माझा आवडता छंद मराठी निबंध | Maza Avadta Chand Marathi Nibandh 2022


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

माझा आवडता छंद मराठी निबंध | Maza Avadta Chand Marathi Nibandh 2022 – नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात माझा आवडता छंद मराठी निबंध | maza avadta chand marathi nibandh बघणार आहोत.

आजच्या या धावपळीच्या युगात आपण खूपच व्यस्त झालो आहोत. आपले मन खूप थकून जाते. त्यासाठी आपण एक तरी छंद जोपासणे गरजेचे आहे. छंद हा कोणताही असू शकतो. जसे की पुस्तक वाचणे, गाणी गाणे, नृत्य करणे, चित्र काढणे इत्यादी.

दिवसभराच्या कामानंतर थोडासा वेळ काढून आपल्या आवडीचे काम करणे यालाच छंद असे म्हणतात. हे काम करताना आपल्याला आनंद वाटतो. आपले मन ताजे तवाने होते.

मित्रांनो परीक्षेमध्ये माझा आवडता छंद या विषयावर एक निबंध नक्की विचारला जातो. आज या लेखात आपण ४ निबंध बघणार आहोत. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता निबंधाला सुरुवात करुया.

माझा आवडता छंद गायन मराठी निबंध

माझा आवडता छंद गायन मराठी निबंध

मागच्या आठवड्यात आमच्या शाळेमध्ये वार्षिक स्नेह संमेलन पार पडले. स्नेहसंमेलनामध्ये विविध स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या, त्यामध्ये गायनाची स्पर्धा देखील होती.

गायनाच्या स्पर्धेमध्ये मला प्रथम क्रमांक मिळाला. तेथे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ गायक जुबीन नौटियाल हे आलेले होते. त्यांच्याच हस्ते मला पुरस्कार मिळाला.

तेव्हा माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. मी खूप खूष होते. पण याचे सर्व श्रेय माझे नियमित मी जोपासलेले गायानाचे छंद याला. कारण मला रोज एक ते दीड तास गाणे गायला खूप आवडते.

का कुणास ठाऊक पण जेव्हा केव्हा मी बोर होते किंवा नाराज होते तर माझ्या तोंडातून आपोआप गायन बाहेर पडते. मला गायनाचा छंद आहे. आणि मी तो जोपासते आहे.

मी अनेक ठिकाणी गायनाच्या ऑडिशन्स देते. मला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. आणि ते म्हणतात ना जे काम तुम्ही मनापासून करता त्यात तुम्हा यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही.

गाणी गाताना माझी शुद्ध हरपून जाते. माझे आजोबा नेहेमी सांगतात की तुझ्या कंठात साक्षात कोकिळा वसते. घरातील इतर सर्व जण मला प्रोत्साहन देतात. माझ्या बाबांचे आणि माझे देखील स्वप्न आहे की मी मोठे झाल्यावर एक महान गायिका व्हावे.

माझे तर असे मत आहे की प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एक तरी छंद जोपासाला पाहिजे. आजच्या या ताण-तणावाच्या जगात एक विश्रांती म्हणून तरी छंद जोपासला पाहिजे. आपले आवडीचे काम केले पाहिजे. जेणेकरून आपले आयुष्य आनंदाने फुलून येईल.

माझा आवडता छंद वाचन मराठी निबंध

माझा आवडता छंद वाचन मराठी निबंध

‘वाचाल तर वाचाल’ असे कोणी थोर महात्मा सांगून गेले आहे. मला पुस्तक वाचायला खूप आवडते. मी रोज दोन तास पुस्तक वाचतो. त्यामध्ये सेल्प हेल्प प्रकारची पुस्तके जास्त असतात. मी रोज संध्याकाळी दिवाबत्ती झाल्यावर निवांत पुस्तक वाचत बसतो. मला पुस्तक वाचण्याचे छंद आहे.

आमच्या शाळेत खूप मोठे ग्रंथालय आहे. तेथे खूप जुनी पुस्तकं आहेतं. आता मागच्या आठवड्यात काही नवीन पुस्तके देखील आणली आहे. मी रोज दुपारच्या सुट्टीत तेथे जाऊन पुस्तक वाचत बसतो.

ग्रंथालयाचे ग्रंथपाल सर श्री. साठे हे माझे चांगले मित्र झाले आहे. ते मला नवीन नवीन पुस्तके वाचण्यास सांगतात. पुस्तके घरी घेऊन जाण्यास परवानगी नाही, परंतु तरी साठे सर मला पुस्तके घरी घेऊन जाण्यास परवानगी देतात.

पुस्तक वाचल्याने मनाला एक नवीन ऊर्जा मिळते. जीवनाच्या वाटेवर येणाऱ्या प्रत्येक अडचणीला कसे सामोरे जायचे हे पुस्तक वाचल्याने समजते. पुस्तकामध्ये लेखकाने त्याच्या आयुष्यात काय चुका केल्या आणि काय बरोबर निर्णय घेतले हे त्या पुस्तकात लेखकाने लिहिलेले असते. त्याच्या अनुभवावरून आपण त्या चुका होऊच देणार नाही. आणि त्यामुळे आपण जीवनात लवकर यशस्वी होऊ शकतो.

माझ्या वाचनात श्रीमद् भागवत गीता, रामायण, शिवचरित्र, मृत्युंजय, एकच प्याला, पानिपत, Rich Dad Poor Dad, Thik and Grow Rich अशी अनेक पुस्तके आहेत जे मी वाचली आहे. माझा आवडता छंद वाचन आहे आणि त्याचा मला अभिमान आहे.

माझे तर असे मत आहे की प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एक तरी छंद जोपासाला पाहिजे. आजच्या या ताण-तणावाच्या जगात एक विश्रांती म्हणून तरी छंद जोपासला पाहिजे. आपले आवडीचे काम केले पाहिजे. जेणेकरून आपले आयुष्य आनंदाने फुलून येईल.

माझा आवडता छंद नृत्य मराठी निबंध | Maza avadta chand dance in marathi

माझा आवडता छंद नृत्य मराठी निबंध

मागच्या आठवड्यात आमच्या शाळेमध्ये वार्षिक स्नेह संमेलन पार पडले. स्नेहसंमेलनामध्ये विविध स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या, त्यामध्ये नृत्याची स्पर्धा देखील होती.

नृत्याच्या स्पर्धेमध्ये मला प्रथम क्रमांक मिळाला. तेथे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नृत्यकार श्री. प्रभू देवा हे आलेले होते. त्यांच्याच हस्ते मला पुरस्कार मिळाला.

तेव्हा माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. मी खूप खूष होते. पण याचे सर्व श्रेय माझे नियमित मी जोपासलेले नृत्याचे छंद याला. कारण मला रोज एक ते दीड तास नृत्य करायला खूप आवडते.

का कुणास ठाऊक पण जेव्हा केव्हा मी बोर होते किंवा नाराज होते तर मला नृत्य करावेसे वाटते. मला नृत्याचा छंद आहे. आणि मी तो जोपासते आहे. मी नृत्याचे क्लासेस देखील लावले आहे. मला कथक नृत्य करायला खूप आवडते.

मी अनेक ठिकाणी नृत्य च्या ऑडिशन्स देते. मला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. आणि ते म्हणतात ना जे काम तुम्ही मनापासून करता त्यात तुम्हा यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही.

नृत्य करताना माझी शुद्ध हरपून जाते. माझे आजोबा नेहेमी माझ्या नृत्याची प्रशंसा करतात. घरातील इतर सर्व जण मला प्रोत्साहन देतात. माझ्या बाबांचे आणि माझे देखील स्वप्न आहे की मी मोठे झाल्यावर एक महान नर्तकी व्हावे.

माझे तर असे मत आहे की प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एक तरी छंद जोपासाला पाहिजे. आजच्या या ताण-तणावाच्या जगात एक विश्रांती म्हणून तरी छंद जोपासला पाहिजे. आपले आवडीचे काम केले पाहिजे. जेणेकरून आपले आयुष्य आनंदाने फुलून येईल.

माझा आवडता छंद चित्रकला निबंध

माझा आवडता छंद चित्रकला निबंध

चित्र काढणे हे मला खूप आवडते. माझा आवडता छंद चित्रकला आहे. मी रोज दीड ते दोन तास चित्र कडतो. मी व माझे मित्र कधी कधी गावाबाहेर असलेल्या मोकळ्या मैदानात चित्र रंगवायला जातो. चित्रात कलर भरायला मला खूप आवडतो.

माझ्या बाबांनी मला चित्रकलेचे सर्व सामान आणून दिले आहे. तसेच मला शाळेत होणाऱ्या इतर किरकोळ स्पर्धेत चित्रकलेचे इतर किरकोळ समान देखील मिळाले आहे.

आमच्या शाळेत चित्रकलेच्या तासाला मला खूप मजा येते. कारण तोच माझा आवडता छंद आहे. आमचे चित्रकलेचे शिक्षक श्री. गोटे सर मला नेहेमी चित्र काढायला प्रोत्साहन देतात. ते मला चित्र काढायला नेहेमी मार्गदर्शन करत असतात.

मागच्या दोन्ही वर्षी झालेल्या राज्यसतरीय चित्रकला स्पर्धे मध्ये मी प्रथम क्रमांक पटकावला आणि आमच्या शाळेचे नाव उंचावले. यावर आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी माझा खूप मोठा सत्कार केला. तेव्हा माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही.

याचे श्रेय फक्त माझ्या गुरूंना आणि मी जोपासलेल्या छंदाला जातो. जी गोष्ट तुम्ही अगदी मनापासून करता त्यामध्ये तुम्हा यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. चित्रकला हा विषय तर माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे.

माझे तर असे मत आहे की प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एक तरी छंद जोपासाला पाहिजे. आजच्या या ताण-तणावाच्या जगात एक विश्रांती म्हणून तरी छंद जोपासला पाहिजे. आपले आवडीचे काम केले पाहिजे. जेणेकरून आपले आयुष्य आनंदाने फुलून येईल.

सारांश | माझा आवडता छंद मराठी निबंध | Maza Avadta Chand Marathi Nibandh 2022

तर मित्रांनो आज आपण या लेखात माझा आवडता छंद मराठी निबंध | maza avadta chand marathi nibandh याचे ४ निबंध बघितले. तुम्हाला नेमका कोणता निबंध आवडला हे आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आम्हाला खात्री आहे की हे निबंध तुम्हाला परीक्षेत नक्कीच उपयुक्त ठरतील. हा लेख आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

टीप – या लेखाला आपण असेही नाव देऊ शकतो.

Maza avadta chand dance in marathi

माझा आवडता छंद निबंध लेखन

माझा आवडता छंद निबंध

Maza Avadta Chand Marathi Nibandh

माझा आवडता छंद मराठी निबंध