माझा आवडता खेळ निबंध मराठी 2023 [07] सर्वोत्तम निबंध | maza avadta khel nibandh marathi


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

माझा आवडता खेळ निबंध मराठी | maza avadta khel nibandh marathi – नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात माझा आवडता खेळ निबंध मराठी maza avadta khel nibandh marathi याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या लेखामध्ये आपण माझा आवडता खेळ खो-खो, क्रिकेट, कब्बडी, लपंडाव, बॅडमिंटन, फुटबॉल, बुद्धिबळ या सर्व खेळावर मराठीतून निबंध बघणार आहोत.

मराठी विषयाच्या परीक्षेमध्ये निबंध या घटकावर 10 ते 20 मार्क चा एक प्रश्न नेहमी विचारला जातो. माझा आवडता खेळ निबंध हा लेख इयत्ता 7वी, 8वी, 9वी आणि 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. हे मराठी निबंध अगदी सोप्या भाषेत असणार आहेत. हे निबंध वाचा आणि परीक्षेमध्ये यशस्वी व्हा.

या लेखात आपण खालील मराठी निबंध पाहूया.

  • माझा आवडता खेळ खो खो
  • माझा आवडता खेळ निबंध क्रिकेट
  • माझा आवडता खेळ निबंध बॅडमिंटन
  • माझा आवडता खेळ कबड्डी निबंध
  • माझा आवडता खेळ लपाछपी
  • माझा आवडता खेळ फुटबॉल
  • माझा आवडता खेळ बुद्धिबळ निबंध

खेळ हा लहान मुलांच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. मैदानावर खेळ खेळण्याचे खूप फायदे आहेत. खेळामुळे लहान मुलांची अंग मेहेनत होते, आपसात मिळून मिसळून राहण्याची सवय त्यांना लागते. लहान मुलांची निर्णय क्षमता वाढते, अशा एक ना अनेक फायदे खेळ खेळण्याचे आहेत. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता निबंधाला सुरुवात करुया.

माझा आवडता खेळ खो खो निबंध मराठी | maza avadta khel kho kho nibandh marathi

माझा आवडता खेळ खो खो

खो खो हा माझा आवडता खेळ आहे. तसे मला सर्वच मैदानी खेळ खेळायला आवडतात परंतु खो खो हा खेळ मला जास्त आवडतो. खो-खो हा एक भारतीय मैदानी खेळ आहे. या खेळासाठी मैदानाच्या दोन टोकांना रोवलेले खांब सोडल्यास कोणत्याही साधनांची आवश्यकता नसते. हा अतिशय सोपा आणि लोकप्रिय खेळ आहे. हा खेळ खेळणारा खेळाडू चपळ असला पाहिजे.

आम्ही सर्व मित्र रोज दुपारच्या सुट्टीत खो खो खेळतो. आणि खेळाच्या तासाला सुध्या आम्ही खो खो खेळतो. हा खेळ खेळताना आम्हला खूप मजा येते. शाळेत आमच्या खो खो च्या स्पर्धाही आयोजित केल्या जातात. आणि आम्ही प्रत्येकवेळी या स्पर्धेत विजयी होतो. खो खो मुळे आमची मैत्री अजून घट्ट झाली आहे.

खो-खो हा खेळ दोन संघात खेळला जातो. प्रत्येक संघात 12 खेळाडू असतात. मैदानात मात्र प्रत्येक संघाचे 9 खेळाडू असतात. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना आपल्याला शिवू न देणे असा यात मुख्य प्रयत्न असतो.

खेळाच्या सुरुवातीला पाठलाग करणाऱ्या संघाचे आठ खेळाडू दोन खांबांमधील आठ चौकोनात आळीपाळीने विरुद्ध दिशांना तोंड करून बसतात. नवा खेळाडू कोणत्याही एका खांबाजवळ उभा राहतो. बचाव करणाऱ्या संघाचे तीन खेळाडू मैदानात असतात. खेळ सुरू झाल्यावर पाठलाग करणाऱ्या संघाचा नववा खेळाडू बचाव करणाऱ्या तीन खेळाडूंना बाद करण्याचा प्रयत्न करतो.

खो खो या खेळाचा उगम महाराष्ट्रातच झाला भारता व्यतिरिक्त हा खेळ दक्षिण आशिया व दक्षिण आफ्रिकेत खेळाला जातो. खो-खो या खेळामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो आणि या खेळामुळे पायाच्या मास पेशी या अधिक मजबूत होतात. खो-खो हा खेळ मुख्य म्हणजे कमी खर्चात खेळता येतो. म्हणून खो-खो हा माझा आवडता खेळ आहे.

माझा आवडता खेळ निबंध क्रिकेट | maza avadta khel nibandh cricket

माझा आवडता खेळ निबंध क्रिकेट

क्रिकेट हा खेळ खेळायला मला खूप आवडतो. क्रिकेट हा माझा सर्वात जास्त आवडणारा खेळ आहे. सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी हे माझे आवडते खेळाडू आहेत. सचिन तेंडुलकरला सर्वजण मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखातात. आम्ही सर्व मित्र मिळून रोज दुपारच्या सुट्टीत क्रिकेट खेळतो. तसेच रविवारी सुट्टीच्या दिवशी ही आम्ही दिवसभर क्रिकेट खेळतो.

आपल्या देशात विविध खेळ खेळले जातात, त्यातील माझा आवडता खेळ क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. हा खेळ सर्वप्रथम इंग्रजांद्वारे भारतात आला, परंतु स्वातंत्र्यानंतर सर्वजण हा खेळ खेळू लागले.

क्रिकेट हा खेळ भारत, इंग्लंड, पाकिस्तान, वेस्टइंडीज, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलँड इत्यादी देशात लोकप्रिय आहे. क्रिकेट हा खेळ नियमानुसारच खेळाला जातो. हा खेळ खेळण्यासाठी बॉल व बॅट आवश्यक असतात. हा खेळ दोन संघात खेळला जातो. दोन्ही संघात 11 – 11 खेळाडू असतात.

एक संघ बॅटिंग करतो व दुसऱ्या संग बॉलिंग करतो. बॅटिंग करणारा संघ एक, दोन चौका किंवा षटकार मारून ठरलेल्या ओव्हर मध्ये रन बनवतो. शेवटी जो संघ जास्त रन बनवतो, तो संघ जिंकतो. क्रिकेटची मॅच टेस्ट एक दिवशीय किंवा 20-20 प्रकारची असते.

भारताने एक दिवशीय सामन्यात सन 1983 व 2011 मध्ये वर्ल्ड कप जिंकले होते. तसेच 20-20 मध्ये 2007 मध्ये वर्ल्ड कप जिंकला आहे.

या खेळात गरीब श्रीमंत लहान-मोठे असा कोणताही भेदभाव होत नाही. या खेळात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण सहभागी होतात. हा खेळ सर्वांनाच आवडतो. या खेळात मनोरंजना सहित शरीराचा व्यायाम होतो. शरीर व मन स्वस्त व सुदृढ राहते, म्हणून मला हा खेळ खूप खूप आवडतो.

माझा आवडता खेळ निबंध बॅडमिंटन | maza avadta khel nibandh badminton

माझा आवडता खेळ निबंध बॅडमिंटन

बॅडमिंटन हा माझा आवडता खेळ आहे. भारतात विविध प्रकारचे खेळ खेळले जातात. त्यापैकी एक खेळ आहे बॅडमिंटन. हा खेळ रॅकेट आणि फुल साहित्याच्या मदतीने खेळला जातो. जगभरात हा खेळ लोकप्रिय आहे. हा खेळ अतिशय वेगवान खेळ आहे. बॅडमिंटन या खेळासाठी उत्तम शैलीची गरज असते.

आमच्या शाळेतर्फे एकदा तालुकास्तरावर बॅडमिंटन स्पर्धा खेळण्यासाठी मी गेलो होतो. त्यावेळी मला उपविजेते पद मिळाले होते. आमच्या घरी बॅडमिंटन खेळाचे सर्व साहित्य आहे. तसेच घरा शेजारी बाबांनी खेळासाठी मैदान देखील तयार केले आहे. तेथे आम्ही नेट बांधून बॅडमिंटनचा सराव करतो.

बॅडमिंटन खेळात सरावाची खूप गरज भासते. तसेच शरीर लवचिक बनवण्यासाठी विशिष्ट प्रकारचा व्यायाम करावा लागतो. या खेळात गती, निर्णय क्षमता आवश्यक असल्याने मला सराव करताना अशा प्रकारची आव्हाने सरावात सामील करून घ्यावी लागतात.

बॅडमिंटन हा एक बंदिस्त मैदानात खेळला जाणारा खेळ आहे. बॅडमिंटन च्या मैदानाला कोर्ट असेही म्हणतात. हा खेळ महिला तसेच पुरुष दोघेही खेळू शकतात. बॅडमिंटन मैदानाची लांबी 44 फूट असते. यामध्ये एकेरी सामन्यासाठी रुंदी 17 फूट असते. तर दुहेरी सामन्यासाठी रुंदी 20 फूट असते. मैदानाच्या बरोबर मध्यभागी नेट बांधली जाते.

बॅडमिंटन साठी जे अंडाकृती आकाराचे रॅकेट वापरले जाते त्यांना शटलकॉक म्हणतात. शटलकॉक हे नेटच्या वरून मारायचे असते. हा खेळ खेळताना एकेरी खेळ असेल तर या खेळांमध्ये दोन खेळाडू असतात आणि जर खेळ दुहेरी असेल तर खेळामध्ये चार खेळाडू असतात. बॅडमिंटन कोर्टाच्या मध्यभागी 1.5 मीटरचे जाळे असते. हा खेळ तीन विभागात खेळाला जातो. या खेळाचे काही नियम आहेत, त्यानुसारच हा खेळ खेळला जातो.

हा खेळ राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाला जातो. पी. व्ही. सिंधू तसेच सायना नेहवाल सारखी महिला खेळाडू या खेळाच्या माध्यमातून आपल्याला लाभले आहेत. पी. व्ही. सिंधू तसेच सायना नेहवाल यांनी या खेळांमध्ये उत्तम कामगिरी करून आपल्या भारत देशाची मान उंचावली आहे.

हा खेळ शरीरासाठी एक उत्तम व्यायाम तर आहेच. सोबत बुद्धीला चालना देणारा देखील आहे. बॅडमिंटन या खेळामुळे आपले मनोरंजनही खूप होते. हा खेळ खेळताना शरीराची हालचाल होऊन शरीर चपळ बनण्यास मदत मिळते. त्यामुळे बॅडमिंटन हा माझा आवडता खेळ आहे.

माझा आवडता खेळ कबड्डी निबंध | maza avadta khel nibandh kabaddi

माझा आवडता खेळ कबड्डी निबंध

कबड्डी हा माझा आवडता खेळ आहे. आपण विविध प्रकारचे खेळ खेळत असतो. जगभरात विविध खेळांच्या स्पर्धा होतात. अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात जसे की क्रिकेट, हॉकी, खो-खो, फुटबॉल, टेनिस इत्यादी. या सर्व खेळांमध्ये कबड्डी हा माझा सगळ्यात आवडता खेळ आहे. मला कबड्डी खेळायला तसेच कबड्डीच्या स्पर्धा बघायला फार आवडते.

दक्षिण आशियातील एक प्रसिद्ध खेळ म्हणून कबड्डीची ओळख आहे. भारतात कबड्डी हा खेळ खूपच प्राचीन काळापासून खेळाला जातो. पूर्वी मातीत खेळला जाणारा हा खेळ सध्या मॅटवर देखील खेळला जातो. सध्या भारतात प्रो कबड्डी लीग, सुरक्षा दल खाती, सेवा क्षेत्रे आणि इतर कबड्डी अकॅडमी यामध्ये कबड्डी स्पर्धा चालू असते.

कुस्तीप्रमाणे अस्सल मर्दानी खेळ म्हणून कबड्डीची ओळख आहे. परंतु सध्या महिला देखील कबड्डी हा खेळ खेळू लागलेल्या आहेत. भारतात सध्या तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्र अशा विविध पातळीवर हा खेळ खेळला जातो. अतिशय रंजकरीत्या आणि उत्स्फूर्तपणे खेळला जाणारा हा खेळ आता आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील पोहोचला आहे.

इसवी सन 1934 मध्ये भारतात कबड्डीचे नियम तयार झाले. त्यानंतर थोड्या प्रसिद्धीच्याच झोतात आल्यावर इसवी सन 1950 साली अखिल भारतीय कबड्डी संघ स्थापन करण्यात आला. भारतात राज्य आणि प्रदेश निहाय कबड्डी या खेळाला हुतुतू, चाडू-गुडू, वंदीकली, झबर गगने, दो-दो वेगळी नावे आहेत.

कबड्डी हा खेळ शरीरासाठी चांगला व्यायाम सुद्धा आहे. या खेळामुळे शरीराचा चांगला व्यायाम होऊन मन एकाग्र होते. हा खेळ खेळण्यासाठी जास्त साहित्याची गरज नसते. प्राचीन काळापासून हा खेळ भारतभर लोकप्रिय आहे. या खेळांमध्ये दोन संघ असतात. प्रत्येक संघात 12 – 12 खेळाडू असतात. खेळ सुरू असताना 7 – 7 खेळाडू मैदानात उतरतात.

एका संघाचा खेळाडू कबड्डी-कबड्डी म्हणत विरोधी संघाकडे जातो आणि त्या खेळाडूंना स्पर्श करून आपल्या संघात परत येतो. परंतु जर विरोधी संघाच्या खेळाडूंनी कबड्डी म्हणणाऱ्या खेळाडूला पकडले आणि परत त्याला त्याच्या संगत जाऊ दिले नाही, तर तो खेळाडू बाद होतो, आणि विरोधी संघाला गुण मिळतात. अशा प्रकारे जो संघ जास्त गुण मिळवतो, तो संघ विजयी ठरतो कबड्डी या खेळात जास्त नियम नसतात. परंतु जेव्हापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर हा खेळ खेळायला जाऊ लागला, तेव्हापासून या खेळाचे काही नियम तयार करण्यात आले आहे.

या खेळामुळे संघ भावना निर्माण होते तसेच शिस्त निर्माण होते. शाळेत, महाविद्यालयात सुद्धा या खेळाला महत्त्व प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांच्या मनात खेळाचे महत्व रुजवण्यासाठी आणि खेळाचे महत्व पटवून देण्यासाठी कबड्डी सारखे खेळ आवश्यक आहेत. म्हणून मला कबड्डी हा खेळ खूप खूप आवडतो.

माझा आवडता खेळ लपाछपी | maza avadta khel lapachapi nibandh in marathi

माझा आवडता खेळ लपाछपी

लपाछपी हा माझा आवडता खेळ आहे. माझ्या मित्रांनाही हा खेळ खूप आवडतो. आम्ही या खेळाला लपंडाव असेही म्हणतो. आम्ही रोज संध्याकाळी हा खेळ खेळतो.

लपाछपी हा खेळ अत्यंत सोपा आहे. या खेळात जास्त काही नियम नाही. या खेळात एका मुलावर राज्य असते. तो डोळे झाकून घेतो आणि 10-20-30 अशाप्रकारे 100 पर्यंत अंक म्हणतो. तोपर्यंत बाकीची मुले लपतात. मग तो डोळे उघडतो लपलेल्यांना शोधून काढतो.

जो पहिल्यांदा सापडतो त्याच्यावर राज्य येते. असा हा खेळ कितीही वेळ खेळता येतो. लपंडाव या खेळात खूप मजा येते. एकाच वेळी खूप मुले खेळू शकतात. या खेळासाठी कोणत्याही साधनांची गरज नसते. फक्त लपण्यासाठी जागा लागते.

परंतु हो मित्रानो या खेळात एक धोका आहे. ज्यावेळी आपण हा खेळ खेळतो त्यावेळी लपावे लागते. अशावेळी लपताना जागा व्यवस्थित बघावी कारण आपण कुठल्याही काना कोपऱ्यात लपतो, परंतु त्या ठिकाणी साप, विंचू अशी हिंस्र प्राणी असू शकतात. त्यापासून तुम्हाला धोका असतो. त्यामुळे लपताना जागा व्यवस्थित बघावी.

बाकी मात्र लपाछपी या खेळासारखी मजा कोणत्याही खेळात नाही. हा खेळ आपण कुठेही खेळू शकतो. या खेळात खूप मनोरंजन होते, म्हणून हा खेळ मला खूप आवडतो.

माझा आवडता खेळ फुटबॉल | maza avadta khel nibandh football

माझा आवडता खेळ फुटबॉल

फुटबॉल हा खेळ मला खूप आवडतो. खेळ कोणताही असो त्यात मनोरंजनासोबत शरीराचा व्यायाम पण होऊन जातो. खेळामुळे शरीर मजबूत बनते. आपल्या देशात वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ खेळले जातात. जसे हॉकी, टेबल टेनिस, फुटबॉल, होली बॉल, कबड्डी, क्रिकेट, बुद्धिबळ इत्यादी. पण या सर्वात माझा आवडता खेळ फुटबॉल हा आहे.

फुटबॉलला जगातील सर्वात मनोरंजक खेळामधून एक मानले जाते. हा खेळ विविध देशातील युवकाद्वारा मोठ्या आवडीने खेळला जातो. फुटबॉल व्यक्तीला शारीरिक मानसिक आणि आर्थिक रुपाने मजबूत बनवतो. पूर्वीच्या काळी हा खेळ फक्त पश्चिमी देशाद्वारे खेळाला जायचा. नंतरच्या काळात हा पूर्ण जगात पसरत गेला.

मी माझ्या मित्रांसोबत रोज फुटबॉल खेळतो. फुटबॉल खेळल्याने आपले शरीर निरोगी आणि चपळ राहते. फुटबॉल हा खुल्या मैदानावर खेळला जाणारा मैदानी खेळ आहे. दोन संघांमध्ये फुटबॉल खेळला जातो. प्रत्येक संघात 11 खेळाडू असतात. रोनाल्डो हा माझा आवडता खेळाडू आहे. हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाला जाणारा अतिशय लोकप्रिय खेळ आहे.

भारतात फुटबॉल खेळाला लोकप्रिय करण्यामागे ज्या व्यक्तीने कार्य केले, त्याचे नाव ‘नागेंद्र प्रसाद सर्वाधिकारी’ आहे. त्यांना भारतीय फुटबॉल चे जनक म्हणूनही संबोधले जाते. नागेंद्र प्रसाद यांनी सर्वात आधी हा खेळ आपल्या मित्रांसोबत खेळला. त्यानंतर त्यांनी अनेक शाळांमध्ये या खेळाला खेळवणे सुरू केले.

फुटबॉल खेळण्यासाठी वापरला जाणारा बॉल मजबूत रबर पासून बनवला जातो. यात टाईट हवा भरलेली असते. फुटबॉल खेळत असताना खेळाडूला आपले संपूर्ण लक्षात चेंडूवर ठेवावे लागते. हा खेळ दोन संघाद्वारे खेळला जातो. प्रत्येक संघामध्ये 11 खेळाडू असतात. या खेळाचे मैदान आयताकृती असते. दोन्ही बाजूंना नेटचे बनवलेले गोल पोस्ट असते.

प्रत्येक संघाला विरोधी पक्षाच्या गोल पोस्टमध्ये बॉल टाकून जास्तीत जास्त गोल करायचे असतात. या खेळाचे काही नियम पण असतात. जसे यात फुटबॉलला हात लावण्याची परवानगी नसते. ठराविक अंतरावरून गोल करावी लागते. हा खेळ 90 मिनिटांचा असतो. असा हा फुटबॉल खेळ मला खूप खूप आवडतो.

माझा आवडता खेळ बुद्धिबळ निबंध | maza avadta khel buddhibal nibandh

माझा आवडता खेळ बुद्धिबळ निबंध

बुद्धिबळ हा माझा आवडता खेळ आहे. मला बरेच खेळ आवडतात. परंतु बुद्धिबळ हा माझा आवडता खेळ आहे. हा खेळ कुठेही बसून खेळता येतो. या खेळामुळे बुद्धीला चालना मिळते. बुद्धिबळ जगातील सर्वात प्रसिद्ध बैठ्या खेळांपैकी एक खेळ आहे. आपली बुद्धिमत्ता वाढविण्यासाठी हा खेळ खेळणे अतिशय उपयुक्त आहे.

बुद्धिबळ खेळण्यासाठी बुद्धिबळाचा पट व सोंगट्यांची ची गरज असते. बुद्धिबळाचा पट एकूण 64 घरांचा असतो. यामध्ये 32 घरे काळ्या रंगाची आणि 32 घरे पांढऱ्या रंगाची असतात. काळ्या सोंगट्याची संख्या 16 तर पांढऱ्या संख्यांची संख्या 16 असते. बुद्धिबळाची काही नियम असतात प्रत्येक सोंगट्याच्या चाली वेगवेगळ्या असतात. प्रतिस्पर्ध्याच्या राजाला शह देऊन मात करणे. हा या खेळाचा उद्देश असतो. हा बुद्धीची कसोटी घेणारा खेळ आहे.

दरवर्षी 20 जुलै हा दिवस जागतिक बुद्धिबळ दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतातील ‘विश्वनाथन आनंद’ हा खेळाडू 2012 सालापर्यंत जगतजेता होता. विश्वनाथन आनंद यांनी पाच वेळा जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे. एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी बुद्धिबळ हा एक चांगला खेळ आहे. बुद्धिबळ या खेळामुळे तार्किक दृष्टिकोन वाढतो. म्हणून हा माझा आवडता खेळ आहे.

सारांश | maza avadta khel nibandh | माझा आवडता खेळ मराठी निबंध

मित्रानो या लेखात आपण माझा आवडता खेळ मराठी निबंध maza avadta khel nibandh marathi याबद्दल अगदी सोप्या भाषेत सखोल माहिती बघितली. या लेखात आपण माझा आवडता खेळ खोखो, कबड्डी, क्रिकेट, बॅडमिंटन, बुद्धिबळ आणि लपाछपी इत्यादी खेळा बद्दल निबंध पाहिले. हा लेख इयत्ता 7वी, 8वी, 9वी आणि 10वी च्याय विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा लेख आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. त्याचप्रमाणे आपले अभिप्राय comment द्वारे आम्हाला कळवा. आमच्या ordar.in या ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

maza avadta khel nibandh | माझा आवडता खेळ मराठी निबंध maza avadta khel nibandh | माझा आवडता खेळ मराठी निबंध maza avadta khel nibandh | माझा आवडता खेळ मराठी निबंध maza avadta khel nibandh | माझा आवडता खेळ मराठी निबंध maza avadta khel nibandh | माझा आवडता खेळ मराठी निबंध maza avadta khel nibandh | माझा आवडता खेळ मराठी निबंध maza avadta khel nibandh | माझा आवडता खेळ मराठी निबंध