वाक्य व त्याचे प्रकार | vakya prakar in marathi 2022


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात vakya prakar in marathi | वाक्य व त्याचे प्रकार याबाबत माहिती जाणून घेणार आहोत. या लेखात आपण वाक्य म्हणजे काय? व त्याच्या विविध प्रकारांची vakya prakar in marathi सखोल माहिती बघणार आहोत.

Contents hide

वाक्य म्हणजे काय?

संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमुहला वाक्य असे म्हणतात. प्रत्येक वाक्य शब्दाचे बनलेले असते. वाक्य म्हणजे अर्थपूर्ण शब्दाचा समूह होय. वाक्यात केवळ शब्दाची रचना करून चालत नाहीत तर, ती अर्थपूर्ण शब्दाची रचना असावयास पाहिजे तेव्हाच ते वाक्य होऊ शकते. वाक्याचे दोन भाग असतात. ज्याच्याविषयी सांगायचे ते उद्देश्य आणि जे सांगायचे ते म्हणजे विधेय.

उदा. ‘त्याची मोठी मुलगी दररोज अगगाडीने मुंबईला जाते.’

या वाक्यात मुलींविषयी सांगायचे आहे, म्हणून ‘मुलगी’ हे उद्देश्य, तर जाते हे विधेय आहे. या वाक्यातील त्याची, मोठी उद्देश्याचा विस्तार आहे. तर दररोज, आगगाडीने हे विधेय चा विस्तार आहे.

वाक्याचे प्रकार मराठी | vakya prakar in marathi

वाक्यांचे विविध प्रकार आहेत. त्यातील काही वाक्य प्रकारांची माहिती आपण बघणार आहोत.
वाक्यांचे विविध प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

वाक्याच्या अर्थावरून

  1. विधानारर्थी
  2. प्रश्नार्थी
  3. उद्गारार्थी

होकार किंवा नकार

  1. होकारार्थी
  2. नकारार्थी

क्रियापदाचा अर्थावरून

  1. स्वार्थी
  2. आज्ञार्थी
  3. विद्यर्थी
  4. संकेतार्थी

वाक्य रचनेवरून

  1. केवल वाक्य
  2. मिश्र वाक्य
  3. संयुक्त वाक्य

आता या वरील सर्व वाक्य प्रकरांची तपशीलवार माहिती आपण पुढे पाहूया.

वाक्य व त्याचे प्रकार | vakya prakar in marathi

वाक्याच्या अर्थावरून पडणारे वाक्याचे प्रकार

वाक्यांमधून प्रकट होणाऱ्या अर्थावरून त्यांचे विविध प्रकार होतात ते खालील प्रमाणे आहेत.

विधानार्थी वाक्य

ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते, त्यास विधानार्थी वाक्य म्हणतात.

उदा.- 1. माझे काका आज परगावी गेले.
2. माझे दादा कामावर गेले.
3. गोपळचे अभ्यास करून झाले.
4. बाबाने आंघोळ केली.

प्रश्नार्थी वाक्य

ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो, त्यास प्रश्नार्थी वाक्य म्हणतात.

उदा.- 1. तुझे नाव काय आहे?
2. तू गावाकडे कधी गेला होतास?
3. तुझे बाबा कसे आहेत?
4. तू कार्यालयात कधी जातो?

उद्गारार्थी वाक्य

ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो, त्यास उद्गारार्थी वाक्य म्हणतात.

उदा.- 1. अबब! केवढे मोठे डोंगर हे!
2. अरे देवा! कसे काय झाले!
3. शी! तुला लाज वाटायला पाहिजे.
4. अबब! काय ते पुर!

होकार किंवा नकार अर्थावरून पडणारे वाक्याचे प्रकार

होकारार्थी वाक्य

ज्या वाक्यातील विधाने हे होकारार्थी असतात, अशा वाक्याना होकारार्थी वाक्य असे म्हणतात.

उदा.- 1. कुसुम अभ्यास करते.
2. श्याम खेळ खेळतो.
3. राम आंबे खातो.
4. शाम काम करतो.

नकारार्थी वाक्य

ज्या वाक्यातील विधाने हे नकारार्थी असतात, अशा वाक्याना नकारार्थी वाक्य असे म्हणतात.

उदा.- 1. तो कधीच गावाला जात नाही.
2. ती कधीच अभ्यास करत नाही.
3. त्याने गावाला जाऊ नये.
4. तो अभ्यास करत नसे.

क्रियापदाच्या अर्थावरून पडणारे वाक्याचे प्रकार

स्वार्थी वाक्य

वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून नुसताच काळाचा बोध होत असेल, तर त्यास स्वार्थी वाक्य म्हणतात.

उदा.- 1. मुले घरी गेली.
2. मुले घरी जातील.
3. मुले घरी जातात.
4. राम काम करतो.

आज्ञार्थी वाक्य

वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती किंवा उपदेश या गोष्टींचा बोध होत असेल, तर त्यास आज्ञार्थी वाक्य म्हणतात.

उदा.- 1. परमेश्वरा, याला चांगली बुद्धी दे.(प्रार्थना)
2. अखंड सौभाग्यवती भव. (आशीर्वाद)
3. मुलांनो, चांगला अभ्यास करा. (उपदेश)
4. तुम्ही हे काम करा. (आज्ञा)

विद्यर्थी वाक्य

वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल, तर त्यास विद्यर्थी वाक्य म्हणतात.

उदा. – 1. मुलांनो वडिलांची आज्ञा पालवी.
2. मला परीक्षेत पहिला क्रमांक मिळवा.
3. मला देव प्रसन्न व्हावा.
4. घरी रोज अभ्यास करावा.

संकेतार्थी वाक्य

वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून अमुक केले असते, तर अमुक झाले असते अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल, तर त्यास संकेतार्थी वाक्य म्हणतात.

उदा. – 1. जर हवे ते पुस्तक मिळाले, तर माझे संशोधन पूर्ण होईल.
2. मी तिथे असते, तर भांडण होऊच दिले नसते.
3. जर मला परीक्षेत चांगले गुण मिळाले, तर मला विज्ञान शाखेत प्रवेश मिळू शकतो.
4. यंदा पाऊस चांगला पडला, की पीक जोमदार येईल.

वाक्यरचनेवरून वाक्याचे प्रकार

वाक्यरचनेवरूनही वाक्याचे प्रकार पडतात ते खालील प्रमाणे –

केवल वाक्य

ज्या वाक्यात एकच उद्देश्य व एकच विधेय असते, त्यास केवल किंवा शुद्ध वाक्य म्हणतात. हे केवल वाक्य साधे, विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी व नकारार्थी कोणत्याही प्रकारचे असू शकते.

उदा.- 1. आम्ही जातो आमच्या गावा.
2. तानाजी लढता-लढता मेला.
3. सचिन खेळता खेळता हरला.
4. तो मरता मरता वाचला.

मिश्र वाक्य

एक प्रधानवाक्य व एक किंवा अधिक गौणवाक्ये गौनत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडून जे एक संमिश्र वाक्य तयार होते, त्यास मिश्र वाक्य असे म्हणतात.

उदा.- 1. आकाशात जेव्हा ढग जमतात, तेव्हा मोर नाचू लागतो.
2. गुरुजी म्हणाले, की प्रत्येकाने नियमितपणे अभ्यास करावा.
3. दादा म्हणाले प्रत्येकाने व्यायाम करावा.
4. मी गावी आलो की सर्व काही चांगले होईल.

संयुक्त वाक्य

दोन किंवा अधिक केवलवाक्ये प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता जे एक जोडवाक्य तयार होते, त्यास संयुक्त वाक्य म्हणतात.

उदा.- 1. सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो किंवा मित्राबरोबर फिरावयास जातो.
2. मी रोध सकाळी पहाटे उठतो व तासभर शाळेचा अभ्यास करतो.
3. मी रोज सकाळी उठतो व अभ्यास करतो.
4. मी एक शेतात जातो कीवा पुस्तक वाचत बसतो.

सारांश | vakya prakar in marathi | वाक्याचे प्रकार मराठी

मित्रांनो या ब्लॉग वर आपण मराठी व्याकरण संदर्भात सखोल माहिती सादर करीत असतो. वरील लेखात आपण वाक्य म्हणजे काय? तसेच वाक्य व त्याचे प्रकार | vakya prakar in marathi याविषयी माहिती बघितली. आम्हाला अशा आहे की आपल्याला हा लेख नक्की आवडला असेल. हा लेख आपल्या मित्राना नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

वाक्य व त्याचे प्रकार | vakya prakar in marathi याबद्दल नेहेमी विचारले जाणारे प्रश्न.

  1. वाक्याचे प्रकार किती व कोणते?

    वाक्याचे एकूण 12 प्रकार आहेत. ते या ब्लॉग पोस्ट मध्ये दिले आहेत.

  2. केवल वाक्य म्हणजे काय?

    ज्या वाक्यात एकच उद्देश्य व एकच विधेय असते, त्यास केवल किंवा शुद्ध वाक्य म्हणतात. हे केवल वाक्य साधे, विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी व नकारार्थी कोणत्याही प्रकारचे असू शकते.

  3. संयुक्त वाक्य म्हणजे काय?

    दोन किंवा अधिक केवलवाक्ये प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता जे एक जोडवाक्य तयार होते, त्यास संयुक्त वाक्य म्हणतात.

  4. मिश्र वाक्य म्हणजे काय?

    एक प्रधानवाक्य व एक किंवा अधिक गौणवाक्ये गौनत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडून जे एक संमिश्र वाक्य तयार होते, त्यास मिश्र वाक्य असे म्हणतात.

1 thought on “वाक्य व त्याचे प्रकार | vakya prakar in marathi 2022”

Leave a Comment