सुट्टीचा अर्ज कसा लिहायचा | शाळा, कॉलेज, कंपनी, कार्यालय | Leave Application in Marathi 2023 | सुट्टीचा अर्ज मराठी


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

सुट्टीचा अर्ज कसा लिहायचा | शाळा, कॉलेज, कंपनी, कार्यालय | Leave Application in Marathi 2023 – नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात सुट्टीचा अर्ज कसा लिहावा? याबाबत विविध नमुने बघणार आहोत.

आपल्याला शाळा / कॉलेज / कंपनी / कार्यालय अशा ठिकाणी अनेक वेळी सुट्टी साठी अर्ज करावा लागतो. आज आपण या लेखात शाळेत सुट्टी साठी अर्ज कसा लिहावा? कॉलेज मध्ये सुट्टी साठी अर्ज कसा लिहावा? कंपनी मध्ये सुट्टी साठी अर्ज कसा लिहावा? तसेच कार्यालयात सुट्टी साठी अर्ज कसा लिहावा? याबाबत छान आणि अगदी सोप्या भाषेत सुट्टीचा अर्ज बघणार आहोत.

सुट्टीचा अर्ज कसा लिहायचा?

मित्रांनो सुट्टीचा अर्ज मराठी कसा लिहायचा? अर्जाची मांडणी कशी करायची? सुट्टीचा अर्ज लिहितांना कोणत्या बाबी लक्षात घ्याव्या? हे सर्व मुद्देसुद पुढे आपण देत आहोत.

  • सुट्टीचा अर्ज लिहिताना तो थोडक्यात आणि विनंती पूर्वक लिहावा.
  • प्रथम वर उजव्या कोपऱ्यात दिनांक लिहावा.
  • त्यानंतर डाव्या बाजूला एक ओळ सोडून प्रति लिहावे.
  • त्याखाली आपण ज्यांच्याकडे सुट्टी साठी अर्ज करीत आहोत त्यांचा हुद्दा लिहावा.
  • त्याखाली शाळा/कॉलेज/कंपनी/कार्यालयाचे नाव वा पत्ता लिहावा.
  • आता एक ओळ सोडून महोदय लिहून अर्जाला सुरुवात करावी.
  • अर्ज थोडक्यात व मुद्देसुद लिहावा.
  • सुट्टीचा / रजेचा दिनांक स्पष्ठ लिहावा, आणि किती दिवस सुट्टी हवी आहे तेही स्पष्ठ लिहावे.
  • त्यानंतर खाली उजव्या कोपऱ्यात एक ओळ सोडून आपला विश्वासू, आज्ञाधारक, विद्यार्थी जे योग्य असेल ते लिहून आपली स्वाक्षरी करावी.
  • त्याखाली आपले संपूर्ण नाव व हुद्दा लिहावा.

शाळेत सुट्टी साठी अर्ज नमुना | Leave Application in Marathi for School

तुम्हाला 02 दिवसांसाठी बाहेरगावी जायचे आहे. शाळेत मुख्याध्यापकांना सुट्टी साठी अर्ज लिहा.

दिनांक – 10 डिसेंबर 2023

प्रति,
मा. मुख्याध्यापक,
श्री. गणेश विद्यालय,
देवगाव (रंगारी)
ता. कन्नड, जि. औरंगाबाद

विषय – 02 दिवस रजा / सुट्टी मिळणे बाबत.
अर्जदार – राजू रामराव जाधव, ह. क्र. 12, इयत्ता 5वी

महोदय,
मी राजू रामराव जाधव आपल्या शाळेत इयत्ता 5 वीत शिकत आहे. माझे हजेरी क्रमांक 12 आहे. मला उद्या दिनांक 11.12.2023 रोजी आई सोबत काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गावी जायचे आहे. त्यामुळे मी दोन दिवस शाळेत उपस्थित राहू शकणार नाही.
तरी मला दि. 11.12.2023 ते दि.12.12.2023 असे दोन दिवस रजा / सुट्टी मिळावी, ही नम्र विनंती.

आपला आज्ञाधारक विद्यार्थी
राजू रामराव जाधव

कॉलेज सुट्टी साठी अर्ज नमुना | Leave Application in Marathi for College

तुम्ही कॉलेज मध्ये असताना 4 दिवस सुट्टी / रजे साठी अर्ज लिहा.

दिनांक – 12 जून 2022

प्रति,
मा. प्राचार्य साहेब,
आसारामजी भांडवलदार,
उच्च माध्यमिक विद्यालय, देवगाव, (रं)
ता. कन्नड, जि. औरंगाबाद

विषय – 04 दिवस रजा / सुट्टी मिळणे बाबत.
अर्जदार – दत्तदास यशवंत कराडकर, ह. क्र. 56, कला शाखा, इयत्ता 12वी

महोदय,
मी दत्तदास यशवंत कराडकर, आपल्या कॉलेज मध्ये इयत्ता 12 वी मधील कला शाखेचा विद्यार्थी आहे. मला उद्या दिनांक 13.06.2022 ते 16.06.2022 या कालावधीमध्ये महत्त्वाचे काम असल्यामुळे मी सदर 04 दिवस कॉलेज मध्ये उपस्थित राहू शकणार नाही.
तरी मला दि. 13.06.2022 ते दि. 16.06.2022 या 04 दिवस कालावधी मध्ये सुट्टी / रजा देण्यात यावी, ही नम्र विनंती.

आपला आज्ञाधारक विद्यार्थी,
दातदास यशवंत कराडकर

कंपनी सुट्टी साठी अर्ज नमुना | Leave Application in Marathi for Company

तुम्ही कंपनी मध्ये कामाला आहात आणि तुम्हाला लग्नासाठी 01 दिवस सुट्टी चा अर्ज लिहायचा आहे.

दिनांक – 13 ऑक्टोबर 2022

प्रति,
मा. मॅनेजर साहेब,
बजाज ऑटो कंपनी,
सेक्टर 12,
वाळूज एमआयडीसी,
औरंगाबाद

विषय – 01 दिवस किरकोळ राज मिळणे बाबत.
अर्जदार – बापू सोनवणे, युनिट न. 10

महोदय,
उपरोक्त विषयास अनुसरून विनंती अर्ज सादर करतो की, मला दिनांक 20.10.2022 रोजी बहिणीच्या मुलाच्या लग्नासाठी गावी जायचे आहे. तरी मे. साहेबांनी माझी दिनांक 20.10.2022 रोजी ची एक दिवस किरकोळ रजा मंजूर करावी, व मला गावी जाण्यास परवानगी द्यावी, ही नम्र विनंती.

आपला विश्वासू
बापू सोनवणे

शासकीय कार्यालय सुट्टी साठी अर्ज नमुना | Leave Application in Marathi for Office

तुम्ही शासकीय कार्यालयात कार्यरत आहात. तुमच्या कार्यालय प्रमुखांना रजा / सुट्टी साठी अर्ज लिहा.

दिनांक – 12 जुलै 2022

प्रति,
मा. कार्यालय प्रमुख साहेब,
जिल्हाधिकारी कार्यालय,
ठाणे.

विषय – 02 दिवस किरकोळ रजा मिळणे बाबत.
अर्जदार – श्री. विनायक राऊत, लेखा अधिकारी
नेमणूक जिल्हा कोषागार कार्यालय, ठाणे.

महोदय,
उपरोक्त विषयास अनुसरून विनंती अर्ज सादर करतो की, दिनांक 14 जुलै 2022 रोजी माझ्या भावाच्या मुलीचे लग्न असल्या कारणाने मला 02 दिवस किरकोळ रजेची आवश्यकता आहे.
तरी मे. साहेबांनी माझी दिनांक 14.07.2022 ते दिनांक 15.07.2022 या रोजी 02 दिवस किरकोळ रजा मंजूर करावी, ही नम्र विनंती.

आपला विश्वासू
विनायक राऊत, लेखाधिकारी

सारांश | Leave Application in Marathi 2023 | सुट्टीचा अर्ज कसा लिहायचा?

विद्यार्थी मित्रांनो आज आपण या लेखात सुट्टीचा अर्ज मराठी कसा लिहावा याबद्दल माहिती जाणून घेतली. आपल्याला हे अर्ज शाळेत, कॉलेज मध्ये, कंपनीत, कार्यालयात अशा अनेक ठिकाणी सुट्टी साठी अर्ज करताना याचा उपयोग नक्कीच होईल, याची आम्हाला खात्री आहे. जर तुम्हाला हे अर्ज मराठी आवडले असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

सुट्टीचा अर्ज कसा लिहायचा | शाळा, कॉलेज, कंपनी, कार्यालय | Leave Application in Marathi 2022 | Leave Application in Marathi 2023

2 thoughts on “सुट्टीचा अर्ज कसा लिहायचा | शाळा, कॉलेज, कंपनी, कार्यालय | Leave Application in Marathi 2023 | सुट्टीचा अर्ज मराठी”

Leave a Comment