सावित्रीबाई फुले भाषण मराठी 2023 (05 सर्वोत्तम भाषणे) | Savitribai Phule Speech in Marathi 2023


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

सावित्रीबाई फुले भाषण मराठी 2023 | Savitribai Phule Speech in Marathi – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात सावित्रीबाई फुले जयंती निमित्त भाषण मराठीतून बघणार आहोत. मित्रांनो 03 जानेवारी या रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. आज आपण आपल्या देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त अतिशय सुंदर आणि सोपे 05 भाषण बघणार आहोत.

हे भाषण लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. कारण यात काही छोटे आणि सोपे भाषण ही आम्ही दिले आहे. जे आपल्याला लगेच पाठ होतील. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता धडाकेबाज भाषणाला सुरुवात करुया.

सावित्रीबाई फुले भाषण मराठी – भाषण क्र. 01

सावित्रीबाई फुले 10 ओळी भाषण मराठी

  1. आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती!
  2. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला.
  3. सावित्रीबाई यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते.
  4. सावित्रीबाई यांचा विवाह वयाच्या नवव्या वर्षी सन 1840 मध्ये ज्योतिबा फुले यांच्याशी झाला.
  5. महात्मा फुले व सावित्रीबाईंनी 01 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.
  6. बालविवाह, सती, केशवपन अशा कित्येक कुप्रथांना सावित्रीबाईंनी विरोध केला.
  7. क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण प्रसार व समाज सुधारणेच्या कामात व्यतीत केले.
  8. स्त्री शिक्षणाच्या कार्याबरोबरच विधवांची परिस्थिती सुधारावी, बालहत्या थांबाव्यात, म्हणून त्यांनी आश्रमांची उभारणी केली.
  9. ज्योतिबांच्या निधनानंतर जोतिबांच्या राहिलेल्या सामाजिक कार्याला पूर्ण करणे, सावित्रीबाईंनी आपले कर्तव्य समजले.
  10. प्लेग संक्रमित लोकांची सेवा करत असताना त्यांनाही प्लेग झाला व 10 मार्च 1897 रोजी त्यांची प्राणज्योत मावळली.

सावित्रीबाई फुले भाषण मराठी – भाषण क्र. 02

जिंदगी एक काटो का सफर है,
हौसला उसकी पहचान है,
रास्तो पर सभी चलते है,
पर जो रास्ते बनाये वही इन्सान है.

भारतीय स्त्रियांना शिक्षणाची दरवाजे खुली करून देणाऱ्या भारतीय शिक्षणाची ज्ञानगंगोत्री क्रांतीसुर्य महात्मा फुले यांना सत्यशोधक मार्गात साथ देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना त्रिवार वंदन.

18 व्या शतकाचा काळ होता. स्त्रियांचे जीवन चूल आणि मूल पर्यंत मर्यादित होते. स्त्रियांनी शिक्षण घेणे, पाप समजले जायचे. अशा या 18व्या शतकात 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव, जिल्हा सातारा येथे ‘सावित्रीबाई फुले’ यांचा जन्म झाला व एका नव्या अध्यायास सुरुवात झाली.

म्हणूनच तर म्हणतात –
बेटीया सबके नसीब में कहा होती है,
रब को जो घर पसंद आये,
वहा बेटीया होती है !

परंतु आजचा काळ बदलला. वेळ बदलली पण लोकांची मानसिकता बदलली नाही. आजही आपल्याला म्हणावे लागते ‘बेटी बचाव बेटी पढाव!’

सावित्रीबाई स्वतः शिकल्या आणि त्यांनी मुलींनाही शिकवले. आज बस कंडक्टर पासून तर राष्ट्रपती पदापर्यंत स्त्रियांनी आपले वर्चस्व गाजवले आहे. पण आज स्त्रिया शिक्षित होऊ शकल्या ते फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच.

शेवटी भारतातल्या सर्व स्त्रियांसाठी एवढेच म्हणेन.

बोये जाते है बेटे
पर हो जाती है बेटिया
स्कूल जाते है बेटे
पर आगे बढ जाती है बेटिया
मेहनत करते है बेटे
पर अवलाती है बेटिया
जब रुलाते है बेटे
तब हसती है बेटिया
नाम करे ना करे बेटे
पर नाम कमाती है बेटिया
आशा रहती है बेटो से
पर पुरी कर जाती है बेटिया.

एवढे बोलून मी माझे भाषण संपवते.
जय हिंद जय महाराष्ट्र

-: समाप्त :-

सावित्रीबाई फुले भाषण मराठी – भाषण क्र. 03

विद्या! ज्ञान! शिक्षण!, आज आपल्या सर्वांना शिक्षणाचे महत्त्व माहिती आहे. सर्वांना माहीत आहे की शिक्षणाशिवाय आपले आयुष्य निरर्थक आहे. पण त्या काळाचं काय? जवळपास दोनशे वर्षांपूर्वी स्त्रियांना घराबाहेर पाऊल टाकण्याचीही परवानगी नव्हती. अशा या बिकट परिस्थितीत एका सामान्य महिलेने पुढाकार घेतला. पुढाकार घेतला स्त्रियांच्या उच्च शिक्षणासाठी, स्त्रियांना शिकवण्यासाठी. कारण त्या स्त्रीला माहीत होतं जर स्त्रीला विद्या प्राप्त झाली तर तीचा आत्मविश्वास वाढेल आणि समाजात स्वतःचे विचार मांडण्याची क्षमता ही वाढेल.

आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्र-मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. मी संजना शिंदे, आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यासाठी आपल्यासमोर उभी आहे.

अठराव्या शतकात जेव्हा स्त्रीसाठी फक्त चूल आणि मूल एवढ्या पुरतेच क्षेत्र तीचे मर्यादित होते. अशा अंधकारमय जगात, अशा अंधकारमय वातावरणात सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे 3 जानेवारी 1831 या शुभमुहूर्तावर स्त्रियांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी पुढाकार घेणाऱ्या एका वाघिणीचा जन्म झाला आणि त्या वाघिणीचं नाव म्हणजेच सावित्रीबाई फुले.

अहो सावित्रीबाई फुले हे नाव जरी ऐकलं तरी डोळ्यासमोर उभे राहते त्यांचे प्रभावी प्रतिबिंब. सावित्रीबाई फुले ह्या अवघ्या नऊ वर्षांच्या असताना त्यांचा 13 वर्षीय ज्योतिबा फुले यांच्यासोबत विवाह झाला. ज्योतिबा फुले पुढे जाऊन एक समाज सुधारक बनले.

त्यांनाही असे वाटायचे की स्त्रियांनी शिकले पाहिजे आणि सावित्रीबाई फुले यांची शिक्षणाप्रती आस आणि ओढ बघून ज्योतिबांनी त्यांना चांगले शिक्षण दिले. स्त्रियांना शिक्षण किती गरजेचे आहे व लोकांना ते शिक्षणाबद्दल जागृती मिळवण्याचे कठीण कार्य ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी केले.

ज्योतिबांच्या आधाराने सावित्रीबाई फुले यांच्या पंखास बळ मिळाले. दोघांनी हात हातात हात घालून सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले अखेर आपल्या धेयात यशस्वी झाले. 01 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील भिडेवाडा येथे ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा उघडून स्त्री शिक्षणाचा पाया रचला व स्त्री शिक्षणाला एक नये स्वरूप दिले.

स्त्री शिक्षण हे त्या काळाची गरज होती बर का, आणि याची जाणीव ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले या दोघांनाही होती. म्हणून त्या बिकट परिस्थिती त्यांनी हार मानले नाही त्यांनी माघार घेतली नाही. ” पुस्तकांन मस्तक सुधारतं आणि जे सुधारलेले मस्त असतं ते कोणापुढेही नतमस्तक होत नसतं. म्हणून पुस्तक वाचायचं असतं.”

सावित्रीबाई फुले जेव्हा मुलींना शिकवायला शाळेत जात असायच्या, तेव्हा लोक त्यांच्या अंगावर दगड, चिखल, माती व शेन फेकायचे. परंतु त्या डगमगल्या नाहीत. त्या संकटांना भेदरल्या नाहीत. कारण कुठे ना कुठे त्यांना माहीत होतं, ते म्हणतात ना.

“जिसमे कुछ कर दिखाने का
जुनून होता है ना !
ओ न आव देखता है न ताव,
बस मंजिल की और
बढता ही जाता है!
बढता ही जाता है!!”

सावित्री मातेची ही परिस्थिती बघून अक्षरशः माझे डोळे पाणावले हो. कसं सहन केल असेल त्यांनी? पण याचाच परिणाम म्हणून आज प्रत्येक मुलगी शिकू शकत आहे. आज अंतरिक्षात बघा, पंतप्रधान, राष्ट्रपती, डॉक्टर, इंजिनियर आज प्रत्येक मोठ्या पदावर एक स्त्री आहे.

तिने किती प्रगती केली आहे ना? आणि स्त्री ची हीच प्रगती पाहून आज माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सावित्रीबाई फुलेंनी अनेक स्त्रियांना वाढत्या मुलींना एक नवीन जीवन दिला आहे. त्यांनी अनेक स्त्रियांना एक नवीन मार्ग दाखवला आहे. शिक्षणाचा अधिकार मुलींना आणि स्त्रियांना देऊन त्यांच्या डोळ्यातील अश्रू ही पुसले आहे.

पण काय करणार प्लेग पिढीतांची सेवा करताना सावित्रीबाई फुलेंना प्लेग झाला. आणि 10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाची प्राणज्योत मावळली. पण सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाची यशोगाथा ऐकल्यानंतर शेवटी जाता जाता मी तुम्हाला एवढेच संदेश देऊ इच्छिते की,- “प्रत्येकाने पराकोटीच्या प्रयत्नांची ज्योत तेवत ठेवली पाहिजे.” अर्थातच आपले चांगले प्रयत्न सतत चालू ठेवले पाहिजे. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते.

जय ज्योती! जय क्रांती! जय सावित्री!

-: समाप्त :-

सावित्रीबाई फुले भाषण मराठी – भाषण क्र. 04

सावित्री तुझ्या लेकींच्या पंखात
आज आकाशात झेपावण्याचे
बळ आहे !
हे तू केलेल्या कार्यकर्तुत्वाचेच
फळ आहे !!

स्त्रियांच्या जीवनातील अंधकार नाश करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो.

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, पूज्य गुरुजन वर्ग उपस्थित सर्व मान्यवर व माझ्या बाल मित्रांनो आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त दोन शब्द सांगणार आहे. ते आपण शांतपणे ऐकावे ही नम्र विनंती.

सावित्रीबाई फुले यांचे पूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिराव फुले असे आहे. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या 09 व्या वर्षी ज्योतिराव फुले यांच्याबरोबर झाला. विवाह झाल्यानंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

ज्योतिबा फुले हे शिक्षीत व आधुनिक विचारसरणीचे होते. पुढे जाऊन ज्योतिबा फुले हे थोर समासुधारक झाले. त्या काळात स्त्रियांनी घराबाहेर पडणे हे देखील पाप समजले जायचे. स्त्रियांचे जीवन नरकासारखे झाले होते. आपल्या समाजातील स्त्रियांचे उध्दार करावे, त्यांनाही समाजाने मान सन्मानाने वागवावे अशी ज्योतीबा फुले यांची तीव्र इच्छा होती.

ज्योतिबा फुले यांनी हे कार्य प्रथम आपल्या घरापासून सुरू करण्याचे ठरवले. त्यामुळे ज्योतीरावांनी त्या काळात सावित्रीबाईंना शिकवले. त्या काळात स्त्रियांना शिकू दिले जात नव्हते. पण सावित्रीबाई स्वतः शिकल्या आणि पुण्यामध्ये भिडे वाड्यामध्ये पहिली शिक्षिका म्हणून मुलींना शिकवू लागल्या. ही एक फार मोठी क्रांतिकारी गोष्ट होती.

परंतु हे कार्य करणे इतके सोपे नव्हते. जेव्हा सावित्रीबाई फुले शाळेत शिकवण्यासाठी जात असायच्या त्यावेळी समाजातील कर्मठ लोक त्यांच्या अंगावर दगड, चिखल, माती आणि शेण फेकायाचे. त्यांचा अपमान करायचे. परंतु सावित्रीबाई त्यांना घाबरल्या नाही. त्यांनी त्यांचे सत्कार्य चालूच ठेवले. पुढे जाऊन समाजाला त्यांची चूक समजली. आणि स्त्री सुद्धा शिकू लागली.

त्या सावित्रीने वाचविले
पतीचे प्राण
या सावित्रीने दिले
महिलांना ज्ञान
वाढविला जगती
महिलांचा सन्मान.

आज पंतप्रधान ते राष्ट्रपती पदापर्यंत आणि इतर डॉक्टर, इंजिनिअर, IAS, IPS अशा सर्व मोठ्या पदांवर स्त्री विराजमान आहे. याचे श्रेय फक्त माझ्या सावित्रीमाई ला जाते. आणि आज मला गर्व आहे की मी एक स्त्री म्हणून जन्माला आले. माझ्या सावित्रीमाई ने मला अभिमानाने जगायला शिकवले.

किती भोगले किती सोसले,
तरीही तिने शिकवले !
स्त्री शिक्षणाचे धडे पुढे,
तिच्या साऱ्या लेकिनी गिरवले !!

आपले समाज सेवेचे कार्य त्यांनी सतत चालू ठेवले. परंतु 1897 साली पुण्यात प्लेग या रोगाची सात आली. प्लेग पिढीतांची सेवा करताना सावित्रीबाई फुलेंना प्लेग झाला आणि 10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाची प्राणज्योत मावळली. स्त्रियांच्या जीवनातील अंधकार दूर करणाऱ्या अशा माझा सवित्रिमातेला त्रिवार वंदन. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपावते.

जय हिंद! जय महाराष्ट्र! जय भारत!

-: समाप्त :-

सावित्रीबाई फुले भाषण मराठी – भाषण क्र. 05

समाजाला जिने दिली
ज्ञानाची सावली,
धन्य ती क्रांतीज्योती
सावित्री माऊली.

स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या, अनंत अडचणींवर मात करीत महिलांसाठी पहिली महिला शाळा सुरू करणाऱ्या, पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मानाचा मुजरा…

आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, पूज्य गुरुजन वर्ग, येथे उपस्थित मान्यवर व येथे बसलेल्या विद्यार्थी मित्रांनो. आज मी तुम्हाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी दोन शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे ही नम्र विनंती.

सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. वडील खंडोजीराव पाटलांनी बाळाचे नाव सावित्री असे ठेवले. बघता बघता सावित्री ०९ वर्षांची झाली आणि १२ वर्षाच्या जोतिबांशी त्याचे लग्न लावण्यात आले. एकीकडे आई-वडिलांना सोडावे लागणार याचे दुःख होते तर दुसरीकडे शहरात जायला मिळणार याची उत्सुकता होती. शिक्षणाचा अंशही माहीत नसणारी सावित्री सासरी निघाली.

इ.स. १८४८ मध्ये महात्मा फुले यांनी पुण्यात महिलांची पहिली शाळा काढली. त्याकाळी मुलींना शिकवण्यासाठी कोणी तयारच होईना. तेव्हा सावित्रीबाईंनी शाळेत शिकवावे असे ज्योतिबांनी ठरवले. सावित्रीबाई अक्षर गिरवायला लागल्या. आणि पुढे शाळेत शिकवायला लागल्या. पुण्यातील जुन्या, कर्मठ लोकांच्या मनात ही गोष्ट खुपायला लागली. चूल आणि मूल पिढ्यान – पिढ्या करत आलेली स्त्री घराचा उंबरठा ओलांडते! आणि येन केन प्रकारे ते सावित्रीबाईंना त्रास द्यायला लागले.

अहो पण ते म्हणतात ना :
“शाम सुरज को ढोलना सिखाती है,
शमा परवाने को जलाना सिखाती है !
इतिहास बदलने वालो को होती है
थोडी तकलीफ मगर,
यही तकलीफ इंसान को चलना सिखाती है !!”

असे अनेक त्रास सहन करत त्या माऊलीने स्त्री शिक्षणाचा वसा निष्ठेने चालू ठेवला. शेवटी या कर्मठ लोकांनी जोतिबांच्या वडिलांचे कान भरले आणि सावित्रीबाईंच्या सासऱ्यांनी शाळा सुरू होण्याच्या एक वर्षाच्या आत ज्योतिबा आणि सावित्रीबाईंना घराबाहेर काढले. पण हिमालयासारख्या इच्छाशक्ती पुढे असे छोटे छोटे भूकंप टिकू शकत नाही.

सावित्रीबाईंनी आपले काम अधिक जोरात सुरू केले. महात्मा फुलेंनी विधवा स्त्रिया आणि निराधार मुलांना आश्रय दिला. या अनाथांवर सावित्रीबाई मातेच्या वात्सल्याने प्रेम करू लागल्या. पुढे अशाच एका अनाथाला दत्तक घेतले आणि हा अनाथ मुलगा ‘यशवंत’ झाला !

महात्मा फुले नंतर सत्यशोधक समाजाची धुरा ही सावित्रीबाईंनी यशस्वीरित्या वाहिली. स्त्री शिक्षणासाठी आयुष्यभर झटणाऱ्या, दीनदलितांना मायेने जवळ घेणाऱ्या, अनाथांना आश्रय देणाऱ्या आणि ज्योतिबांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री शिक्षणाचा दिवा उभ्या देशात लावणाऱ्या या माऊलीचा १० मार्च १८९७ रोजी स्वर्गवास झाला. अशा या थोर माते समोर कोट्यवधी वेळा नतमस्तक होतो आणि माझे दोन शब्द संपवतो.

जय हिंद! जय महाराष्ट्र!

-: समाप्त :-

सारांश | Savitribai Phule Speech in Marathi 2023 | सावित्रीबाई फुले भाषण मराठी

सावित्रीबाई फुले भाषण मराठी 2023 | Savitribai Phule Speech in Marathi – मित्रांनो, वरील लेखात आपण सावित्रीबाई फुले भाषण मराठी / सावित्रीबाई फुले जयती निमित्त भाषण मराठी तून पाहिले. हे भाषण लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. कारण हे भाषण अगदी सोप्या आणि सुंदर भाषेत लिहिली आहेत. 03 जानेवारी 2023 ला सावित्रीबाई फुले यांच्या जयंती ला वरील धडाकेबाज भाषण द्या व श्रोत्यांना कडून टाळ्यांचा कडकडाट ऐकून घ्या.

मित्रांनो, आपल्याला वरील सावित्रीबाई फुले यांचे भाषण कसे वाटले आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आम्हला आशा नाही तर खात्री आहे की आपल्याला हे भाषण नक्की आवडली असतील. ही भाषणे आपल्या गरजू विद्यार्थ्यांना, मित्रांना नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

सावित्रीबाई फुले भाषण मराठी 2023 [05 भाषण] | Savitribai Phule Speech in Marathi सावित्रीबाई फुले 10 ओळी भाषण मराठी सावित्रीबाई फुले भाषण मराठी 2023 [05 भाषण] | Savitribai Phule Speech in Marathi सावित्रीबाई फुले 10 ओळी भाषण मराठी सावित्रीबाई फुले भाषण मराठी 2023 [05 भाषण] | Savitribai Phule Speech in Marathi सावित्रीबाई फुले 10 ओळी भाषण मराठी सावित्रीबाई फुले भाषण मराठी 2023 [05 भाषण] | Savitribai Phule Speech in Marathi सावित्रीबाई फुले 10 ओळी भाषण मराठी सावित्रीबाई फुले भाषण मराठी 2023 [05 भाषण] | Savitribai Phule Speech in Marathi सावित्रीबाई फुले 10 ओळी भाषण मराठी सावित्रीबाई फुले भाषण मराठी 2023 [05 भाषण] | Savitribai Phule Speech in Marathi सावित्रीबाई फुले 10 ओळी भाषण मराठी

Leave a Comment