अभिनंदन पत्र लेखन मराठी 2023 | abhinandan patra lekhan in marathi


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

अभिनंदन पत्र लेखन मराठी 2023 | abhinandan patra lekhan in marathi नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज आपण या लेखात अभिनंदन पत्र कसे लिहायचे याबद्दल जाणून घेणार आहोत. आज या लेखात आपण अभिनंदन पत्र लिहिताना कोणकोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजे, अभिनंदन पत्राचे काही महत्त्वाचे नियम तसेच अभिनंदन पत्राचे 05 सर्वोत्तम नमुने या ठिकाणी बघणार आहोत.

तुम्ही इयत्ता 7वी, 8वी, 9वी किंवा 10वी मध्ये शिकत असाल तर तुम्हाला परीक्षेत पत्र लेखनाचा प्रश्न नक्की आला असेल. यामध्ये तुमचे भाऊ / बहीण / मित्र यांनी काही उत्कृष्ठ कामगीरी केली असेल तर त्याला पात्र लिहून त्याचे अभिनंदन करा असे प्रश्नात सांगितले असते. चला तर मित्रांनो वेळा वाया न घालवता abhinandan patra lekhan in marathi बद्दल संपुर्ण माहिती जाणून घेऊया.

Contents hide

अभिनंदन पत्र लेखनाचे नियम

अभिनंदन पत्र लिहिताना त्याचे काही महत्त्वाचे नियम आपण लक्षात घेतले पाहिजे. अभिनंदन पत्र लेखनाचे नियम पुढीलप्रमाणे आहेत.

 • अभिनंदन पत्र लिहिताना सोज्वळ भाषा वापरावी.
 • अभिनंदन पत्र काही नियमांमध्ये बांधली असतात.
 • अभिनंदन पत्राची सुरूवात आणि शेवट प्रभावी असावी.
 • अशा पत्राची भाषा सोपी, स्पष्ट आणि सुंदर असावी.
 • पृष्ठाच्या डाव्या बाजूला मार्जिनसह पत्र लिहा.
 • पत्र एका पानावर लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून सुसंगतता / लय कायम राहील.

अभिनंदन पत्र कसे लिहावे?

 • अभिनंदन पत्र लिहिण्यास सुरुवात करताना उजव्या बाजूला प्रथम आपण ज्याला पत्र लिहिणार आहोत त्याचे नाव लिहावे.
 • त्यानंतर त्या व्यक्तीचा निवासस्थानाचा पत्ता लिहावा.
 • त्यानंतर पत्राचा दिनांक लिहावा.
 • आता अभिनंदन पत्राची सुरुवात करताना प्रिय भाऊ / प्रिय बहीण / प्रिय मित्र आणि नाव लिहावे.
 • आता तुम्हाला माहिती कशी कळली व समोरच्या व्यक्तीने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल थोडक्यात माहीती लिहून त्याचे अभिनंदन करा.
 • त्याने कशाप्रकारे मेहेनत केली त्याचं थोडक्यात वर्णन करावे.
 • आणि शेवटी तुझा प्रिय भाऊ / बहीण / मित्र व आपले नाव लिहावे.

अभिनंदन पत्र लेखनाचे नमुने | उदाहरण

आता आपण अभिनंदन पत्र लेखनाचे काही सर्वोत्तम नमुने बघुया. अभिनंदन पत्र लेखन इयत्ता 10वी मधील परीक्षेत नेहेमी विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न देखील आपण पाहुयात.

अभिनंदन पत्र इयत्ता दहावी | अभिनंदन पत्र लेखन मराठी 2023

तुमच्या लहान भावाचा किंवा बहिणीचा धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल अभिनंदन पत्र लिहा.

राजेश पवार,
53, जन्म भूमी मार्ग,
ता. कन्नड, जि. औरंगाबाद,
दिनांक – 08.12.2022

प्रिय गणेश,

अनेकोत्तम आशीर्वाद,

आज सकाळीच दैनिक ‘लोकसत्ता’ मध्ये तू शालेय पावसाळी क्रीडा प्रकारातील धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावल्याची बातमी वाचली, आणि आनंदाला पारावर राहिला नाही. या उत्तुंग कामगिरीसाठी तुझे खूप खूप अभिनंदन.

लहानपणापासून तुला धावण्याची आवड होती. गेल्या अनेक दिवसांपासून तुझा सराव देखील सुरू होता. आज स्पर्धा जिंकून तू या यशाला गवसणी घातली. खूप आनंद झाला. यापुढेही सातत्य टिकून ठेव.

मी, आई – बाबा इकडे मजेत आहोत. लवकरच तुला भेटायला येणार आहोत.

तुझाच भाऊ
राजेश

बहिणीला अभिनंदन पत्र

सुजाता पवार,
23, आकाशवाणी मार्ग,
ता. गंगापूर, जि. औरंगाबाद,
दिनांक – 10.12.2022

प्रिय सपना,

अनेकोत्तम आशीर्वाद.

आज सकाळीच दैनिक ‘लोकमत’ मध्ये तू शालेय पावसाळी क्रीडा प्रकारातील धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावल्याची बातमी वाचली, आणि आनंदाला पारावर राहिला नाही. या उत्तुंग कामगिरीसाठी तुझे खूप खूप अभिनंदन.

लहानपणापासून तुला धावण्याची आवड होती. गेल्या अनेक दिवसांपासून तुझा सराव देखील सुरू होता. आज स्पर्धा जिंकून तू या यशाला गवसणी घातली. खूप आनंद झाला. यापुढेही सातत्य टिकून ठेव.

मी, आई – बाबा इकडे मजेत आहोत. लवकरच तुला भेटायला येणार आहोत.

तुझी प्रिय बहिण,
सुजाता

चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल मित्राला अभिनंदन पत्र

प्रशांत पाटील,
मु – रायपूर, ता – गंगापूर,
जि – अहमदनगर,
दिनांक – 05.10.2022

प्रिय अनिल,

सप्रेम नमस्कार.

आज सकाळी चोपडे गुरुजी भेटले. त्यांनी तू राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत तुझा प्रथम क्रमांक आल्याची बातमी सांगितली आणि हे ऐकून आनंदाला पारावार राहिला नाही. त्याबद्दल तुझे हार्दिक अभिनंदन.

मला माहित आहे की, याअगोदर ही तू आंतरशालेय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला होतास. तेव्हा पासून तुझ्या यशाची कमान चढत गेली. तुला तुझ्या आई – बाबांनी व चित्रकलेच्या जाधव सरांनी केलेले मार्गदर्शन खूप मोलाचे ठरले.

असाच यापुढेही तू यशस्वी हो. मला खात्री आहे की तू भविष्यात नक्की एक खूप यशस्वी होशील. तुझ्या यशाबद्दल तुझे मनापासून खूप खूप अभिनंदन.

तुझा प्रिय मित्र
प्रशांत

तुमच्या लहान भावाचा किंवा बहिणीचा धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल अभिनंदन पत्र लिहा.

विनायक परब,
53, जन्म भूमी मार्ग,
ता. कन्नड, जि. औरंगाबाद,
दिनांक – 08.12.2022

प्रिय गजानन,

अनेकोत्तम आशीर्वाद.

आज सकाळीच दैनिक ‘लोकसत्ता’ मध्ये तू शालेय पावसाळी क्रीडा प्रकारातील धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावल्याची बातमी वाचली, आणि आनंदाला पारावर राहिला नाही. या उत्तुंग कामगिरीसाठी तुझे खूप खूप अभिनंदन.

लहानपणापासून तुला धावण्याची आवड होती. गेल्या अनेक दिवसांपासून तुझा सराव देखील सुरू होता. आज स्पर्धा जिंकून तू या यशाला गवसणी घातली. खूप आनंद झाला. यापुढेही सातत्य टिकून ठेव.

मी, आई – बाबा इकडे मजेत आहोत. दिवाळीच्या सुट्टीत लवकर आम्हाला भेटायला ये.

तुझाच भाऊ
विनायक

विज्ञान प्रदर्शनात प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल तुमच्या मित्राचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.

सुरेश कांबिलकर,
मु – पिंपळगाव, ता – सिल्लोड,
जि – कोल्हापूर,
दिनांक – 10.08.2022

प्रिय राजेश,

सप्रेम नमस्कार.

आज सकाळी दैनिक पुण्यनगरी वाचत असताना तुझी बातमी बघितली. तुला राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम पारितोषिक मिळाल्याची बातमी बघितली आणि हे बघून आनंदाला पारावार राहिला नाही. त्याबद्दल तुझे हार्दिक अभिनंदन.

मला माहित आहे की, तुला लहानपनासूनच विज्ञानाची आवड होती. याअगोदर ही तू आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला होतास. तेव्हा पासून तुझ्या यशाची कमान चढत गेली. तुला तुझ्या आई – बाबांनी व विज्ञानाच्या पवार सरांनी केलेले मार्गदर्शन खूप मोलाचे ठरले.

असाच यापुढेही तू यशस्वी हो. मला खात्री आहे की तू भविष्यात नक्की एक खूप यशस्वी होशील. तुझ्या यशाबद्दल तुझे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप अभिनंदन.

तुझा प्रिय मित्र
सुरेश कांबिलकर

उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.

विक्रम जाधव,
श्री. गणेश विद्यालय,
देवगाव(रं), ता. कन्नड
जि. औरंगाबाद

इयत्ता आठवी च्या सर्व विद्यार्थ्यांना सप्रेम नमस्कार.

आज तुम्ही सर्वांनी तालुका स्तरीय वृक्ष लागवड या उपक्रमात सहभागी होऊन श्री. गणेश विद्यालयाचे नाव उंचावले आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे अभिनंदन. मला माहीत आहे की तुम्ही यासाठी खूप कष्ट घेतले आहे.

ही बातमी ऐकून मला खूप आनंद झाला. तुम्ही सर्व अशाच प्रकारे उंच उंच भरारी घेत जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

तुमचाच
विक्रम जाधव

सारांश | abhinandan patra lekhan in marathi

मित्रांनो आज आपण या लेखात अभिनंदन पत्र लेखन मराठी 2023 (abhinandan patra lekhan in marathi) बद्दल संपुर्ण माहिती बघितली. तेही अगदी सोप्या भाषेत. अभिनंदन पत्राचे काही नमुने / उदाहरण देखील बघितले. जेणेकरून तुम्हाला समजायला सोपे होईल. जर तुम्हाला अभिनंदन पत्र लेखन मराठी 2023 (abhinandan patra lekhan in marathi) हा लेख आवडला असेल तर त्याला तुमच्या मित्रांना Facebook, telegram, WhatsApp वर नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

परीक्षेत अभिनंदन पत्र लेखनावर नेहमी विचारले जाणारे काही प्रश्न.

 1. तुमच्या लहान भावाचा किंवा बहिणीचा धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल अभिनंदन पत्र लिहा.
 2. उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
 3. विज्ञान प्रदर्शनात प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल तुमच्या मित्राचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
 4. चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल मित्राला अभिनंदन पत्र लिहा.
 5. बहिणीला अभिनंदन पत्र लिहा.

abhinandan patra lekhan in marathi, abhinandan patra lekhan in marathi 2022, abhinandan patra lekhan, abhinandan patra lekhan in hindi, patra lekhan in marathi, abhinandan patra lekhan in marathi abhinandan patra lekhan in marathi

2 thoughts on “अभिनंदन पत्र लेखन मराठी 2023 | abhinandan patra lekhan in marathi”

Leave a Comment