माझे आवडते पुस्तक निबंध मराठी [03 निबंध] | Maze Avadte Pustak Nibandh in Marathi 2022


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

Maze Avadte Pustak Nibandh in Marathi माझे आवडते पुस्तक निबंध मराठी – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात माझे आवडते पुस्तक निबंध मराठी मध्ये बघणार आहोत. या लेखात आपण एकूण 2 पुस्तकांवर 3 निबंध बघणार आहोत. एक पुस्तक म्हणजे श्यामची आई आणि दुसरे अग्निपंख.

परीक्षेत माझे आवडते पुस्तक या विषयावर निबंध लिहिण्यासाठी एक 5 ते 10 गुणांचा एक प्रश्न नक्की विचारला जातो. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता निबंधाला सुरुवात करुया.

माझे आवडते पुस्तक श्यामची आई निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Maze Avadte Pustak Shyamachi Aai Marathi Nibandha

 1. मला पुस्तक वाचायला खूप आवडते.
 2. मी दर महिन्याला एक पुस्तक वाचतो.
 3. माझे आता पर्यंतचे सर्वात आवडते पुस्तक श्यामची आई हे आहे.
 4. या पुस्तकाचे लेखक श्री. साने गुरुजी हे आहेत.
 5. साने गुरुजींनी हे पुस्तक ते तुरुंगात असताना सन 1933 साली लिहिले आहे.
 6. साने गुरुजींनी हे पुस्तक आपल्या आई च्या आठवणीत लिहिले आहे.
 7. ते त्यांच्या आई वर प्रेम करायचे. त्यांची आई खूप प्रेमळ व दयावान होती.
 8. श्यामच्या बालमनावर जे माणुसकीचे संस्कार त्यांच्या आईकडून झाले ते साने गुरुजींनी या पुस्तकात मांडले आहे.
 9. प्राणी मात्रावर प्रेम करावे, देशाबद्दल प्रेम व स्वाभिमान बाळगावा हे श्यामच्या आई ने शिकवले.
 10. श्यामची आई हे पुस्तक माझ्या मनात घर करून राहिले आहे.

माझे आवडते पुस्तक श्यामची आई निबंध मराठी 300 शब्द | Maze Avadte Pustak Shyamchi Aai Nibandh in Marathi

माझे आवडते पुस्तक श्यामची आई

आपण अनेक विषयांवरची पुस्तके वाचतो. पुस्तके माणसाला ज्ञान समृद्ध बनवतात. अनुभव संपन्न बनवतात. मी ही माझ्या जीवनात अनेक पुस्तकांचे वाचन केले. परंतु पूज्य साने गुरुजींनी लिहिलेले ‘श्यामची आई‘ हे पुस्तक सतत माझ्या मनामध्ये रुंजी घालत असते. माझ्या मनात घर करून राहिलेले ‘श्यामची आई’ हे पुस्तक म्हणून माझे आवडते पुस्तक आहे. आईच्या प्रेमाचा मूर्तिमंत झरा म्हणजे हे पुस्तक आहे.

‘श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर आणि सुरस असून त्यात साने गुरुजींनी हृदयातील सारा जिव्हाळा ओतलेला आहे. मातेबद्दल असणाऱ्या प्रेम, भक्ती व कृतज्ञता अशा अपार भावना ‘श्यामची आई’ या पुस्तकात साने गुरुजींनी मांडलेल्या आहेत. हे पुस्तक वाचून प्रत्येक वाचकांचे डोळे भरून येते. हे पुस्तक ही एक सत्यकथा आहे.

‘श्यामची आई’ या पुस्तकातून त्यांनी आपली जीवनगाथा कथन केली. श्यामची आई हे पुस्तक मराठी भाषेतील अक्षर धन ठरले आहे. माय लेकरातील प्रेम व संस्काराच्या हृदयस्पर्शी आठवणी या पुस्तकात आहेत. श्यामच्या बालमनावर जे माणुसकीचे संस्कार त्यांच्या आईकडून झाले, त्या घटना या अजरामर कलाकृतीत कथन केल्या आहेत. साने गुरुजींनी 1933 साली नाशिकच्या तुरुंगात अवघ्या पाच रात्रीत हे पुस्तक लिहिले.

एकदा आश्रमातील मित्रांनी त्यांना विचारले होते, गुरुजी तुमच्या जीवनात हा कस्तुरीचा सुगंध कोठून आला? तुमच्यामध्ये ही सेवावृत्ती, निस्पृहता कशी निर्माण झाली? त्यावेळी गुरुजी अश्रू पूर्ण नेत्रांनी म्हणाले, गड्यांनो हे सारे माझ्या आईचे देणे आहे बरं, आई माझा गुरु आणि तीच माझी कल्पतरू.

प्रेमळ बोलावयास तिनेच मला शिकविले. केवळ मनुष्यावरचं नव्हे तर गाई गुरांवर, फुलपाखरांवर, झाडामाडांवर प्रेम करावयास तिनेच शिकविले. माझ्या आईनेच माझ्या जीवनात अत्तर ओतले. शिवाय तिचे त्या थोर माऊलीचे देशप्रेम व मानवतेचा केवडा अतिशय विचार श्यामच्या आईने त्याला दिला होता. नवीन चैतन्य आणि सामर्थ्य निर्माण करण्याची शक्ती साने गुरुजींच्या आईच्या या संस्कारात आहे.

पुढच्या अनेक पिढ्यांची जीवनी विशुद्ध व विशाल बनविण्याची विलक्षण संजीवनी श्यामच्या आई मध्ये आहे. म्हणून हे पुस्तक मला खूप खूप आवडते. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी वाचून हे पुस्तक समजून घ्यायला हवे. मातृप्रेमाचे महान मंगल स्तोत्र म्हणून गौरविल्या गेलेल्या या श्यामच्या आईला त्रिवार अभिवादन!

-: समाप्त :-

माझे आवडते पुस्तक श्यामची आई निबंध मराठी 250 शब्द | Maze Avadte Pustak Shyamchi Aai Nibandh in Marathi

माझे आवडते पुस्तक श्यामची आई

मला पुस्तके वाचायला खूप आवडते. पुस्तक वाचन हा माझा छंद आहे. तसे पाहता आजपर्यंत मी अनेक पुस्तके वाचली आहेत. त्यातील काही पुस्तके मला खूपच आवडली आहेत. मला आवडणाऱ्या अशाच पुस्तकांपैकी एक पुस्तक आहे ‘श्यामची आई’. या पुस्तकाला पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच आपले साने गुरुजींनी लिहिले आहे. श्यामची आई ही साने गुरुजींची आत्मकथा आहे.

9 फेब्रुवारी 1933 रोजी नाशिकच्या तुरुंगात असताना त्यांनी ‘श्यामची आई’ हे पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली. साने गुरुजी यांनी आपली बरीच लेखन तुरुंगात असताना केली. श्यामची आई हा कथासंग्रह त्यांनी अवघ्या पाच दिवसात लिहून संपवला. श्यामची आई या पुस्तकात साने गुरुजींनी ममतेचा महिमा गायला आहे. त्याचबरोबर सुसंस्कृत व बालबोध घराण्यातील साध्या सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रनही यात केले आहे.

आपल्या मुलांची संगोपन कसे करावे, ही कला गुरुजींच्या आईला चांगली माहीत होती. आपल्या आईसोबत घडलेल्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीचे वर्णन गुरुजींनी श्यामची आई पुस्तकात केले आहे. गुरुजींच्या आईने लहानपणापासून देशभक्ती आणि ईश्वर भक्तीची भावना त्यांच्यात व त्यांच्या भावंडात निर्माण केली. या संस्कारामुळे चंद्र सूर्य सारखी तेजस्वी फुले साने गुरुजींच्या रूपाने उमलली.

अध्यापन कार्य, समाजसेवा, स्वातंत्र्य युद्ध अशा बहुविध क्षेत्रामध्ये आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवणारे आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे साने गुरुजी. मातृभूमीच्या सेवेसाठी नोकरीचा राजीनामा देऊन स्वातंत्र्यसमरात स्वतःला झोकून देणारे, अखेरच्या श्वासापर्यंत जनतेच्या सुखासाठी झटणारे, साने गुरुजी व त्यांना निर्माण करणारी अशी श्यामची आई खरंच थोर आहे. त्यांच्या अंगी विविध गुण ठसवणारी जागृत करणारी व त्यांना घडविणारी ती माता अमर आहे.

-: समाप्त :-

माझे आवडते पुस्तक अग्निपंख निबंध मराठी 250 शब्द | Maze Avadte Pustak Agnipankha Nibandh in Marathi

माझे आवडते पुस्तक अग्निपंख

मी वाचलेल्या पुस्तकांमध्ये मला सर्वाधिक आवडणाऱ्या पुस्तकाचे नाव ‘अग्निपंख‘ आहे. हे पुस्तक भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी लिहिले आहे.

‘अग्निपंख’ मध्ये त्यांनी आपली आत्मकथा लिहिली आहे. या पुस्तकात त्यांच्या बालपणापासून ते राष्ट्रपती पदापर्यंतचा संपूर्ण प्रवास लिहिण्यात आला आहे. भारताच्या यशस्वी शास्त्रज्ञांपैकी एक शास्त्रज्ञ डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे आहेत. त्यांनी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे.

भारताची सैनिक क्षमता वाढविण्यासाठी त्यांनी अणु चाचणी घेतली, म्हणूनच त्यांना मिसाईल मॅन म्हणूनही संबोधले जाते. मला या पुस्तकातील सुरुवातीचे धडे जास्त आवडले. कारण यामध्ये भारताच्या 1930 ते 1950 या काळातील परिस्थितीचे चित्रण करण्यात आले आहे.

अब्दुल कलाम यांचा जन्म रामेश्वरम मधील एका मुस्लिम कुटुंबात झाला. देशातील धार्मिक एकता आणि एकात्मतेचे वर्णन अब्दुल कलाम यांनी पहिल्या दोन धड्यांमध्ये केले आहे. लहान असताना त्यांचे स्वप्न पायलट बनवण्याचे होते. परंतु ते मुलाखतीमध्ये अनुत्तीर्ण झाले. परंतु त्यांनी निराश न होता दुसऱ्या क्षेत्रात आपले कार्य सुरू केले.

पुस्तकात सांगितल्याप्रमाणे कलाम यांनी सुरुवातीला विमान बनविण्याच्या क्षेत्रात कार्य केले. नंतर ते अंतरिक्ष संस्था इस्रोकडे वळले. अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडणही फार सुंदर पणे वाचकांना सांगितली आहे.

अग्निपंख या पुस्तकात फक्त स्वतःचे चरित्र न मांडता अब्दुल कलाम यांनी अनेक कवितांचा देखील समावेश केला आहे. हे पुस्तक तरुण तसेच प्रत्येक वयातील लोकांसाठी प्रेरणेचा अखंड स्रोत आहे. म्हणून प्रत्येकाने एकदा तरी अग्निपंख हे पुस्तक वाचायला हवे.

-: समाप्त :-

सारांश | माझे आवडते पुस्तक निबंध मराठी | Maze Avadte Pustak Nibandh in Marathi

मित्रांनो आज आपण या लेखात माझे आवडते पुस्तक मराठी निबंध Maze Avadte Pustak Nibandh in Marathi बघितले. आपण दोन पुस्तकावरे तीन निबंध बघितले. या लेखात आपण माझे आवडते पुस्तक श्यामची आई आणि माझे आवडते पुस्तक अग्निपंख असे दोन पुस्तकांची माहिती बघितली. हे निबांध अगदी सोप्या आणि सरळ भाषेत लिहिलेले आहे. आम्हाला खात्री आहे की हे निबंध तुम्हाला नक्की आवडले असतील. आमच्या ordar.in या ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

या लेखाला असेही शीर्षक असू शकते.

 • Maze Avadte Pustak Nibandh in Marathi
 • माझे आवडते पुस्तक निबंध मराठी
 • माझे आवडते पुस्तक श्यामची आई निबंध मराठी
 • माझे आवडते पुस्तक अग्निपंख निबंध मराठी
 • माझे आवडते पुस्तक अग्निपंख निबंध
 • माझे आवडते पुस्तक श्यामची आई निबंध
 • Maze Avadte Pustak Nibandh
 • Maze Avadte Pustak Marathi Nibandh
 • Maze Avadte Pustak Nibandh in Marathi

1 thought on “माझे आवडते पुस्तक निबंध मराठी [03 निबंध] | Maze Avadte Pustak Nibandh in Marathi 2022”

Leave a Comment