माझा आवडता खेळ लंगडी निबंध मराठी (03 निबंध) | Maza Avadta Khel Langdi Nibandh in Marathi 2023


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

Maza Avadta Khel Langdi Nibandh in Marathi 2023– नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात माझा आवडता खेळ लंगडी निबंध मराठी मध्ये बघणार आहोत.

आज आपण या लेखात लंगडी बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. माझा आवडता खेळ लंगडी यावर परीक्षेत 5 ते 10 गुणांचा एक प्रश्न नक्की विचारला जातो. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता निबंधाला सुरुवात करुया.

माझा आवडता खेळ लंगडी निबंध मराठी 150 शब्द | Maza Avadta Khel Langdi Nibandh in Marathi 150 Words

माझा आवडता खेळ लंगडी

लंगडी हा खेळ महाराष्ट्रात सर्वांना परिचयाचा आहे. या खेळाचा उगम नक्की सांगता येणार नाही. परंतु याचा उल्लेख प्राचीन कथा व ग्रंथात देखील झाला आहे. लंगडी हा खेळ श्रीकृष्णाने पण खेळला आहे, असे म्हणतात.

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात राज्यातील विविध शाळेत संस्थेत वेगवेगळ्या नियमांनी हा खेळ खेळला जातो. उत्तर भारतात हा खेळ ‘लंगडा शेर’ या नावाने तर दक्षिण भारतात ‘कुटीअटा’ किंवा ‘कुकू राजू’ या नावाने तर पश्चिम भारतात ‘लंगडी’ या नावाने ओळखला जातो.

लंगडी हा माझा आवडता खेळ आहे. आम्ही दररोज शाळेत हा खेळ खेळतो. या खेळात दोन संघ असतात. प्रत्येक संघात 7 ते 9 खेळाडू असतात. ज्याच्यावर राज्य असते त्याला एका पायावर उभे राहावे लागते. त्याला दुसरा पाय जमिनीवर ठेवण्याची परवानगी नसते. अशा प्रकारे पळत त्याला समोरच्या प्रतिस्पर्ध्याला स्पर्श करावयाचे असते.

अशावेळी प्रतिस्पर्धी खेळाडू मैदानाबाहेर गेल्यास तो खेळाडू बाद होतो. अशाप्रकारे हा खेळ कितीही वेळा खेळता येतो. या खेळात खूप पाळावे लागते. त्यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. असे असूनही या खेळात खूप मजा येते.

मागच्या वर्षी झालेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत आमच्या शाळेच्या संघाने लंगडी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते. त्यावेळी कप्तान मी होते. जेव्हा आम्हाला ट्रॉफी देऊन आमच्या संघाचा सत्कार करण्यात आला तो क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता. अशाप्रकारे हा खेळ मला खूप खूप आवडतो.

-: समाप्त :-

माझा आवडता खेळ लंगडी निबंध मराठी 250 शब्द | Maza Avadta Khel Langdi Nibandh in Marathi 250 Words

माझा आवडता खेळ लंगडी निबंध

मला खेळ खेळायला खूप आवडतात. त्यातल्या त्यात मला मैदानी खेळ खेळायला जास्त आवडतात. आपल्या जीवनामध्ये शिक्षणाइतकेच महत्व खेळाला आहे. खेळ आणि शिक्षण हे एका गाडीची दोन चाक आहेत. त्यामुळे पुस्तकात शिकलेल्या गोष्टी प्रत्यक्ष कृतीत येतात तेव्हाच आपला खरा विकास होतो.

कॅलरी चा हिशोब कागदावर नव्हे तर तो शरीरावर दिसायला हवा. म्हणून शिक्षणाला खेळाची जोड हवीच. त्यामुळे मला लंगडी हा खेळ आवडतो. म्हणून आज मी आपल्याला लंगडी खेळाची माहिती सांगणार आहे.

लंगडी हा खेळ आपल्या भारतामध्ये खेळला जाणारा देशी खेळ आहे. एकाग्रता व देहाप्रती वाटचाल ही या खेळाची महत्त्वाची बलस्थाने आहे. एका पायावर ठराविक भागात आपले धेय पकडण्यासाठी मार्गक्रमण करणे हा या महत्त्वाचा उद्देश्य आहे. त्यातून शरीराची चपळता, स्नायूंची बळकटता व नजरेची भेदरता साधली जाते.

लंगडी हा खेळ लहान गट व मोठा गट अशा दोन गटांमध्ये खेळला जातो. पहिली ते पाचवी हा लहान गट तर सहावी ते आठवी हा मोठा गट अशी त्याची विभागणी केलेली असते. लहान गटाची मैदान हे 7.5 मीटर लांब व 7.5 मीटर रुंद असते. तर मोठ्या गटाचे मैदान हे 9 मीटर लांब व 9 मीटर रुंद असते.

हा खेळ मुले व मुली या दोन्ही गटांमध्ये खेळला जातो. तसेच हा खेळ खेळण्यासाठी दोन संघ व प्रत्येक संघात 9 खेळाडू अधिक 2 राखीव खेळाडू असतात. या खेळाचा एक ढाव 7 मिनिटांचा असतो. दोन्ही संघांच्या संघनायकांमध्ये नानेफेकी द्वारे आक्रमण व संरक्षण निवडले जाते.

आक्रमण म्हणजे लंगडी घालने व संरक्षण म्हणजे पळणे. आक्रमण करणाऱ्या खेळाडूंसाठी मैदानाचा एक कोपरा राखीव ठेवलेला असतो. तर संरक्षण करणाऱ्या खेळाडूंसाठी मैदानाचे तीन कोपरे राखीव ठेवलेले असते.

हा खेळ खेळण्यासाठी साधनांची आवश्यकता नसते. यामध्ये आपल्याला लंगडी घालत संरक्षण करणाऱ्या संघाच्या खेळाडूला शिवायचे असते. दिलेली विहित वेळेत जो जास्त गाडी शिवून बाद करेल. तो संघ विजयी ठरतो.

मित्रानो या खेळामध्ये खूप मजा येते. आम्ही रोज शाळेच्या खेळाच्या तासाला हा खेळ खेळतो. आमच्या शाळेत लंगडी या खेळाच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातात. आम्ही त्यावेळी खूप धमाल करतो. मागच्या वर्षी आमचा संघ विजयी झाला होता. त्यावेळी मला खूप आनंद झाला होता. अशाप्रकारे लंगडी हा खेळ मला सर्वात जास्त आवडतो.

-: समाप्त :-

माझा आवडता खेळ लंगडी निबंध मराठी 300 शब्द | Maza Avadta Khel Langdi Nibandh in Marathi 300 Words

माझा आवडता खेळ लंगडी निबंध

आपल्या भारत देशात आणि जगभरात अनेक खेळ खेळले जातात. यातील काही खेळ आंतरराष्ट्रीय तर काही स्थानिक आहेत. काही खेळांचे सामने आंतरराष्ट्रीय पातळीवर होतात. तर काही स्थानिक पातळीवर लोकांद्वारे खेळले जातात. या खेळांना मान्यता मिळाली नसूनही ते त्यांच्या विशिष्ट भागात प्रसिद्ध असतात.

अशाच प्रसिद्ध खेळांपैकी एक खेळ आहे लंगडी. लंगडी हा एक भारतीय मैदानी खेळ असण्यासोबतच माझा आवडता खेळ आहे. आपल्या देशात साधारणतः 6 ते 7 व 13 ते 14 वयोगटातील मुले व मुली हा खेळ खेळताना दिसतात.

जास्त करून मुलींद्वारे हा खेळ खेळाला जातो. या खेळासाठी लागणारे छोटेसे मैदान, कमीत कमी साधे सोपे नियम, यामुळे हा खेळ लहान मुला मुलींमध्ये विशेष आवडीचा आहे. आज काल या खेळाला लहान मुलांसाठी प्राथमिक शाळांच्या आंतरशालेय स्पर्धेत घेण्यात आले आहे.

मी दररोज माझ्या वर्गातील तसेच गावातील मैत्रिणी सोबत लंगडी खेळते. लंगडी खेळण्यासाठी 7X7 मीटर चौरस क्रीडांगण बनविण्यात येते. या क्रीडांगणाचा एका बाजूच्या कोपऱ्यावर प्रवेशाची खूण असते.

या खेळात ज्याच्यावर डाव आला आहे, तो व्यक्ती लंगडी घालतो. आणि लंगडी घालीत आपल्यासमोर असलेल्या पाच ते सात प्रतिस्पर्धी लोकांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो.

लंगडी करणाऱ्याला दुसरा पाय जमिनीवर ठेवण्याची परवानगी नसते. पळणाऱ्या खेळाडूंपैकी एक जर एखादा खेळाडू मैदानाबाहेर गेला, तर तो बाद होतो. आणि अशा पद्धतीने या खेळाला खेळले जाते.

लंगडी खेळत असताना शरीराचे संपूर्ण वजन एकाच पायावर बॅलन्स करावे लागते. त्यामुळे शरीराचे संतुलन वाढते. या खेळात पायाचे सगळेच स्नायू आणि सांधे देखील वापरले जातात. त्यामुळे त्यांचा चांगलाच व्यायाम होतो.

याशिवाय खेळत असताना निरंतर पळत राहावे लागते. त्यामुळे संपूर्ण शहराचाच व्यायाम होतो. लंगडी खेळल्याने मला खूप प्रसन्न वाटते. हा खेळ सुदृढ शरीर व मानसिक आरोग्यासाठी खूप उपयोगी आहे. लंगडी खेळल्यानंतर माझे अभ्यासात एकाग्रचित्त लागते. लंगडी खेळामुळेच माझे चित्त संतुलित राहून अभ्यासात लक्ष ठेवायला मदत मिळते.

याशिवाय मला लंगडी आवडण्यामागे अनेक कारणे आहेत. या खेळाला खेळण्यासाठी जास्त जागेची गरज लागत नाही. घराच्या पुढील मोकळ्या जागेत देखील या खेळाला खेळले जाऊ शकते. याला खेळण्यासाठी काहीही साहित्य लागत नाही. त्यामुळे खर्च देखील होत नाही.

थोडक्यात सांगायचे झाले तर लंगडी हा शून्य खर्चात जास्त मजा करून देणारा खेळ आहे. माझी इच्छा आहे की शासनाने या खेळाला राष्ट्रीय तसेच पुढे आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये सामील करायला हवे.

-: समाप्त :-

सारांश | माझा आवडता खेळ लंगडी निबंध मराठी | Maza Avadta Khel Langdi Nibandh

मित्रांनो आज या लेखात आपण माझा आवडता खेळ लंगडी निबंध मराठी | Maza Avadta Khel Langdi Nibandh in Marathi मध्ये बघितले. या लेखामध्ये आपण माझा आवडता खेळ लंगडी यावर निबंधाचे एकूण तीन सर्वोत्तम नमुने बघितले. त्याचप्रमाणे या लेखात आपण लंगडी खेळाची माहीत देखील बघितली.

हा लेख इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. जर आपल्याला हा लेख आवडला तर आपल्या मित्रांनाही शेअर करू शकता. आपल्याला हा लेख आवडला तर Comment नक्की करत जा मित्रांनो. आमच्या ordar.in या मराठी ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

Leave a Comment