येक संघाच्या सर्व खेळाडूंना लगोरी फोडण्याची संधी मिळेपर्यंत खेळ चालतो. ज्या संघाच्या अधिक लगोऱ्या होतात म्हणजेच अधिक गुण होतात. तो संघ विजयी घोषित केला जातो.

असा हा लगोरी खेळ बाल मित्रांनो तुम्ही नक्कीच खेळा, आणि या खेळाचा आनंद घ्या. हा लगोरी खेळ खेळताना खूप मजा येते. पण धावताना व चेंडू मारताना आपल्यामुळे कुणाला इजा होणार नाही, याची काळजी घ्या.

-: समाप्त :-

सारांश | माझा आवडता खेळ लगोरी निबंध मराठी | Maza Avadta Khel Lagori Nibandh in Marathi 2022

मित्रांनो आज आपण या लेखात माझा आवडता खेळ लगोरी या वर अगदी सोप्या आणि सुंदर भाषेत निबंध बघितले. यामध्ये आपण लगोरी खेळाची थोडक्यात माहीत देखील बघितली.

आपल्याला हा लेख कसा वाटला? आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा मित्रांनो. आम्हला आशा आहे की आपल्याला हा लेख नक्की आवडला असेल. हा लेख आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

Leave a Comment