सावित्रीबाई फुले चारोळ्या मराठी 2023 (40+ सर्वोत्तम चारोळ्या) | Savitribai Fule Charolya in Marathi | सावित्रीबाई फुले चारोळी मराठी

Savitribai Fule Charolya in Marathi and Hindi 2023 | सावित्रीबाई फुले चारोळ्या मराठी आणि हिंदी 2023 – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त 40 सुंदर चारोळ्या बघणार आहोत. सावित्रीबाई फुले यांच्यावर भाषण देताना जर आपल्याला श्रोत्यांचे मने जिंकायची असतील तर चारोळ्या शिवाय पर्याय नाही.

मित्रांनो सूत्रसंचालन करताना देखील आपल्याला चारोळ्याची गरज असते. सूत्रसंचालन करताना किंवा भाषण देताना आपण चारोळी वापरली की भाषणात एक गोडवा तयार होतो. तर तुम्हीही मित्रांनो भाषणात चारोळी नक्की वापरा. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता चारोळ्याना सुरुवात करुया.

सावित्रीबाई फुले चारोळ्या मराठी | सावित्रीबाई फुले चारोळी मराठी

सावित्रीबाई फुले चारोळ्या मराठी

स्त्रियांच्या शिक्षणाची,
सावित्री तूच खरी कैवारी…
तुझ्यामुळेच शिकत आहे,
आज प्रत्येक नारी…

सोसूनी अनंत यातना,
शिकवलेस तू स्त्रियांना…
कृत्य कृत्य होतो आम्ही,
थोरवी तुझी गाताना…

स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनाला,
उजळवलेस तू…
क्रांतीज्योती, दिन दुबळ्यांची,
खरी माय सावित्री तू…

सावित्री, बघ तुझ्या लेकी,
जगात कर्तुत्व गाजवत आहेत.
केवळ तुझ्यामुळेच त्या,
आज मुक्त श्वास घेत आहेत.

तू एकटीच शिकली नाहीस,
अनेकींना तू शिकवलेस…
अंध:कारमय जीवन नारीचे
शिक्षण ज्योतीने तूच उजळवलेस…

अज्ञानाच्या बंदिस्त पिंजऱ्यात,
कैद होती नारी…
संकटाशी तू करून सामना,
साऊ, मुक्त केलीस नारी…

धैर्यशील होती सावित्री,
शूरवीर होती सावित्री,
ज्योतिबांचे कार्य झाले श्रेष्ठ,
सोबतीला सावित्री…
सोबतीला सावित्री…

स्त्री म्हणजे फक्त चूल आणि मूल,
नव्हती मान्य कसलीच तिची भूल…
सावित्रीबाई संघर्षाने तुझ्या,
आला तिच्या हाती प्रगतीचा त्रिशूल…

लेखणी जणू शस्त्र झाले,
सन्मान आमचे परत मिळाले…
क्रांतीज्योतीची होती प्रेरणा,
दुःख आमचे दूर पळाले…

सावित्रीबाई…
झिजविले आयुष्य तू,
अजूनही संघर्ष आमचा संपलेला नाही…
नराधम, कुविचारांचे सावट,
सोबतीला आमच्या राही…

ज्ञानासाठी झिजलेली,
शेणाने भिजलेली,
समाजसेवेत सजलेली,
संकटांना न खचलेली,
ज्ञानाची आई… सावित्रीबाई…

चला…
चला सावित्रीची ज्योत,
मशाल करूया,
हातात घेऊनी हात,
स्त्री विकासाची साथ धरूया…

समाजाला जिने दिली
ज्ञानाची सावली,
धन्य ती क्रांतीज्योती
सावित्री माऊली.

सावित्री तू सोसलेस,
दगड आणि धोंडे,
रोवलेस झेंडे,
शिक्षणाचे…

तू क्रांतीज्योती अन
खरी धैर्याची मूर्ती,
तुझ्या ऋणातून
कशी होऊ उतराई…

उद्धारण्या भारतमातेच्या लेकी,
दिली तू सुखाला आहूती,
सावित्री तुझ्यामुळेच तेवत आहे,
आज जगती ज्ञानज्योती…

शिक्षणाच्या स्वर्गाचे,
जिने उघडले दार,
तीच सावित्री,
आज जगाची शिलेदार.

आम्ही सावित्रीच्या लेकी,
आम्ही ज्योतिबाच्या लेकी,
नका समजू आम्हाला दासी,
आम्ही कर्तुत्वाच्या राशी!!

जिच्यामुळे शिकली
दीनदुबळ्यांची मुले,
ती ज्ञानदाती, ती ज्ञानज्योती
सावित्रीबाई फुले!!

होता स्वातंत्र्य पूर्वीचा तो काळ,
महिलांना नव्हता शिक्षणाचा अधिकार !!
त्यांच्यासाठी तिने केले ज्ञानाचे द्वार खुले
ती ज्ञानदाती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले !!

ठोकले तू परंपरेला
तोडले ते बंध जुने,
आज यशाच्या शिखरावर
बांधती ती तोरणे..

अक्षरे ही आसू, गाळाया लागली,
आज माय आम्हा, ओळखायला लागली.

ज्योतीची ज्ञानज्योती तू,
खरीखूरी तू क्रांतीज्योती
अक्षराचा वसा देऊनी,
प्रकाशले नारी जगती!!

ती माया, ती शक्ती,
कोंडूनी ठेवली होती.
मुक्त केले पिंजऱ्यातूनी,
श्रेष्ठ जगती सावित्री…

हाती घेतली तुम्ही लेखणी
नव चेतना आली जीवनी
शिक्षणाचा दीप लावला
ज्ञानाचा प्रकाश पडे अंगणी

चौकटीतले होते जगणे
आज भरारी विद्येच्या प्रांगणी
पंख दिले सावित्रीबाईंनी
उडण्या विशाल नभांगणी

अनाथांसाठी हृदयी माया
साधी, सरळ होती राहणी
स्त्री शिक्षणाचा ध्यास होता
स्वप्न होते एकच मनी

तेज कार्याचे झळके तुमच्या
इतिहासाच्या प्रत्येक पाणी
‘क्रांतीज्योती सावित्रीमाई’
हृदयी अजरामर तुमची कहाणी

तीन जानेवारीला,
नमन करू क्रांतीज्योतीला,
सावित्रीबाईंच्या जन्मदिनाला
मान मिळाला बालिका दिनाचा !!

महाराष्ट्राची दिव्यज्योती…
ओवाळू त्यांची आरती !
नमन माझे सावित्रीस…
आज आहे त्यांची जयंती !!

किती भोगले किती सोसले,
तरीही तिने शिकवले !
स्त्री शिक्षणाचे धडे पुढे,
तिच्या साऱ्या लेकिनी गिरवले !!

तू ग सावित्री, तू ग ज्ञानज्योती
तू आमची विद्यादाती
सकल महिला वर्गाची तूच आहेस ग
भाग्यविधाती, भाग्यविधाती

स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात
पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती
म्हणून तर आज जगती
अमर आहे माता सावित्री.

सावित्री तुझ्या लेकींच्या पंखात
आज आकाशात झेपावण्याचे
बळ आहे !
हे तू केलेल्या कार्यकर्तुत्वाचेच
फळ आहे !!

त्या सावित्रीने वाचविले
पतीचे प्राण
या सावित्रीने दिले
महिलांना ज्ञान
वाढविला जगती
महिलांचा सन्मान.

महाराष्ट्राची दिव्यज्योती
ओवाळू त्यास आरती
नमन माझे सावित्रीमाईस
आज आहे त्यांची जयंती.

सावित्रीबाई फुले चारोळ्या हिंदी | सावित्रीबाई फुले चारोळी

नारी को दुनिया ने जबसे सन्मान दिया है,
नारी ने अपने ताकद को पहचान लिया है,
अबला से बन गई है सबला देखो
सच है नारी ने जग पर बडा एहसान किया है

जावो जाकर पडो-लिखो,
बनो आत्मनिर्भर, बनो मेहनती,
काम करो, ज्ञान और धन इकट्टा करो,
ज्ञान के बिना सब खो जाता है!
ज्ञान के बिना हम जानवर बन जाते है,
इसलीये, खाली ना बैठो,
जाओ, जाकर शिक्षा लो !!

मेरी कविता को पड-सूनकर यदि
थोडा भी ज्ञान हो जाये प्राप्त मे समझुंगी
मेरा परिश्रम सार्थक हो गया !!

मुझे बताओ सत्य निडर
होकर की कैसी है मेरी कविताए
ज्ञानपरक, यथार्थ मनभावन
या अद्भुत तुम ही बताओ !!

सारांश | सावित्रीबाई फुले जयंती चारोळ्या मराठी | Savitribai Fule Charolya in Marathi 2023 | सावित्रीबाई फुले चारोळी

सावित्रीबाई फुले चारोळ्या मराठी 2023 | Savitribai Fule Charolya in Marathi | सावित्रीबाई फुले चारोळी मराठी – मित्रांनो, वरील लेखात आपण सावित्रीबाई फुले जयंती निमित्त अतिशय सुंदर चारोळ्या मराठी आणि हिंदी भाषेतून बघितल्या. आज या लेखात आपण सावित्रीबाई फुले भाषण तथा सूत्रसंचालन साठी चारोळ्या बघितल्या. मित्रांनो आम्हाला आशा नाही तर खात्री आहे की, आपल्याला ह्या चारोळ्या नक्की आवडल्या असतील.

आपल्या गरजू विद्यार्थ्यांना / मित्रांना हा लेख नक्की शेअर करा. आपले आमच्याबद्दल काही मत असेल किंवा आपल्या काही सूचना असल्यास आम्हला Comment द्वारे नक्की कळवा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

Leave a Comment