चौकशी पत्र लेखन मराठी (०३ नमुने) | Chaukashi Patra in Marathi 2023


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

चौकशी पत्र लेखन मराठी | Chaukashi Patra in Marathi – नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात चौकशी पत्र लेखन मराठीतून बघणार आहोत. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची किंवा सेवेची माहिती जाणून घ्यायची असते तेव्हा आपण चौकशी पत्र लिहितो.

त्याचप्रमाणे आपण या लेखात चौकशी पत्र म्हणजे काय? चौकशी पत्र कसे लिहावे? चौकशी पत्र लिहिताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे आणि चौकशी पत्राचे नमुने/उदाहरण बघणार आहोत.

मित्रांनो चौकशी पत्र हा औपचारिक पत्राचाच एक उप-प्रकार आहे. परीक्षेमध्ये यावर तुम्हाला 5 ते 10 गुणांचा एक प्रश्न हमखास विचारला जातो. हा लेख आपल्या इयत्ता 7 वी ते 10 वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. चला तर मित्रांनो चौकशी पत्र पाहूया.

चौकशी पत्र म्हणजे काय?

मित्रांनो ज्यावेळी आपल्याला एखाद्या संस्थेकडून किंवा व्यक्तीकडून एखाद्या गोष्टीची माहिती हवी असेल किंवा चौकशी करावयाची असेल तर अशावेळी आपण संबंधीत जबाबदार व्यक्तीला चौकशी पत्र लिहितो.

चौकशी पत्र कसे लिहावे?

मित्रांनो, चौकशी पत्र कसे लिहावे? चौकशी पत्र लेखनाचे स्वरूप कसे असू शकते या बाबी आपण खालीलप्रमाणे पाहूया.

  • चौकशी पत्र लिहिताना प्रथम डाव्या बाजूला दिनांक लिहावा.
  • त्यानंतर आपण ज्या व्यक्तीला पत्र लिहीत आहोत त्या व्यक्तीचे नाव, हुद्दा, कार्यालयाचे नाव, आणि पत्ता सविस्तर लिहावा.
  • त्याखाली एक ओळ सोडून विषय लिहावा.
  • विषय हा थोडक्यात व मुद्देसुद लिहावा.
  • त्यानंतर महोदय/महोदय, आदरणीय सर, सप्रेम नमस्कार अशा शब्दांनी पत्राला सुरूवात करावी.
  • आता पत्रामध्ये प्रथम आपला स्वतःचा परिचय द्यावा.
  • त्यानंतर आपल्याला हवी असलेली माहिती चा उल्लेख करावा.
  • माहिती उपलब्ध करून देण्यासाठी विनंती करावी.
  • पत्र संपल्यावर एक ओळ सोडून उजव्या बाजूला आपला/आपली असे लिहून आपली सही करावी.
  • त्याखाली आपले संपूर्ण नाव व हुद्दा लिहावा.

चौकशी पत्र लेखनाचे मुद्दे

चौकशी पत्र लिहिताना आपण कोणत्या बाबी विचारात घेतल्या पाहिजे? चौकशी पत्र लेखनाचे मुद्दे काय काय असू शकतात? या सर्व बाबी आपण खाली पाहूया.

  • चौकशी पत्र लिहिताना आपण योग्य व्यक्तीलाच पत्र लिहीत आहोत की नाही याची खात्री करावी.
  • चौकशी पत्र हे विनंती पूर्वकाच लिहावी.
  • चौकशी पत्र लिहिताना सौम्य भाषेचा वापर करावा.
  • चौकशी पत्र लिहिताना कायदे, नियम याचाही उल्लेख करावा जेणेकरून समोरचा व्यक्ती तुमचे म्हणणे विचारात घेईल.
  • चौकशी पत्र थोडक्यात परंतु मुद्देसुद लिहावे.
  • ते देत असलेल्या सेवेची आणि आपल्याला हवी असलेल्या सेवेची माहिती सांगावी.

चौकशी पत्र लेखनाचे नमुने / उदाहरण

मित्रांनो चौकशी पत्र लेखनाचे काही उत्तम नमुने, उदाहरण आम्ही तुमच्या अभ्यासासाठी खाली देत आहोत, त्यांचा अभ्यास करा.

संगणक अभ्यासक्रमाविषयी चौकशी पत्र.

दिनांक – 18 नोव्हेंबर 2022
सुवर्णा शिवाजी पाटील,
श्री. गणेश विद्यालय, देवगाव (रं)
ता. कन्नड, जि. संभाजीनगर

प्रति,
मा. व्यवस्थापक,
इन्फोटेक संगणक संस्था,
कन्नड, ता. कन्नड,
जि. संभाजीनगर

विषय – संगणक अभ्यासक्रमाविषयी चौकशी करणे बाबत.

महोदय,

मी सुवर्णा पाटील, मार्च 2023 मध्ये दहावीची परीक्षा देणार असून परीक्षा संपल्यानंतर ते कॉलेज चालू होईपर्यंत संगणक क्षेत्रातील MS-CIT हा कोर्स करण्याचा विचारात आहे. माझ्यासोबत माझ्या पाच मैत्रिणी सुद्धा आहेत. जर आपल्या संस्थेत या कोर्सची वेळ, कालावधी आणि फी यासंदर्भात छापील पत्रक असल्यास आमच्या शाळेच्या वरील पत्त्यावर पाठविल्यास सर्व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल. तसदीबद्दल क्षमस्व.

आपली कृपाभिलाशी
सुवर्णा पाटील,
श्री. गणेश विद्यालय, देवगाव (रं)
ता. कन्नड, जि. संभाजीनगर

तुमच्या आजोबांना पत्र पाठवून त्यांच्या प्रकृतीची चौकशी करा.

अनिल जारवाल,
साकेत निवास,
आंबेडकर नगर,
सांगली – 40
दि.10/12/2022

प्रिय आजोबास,
साष्टांग नमस्कार,

कालच कालच स्वप्नील काकांचे पत्र मिळाले. त्यावरून कळले की गेल्या आठवड्यात तुमची प्रकृती ठीक नव्हती. तुम्हाला ताप येत होता. आजोबा आता तुमची तब्येत कशी आहे? सर्दी, खोकला वगैरे झालाय का?

दुसरे सांगायचे म्हणजे यावर्षी आपण सर्वांनी एकत्र सोलापूरला दिवाळी साजरी करायची आहे. बाबा स्वतः तुम्हाला न्यायला येणार आहेत. यावेळी कृपया कोणतेही कारण सांगू नका. तुम्ही दोघांना म्हणजे आजी व तुम्ही इकडे यायचे आहे. म्हणून आधीच सांगत आहे. मला तुमच्यासोबत खूप गप्पा मारायच्या आहेत. तुम्ही लवकर या. तब्येतीची काळजी घ्या. वेळेवर औषध गोळ्या घ्या व वेळेवर जेवण करा. आजीला माझा साष्टांग नमस्कार सांगा.

तुमचा लाडका
अनिल

तुम्हाला पक्षांचे अभयारण्य पाहायचे आहे. त्यासाठी काय पूर्वतयारी करायची? कोणाकडून अनुमती मिळवायची? याबाबतची चौकशी करणारे पत्र वनक्षेत्र पालास पाठवा.

अ. ब. क.
रुपाली नगर,
बुधवार पेठ, पुणे – १०
दि. 20 नोव्हेंबर 2022

प्रति,
मा. वनक्षेत्रपाल,
कर्नाळा पक्षी अभयारण्य,
कर्नाळा, खोपोली
जि. रायगड

विषय – अभयारण्याच्या भेटीसंबंधी चौकशी.

मा. महोदय,
दैनिक ‘लोकमत’ मध्ये आलेली आपली जाहिरात वाचली. कर्नाळा अभयारण्य पाहण्यासाठी खुले केले आहे. हे वाचून खूप आनंद झाला. अभयारण्याला विशेषतः पक्षी अभयारण्याला भेट द्यायची असल्यास कोणती पूर्वतयारी करावी? त्याबाबत माहिती देणारी कोणती पुस्तके आहेत? अभयारण्यात जाताना बरोबर कोणत्या गोष्टी न्याव्यात? दुर्बिन हवी का? कृपया याबाबतची माहिती द्यावी.

महत्त्वाचे असे की पक्षी अभयारण्यात जाण्यापूर्वी कोणाकोनाकडून अनुमती घ्यावी लागेल. हेही कळवावे. यासोबत माझा पत्ता असलेल्या पोस्टाचे पाकीट पाठवत आहे.
आपल्या उत्तराची वाट पाहत आहे. तसदीबद्दल क्षमस्व.

आपला कृपाभिलाशी
अ. ब. क.

सारांश | चौकशी पत्र लेखन मराठी | Chaukashi Patra in Marathi

मित्रांनो वरील लेखात आपण चौकशी पत्र लेखन मराठी | Chaukashi Patra in Marathi हे अगदी सोप्या आणि भाषेत बघितले. ही चौकशी पत्राची अगदी छान नमुने आणि उदाहरण आहेत. आम्हाला खात्री आहे की आपल्याला हा लेख नक्की आवडला असेल.

आपल्या काही सूचना किंवा मत असेल तर आम्हला Comment द्वारे नक्की कळवा. हा लेख आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

Leave a Comment