माझे मामा निबंध मराठी | Maze Mama Nibandh Marathi 2023


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

माझे मामा निबंध मराठी | Maze Mama Nibandh Marathi 2023 – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात माझे मामा या विषयावर अगदी सोप्या आणि सुंदर भाषेत निबंध बघणार आहोत. मित्रांनो लहान मुलांना आपल्या आई वडील यांनातर सर्वात प्रिय असणारा व्यक्ती म्हणजे मामा. शाळेत नेहेमी हा प्रश्न विचारला जातो. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता निबंधाला सुरुवात करुया.

माझे मामा निबंध मराठी 10 ओळी

  1. माझ्या मामाचे नाव सूरज आहे.
  2. मला एकच मामा आहे आणि मला माझा मामा खूप आवडतो
  3. आम्ही दरवर्षी रक्षाबंधन आणि दिवाळीला मामाच्या गावी जातो.
  4. तेव्हा माझे मामा मला नवीन कपडे घेतात. नवीन खेळणी घेतात. मला खायला खाऊ आणतात.
  5. माझे मामा माझे खूप लाड करतात.
  6. आमचे मामा आम्हाला यात्रेत फिरायला घेऊन जातात.
  7. आमची मामी देखील आमचे खूप लाड करते.
  8. उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही एक महिना मामाच्या गावाला जातो.
  9. मामाच्या गावी आम्ही खूप मजा करतो.
  10. मी माझा मामाचा खूप लाडका आहे.

माझे मामा निबंध मराठी 150 शब्द

माझे नाव सूरज आहे. मला एक मामा आहे. माझ्या मामाचे नाव संजय आहे. माझे मामा एक शेतकरी आहे. मामा माझे खूप लाड करतात. माझे मामा मला खूप आवडतात. माझे मामा मला छान छान नवीन कपडे घेतात. ते मला खायला खाऊ दातात.

दिवाळीच्या सुट्टीत आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही मामाच्या गावी जातो. मी तर सुट्टीच्या एक महिना अगोदरच सर्व नियोजन करून घेतो. मी मामाच्या गावी जाण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतो. एकदा का सर्व परीक्षा संपल्या की आम्ही मामाच्या गावी जाण्यासाठी तयार असतो.

आम्ही मामाच्या गावी रेल्वेने जातो. मग आम्ही एस टी बसने मामाच्या गावी जातो. मामाच्या गावी पोहोचल्यावर प्रथम मी आजी आजोबा आणि मामा मामीचे पाया पडतो. आजी आजोबा मला मिठीत घेतात व मला खूप गप्पा मारतात. मामी मला खायला लाडू, चकली, करंजी आणि चिवडा खायला देते.

मग माझा मामचा मुलगा सुनील आणि आम्ही फटाके फोडतो आणि खूप खेळतो. मामा मला बाजारात घेऊन जातात आणि माझ्यासाठी नवीन नवीन खेळणी, कपडे घेतात. माझ्यासाठी फटाके देखील घेतात. मामा माझे प्रत्येक लाड पुरवतात. माझे मामा मला खूप आवडतात. माझे मामा खूप चांगले आहे.

-: समाप्त :-

माझे मामा निबंध मराठी 300 शब्द

माझे नाव शौर्य जारवाल आहे. मी 12 वर्षांचा आहे. मी इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे. मला दोन मामा आहे. माझ्या मामाचे नाव सूरज आणि सागर असे आहे. माझ्या मामाचे लग्न झालेले आहे. त्यांच्या मुलाचे नाव भूषण आहे.

मी माझ्या मामाचा खूप लाडका आहे. दोन्ही मामा माझे खूप लाड करतात. प्रत्येक दिवाळीच्या आणि उन्हाळ्याचा सुट्टीत मी मामाच्या गावी जातो. तेथे भूषण आणि मी खूप मजा करतो. मामा मला नवीन नवीन खेळणी आणि कपडे घेतात.

मामा मला खायला छान छान खाऊ आणतात. मी मामाच्या गावी जाण्यासाठी अतुर असतो. कधी दिवाळीच्या आणि उन्हाळ्याचा सुट्टी लागतात याचाकडेच माझे लक्ष असते. मी अगोदरच सर्व नियोजन करून घेतो.

आम्ही सध्या मुंबईला राहतो आणि माझ्या मामाचे गाव हे औरंगाबाद जिल्ह्यात पिंपळगाव हे आहे. मामाच्या गावी जाण्यासाठी आम्हाला रेल्वेने 6 तास प्रवास करावा लागतो. त्यानंतर औरंगाबाद रेल्वे स्थानकावर मामा आम्हाला घ्यायला येतात.

मामा आम्हाला घेण्यासाठी घोडागाडी घेऊन येतात. तिथून मामाचे गाव 30 की.मी. आहे. शहराच्या बाहेर पडलो की मोकळा स्वस घेता येतो. थंड हवेची झुळूक अंगाला स्पर्श करते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवेगार उसाचे शेत असतात. अशा या वातावरणात मन अगदी उल्हासित होऊन जाते.

मामाच्या गावी पोहोचलो की आजी आजोबा मला मीठी मारतात. माझ्यासोबत गप्पा मारतात. मी आजी आजोबा यांची पाया पडतो. मामा मामीचे देखील पाया पडतो. मामी मला खायला लाडू, करंजी आणि चकली देते. मग आम्ही सर्व जण खूप गप्पा मारतो.

भूषण आणि मी गावात त्याच्या मित्रांबरोबर खेळायला जातो. आम्ही शेतात देखील जातो. शेतातील बोरे, पेरू आणि केळी आम्ही खातो. शहरात मिळणाऱ्या फळांना चव नसते. गावातील फळांना खूप चव असते.

माझे मामा मला आठवडी बाजारात घेऊन जातात. दिवाळी साठी फटाके घेतात. मामा मला नवीन कपडे घेतात. खायला छान छान खाऊ घेतात. माझे मामा माझे खूप लाड करतात. माझ्या मामाचे गाव खूप छान आहे. मला माझ्या मामाचे गाव खूप आवडते. मला माझे मामा खूप आवडतात.

-: समाप्त :-

सारांश | माझे मामा निबंध मराठी | Maze Mama Nibandh Marathi

मित्रांनो आज आपण या लेखात माझे मामा यावर मराठीतून अगदी सोप्या आणि सुंदर भाषेत निबंध बघितले. आम्हाला खात्री आहे की आपल्याला ही निबंध नक्की आवडली असतील. मित्रांनो मामाचे एक विशिष्ठ स्थान आपल्या जीवनात असते. म्हणून आज आपण मामा बद्दल निबंध पाहिले. मित्रांनो तुम्हाला ही निबंध कशी वाटली आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आणि हा लेख आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

माझे मामा निबंध मराठी | Maze Mama Nibandh Marathi माझे मामा निबंध मराठी | Maze Mama Nibandh Marathi 2022

Leave a Comment