BDO बद्दल संपुर्ण माहिती 2022 | bdo full form in marathi


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

bdo full form in marathi नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात BDO बद्दल संपुर्ण माहिती जाणून घेणार आहोत. BDO चे फुल फॉर्म block development officer हे आहे. BDO लाच मराठीत गट विकास अधिकारी असे म्हणतात. गट विकास अधिकारी हे पद पंचायत समिती कार्यालयातील अत्यंत महत्वाचे पद आहे. आपल्या गटात येणाऱ्या खेडेगावांची विकास कामे करण्याचे व करून घेण्याचे काम हे bdo म्हणजेच गट विकास अधिकार्याचे असते.

आज आपण या लेखात गट विकास अधिकारी यांची नियुक्ती, वेतन, बदली, पदोन्नती आणि कामाचे स्वरूप इत्यादी अशा अनेक प्रकारची माहिती जाणून घेणार आहोत. आमच्या team ने bdo बद्दल खुप अभ्यास करून ही माहिती जमा केली आहे. आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच उपयुक्त ठरेल.

Contents hide

bdo full form in marathi

bdo full form in English is block development officer. bdo चे फुल फॉर्म block development officer हे आहे. bdo लाच मराठीमध्ये गट विकास अधिकारी असे म्हणतात. गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात. bdo हे पंचायत समिती व जिल्हा परिषद यांमधील महत्त्वाचा दुवा असतो.

गट विकास अधिकारी (bdo) ची नियुक्ती कोण करते?

bdo म्हणजेच गट विकास अधिकाऱ्याची नियुक्ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे नामनिर्दशनाद्वारे महाराष्ट्र शासन करते. तसेच सहाय्यक गट विकास अधिकारी (गट – ब) या पदातून पदोन्नतीने देखील bdo ची नियुकी करण्यात येते.

महाराष्ट्रात महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 97 मध्ये प्रत्येक गटासाठी एक गटविकास अधिकारी असेल अशी तरतूद करण्यात आली आहे.

गट विकास अधिकारी संवर्ग

गट विकास अधिकारी हे गट – अ (राजपत्रित) पद आहे.
गट विकास अधिकाऱ्याचे पद हे राजपत्रित पद आहे.

गट विकास अधिकारी (bdo) चे वेतन

गट विकास अधिकारी (bdo) हे राजपत्रित पद असून त्यांचे अंदाजित मासिक वेतन रू.75,000/- इतके असते. गट विकास अधिकारी (bdo) चे वेतन मॅट्रिक्स मधील वेतनस्तर S – 20 : 56100 – 177500 अधिक महागाई भत्ता व इतर देय भत्ते त्यांना देय असतात.

गट विकास अधिकारी (bdo) ची पदस्थापना

गट विकास अधिकारी (bdo) ची महाराष्ट्रात कोणत्याही पंचायत समिती च्या ठिकाणी किंवा जिल्हा परिषदेत उप मुख्य कार्यकारी पदावर पदस्थापना होते.

महाराष्ट्रात गटविकास अधिकाऱ्याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून व नेमणूक महाराष्ट्र शासनाकडून होते. काही जागा जिल्हा परिषदेच्या विस्तार अधिकाऱ्यांमधून पदोन्नतीने भरण्यात येतात. हा अधिकारी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास खात्याखाडील अधिकारी असून त्याच्यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे नियंत्रण असते.

गट विकास अधिकारी (bdo) ची बदली

गट विकास अधिकारी (bdo) ची बदली दर तीन वर्षांनी पंचायत समिती तर दर 6 वर्षांनी महसूली संवर्गात होते.

गट विकास अधिकारी (bdo) ची पदोन्नती

गट विकास अधिकारी (bdo) ची पदोन्नती ची साखळी खालील प्रमाणे असते.

  1. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (उच्च श्रेणी) किंवा सहाय्यक आयुक्त (विकास)
  2. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा उपायुक्त (विकास)
  3. संवर्ग पद

वरीलप्रमाणे गट विकास अधिकाऱ्याची पदोन्नती होत असते.

गट विकास अधिकारी (bdo) चे कामाचे स्वरूप

  • गट स्तरावर (तालुकास्तरावर) पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख म्हणून bdo काम पाहतो. पंचायत समितीचे सर्व करार त्याच्या सहीनीशी केले जातात.
  • पंचायत समितीचा अर्थसंकल्प तयार करणे, बैठका बोलावणे, ग्रामपंचायतिंच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.
  • गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकिय अधिकारी असतो.
  • गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी असतो.
  • पंचायत समितिच्या स्थायी समिती चे सचिव म्हणून काम पाहणे.
  • पंचायत समितीच्या सभापतीस प्रशासकीय बाबींवर सल्ला देणे.
  • तालुक्यातील सर्व विकास कामांची अंमलबजावणी करणे. विकास योजनांवर देखरेख ठेवणे. सनियंत्रण करणे.
  • पंचायत समितीचा वार्षिक अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करणे.
  • पंचायत समितीतील गट – क व गट – ड कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे, त्यांच्या रजा मंजूर करणे.
  • पंचायत समितीचा सर्व खर्च गटविकास अधिकाऱ्याच्या संमतीने व सहीनिशी केला जातो.

गट विकास अधिकारी (bdo) या पदावरील जमेची बाब

पंचायत समितीतील विकास कामांच्या अंमलबजावणीची जबाबदारी गट विकास अधिकाऱ्यांवर असल्याने लोकसेवेची मोठी संधी प्राप्त होते.

पंचायत समिती सामान्य लोकांशी संबंधित कामे पाहत असल्याने मोठी सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होते.

गट विकास अधिकारी (bdo) यांना शासकीय निवासस्थान, प्रशासकीय कामासाठी शासकीय वाहनाची सुविधा शासनाकडून पुरवली जाते.

प्रशासनाच्या सर्व विभागांशी संबंध येत असल्याने विविध विभागातील प्रशासनाचा मोठा अनुभव प्राप्त होतो.

गट विकास अधिकारी (bdo) या पदावरील अडचणीच्या बाबी

प्रशासनाच्या सर्व विभागाच्या विकास कामांच्या अंमलबजावणीची जबाबदारी असल्याने कामाचा मोठा व्याप असतो.

राजकीय प्रतिनिधी व माध्यम प्रतिनिधी यांच्याशी संबंध येत असल्याने कधीकधी कामांमध्ये त्यांचा हस्तक्षेप अडचणीचे ठरू शकते.

गट विकास अधिकारी (bdo) बद्दल महत्त्वाची माहिती

पंचायत समितीचा महत्वाचा अधिकारी म्हणजेच गटविकास अधिकारी हा असतो. याला इंग्रजीमध्ये BDO म्हणजेच ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर असेही म्हणतात.

पंचायत समितीचा सचिव हा गटविकास अधिकारी असतो. गटविकास अधिकाऱ्याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होते. तर नेमणूक महाराष्ट्र शासन करते. गटविकास अधिकारी अधिकारी हा वर्ग एक व वर्ग दोन दर्जाचा अधिकारी असतो.

गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी असतो आणि हा पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारीही असतो. गटविकास अधिकाऱ्यांवर नजिकचे नियंत्रण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे असते.

गट विकास अधिकारी हा पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो. पंचायत समितीचे अंदाजपत्रक गटविकास अधिकारी तयार करतो. पंचायत समितीस मिळणाऱ्या अनुदानाच्या रकमा काढण्याचे व वाटप करण्याचे अधिकार गटविकास अधिकाऱ्याला आहे.

पंचायत समितीचा अहवाल गटविकास अधिकारी हे मुख्य कार्यकारी अधिकारी (ceo) कडे पाठवीत असतो. पंचायत समितीच्या कार्याची यशस्विता गटविकास अधिकाऱ्यावर अवलंबून असते.

गटविकास अधिकाऱ्याला शिक्षा करण्याचा अधिकार विभागीय आयुक्त यांना असतो. पंचायत समिती व जिल्हा परिषद यामधील दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतो. राज्य शासन व पंचायत समिती यामधील दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतो.

महाराष्ट्रात महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 97 मध्ये प्रत्येक गटासाठी एक गटविकास अधिकारी असेल अशी तरतूद करण्यात आली आहे.

पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण तयार करतो?

पंचायत समितीचे अंदाजपत्रक गट विकास अधिकारी तयार करतो. पंचायत समितीचे अंदाजपत्रक तयार होऊन जिल्हा परिषदे कडे मंजुरीस्तव पाठविण्यात येते.

सारांश | bdo full form in marathi

मित्रांनो आज आपण या लेखात bdo full form in marathi बद्दल तसेच गट विकास अधिकारी बद्दल सखोल माहिती बघितली. या लेखात आपण गट विकास अधिकार्याचे वेतन, नियुक्ती, पदस्थपणा, त्यांचे पंचायत समितीतील कर्तव्ये व जबाबदऱ्या अशा सर्व बाबींची माहिती आपण या लेखात बघितली. आम्हाला आशा आहे की आम्ही दिलेली माहिती आपल्याला नेहेमी उपयोगी पडेल. आमच्या ordar.in या ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले धन्यवाद.

गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा कोण असतो?

गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव तथा मुख्य अधिकारी असतो.

What is the qualification of BDO?

Any Degree.

What is the name of BDO exam?

the name of bdo exam is mpsc in maharashtra.

पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण तयार करतो?

पंचायत समितीचे अंदाजपत्रक गट विकास अधिकारी तयार करतो.

BDO बद्दल संपुर्ण माहिती 2022 | bdo full form in marathi मध्ये खालील माहिती दिलेली आहे.

bdo full form in marathi

bdo full form in marathi

bdo full form in marathi

bdo full form in English

BDO बद्दल संपुर्ण माहिती

BDO बद्दल माहिती

गट विकास अधिकारी (bdo)

bdo full form in marathi

bdo full form in marathi

bdo full form in marathi

Leave a Comment