महाराष्ट्र सुरक्षा बल संपूर्ण माहिती | MSF Information in Marathi 2022 | Latest Information about MSF


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

महाराष्ट्र सुरक्षा बल संपूर्ण माहिती 2022 | MSF Information in Marathi 2022 – जर तुम्ही हा लेख वाचत आहात तर याचा अर्थ असा आहे, की तुम्हाला महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये भरती होण्याची इच्छा आहे किंवा तुम्हाला महाराष्ट्र सुरक्षा बलाविषयी माहिती MSF Information in marathi जाणून घ्यायची आहे.

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात महाराष्ट्र सुरक्षा बलाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण या लेखात महाराष्ट्र सुरक्षा बल म्हणजे नेमके काय आहे?, महाराष्ट्र सुरक्षा बल याची भरती प्रक्रिया कशी असते?, यासाठी पात्रता काय असते?, भरती झाल्यानंतर पगार किती मिळतो? नौकरी कशा प्रकारची असते? ही नौकरी कंत्राटी आहे की कायमस्वरूपी आहे, अशी सर्व महत्त्वाची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

MSF नेमके काय आहे?

तर मित्रांनो ज्या प्रकारे आपले महाराष्ट्र पोलीस दल आहे, राज्य राखीव पोलीस बल आहे, होमगार्ड आहे त्याचा प्रकारे M.S.F. (Maharashtra Security Force) म्हणजेच महाराष्ट्र सुरक्षा बल हे देखील आहे. महाराष्ट्र सुरक्षा बल स्थापन करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्र पोलीस दलावरील अतिरिक्त ताण करणे हा होय.

M. S. F. (Maharashtra Security Force) महाराष्ट्र सुरक्षा बल याचे मुख्यालय मुंबई, भारत येथे आहे. ही एक कॉर्पोरेट संस्था असून याचे पोलीस महासंचालक यांच्या अधिपत्याखालील एक आयपीएस अधिकारी याचे नेतृत्व करत असतो. महाराष्ट्र सुरक्षा बल यांचे अधिकृत संकेतस्थळ http://mahasecurity.gov.in/ हे आहे.

MSF ची स्थापना कधी व का झाली?

शासनाचे महत्त्वाचे प्रकल्प, वित्तीय संस्थांन, धार्मिक संस्थान तसेच शैक्षणिक संस्थान यांना चांगली सुरक्षा पुरविण्यासाठी MSF (महाराष्ट्र सुरक्षा बल) याची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र सुरक्षा बल याची स्थापना सन 2010 मध्ये करण्यात आली. महाराष्ट्र राज्य सुरक्षा निगम अधिनियम, 2010 च्या आदेशानुसार MSF महाराष्ट्र सुरक्षा बल याची स्थापना करण्यात आली.

MSF Full Form in Marathi | MSF चे FULL FORM काय आहे?

MSF चे इंग्रजी मधील FULL FORM हे MAHARASHTRA SECURITY FORCE आहे.
त्याचप्रमाणे मराठीत याला म. सु. ब. म्हणजेच महाराष्ट्र सुरक्षा बल असे म्हंटले जाते.

MSF भरती कशी होते?

मित्रांनो MSF च्या भरती साठी प्रथम ऑनलाईन फॉर्म भरून मागविले जातात. त्यांनतर 3 ते 4 आठवड्यांनी उमेदवारांना मैदानी चाचणी साठी बोलावले जाते. आता या भरती साठी फॉर्म कोण कोण भरू शकतो जो याची शैक्षणिक पात्रता पूर्ण करतो तोच याचे फॉर्म भरू शकतो.

MSF साठी शैक्षणिक पात्रता

MSF मध्ये भरती होण्यासाठी आपण 12 वी पास असणे आवश्यक आहे. 12 वी मध्ये जर आपल्याला 70 टक्के पेक्षा जास्त गुण असेल तर अती उत्तम आहे. कारण 12 वी मध्ये ज्यांना 70 टक्के पेक्षा अधिक गुण आहे त्यांना MSF च्या भरती मध्ये 50 गुण अधिक मिळतात.

MSF साठी शारीरिक पात्रता

 • उमेदवाराची उंची ही 170 से.मी. पेक्षा कमी नसावी.
 • उमेदवाराचे वजन हे 60 कि. ग्रा पेक्षा कमी नसावे.
 • उमेदवाराची छाती न फुगवता 79 से. मी. वा जास्त असायला हवी आणि फुगवून किमान 5 से. मी. असायला हवी.

MSF भरती पात्रतेचे निकष आणि अटी व शर्ती

निकष उमेदवार
वयोमर्यादा उमेदवाराचे वय हे 18 ते 28 वर्षे असावे.
शैक्षणिक पात्रताउच्च माध्यमिक शालांत परीक्षा HSC (12वी) पास.
अधिवास निकषमहाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे.
भरती परीक्षा (100 गुण) बारावीच्या गुणांचे भार प्राधान्यानुसार 50 गुण व शारीरिक चाचणी करिता 50 गुण असतील.
बारावीच्या गुणांचे भार प्राधान्य 12वी परीक्षेत 70 टक्के पेक्षा अधिक गुण – 50 गुण
12वी परीक्षेत 60 टक्के ते 70 टक्के गुण – 40 गुण
12वी परीक्षेत 50 टक्के ते 60 टक्के गुण – 30 गुण
12वी परीक्षेत 40 टक्के ते 50 टक्के गुण – 10 गुण
12वी परीक्षेत 40 टक्के पेक्षा कमी गुण – 00 गुण
शारीरिक चाचणी 1600 मीटर धावणे – 50 गुण
05 मि. 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी – 50 गुण
05 मि. 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 05 मि. 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी – 40 गुण
05 मि. 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 05 मि. 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी – 20 गुण
05 मि. 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 06 मि. 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी – 10 गुण
06 मि. 10 सेकंदापेक्षा जास्त – 00 गुण (अपात्र)
उंची / वजन / छातीउंची – 170 से. मी. पेक्षा कमी नसावी.
वजन – 60 कि. ग्रॅ. पेक्षा कमी नसावे.
छाती – न फुगवता 79 से. मी. व जास्त फुगून किमान 05 से. मी.
कंत्राटानुसार मोबदला मासिक रु.17,000/-
अधिक 12 % EPF – Employer Contribution
हत्यारी सुरक्षारक्षकांकरिता रुपये 1000 अतिरिक्त हत्यारी भत्ता.
प्रत्येक वर्षी एक नवीन युनिफॉर्म

अधिक माहितीसाठी खालील pdf नक्की वाचा.

MSF मध्ये पगार किती मिळतो? | MSF Salary Per Month in Maharashtra

MSF मध्ये भरती झाल्यानंतर रू. 17,000/- इतका पगार व इतर भत्ते मिळतात.

MSF मध्ये नौकरी कशाप्रकारे असते?

MSF मध्ये भरती झाल्यानंतर तुमची ट्रेनिंग होते व त्यानंतर तुम्हाला पोस्टिंग दिली जाते. तुमची नौकरी ही शासनाच्या मालमत्ता जसे की रेल्वे, बँका, शाळा, शासकीय रुग्णालये, विद्युत केंद्र अशा ठिकाणी तुमची नौकरी असते. पूर्वी अशा ठिकाणी पोलीस नौकरी करायची पण पोलिसांवरच वाडता ताण पाहता आता अशा ठिकाणी सुरक्षा देणे हे MSF म्हणजेच महाराष्ट्र सुरक्षा बल यांचे आहे.

सारांश | MSF Information in Marathi 2022 | महाराष्ट्र सुरक्षा बल संपूर्ण माहिती 2022

मित्रांनो आज आपण या लेखात महाराष्ट्र सुरक्षा बल संपूर्ण माहिती 2022 MSF Information in Marathi माहिती बघितली. मित्रांनो 12 वी झाल्यानंतर बेरोजगार बसण्यापेक्षा MSF मध्ये नौकरी करणे कधीही उत्तम आहे. तुम्हाला येथे चांगला अनुभव मिळेल. जे तुम्हाला पोलीस भरतीसाठी उपयोगात येईल.

मित्रांनो जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. आपले काही मत असतील तर आम्हाला COMMENT नक्की करा. आमच्या ordar.in या ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

18 thoughts on “महाराष्ट्र सुरक्षा बल संपूर्ण माहिती | MSF Information in Marathi 2022 | Latest Information about MSF”

 1. मी एक international athelete आहे, मी graduate आहे, माझं वय 44 आहे, मला MSF मध्ये नोकरी मिळू शकते का

 2. माझा भाऊ MSF मध्ये कार्यरत होता पण अपघातात त्यांचे निधन झाले तर त्यांच्या जागी दुसर्या भावाला नोकरी मिळेल का (अनुकंपा अंतर्गत) तो पण पोलिस भरती करत आहे

 3. Sir mi 1 Mark’s ne waiting la aahe
  Maze msf sathi documents ghetle aahet
  Pn posting Mumbai la aahe
  Mazi family punya aahe
  Nantr trasfer hou shakte ka
  Aani hot asel tr kiti divsa nantr hou shakte

Leave a Comment