Shubhechha Patra Lekhan in Marathi 2023 / शुभेच्छा पत्र लेखन मराठी – नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात शुभेच्छा पत्र मराठी मध्ये बघणार आहोत. हे पत्र आपण अगदी सोप्या आणि सुंदर भाषेत बघणार आहोत.
आज आपण या लेखात शूभेच्छा पत्राचे काही उत्तम उदाहरण बघणार आहोत, जसे की मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा पत्र, मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा पत्र आणि बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी पत्र. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता शुभेच्छा पत्राला सुरूवात करूया.
- हे देखील वाचा >> अभिनंदन पत्र लेखन मराठी
- हे देखील वाचा >> मराठी पत्र लेखन संपूर्ण माहिती
शुभेच्छा पत्र नमुने / उदाहरण
मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमच्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र लिहा.
दि. 20.11.2022
प्रिय मित्र प्रशांत,
सप्रेम नमस्कार.
तुला प्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
मला तुझी खुप आठवण येते. प्रशांत तुझ्या वाढदिवसाला येण्याची माझी खूप इच्छा होती. पण माझी वार्षिक परीक्षा चालू असल्यामुळे मी येऊ शकलो नाही. मला तुझी खुप आठवण येते. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी तुझ्या गावी येईन. तेव्हा आपण धमाल मस्ती करू. काकांना आणि मावशींना माझा नमस्कार सांग.
तुझा मित्र
सुनिल जारवाल,
मु. मलकापूर, जि. संभाजीनगर
मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा पत्र
तुमच्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र लिहा.
दि. 20.07.2022
प्रिय मैत्रीण सुजाता,
सप्रेम नमस्कार.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
सुजाता, मला तुझी खुप आठवण येते. तुझ्या वाढदिवसाला येण्याची माझी खूप इच्छा आहे. पण इकडे खूप पाऊस पडत असल्यामुळे मी येऊ शकले नाही. मला तुझी खुप आठवण येते. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी तुझ्या गावी येईन. तेव्हा आपण धमाल मस्ती करू. काकांना आणि मावशींना माझा नमस्कार सांग.
तुझी प्रिय मैत्रीण
मंगला,
शनिवार वाडा, पुणे
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी पत्र
तुमच्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र लिहा.
विना पाटील,
गुरू नगर, नाशिक,
दि. 5.08.2023
प्रिय बहीण विना,
नमस्कार,
उद्या तुझा वाढदिवस आहे. तुझा वाढदिवस आम्हा सर्वांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे. या शुभ सोहळ्याला येण्याची माझी खूप इच्छा आहे. परंतु दिवाळीची सहामाही परीक्षा तोंडावर आहेत, त्यामुळे मी तुझ्या वाढदिवसाला येऊ शकणार नाही. परंतु तू वाईट वाटून घेऊ नकोस. मी दिवाळीच्या सुट्टीत घरी आल्यावर आपण खूप मस्ती करू. मी तुला छान गिफ्ट सुद्धा शोधून ठेवले आहे. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई बाबांना माझा साष्टांग नमस्कार सांग.
तुझा लाडका भाऊ,
सुरेश
तुमच्या मित्राला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे पत्र लिहा.
शंकर पाटील,
२३, राजगुरू नगर,
नाशिक – 400012
प्रिय मित्र सुशांत,
सप्रेम नमस्कार.
मी इथे आनंदात आहे. आशा आहे की तू ही तिथे आनंदात असशील. तुला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा! तुला नवीन वर्ष सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे व उत्तम आरोग्याची जावो.
मित्र येणाऱ्या नवीन वर्षात तू केलेले सर्व संकल्प पूर्ण होवोत. तुझ्या सर्व इच्छा, आकांक्षांना नवीन बळ मिळो. तुझ्या कर्तुत्वाला नवीन दिशा मिळो. तुला भरपूर यश मिळेल हीच ईश्वरचरणी प्रार्थना! मित्रा पुनश्च एकदा तुला, तुझ्या कुटुंबीयांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
तुझा प्रिय मित्र
शंकर
- हे देखील वाचा >> मागणी पत्र मराठी
सारांश | Shubhechha Patra Lekhan in Marathi | शुभेच्छा पत्र लेखन मराठी
मित्रांनो आज आपण या लेखात शुभेच्छा पत्र लेखन मराठी मध्ये बघितले. आम्हला आशा आहे की तुम्हाला हा लेख नक्की आवडला असेल. आपले काही मत किंवा सूचना असतील तर आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आमच्या ordar.in या मराठी ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद. shear now