NMMS परीक्षा संपुर्ण माहिती 2022 | NMMS Exam Information in Marathi


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

nmms exam information in marathi – जर तुम्हाला nmms परीक्षेबाबत माहिती जाणून घ्यायची असेल, NMMS परीक्षा नक्की असते तरी काय? NMMS चे फुल फॉर्म काय आहे? ही परीक्षा केव्हा आणि कशा प्रकारे होते? पात्रता काय आहे? अशा आपल्या सर्व शंकांचे निरसन या ठिकाणी होणार आहे.

तर नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात NMMS परीक्षे (NMMS Exam Information in Marathi) बद्दल सखोल माहिती बघणार आहोत. जसे की NMMS परीक्षे साठी पात्रता काय आहे? अर्ज करण्याची पद्धत काय आहे? NMMS परीक्षेचे वेळापत्रक काय आहे? परीक्षेचे विषय काय आहे? NMMS परीक्षा पात्रता गुण किती पाहिजे? परीक्षेचे निकाल कधी जाहीर होते? NMMS परीक्षेत कोणत्या विद्यार्थ्याला आरक्षण आणि किती शिष्यवृत्ती मिळते? या सर्व बाबींची संपुर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

NMMS परीक्षा काय आहे?

NMMS ही एक शिष्यवृत्ती परीक्षा आहे. इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वीतील राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) ही असते. NMMS चे फुल फॉर्म National Means-cum-Merit Scholarship Scheme हे आहे. यामध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते.

महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्याच्या दृष्टीने या परीक्षेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रे आकाशवाणी व दूरदर्शन वरून व लोकराज्य मासिकांमधून या परीक्षेच्या प्रसिद्धी विनामूल्य करण्यात येते.

सन 2007-08 पासून इयत्ता 08 वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी. आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या NMMS योजनेचे उद्दिष्ट आहे.

nmms full form in marathi

nmms full form in marathi आहे National Means-cum-Merit Scholarship Scheme. NMMS शब्दाचा मराठी भाषेत Full Form हा नॅशनल मिन्स कम-मेरिट स्कॉलरशिप असा आहे.

nmms exam full form in marathi हा नॅशनल मिन्स कम-मेरिट स्कॉलरशिप असा आहे.

NMMS योजनेचा लाभ कोणास मिळतो?

इयत्ता आठवीतील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न रु.1,50,000/- पेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होते.

NMMS परीक्षेसाठी पात्रता | nmms exam information in marathi

 1. महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता आठवी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी विद्यार्थिनी या परीक्षेत बसता येते.
 2. पालकांचे (आई-वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न रू.1,50,000/- पेक्षा कमी असावे. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा/तलाठ्याचा चालू वर्षाचा आर्थिक उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा.
 3. विद्यार्थी/विद्यार्थिनी इयत्ता सातवी मध्ये किमान 55% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. (SC / ST चा विद्यार्थी किमान 50% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.)
 4. खालील विद्यार्थी NMMS परीक्षेसाठी अपात्र आहेत.
 • विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी.
 • केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
 • जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
 • शासकीय वस्तीगृहाच्या सवलतीचा, भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी.
 • सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी.

NMMS परीक्षेसाठी अर्ज करण्याची पद्धत

दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे-1 यांच्याकडून प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात येते. दरवर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाईन आवेदन पत्रे परिषदेच्या www.mscepune.inhttp://nmms.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होते.

विद्यार्थ्यांची निवड कशा प्रकारे होते?

विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येते. संबंधित लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणा नुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते.

NMMS परीक्षेचे वेळापत्रक

महाराष्ट्रातील विविध केंद्रावर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किंवा शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांचे मार्फत दरवर्षी मार्च महिन्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेत असते. सदर परीक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे असते.

अ. क्र.विषयाचे नाव एकूण गुण एकूण प्रश्न कालावधीवेळ पात्रता गुण
01 बौद्धिक क्षमता चाचणी
Mental Ability Test
(MAT)
9090दीड तास (फक्त दृष्टी
अपंगांसाठी 30 मिनिटे
जादा वेळ)
10.30
ते
12.00
40% *
02शालेय क्षमता चाचणी
Scholastic Aptitude Test
(SAT)
9090दीड तास (फक्त दृष्टी
अपंगांसाठी 30 मिनिटे
जादा वेळ)
13.30
ते
15.00
40% *
NMMS परीक्षेचे वेळापत्रक

सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण 40% मिळणे आवश्यक आहेत. (SC / ST व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण 32% मिळणे आवश्यक आहेत.)

NMMS Exam Syllabus | nmms परीक्षेसाठी विषय

सदर NMMS परीक्षेसाठी मुख्यत्वे दोन विषय असतात. त्यांची माहिती पुढील प्रमाणे आहे.

1. बौद्धिक क्षमता चाचणी (MAT)

ही मानसशास्त्रीय चाचणी असून त्यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.

2. शालेय क्षमता चाचणी (SAT)

ही सामान्यतः इयत्ता आठवी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असते. त्यामध्ये

 • सामान्य विज्ञान एकूण गुण – 35
 • समाजशास्त्र एकूण गुण – 35
 • गणित एकूण गुण – 27

असे तीन विषय असतात या तीन विषयांचे एकूण 90 प्रश्न सोडवायचे असतात.

>>उप विषयावर गुणांची विभागणी खालील प्रमाणे असते.

 1. सामान्य विज्ञान 35 गुण :- भौतिकशास्त्र 11 गुण, रसायनशास्त्र 11 गुण, जीवशास्त्र 13 गुण
 2. समाजशास्त्र 35 गुण :- इतिहास 15 गुण, नागरिक शास्त्र 5 गुण, भूगोल 15 गुण
 3. गणित 20 गुण

NMMS प्रश्नपत्रिकेचे मध्यम

प्रश्नपत्रिका मराठी, इंग्रजी, गुजराती, उर्दू, सिंधी, कन्नड व तेलगू या आठ माध्यमातून उपलब्ध असतील. (सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येणार आहे) यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल. दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तर पत्रिका दिल्या जातील. प्रत्येक प्रश्न क्रमांका पुढे पर्यायासाठी 04 वर्तुळे असतील.

योग्य पर्यायाचे वर्तुळ निळे / काळे बालपणाने पूर्णतः रंगवून उत्तर नोंदवायचे आहे. पेन्सिलचा वापर केलेली/अपुरी/अंशतः रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत. एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदविलेले/उत्तरे/चुकीच्या पद्धतीने नोंदवलेली उत्तरे व्हाइटनर खाडाखोड करून नोंदवलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत.

NMMS आरक्षण व शिष्यवृत्ती संख्या

अखिल भारतीय पातळीवर NMMS शिष्यवृत्तीची संख्या एक लाख इतकी आहे. महाराष्ट्रासाठी 11682 इतका कोटा निश्चित करून दिलेला आहे. कोट्यानुसार व राज्याच्या संवर्गनीहाय आरक्षणानुसार, गुणवत्तेच्या आधारे जिल्हानिहाय, संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. दिव्यांगांसाठी प्रत्येक संवर्गात राज्याच्या दिव्यांग आरक्षणानुसार आरक्षण असेल. जिल्ह्यासाठीचा कोटा व विद्यार्थ्यांच्या जात संवर्गाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या प्रदान करण्यात येतील.

NMMS परिक्षेसाठी शुल्क | NMMS Exam Fees

NMMS परीक्षेसाठी खालील प्रमाणे शुल्क आकारण्यात येते.

अ. क्र. तपशील दिनांक शुल्क रु.शाळा संलग्नता फी
01 ऑनलाइन वियमित
आवेदन पत्रे भरणे.
100/-रु.200/- प्रती संस्था
शैक्षणिक वर्षासाठी
02 ऑनलाइन विलंब
आवेदन पत्रे भरणे.
200/-रु.200/- प्रती संस्था
शैक्षणिक वर्षासाठी
03 ऑनलाइन अतिविलंब आवेदनपत्रे
(शाळा/संस्था जबाबदार असेल तर)
300/- किवा
400/-
रु.200/- प्रती संस्था
शैक्षणिक वर्षासाठी
NMMS Exam Fees

निकाल घोषित करणे | NMMS Exam Result 2022

सदर परीक्षेचा निकाल साधारणतः मे व जून महिन्यात जाहीर करण्यात येतो. सदर परीक्षेचा निकाल व निवड यादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध केली जाते. जिल्ह्यांनी शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरूनच काढावयाचा असतो. महाराष्ट्रातील विद्यार्थी आपला निकाल परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर पाहू शकता.

शिष्यवृत्ती दर | NMMS Scholarship Amount

शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांस इयत्ता 9 वी ते 12 वीपर्यंत दरमहा रुपये 1000/- (वार्षिक रुपये 12000/-) शिष्यवृत्ती दिली जाते.

शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी इ. 09 वी व इ. 11 वी मध्ये किमान 55% गुण मिळणे आवश्यक आहे. (SC/ST विद्यार्थ्यांना किमान 50% गुणांची आवश्यकता आहे.)

इ. 10 वी मध्ये किमान 60% गुण मिळणे आवश्यक आहेत. (SC/ST विद्यार्थ्यांना किमान 55% गुणांची आवश्यकता आहे.)

सदर शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व माननीय शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांचे मार्फत केले जाते.

सारांश | nmms exam information in marathi

मित्रांनो आज आपण या लेखात nmms exam information in marathi – nmms परिषेबद्दल सखोल महिती बघितली. हुशार आणि अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी nmms ही परीक्षा एक सुवर्णसंधी आहे. इयत्ता 8 वीतील विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा छोटासा प्रयत्न आवडला असेल. जर आपल्या काही शंका असतील तर आपण खाली आमहल comment करू शकता. आमच्या ordar.in या ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

nmms exam information in marathi, nmms exam information in marathi, nmms exam information in marathi, nmms exam information in marathi, nmms exam information in marathi, nmms exam information in marathi, nmms exam information in marathi, nmms exam information in marathi, nmms exam information in marathi, nmms exam information in marathi,nmms exam information in marathi,nmms exam information in marathi

2 thoughts on “NMMS परीक्षा संपुर्ण माहिती 2022 | NMMS Exam Information in Marathi”

 1. जर एखाद्या विद्यार्थ्यांने 10 वी नंतर डिप्लोमाला प्रवेश घेतला तर त्या विद्यार्थ्याला ही शीष्यवृत्ती चालू राहते की बंद होते.

Leave a Comment