पत्र लेखन मराठी 2023 | Patra Lekhan in Marathi | Marathi Patra Lekhan


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

Patra Lekhan in Marathi – नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात पत्र लेखन मराठी याबद्दल सखोल अभ्यास करणार आहोत. या लेखात आपण पत्र लेखन म्हणजे काय? आणि मराठी पत्र लेखनाचे प्रकार किती व कोणकोणते यांची माहिती अगदी सोप्या भाषेत बघणार आहोत. या लेखाच्या शेवटी मराठी पत्र लेखन pdf सुध्दा दिलेली आहे, त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

पत्र लेखन म्हणजे काय?

आपल्या मनातील भावना, विचार, मते अभिव्यक्त करायचे माध्यम म्हणजे बोलणे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. पण ही अभिव्यक्ती अधिक मुद्देसूदपणे, सूसंबंध पद्धतीने अपेक्षित व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे उत्तम माध्यम म्हणजे पत्रलेखन होय. पत्र लेखन हा मराठी व्याकरणाचा अत्यंत महत्वाचा घटक आहे.

प्रत्यक्ष बोलताना कधीतरी विषययासंदर्भात एखादा मुद्दा राहून जातो. परंतु पत्रलेखन करताना ते लिहीण्याआधी वैचारिक पातळीवर आपली पूर्वतयारी झालेली असते. त्यासाठी वेळ मिळत असतो, आणि त्यामुळेच पत्र लेखन हे अधिक मुद्देसूद, सुसंगत, नेमके, परिणामकारक होत असते.

पत्रलेखनाचे प्रामुख्याने औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र असे दोन मुख्य प्रकार पडतात.

औपचारिक पत्र | Aupcharik Patra Lekhan in Marathi

औपचारिक पत्र (Aupcharik Patra) ही बहुतेक वेळा आपण अपरिचित, त्रयस्थ अशा व्यक्तीला लिहीत असतो. या पत्रातून आपण आपले काम करून घेण्याच्या, काही माहिती मिळवण्याच्या किंवा काही वस्तूंची मागणी करण्याच्या भूमिकेत असतो. त्यामुळे या पत्राचे लेखन ठरलेल्या संकेतानुसारच होणे आवश्यक असते.

औपचारिक पत्र लिहिताना त्यातील भाषा साधी, सोपी, सरळ असावी. जास्त पन्हाळा न लावता आपले म्हणणे योग्य त्या शब्दात सांगणारी असावी. जेवढ्यास तेवढी भाषा असली तरी नम्र व संयत असावी.

औपचारिक पत्र कसे लिहावे?

औपचारिक पत्र लिहीत असताना ते नेमके कसे लिहावे? त्याबाबतचे काही मुद्दे खालील प्रमाणे आहेत. त्यानुसार आपण औपचारिक पत्र लिहायला पाहिजे.

  • पत्राच्या सुरुवातीला उजव्या कोपऱ्यात पत्र लिहिणाऱ्याचे नाव व मुद्दा लिहावा.
  • पत्र कोणत्या नात्याने लिहित आहोत त्याचा उल्लेख करावा. उदा. विद्यार्थी प्रमुख, सजग नागरिक इत्यादी व पत्ता असावा.
  • पत्त्यानंतर योग्य तो दिनांक आणि ई-मेल ही लिहावा.
  • त्यानंतर डावीकडे योग्य तो मायना असावा. संबंधित व्यक्तीचे नाव, हुद्धा व थोडक्यात पत्ता असावा.
  • विशेष नाम पत्रात असेल तरच ते लिहावे. अन्यथा प्रति, प्रेषक या ठिकाणी अ ब क असाच उल्लेख करावा.
  • औपचारिक पत्र ‘विषय’ लिहिणे आवश्यक असते. विषयावरून पत्राचा हेतू पटकन लक्षात येतो. त्यामुळे विषय नेमका व थोडक्यात लिहावा.
  • महोदय / महोदया असे लिहून पत्र लेखनाला सुरुवात करावी.
  • पल्हाळीकपणा न करता तरीही सविस्तरपणे नेमके शब्दात विषयी विस्तार करावा.
  • दोन ते तीन परिच्छेदात मुद्देसुद लेखन असावे.
  • शेवटी आपला / आपली कृपाभिलाशी / आज्ञार्थी यांपैकी योग्य ते संबोधन वापरून समारोप करावा.

औपचारिक पत्रांचे प्रकार

औपचारिक पत्रांचे काही उपप्रकार पडतात ते पुढील प्रमाणे आहेत.

  1. तक्रार पत्र
  2. चौकशी पत्र
  3. मागणी पत्र
  4. विनंती पत्र
  5. अभिनंदन पत्र, शुभेच्छापत्र
  6. मानपत्र
  7. निमंत्रण पत्र
  8. आभार पत्र
  9. अर्ज लेखन

आता आपण औपचारिक पत्राच्या विविध उपप्रकरांची उदाहरणासहित माहिती बघूया.

तक्रार पत्र | Takrar Patra Lekhan in Marathi

Takrar Patra Lekhan in Marathi – तक्रार पत्रातून आपल्याला होणारा त्रास, अपेक्षा आपण संबंधित व्यक्तीला कळवत असतो आणि तो त्रास दूर व्हावा, आपल्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून तक्रार करत असतो.

उदाहरण –

खरेदी केलेला मोबाईल सदोश निघाला आहे. ग्राहक पंचायतीकडे योग्य ती तक्रार नोंदवा. (प्रेषक- सुनील शरद पाटील)

सुनील शरद पाटील
शिवाजी चौक, गणेश कॉलनी,
पुणे – 431005
[email protected]
मो. 9656897869
दि. 11.12.2022

प्रति,
मा. अध्यक्ष,
ग्राहक पंचायत, पुणे

विषय – ऑनलाइन खरेदी केलेला मोबाईल सदोष निघाल्या बाबत.

महोदय,

मी, रविवार दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी ‘एमआरआय’ या या कंपनीचे bogo हे मोबाईल www.xyz.com या वेबसाईट वरून खरेदी केला. या याची किंमत रक्कम रुपये 9,999/- इतकी आहे. त्यानुसार मला ‘एमआरआय’ या कंपनीकडून दि. 20 सप्टेंबर 2022 रोजी ‘राजदूत’ या कुरिअर कंपनी मार्फत सदर मोबाईल मिळाला.

कंपनीच्या नियमानुसार मोबाईल खराब असल्यास त्याची तुम्हाला 8 दिवसाच्या आत कंपनीकडे तक्रार करावी लागते. व कंपनी तुम्हाला मोबाईल बदलून देते. मी हा मोबाईल घेतला तेव्हापासूनच व्यवस्थित चालत नाही. हा मोबाईल कधीही बंद पडतो व कधीही चालू होतो. याची तक्रार मी ईमेल द्वारे दि. 22 सप्टेंबर 2022 रोजी कंपनीला केली होती. परंतु मला कंपनीकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा मला समजले की माझी फसवणूक झाली आहे.

मला मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे मला न्याय मिळावा. अशी माझी इच्छा आहे. आपली संस्था ग्राहकांच्या अशा तक्रारींचा पाठपुरावा करते. आणि ग्राहकाला न्याय मिळवून देते. याची जाणीव असल्याने हे पत्र आपल्याला पाठवीत आहे. तरी माझ्या या तक्रारीचा अभ्यास करून आपण मला मार्गदर्शन करावे. ही विनंती.

आपला,
(सुनील शरद पाटील)

सोबत – खरेदीचे सर्व कागद पत्रे.

चौकशी पत्र | Choukashi Patra Lekhan in Marathi

जर आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी आपण संबंधीत जबाबदार व्यक्तीला चौकशी पत्र

लिहितो.

उदाहरण –

एका व्यवसाय मार्गदर्शकाकडे पदव्युत्तर अभ्यासक्रमांची चौकशी करणारे पत्र लिहा. (प्रेषक – दगडू शिंदे)

दगडू शिंदे,
मु. पो. कन्नड,
ता. कन्नड, जि. औरंगाबाद,
दि. 10.11.2022

प्रति,
मा. आ. का. भांडवलदार,
सादर नमस्कार

विषय – पदव्युत्तर अभ्यासक्रमाची चौकशी करण्याबाबत.

महोदय,

मी, दगडू शिंदे, श्री. गणेश कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये वाणिज्य शाखेच्या शेवटच्या वर्षात शिकतो आहे. प्रथम आणि द्वितीय वर्षात मी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो आहे. यावर्षीही प्रथम श्रेणीने उत्तीर्ण होण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत.

आपण व्यवसाय मार्गदर्शक आहात. आपले वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होणारे लेख माझ्या वाचनात आले. त्याच ओळखीवर आपल्याला पत्र पाठवितो आहे. वाणिज्य शाखेतील पदवी मिळाल्यानंतर पुढे कोणकोणते अभ्यासक्रम आहेत, याची चौकशी करण्यासाठीच हे पत्र लिहीत आहे.

कन्नड तालुक्यातच आमची पाच एकर जिराईत जमीन आहे. शेतीकडे सध्या वडील लक्ष देतात. परंतु वृद्ध आई-वडील आणि शेती यासाठी मी इथे गावीच राहण्याच्या निर्णयापर्यंत आलो आहे. शेतीतील समस्या आपल्याला माहित असतीलच. बे भरवशाच्या पावसापासून शेतीमालाची योग्य भावात विक्री होईपर्यंत मार्गात अनंत अडचणी येतात. त्यामुळे केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीपूरक छोटा-मोठा व्यवसाय मी करू इच्छितो.

यासाठी पदवी परीक्षानंतर अल्पमुदतीचे कोणते अभ्यासक्रम मला करता येतील, याबद्दल कृपया मला मार्गदर्शन करावे, ही विनंती. अभ्यासक्रम, त्याचा कालावधी, तो अभ्यासक्रम कुठे उपलब्ध आहे व त्याचे अंदाजे शुल्क याबद्दलही मार्गदर्शन करावे.

मी हे पत्र सविस्तर लिहिले असून माझी वैयक्तिक माहिती तुम्हाला कळविली आहे. ज्यायोगे तुम्हाला माझ्या परिस्थितीचा योग्य तो अंदाज येऊ शकेल. तरी वाणिज्य शाखेतील पदवीनंतर शेतीपूरक व्यवसायासाठीचे अभ्यासक्रम कोणते कोणते आहेत याबद्दल आपण मार्गदर्शन करावे, ही विनंती.

आपल्याकडून प्रतिसादाच्या प्रतीक्षेत
दगडू शिंदे

मागणी पत्र | Magni Patra Lekhan in Marathi

ज्यावेळेस एखाद्या वस्तूची किंवा सेवेची आपल्याला मागणी करावयाची असते, त्यावेळेस आपण संबंधित जबाबदार व्यक्तीस मागणी पत्र (Magni Patra Lekhan in Marathi) लिहितो.

उदाहरण –

तुमच्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या ग्रंथालयासाठी ललित पुस्तकांची मागणी करा.

राजेश शिरसाट,
गटप्रमुख,
राष्ट्रीय सेवा योजना,
श्री. गणेश महाविद्यालय देवगाव (रं)

प्रति,
मा. व्यवस्थापक,
उदय एजन्सीज, औरंगाबाद

विषय – श्री. गणेश महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या ग्रंथालयासाठी पुस्तके पाठवण्याबाबत.

महोदय,

मी, राजेश शिरसाट, श्री. गणेश महाविद्यालय देवगाव, (रं) या संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा गटप्रमुख या नात्याने आपल्याला पत्र लिहीत आहे.

आमच्या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विविध उपक्रम राबवले जातात. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य केवळ एका शिबिरापुरते, गावात केलेल्या चार दिवसांच्या श्रमदानापुरतेच मर्यादित राहू नये, अशी आम्हा विद्यार्थ्यांची चर्चा झाली.

आमच्या प्राध्यापकांनीही याला सहर्ष पाठिंबा दर्शविला. वर्षभर छोटे-मोठे उपक्रम राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत राबवावेत अशीही पुस्ती त्यांनी जोडली. वेगवेगळ्या उपक्रमा अंतर्गत महाविद्यालयीन युवक – युवतींचा राष्ट्रीय सेवा योजना कार्यालयात नेहमीच राबता असतो. या युवक – युवतींना संघटित ठेवावे, त्यांचा कार्यालयातील वेळ सत्कारणी लागावा, या निमित्ताने काही चांगले वाचन घडावे, त्यावर चर्चा व्हाव्यात असे वाटले.

त्यातूनच कार्यालयात एक ग्रंथालय ही असावे असे ठरले. ग्रंथालयाचे कामकाज कसे चालते, पुस्तकांची व्यवस्था कशी केली जाते हे ही या निमित्ताने आमच्या लक्षात येईल. या सर्व उद्देशाने आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यालयात आम्ही एक ग्रंथालय सुरू केले आहे. यासाठी बाजारात आलेली काही नवीन पुस्तके आणि काही इतरांनी सुचवलेली पुस्तके आम्हाला हवी आहेत. त्यांची यादी आम्ही या पत्रासोबत जोडत आहोत. पुस्तके लवकरात लवकर पाठवावीत ही विनंती.

आपला,
राजेश शिरसाट,
गटप्रमुख
श्री. गणेश विद्यालय देवगाव (रं)
ता. कन्नड

विनंती पत्र | Vinanti Patra Lekhan in Marathi

आपण पत्राद्वारे एखाद्या गोष्टीची किंवा वस्तूची मागणी करतो किंवा एखाद्या गोष्टीबद्दल चौकशी करतो. अशा वेळेस आपण संबंधित जबाबदार व्यक्तीस विनंती करीत असतो. अशा प्रकारच्या पत्राला विनंती पत्र (Vinanti Patra Lekhan in Marathi) असे म्हणतात.

उदाहरण –

तुम्ही राहता त्या भागात बस थांबा नाही परिवहन मंडळाच्या गोष्ट व्यवस्थापकांना तुमच्या भागात बस थांबा करावा यावर विनंती पत्र लिहा.

गिरीश चौधरी
मु. पाचपीरवाडी
ता. गंगापूर, जि. औरंगाबाद,
पिन 431006
दि. 15.12.2022

प्रति,
वरिष्ठ व्यवस्थापक,
परिवहन मंडळ,
देवगाव बस आगार,
देवगाव रंगारी

विषय – पाचपीरवाडी फाटा या भागात नवीन बस थांबा सुरू करण्याबाबत.

महोदय,

मी गिरीश चौधरी पाचपीरवाडी या गावात जन्मापासून राहत आहे. रोज बसने प्रवास करणाऱ्यांपैकी मी एक नागरिक आहे. या नात्याने पाचपीरवाडी भागातील परिस्थिती तुमच्यासमोर मांडत आहे.

पाचपीरवाडी हा भाग औरंगाबाद वैजापूर रस्त्यावरील एक गाव आहे, व ते देवगाव रंगारी च्या भागांमध्ये येतो. पाचपीरवाडी हे गावाची लोकसंख्या 6000 इतकी आहे. इथून औरंगाबाद ला नौकरी साठी शेकडो कर्मचारी जातात. त्यांचे जाण्यायेण्याचे खूप हाल होतात.

मी इतर नागरिकांना देखील याबाबत विचारणा केली. येथील स्थानिक नागरिकांची देखील अशी इच्छा आहे की या ठिकाणी एक बस थांबा असावा. नागरिकांची वाढती मागणी, आग्रह लक्षात घ्यावा ही विनंती.

तरी आपण या प्रकरणी लक्ष घालून पाचपीरवाडी भागात लवकरात लवकर बस थांबा होईल, यासाठी प्रयत्न करावे ही विनंती.

कळावे.

आपला
गिरीश चौधरी
बस सेवेचा लाभ घेणारा एक ग्राहक

अभिनंदन पत्र, शुभेच्छापत्र | Abhinandan Patra Lekhan in Marathi

जवळच्या व्यक्तीने छोटेसे जरी चांगले काम केले किंवा कुठल्याही परीक्षेत यश मिळवले, की आपण त्याबद्दल त्याचे अभिनंदन करतो, कौतुक करतो, पाठीवर शाबासकीची थाप देतो. अशा वेळेस आपण समोरच्या व्यक्तीस अभिनंदन पत्र (Abhinandan Patra Lekhan in Marathi) लिहितो.

उदाहरण –

मा. कुसुमाग्रज यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यांचे अभिनंदन आकाश जाधव, पुणे हे करत आहेत अशा आशयाचे पत्र लिहा.

आकाश जाधव
बी – 10, मोरया कॉलनी,
पंडित नेहरू रस्ता,
अहमदनगर – 56
दि. 10.11.2022

प्रति,
मा. कुसुमाग्रज,
सादर नमस्कार

बालसाहित्यातील कार्याबद्दल आपल्याला साहित्य विश्वातील अत्यंत मानाचा समजला जाणारा ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ मिळाला. त्यासाठी सर्वप्रथम आपलं मनःपूर्वक अभिनंदन! या घटनेमुळे उचित व्यक्तीला पुरस्कार मिळाल्याचं समाधान माझ्या प्रमाणेच अनेकांना मिळालं असणार, यात शंका नाही.

कोणी एकेकाळी किंवा एकदा काय झाले असे सुरुवात आणि ती गुण्यागोविंदाने नांदू लागले असे शेवट असणाऱ्या साच्यातून तुम्ही मराठी बालविश्वाला बाहेर आणलं परी राक्षस जादुई दिवा यांच्या गोष्टी मुलांना आवडत असल्या तरी आपल्या आजूबाजूला असलेल्या आजच्या जगाबद्दल त्यातील घटनांबद्दल माणसांबद्दल त्यांच्यातील परस्पर संबंधांमधील ही मुलांना जबरदस्त कुतूहल असतं हे तुम्ही अचूक ओळखलं.

या सगळ्यावर कळस म्हणजे पुस्तकातील आपणच सितारलेली जिवंत चित्र त्यामुळे मजकूर आणि चित्र एकमेकांच्या साथीने पुढे जातात अत्यंत जानकारी न्या केलेल्या लेखन आणि तितक्याच प्रभावीपणे विचारपूर्वक केलेलं चित्रण यामुळे ही पुस्तकं एक वेगळीच उंची गाठतात भाषेबरोबरच कलेचे पुस्तकांकडे बघण्याचा भागही मुलांच्या आपसूक निर्माण होत.

पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आणि तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.

आपला शुभेच्छुक
आकाश जाधव

मानपत्र | Man Patra Lekhan in Marathi

मानपत्रातूनही आपण शुभेच्छा / अभिनंदनपत्राप्रमाणेच आपल्या भावना, आनंद, वाटलेले समाधान व्यक्त करतो. मान्यवर व्यक्तीच्या कार्याचा गौरव करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.

उदाहरण –

साकेत फाऊंडेशन, मुंबई
डॉ. अभिजीत राणे

‘साकेत फाउंडेशन, मुंबई’ या संस्थेतर्फे डॉ. अभिजीत राणे यांना 2015 सालचा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.

आदरणीय डॉ. राणे, वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण उत्तम प्रकारे पूर्ण केल्यानंतर देशाच्या दुर्गम भागात जिथे डॉक्टर पोहोचलेला नाही, अशा भागात जाऊन काम करण्याचे आपण ठरवलेत. संपत्ती, कीर्ती, समृद्धी यांच्या मोहात न अडकता विशिष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेवून, ध्येयासक्त मनोवस्थेत आपण अक्षरशः वनवास स्वीकारला.

‘ज्या लोकांच्यात आपण राहतो, त्यांच्या सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक समस्याही आपण सोडवल्या पाहिजेत’, या जाणिवेतून आपल्या कामाला विविध आयाम येत गेली. स्त्रीअत्याचार, कुपोषण, बालमृत्यू, सरकारी कामातील भ्रष्टाचार, वन तस्करी अशा एक ना अनेक समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत मेळघाटातील आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सतत कार्यरत आहात. त्यात कधी अपयश आले, लोकांचा रोष पत्करावा लागला, तरी तुम्ही अवलंबिलेला ध्येयवाद आणि सत्त्यावरची निष्ठा यामुळे अंगीकृत केलेल्या कामापासून विचलित झाला नाहीत. बळीची प्रथा बंद व्हावी, अज्ञानातून, आर्थिक विवंचनेतून धर्मांतर होऊ नये, यासाठी जनजागृती हाच उपाय आहे हे जाणून तुम्ही लोकांशी संपर्क साधत राहिलात.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर इतकी वर्षे झाली तरी मेळघाटामध्ये कुपोषणाचा महाभयंकर प्रश्न तसाच आहे हे तुम्ही सर्वांच्या लक्षात आणून दिले. या दुर्गम भागाला सर्वांशी जोडण्यासाठी प्रयत्न केलेत.

अचलनिष्ठेने आपण करत असलेले हे भव्य रचनात्मक कार्य तरुणांना प्रेरणादायी ठरावे असेच आहे. आपण उभयंतांच्या कामात अनेकांचे सामाजिक देणे भरलेले हात लागावेत ही सदिच्छा! आज समाजसेवेचा आदर्श दीपस्तंभ म्हणून आपल्याकडे आशेने पाहिले जाते. याहून मोठा सन्मान तो काय असू शकतो. तरीही या पुरस्काराच्या निमित्ताने आम्ही सर्वांच्या वतीने आपल्या कार्यास सलाम करतो व आपणाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.

हस्ते – मा. अमोल कोल्हे

अध्यक्ष – मा. नारायण राणे

निमंत्रण पत्र | Nimantran Patra Lekhan in Marathi

निमंत्रण पत्रातून आपण एखाद्या मान्यवर व्यक्तीला कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबद्दल आग्रहाची / आपलेपणाची विनंती करत असतो. शाळा, महाविद्यालय, मंडळे, परिषदा यांच्या एखाद्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणेपद किंवा अध्यक्षपद भूषवावे, अशी मान्यवरांना केलेली विनंती असे निमंत्रण पत्राचे स्वरूप असते.

उदाहरण –

भारत इतिहास संशोधन मंडळ, मुंबई यांच्या ‘इतिहास जाणीव जागृती’ विषयासंबंधी होणाऱ्या व्याख्यानमालेत इतिहास अभ्यासक राजू शेट्टी यांना बोलविण्यासाठी निमंत्रण पत्र लिहा.

क. ख. ग.
कार्यवाहक,
भारत इतिहास संशोधन मंडळ,
मुंबई
दि.05.06.2022

प्रति,
मा. राजू शेट्टी,
प्राध्यापक,
इतिहास विभाग सावित्रीबाई फुले विद्यापीठ, मुंबई

विषय – भारत इतिहास संशोधन मंडळातर्फे आयोजित केलेल्या ‘इतिहास जाणीव जागृती’ व्याख्यानमालीत व्याख्यान देण्याबाबत.

महोदय,

मी. क ख ग, भारत इतिहास संशोधन मंडळ मुंबई या संस्थेचा कार्यवाहक या नात्याने आपल्याला पत्र लिहीत आहे. भारत इतिहास संशोधन मंडळ गेली अनेक दशके इतिहास विषयासंदर्भात संशोधन, मानवी प्रशिक्षणे तसेच ऐतिहासिक दस्तऐवज जतन करणे, या विषयात भरीव काम करते, हे आपल्याला माहीत आहेच. इतिहासाकडे बघण्याचा योग्य तो दृष्टिकोन लोकांमध्ये निर्माण व्हावा यासाठी मंडळ प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून पुढील महिन्यांमध्ये ‘इतिहास जाणीव जागृती’ ही व्याख्यानमाला मंडळातर्फे आयोजित करण्यात येणार आहे.

आपण गेली अनेक वर्षे विद्यापीठ पातळीवर इतिहासाचे अध्यापन करता आहात. प्राथमिक आणि पदव्युत्तर पाठ्यपुस्तकाच्या अभ्यास मंडळावरही आपण अनेक वर्षे सक्रिय आहात. ‘आधुनिक काळातील महाराष्ट्र’ हा आपल्या खास अभ्यासाचा विषय आहे. आजवर वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून आपले लेखन आणि वेगवेगळे शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. समाजाभिमुख अभ्यास संशोधक म्हणून आपण सुपरिचित आहात. त्यामुळेच मंडळाच्या ‘इतिहास जाणीव जागृती’ या व्याख्यानमाले मध्ये इतिहास का व कशासाठी शिकावा याबद्दल आपण मार्गदर्शन करावे, ही आग्रहाची विनंती. या निमित्ताने उपस्थित नागरिकांना, मंडळाच्या सभासदांनाही आपले विचार जाणून घेण्याची संधी मिळेल. इतिहासाच्या ठराविक कल्पना लोकांच्या मनात असतात पण इतिहास म्हणजे नेमके काय? इतिहास आपल्या जगण्याचाच भाग कसा असतो? याबद्दलची मार्गदर्शन आपण आपल्या व्याख्यानातून करावे ही विनंती.

ही व्याख्यानमाला दि. 10 जून ते 15 जून 2022 या 5 दिवसात सकाळी 10 ते 12 या वेळेत मंडळाच्या सभागृहात होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे. व्याख्यानमालेची वेळ दोन तास असणार आहे. यामध्ये आपले व्याख्यान साधारण दीड तास आणि मग प्रश्नोत्तरासाठीचा वेळ असे कार्यक्रमाचे ढोबळ स्वरूप ठरविले आहे. आपला विषय मांडण्यासाठी चा वेळ, कार्यक्रमाची वेळ इत्यादी बाबत आपल्या काही सूचना असतील तर अवश्य कळवाव्यात. त्यांचे स्वागतच आहे. व्याख्यानाचे मानधन आणि प्रवास खर्च याबाबत आम्ही लवकरच संपर्क साधू.

आपण आपल्या कामात / संशोधनात व्यस्त असतात. याची जाणीव आहेच. तरी वेळात वेळ काढून व्याख्यानाचे आमंत्रण आपण स्वीकारावे, ही आग्रहाची विनंती.

कळावे.

आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या अपेक्षेत
क ख ग,
कार्यवाहक भारत इतिहास संशोधन मंडळ, मुंबई

आभार पत्र | Abhar Patra Lekhan in Marathi

आभार पत्र (Abhar Patra) बरेचदा हातात हात घालूनच देतात. आभार पत्रातून कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन केल्याबद्दल, बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता असते. आभार पत्र ही प्रामुख्याने एकाच व्यक्तीला उद्देशून लिहिलेली असतात. आभार पत्रामध्ये वर सांगितलेल्या कार्यक्रमाच्या नंतरच्या प्रवासांची प्रतिबिंब उमटत असतात. या पत्रातून वेळ दिल्याबद्दल, मार्गदर्शन केल्याबद्दल मान्यवरांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता असते.

उदाहरण –

भारत इतिहास संशोधन मंडळातर्फे आयोजित ‘इतिहास जाणीव जागृती’ या व्याख्यानमालीमध्ये व्याख्यान व्याख्यान दिल्याबद्दल इतिहास अभ्यासक राजू शेट्टी यांना कार्यवाहक या नात्याने आभार पत्र लिहा.

य र ल
कार्यवाह,
भारत इतिहास संशोधन मंडळ,
मुंबई
दि. 05.09.2022

प्रति,
मा. राजू शेट्टी,
प्राध्यापक,
इतिहास विभाग सावित्रीबाई फुले विद्यापीठ, मुंबई

विषय – भारत इतिहास संशोधन मंडळातर्फे आयोजित केलेल्या ‘इतिहास जाणीव जागृती’ व्याख्यानमालेतील व्याख्यानाबाबत आभार.

महोदय,

भारत इतिहास संशोधक मंडळातर्फे आयोजित ‘इतिहास जाणीव जागृती’ या व्याख्यानमालीमध्ये आपण सहभागी झालात व उपस्थितांना अत्यंत अभ्यासपूर्वक मार्गदर्शन केले, त्यासाठी आपले मनापासून आभार आणि धन्यवाद.

इतिहासाला बरेचदा वंशावळी आणि सणावळी यांच्या चष्म्यातूनच पाहिले जाते. पण केवळ परीक्षार्थी ही भूमिका सोडली, तर इतिहासासारखा रंजक व रसपूर्ण विषय दुसरा कुठला नाही. आपल्या दैनंदिन आयुष्यात इतिहासाचा स्पर्श असतो. या दृष्टीने इतिहासाची व्याप्ती खूपच व्यापक आहे, याबद्दलची जाण समाजात वाढावी यासाठीच आपणही व्याख्यानमाला आयोजित केली होती.

साध्या सोप्या भाषेमध्ये श्रोत्यांशी संवाद साधत आपण दिलेले व्याख्यान प्रभावी आणि रंगतदारही झाले. व्याख्यानानंतर प्रश्न उत्तरांच्या वेळीही श्रोत्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारले. त्यावेळच्या उत्तरांमध्ये ही आपल्याकडून नवनवीन माहिती मिळत गेली व शंकांचे निरसन होत गेले. व्याख्यानमाला संपल्यावरही आपल्या व्याख्यानाची मोहीनी कमी झाली नाही. परत एकदा आपल्याला संवाद साधण्यासाठी अवश्य बोलवावे, अशाही सूचना आमच्यापर्यंत येत आहेत.

आपण आपल्या व्यग्र दिनक्रमातून वेळ काढून आलात त्यासाठी परत एकदा मनापासून धन्यवाद. भविष्यातही आम्हाला आपले मोलाचे मार्गदर्शन असेच मिळत राहील याबद्दल खात्री आहेच.

कळावे.

आपला
य र ल
कार्यवाह
भारत इतिहास संशोधन मंडळ, मुंबई

अर्ज लेखन | Arj Lekhan in Marathi

रजेचा अर्ज, सुट्टीचा अर्ज, नोकरी संदर्भात करावयाचा अर्ज इत्यादी अर्ज लेखनाचे विषय असू शकतात. बरेचदा या अर्जाचा विहित नमुना तयार असतो. त्यानुसारच अर्ज करायचा असतो. अन्यथा हे सुद्धा एक प्रकारे विनंती पत्रच असते. त्यामुळे त्यांचे लेखन विनंती पत्राप्रमाणेच करावे. मात्र त्यात विषय दिल्यावर योग्य तो संदर्भ देणे आवश्यक आहे. नोकरीसाठी अर्ज करताना जाहिरातीचा संदर्भ, रजेचा अर्जात रजेचा प्रकार इत्यादी नोंदणी आवश्यक ठरतात.

उदाहरण –

वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार जनसंपर्क अधिकारी या पदासाठी अर्ज लेखन करा.

विनय आपटे
रूम न.A-605
टिटवाळा (पूर्व),
ता. कल्याण, जि. ठाणे
दि.15.10.2022

प्रति,
मा. व्यवस्थापक,
ग्रीन इंडस्ट्रीज, ठाणे

विषय – जनसंपर्क अधिकारी या पदाची नौकरी मिळनेबाबत.

संदर्भ – आपली दि. 10 ऑक्टोबर 2022 रोजीची दैनिक पुढारी मध्ये प्रसिद्ध झालेली जाहिरात.

महोदय,

मी विनय आपटे, टिटवाळा येथील स्थानिक रहिवासी असून पुणे विद्यापीठातून पत्रकारिता व जनसंपर्क विषय पदव्युत्तर पदवी उत्तम गुणांसह प्राप्त केलेली आहे. मला पुणे तसेच अकोला येथील वृत्तपत्र कार्यालय तसेच औद्योगिक संस्थांमध्ये काम करण्याचा सुमारे पाच वर्षांचा अनुभव आहे. यासंबंधी सर्व प्रमाणपत्रे मी सोबत जोडली आहे. आपल्यासारख्या नामवंत औद्योगिक संस्थेमध्ये काम करण्याची संधी माझ्यासाठी अतिशय मोलाची आहे. संस्थेचा जनसंपर्क विभाग अधिक बळकट करण्यासाठी सर्वतोपरी कष्ट घेण्याची माझी तयारी आहे.

कृपया या पदासाठी माझी निवड करण्याचा प्राधान्याने विचार करावा.

आपला
विनय आपटे

सोबत – 1) शैक्षणिक प्रमाणपत्रे 2) अनुभवाची प्रमाणपत्रे 3) माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची कात्रणे व पुरस्कार

अनौपचारिक पत्र | Anopcharik Patra Lekhan in Marathi

अनौपचारिक पत्र (Anopcharik Patra) म्हणजे घरगुती, कौटुंबिक, मित्र-मैत्रिणींना लिहिलेली पत्रे होय. या पत्रातून आपण आपल्या भावभावना, खुशाली दुसर्यांपर्यंत पोहोचवत असतो.

अनौपचारिक पत्राचे मुद्दे

  • अनौपचारिक पत्र लिहिण्याचे विशिष्ट असे नियम संकेत नाहीत.
  • उजवीकडच्या कोपऱ्यात दिनांक, वार, गावाचे नाव लिहावे.
  • मध्यभागी ओम / श्री असेही लिहावे.
  • डावीकडे प्रिय, तीर्थरूप, आदरणीय इ. योग्य भावना लिहून पुढे व्यक्तीचे नाव लिहून पत्र लेखनाला सुरुवात करवी.
  • शेवटी व्यक्तीनुरूप नमस्कार, आशीर्वाद लिहून तुझा/तुझी/तुमचा इ. लिहून समारोप करावा.
  • पत्रातील भाषा संवाद केल्यासारखी, गप्पा मारल्यासारखी, साधी, सोपी, मनमोकळी असावी.
  • पत्रातील भाषा वर्णनात्मक, खेळकर, दिलखुलास आपलेपणाची असावी.
  • पत्रातील भाषा प्रेमळ असावी.

उदाहरण –

राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आयोजित केलेल्या शिबिरात सहभागी झालेला मुलगा आपल्या वडिलांना आपले अनुभव कळवत आहे असे पत्र लिहा.

प्रिय बाबा,

खूप दिवसांनी असं पत्र लिहिण्याची वेळ आली. रोज तुझ्याजवळच असतो ना, त्यामुळे कॉलेजमध्ये काही घडलं संध्याकाळी सगळं बडबडून सांगता येतं तुम्हाला. घरापासून दूर आलो की आपलं घर, आपली माणसं याची किंमत कळते. पण याचा अर्थ असा नाही की मी येथे कंटाळलोय. मी खूप नव्हे, खूप वेगळे अनुभव घेतोय सध्या.

राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत कॉलेजतर्फे आयोजित केलेल्या शिबिरासाठी शहरापासून दूर या आडगावी यायला निघालो, तेव्हा आमचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता, पण ही काही आपली नेहमीची ऐशारामाची सहल नाही याची जाणीव इथल्या खास खळग्याच्या वाटेने लगेच करून दिली. मग इथल्या शाळेत आमची पलटण उतरली. शाळा कसली म्हणायची तिला ना फरशी, ना पंखी, ना धड स्वच्छतागृह, पटांगण मात्र मस्त आहे आणि आसपास शेतं पलीकडे नदी आणि जवळच डोंगर आम्ही अगदी खुश झालो या मोकळ्या वाऱ्यात हुंदडताना.

रात्री आमटी, भात, भाजी, भाकरीचे जेवणही मस्त वाटलं. पण एकदाच ह! अजून पाच-सहा दिवस असं जेवायचं या कल्पनेने मन धास्तावलच. त्यादिवशी रात्री चांदण्यात बसून सरांनी शिबिराच्या कार्यक्रमाची कल्पना दिली.

सरांनी पहाटे शिट्टी वाजवली आणि खऱ्या अर्थाने शिबिर सुरू झालं. चित्रकथन, गटचर्चा, गाणी, व्याख्यान, खेळ यात दिवस कसा संपायचा ते समजलं नाही. त्याचबरोबर आम्ही गावात जाऊन लोकांशी बोलत होतो. त्यांच्या अडचणी जाणून घेत होतो. त्यांचं रोजचं हलाखीचं कष्टाचं जीवन बघत होतो. त्यातून आम्ही कधीच शहाणे होतोय असं जाणवतंय.

बाबा, रोज सकाळी गावकऱ्यांच्या सहाय्याने श्रमदानाने स्वच्छता अभियान राबवायचं अशी योजना आहे. प्रथम गावातील रस्ता त्यातील काच खळगे भरून सपाट करायचा. गटार तुंबू नये म्हणून पाणी वाहत ठेवण्यासाठी लोकांना पटवायचं. एक ना दोन!

रोज रात्री गटागटांना आम्ही पहारा देतो, तेव्हा जबाबदारीची जाणीव होते. सगळ्यांच्यात मिळून, मिसळून, जमवून घेण म्हणजे काय? हे कळायला लागले आता. बाबा, सगळं शब्दात वर्णन करून नाही सांगता येणार पण खूप काही समजत नाही. भेटू तेव्हा बोलूच.

आई आणि आजी ला माझा नमस्कार सांगा. मीनी ची खूप आठवण येते.

तुमचाच लाडका,
दिपू.

सारांश | Patra Lekhan in Marathi

मित्रानो या लेखात आपण मराठीतून पत्र लेखन मराठी Patra Lekhan in Marathi हा विषय अगदी सोप्या भाषेत आणि सखोल बघितला. औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र म्हणजे काय? हे ही जाणून घेतले. त्यांच्या विविध उपप्रकरांची माहिती जाणून घेतली. त्यामधील फरक जाणून घेतला. मराठी पत्र लेखनाचे विविध नमुने / उदाहरण बघितले.

मराठी विषयाच्या परीक्षेमध्ये मराठी पत्र लेखन यावर एक तरी प्रश्न नक्की विचारला जातो. त्यामध्ये खालील विषयावर प्रश्न विचारले जातात.

  • तक्रार पत्र
  • चौकशी पत्र
  • मागणी पत्र
  • विनंती पत्र
  • अभिनंदन पत्र, शुभेच्छापत्र
  • मानपत्र
  • निमंत्रण पत्र
  • आभार पत्र
  • अर्ज लेखन

मराठी पत्र लेखनाचे दोन महत्त्वाचे प्रकार म्हणजे औपचारिक आणि अनौपचारिक पत्र हे होय. आम्हला आशा आहे की आपल्याला आमचा हा लेख नक्की आवडला असेल. आपल्याला लेख आवडल्यास आपल्या मित्र-मैत्रिणीना Facebook, Telegram & WhatsApp वर नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

हा लेख खालील बाबतीत उपयुक्त ठरेल.

  • पत्र लेखन मराठी 7वी
  • पत्र लेखन मराठी ८वी
  • पत्र लेखन मराठी ९वी
  • पत्र लेखन मराठी १०वी
  • magni patra lekhan in marathi
  • vinanti patra lekhan in marathi
  • abhinandan patra lekhan in marathi