बोनाफाईड सर्टिफिकेट अर्ज नमूना 2022 | bonafide certificate application in marathi

bonafide certificate application in marathi – विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वेगवेगळ्या कारणासाठी शाळेच्या बोनाफाईड सर्टिफिकेटची गरज असते. बोनाफाईड प्रमाणपत्र हे विद्यार्थ्यांना आर्मी भरतीसाठी, पोलीस भरतीसाठी, एसटी बस मासिक पास काढण्यासाठी, मतदान यादी मध्ये नाव नोंदणीसाठी, आधार कार्ड अपडेट करण्यासाठी, बँकेमध्ये स्कॉलरशिप साठी खाते उघडणे अशा अनेक महत्त्वाच्या कामासाठी बोनाफाईड प्रमाणपत्र मागितले जाते.

हे बोनाफाई सर्टिफिकेट मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या शाळेमध्ये तसेच महाविद्यालयांमध्ये अर्ज करावा लागतो. तो अर्ज कशाप्रकारे लिहायचा असतो? हे आपण या लेखात पाहणार आहोत.

बोनाफाईड सर्टिफिकेट मिळण्यासाठी अर्ज कसा लिहावा?

Bonafide certificate in marathi – सुरुवातीला वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यामध्ये अर्ज करत आहे तो दिनांक तेथे टाकायचा असतो, त्यानंतर डाव्या बाजूला प्रती, त्यानंतर त्याच्याबरोबर खाली माननीय मुख्याध्यापक किंवा प्राचार्य साहेब आणि त्याच्याखाली शाळेचे नाव तुमचं महाविद्यालय असेल तर त्या महाविद्यालयाचे नाव तुम्हाला टाकायचे असते. त्यानंतर शाळेचा किंवा महाविद्यालयाचा पत्ता या ठिकाणी लिहून घ्यायचा असतो.

पत्ता झाल्यानंतर एक ओळ सोडायची आहे आणि खालच्या ओळीला विषय घ्यायचा आहे. विषय लिहा “बोनाफाईड सर्टिफिकेट मिळणेबाबत”. विषयाच्या बरोबर खाली अर्जदार आणि तुम्ही तुमचं स्वतःचं पूर्ण नाव लिहायचं आहे.

त्यानंतर एक ओळ सोडायची आहे आणि खालच्या ओळीला महोदय असे लिहून इथ आपण आता अर्ज लिहायला सुरूवात करत आहोत.

वरील विषयास अनुसरून विनंती अर्ज सादर करतो किंवा करते की मी आपल्या शाळेत / महाविद्यालयात सण या ठिकाणी वर्ष टाकायचा आहे मध्ये शिकत आहे. ती इयत्ता लिहायचे आहे इयत्ता टिंब टिंब मध्ये शिकत असून माझा रोल नंबर तुमचा नंबर इथे लिहायचा आहे. मला माझ्या वैयक्तिक कामानिमित्त बोनाफाईड सर्टिफिकेटची गरज आहे. कृपया मला सदर प्रमाणपत्र लवकरात लवकर द्यावे ही नम्र विनंती. धन्यवाद.

आणि हे लिहिल्यानंतर तीन ओळ सोडून परत उजव्या कोपऱ्यात खालच्या बाजूला आपला आज्ञाधारक विद्यार्थी आणि याखाली तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे आणि तुमची सही सुद्धा करायची आहे.

अशाप्रकारे तुमच्या शाळेमधून किंवा महाविद्यालयामधून बोनाफाईड प्रमाणपत्र मिळविण्यासाठी चा अर्ज तुमच्या शाळेमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये दाखल करायचा आहे की जेणेकरून तुम्हाला तुमचे बोनाफाईड सर्टिफिकेट लवकर मिळेल.

बोनाफाईड सर्टिफिकेट अर्ज नमूना | Bonafide certificate in marathi

बोनाफाईड अर्ज मराठी – आपण शाळेमध्ये शिकत असताना आपल्याला विविध बाबींसाठी बोनाफाईड सर्टिफिकेट ची आवश्यकता भासते. आता आपण काही महत्त्वाच्या कामांसाठी लागणार्या बोनाफाईड प्रमाणपत्र मिळविण्यासाठी चे अर्जाचे नमुने बघणार आहोत.

पोलीस भरतीसाठी बोनाफाईड सर्टिफिकेट अर्ज नमुना

Bonafide certificate application in marathi college

दि. 20.07.2022

प्रति,
मा. प्राचार्य साहेब,
आसारामजी भांडवलदार महाविद्यालय,
देवगाव (रं), ता. कन्नड, जि. औरंगाबाद

विषय – बोनाफाईड सर्टिफिकेट मिळणेबाबत.
अर्जदार – राजेश सखाराम पवार

महोदय,

वरील विषयास अनुसरून विनंती अर्ज सादर करतो की, मी राजेश सखाराम पवार आपल्या आसारामजी भांडवलदार महाविद्यालयात सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात बी.कॉम 1st Year ला शिकत असून माझा रोल नंबर 56 हा आहे. मला या वर्षी होणाऱ्या पोलीस भरतीसाठी बोनाफाईड सर्टिफिकेट ची आवश्यकता आहे. कृपया मला सदर प्रमाणपत्र लवकरात लवकर द्यावे ही नम्र विनंती. धन्यवाद.

आपला आज्ञाधारक विद्यार्थी
राजेश सखाराम पवार

एसटी बस मासिक पास काढण्यासाठी बोनाफाईड सर्टिफिकेट अर्ज नमुना

दि. 22.07.2022

प्रति,
मा. मुख्याध्यापक साहेब,
श्री. गणेश महाविद्यालय, देवगाव (रं),
ता. कन्नड, जि. औरंगाबाद

विषय – बोनाफाईड सर्टिफिकेट मिळणेबाबत.
अर्जदार – सुनिल शिवसींग जारवाळ

महोदय,
वरील विषयास अनुसरून विनंती अर्ज सादर करतो की, मी सुनिल शिवसींग जारवाळ आपल्या श्री. गणेश महाविद्यालय, देवगाव (रं) मध्ये सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात 10वीत शिकत असून माझा रोल नंबर 10 आहे. मला एसटी बस मासिक पास काढण्यासाठी बोनाफाईड सर्टिफिकेट ची आवश्यकता आहे. कृपया मला सदर प्रमाणपत्र लवकरात लवकर द्यावे ही नम्र विनंती. धन्यवाद.

आपला आज्ञाधारक विद्यार्थी
सुनिल शिवसींग जारवाळ

आधार कार्ड नोंदणीसाठी बोनाफाईड सर्टिफिकेट अर्ज नमुना

दि. 10.07.2022

प्रति,
मा. मुख्याध्यापक साहेब,
सरस्वती महाविद्यालय, डोनगाव
ता. गंगापूर, जि. औरंगाबाद

विषय – बोनाफाईड सर्टिफिकेट मिळणेबाबत.
अर्जदार – राजेश शिवराम जाधव

महोदय,
वरील विषयास अनुसरून विनंती अर्ज सादर करतो की, मी राजेश शिवराम जाधव आपल्या सरस्वती महाविद्यालय, डोनगाव मध्ये सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात 09वीत शिकत असून माझा रोल नंबर 20 आहे. मला आधार कार्ड नोंदणीसाठी बोनाफाईड सर्टिफिकेट ची आवश्यकता आहे. कृपया मला सदर प्रमाणपत्र लवकरात लवकर द्यावे ही नम्र विनंती. धन्यवाद.

आपला आज्ञाधारक विद्यार्थी
राजेश शिवराम जाधव

बँकेमध्ये स्कॉलरशिप साठी बोनाफाईड सर्टिफिकेट अर्ज नमुना

दि. 22.07.2022

प्रति,
मा. मुख्याध्यापक साहेब,
श्री. गणेश महाविद्यालय, देवगाव (रं),
ता. कन्नड, जि. औरंगाबाद

विषय – बोनाफाईड सर्टिफिकेट मिळणेबाबत.
अर्जदार – सुनिल शिवसींग जारवाळ

महोदय,
वरील विषयास अनुसरून विनंती अर्ज सादर करतो की, मी सुनिल शिवसींग जारवाळ आपल्या श्री. गणेश महाविद्यालय, देवगाव (रं) मध्ये सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात 10वीत शिकत असून माझा रोल नंबर 10 आहे. मला बँकेमध्ये स्कॉलरशिप साठी बोनाफाईड सर्टिफिकेट ची आवश्यकता आहे. कृपया मला सदर प्रमाणपत्र लवकरात लवकर द्यावे ही नम्र विनंती. धन्यवाद.

आपला आज्ञाधारक विद्यार्थी
सुनिल शिवसींग जारवाळ

बोनाफाईड प्रमाणपत्र pdf

आपल्याला रेडिमेड बोनाफाईड प्रमाणपत्र pdf येथे आम्ही उपलब्ध करून देत आहोत. बोनाफाईड प्रमाणपत्र pdf मराठी मध्ये येथे डाउनलोड करा.

सारांश | bonafide certificate application in marathi

मित्रांनो आज आपण या लेखात bonafide certificate application in marathi, बोनाफाईड अर्ज मराठी याबद्दल सखोल माहिती बघितली. आपण शाळेत किवा कॉलेज मध्ये असताना आपल्याला कधी ना कधी बोनाफाईड प्रमाणपत्राची आवश्यकता लागतेच. त्यासाठीच आपल्याला अर्ज करावा लागतो. आम्ही या लेखात बोनफाईड प्रमाणपत्र मिळण्यासाठीचे अर्जाचे सर्वोत्तम नमुने आपल्यासमोर सादर केले आहे. आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा लेख नक्की आवडेल. आमच्या ordar.in या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.

bonafide Certificate In Marathi, Bonafide Certificate Meaning In Marathi, bonafide certificate sathi arj. बोनाफाईड अर्ज मराठी नमुना pdf, बोनाफाईड साठी अर्ज मराठी, bonafide certificate application in marathi

5 thoughts on “बोनाफाईड सर्टिफिकेट अर्ज नमूना 2022 | bonafide certificate application in marathi”

Leave a Comment