(40+) राजमाता जिजाऊ चारोळ्या मराठी | Rajmata Jijau Charoli Marathi 2023 | राजमाता जिजाऊ चारोळी मराठी


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

Rajmata Jijau Charoli Marathi 2023| Rajmata Jijau Charolya Marathi 2023 | राजमाता जिजाऊ चारोळ्या मराठी 2023 – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त 40+ सुंदर चारोळ्या बघणार आहोत. राजमाता जिजाऊ यांच्यावर भाषण देताना जर आपल्याला श्रोत्यांची मने जिंकायची असतील तर चारोळ्या शिवाय पर्याय नाही.

मित्रांनो सूत्रसंचालन करताना देखील आपल्याला चारोळ्याची गरज असते. सूत्रसंचालन करताना किंवा भाषण देताना आपण चारोळी वापरली की भाषणात एक गोडवा तयार होतो. तर तुम्हीही मित्रांनो भाषणात चारोळी नक्की वापरा. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता चारोळ्याना सुरुवात करुया.

राजमाता जिजाऊ चारोळ्या मराठी | Rajmata Jijau Charolya Marathi

मुजरा माझा त्या माता जिजाऊला,
घडविले तिने शूर शिवबाला !
साक्षात होती ती आई भवानी,
जन्म घेतला तिच्या पोटी शिवबांनी !

थोर तुमचे कर्म जिजाऊ,
उपकार कधी न फिटणार !
चंद्र, सूर्य असेपर्यंत,
नाव तुमचे न मिटणार !

स्वराज्याचा ज्यांनी,
घडविला विधाता !
धन्य त्या स्वराज्यजननी,
जिजाऊ माता !

महाराष्ट्राचा साज तू,
रणरागिनीचे रूप तू !
अंधारल्या समाजासाठी,
तेजस्वी किरण तू !

जिजाऊ तुम्ही नसता तर –
नसते लढले मावळे !
जिजाऊ तुम्ही नसता तर –
नसते दिसले विजयाची सोहळे !

वीरकन्या, वीरपत्नी,
जिजाऊ राजमाता !
त्यांच्या उदरी जन्म आला,
महाराष्ट्राचा भाग्यविधाता !

पेचप्रसंग आला तरी,
जिजाऊ डगमगल्या नाहीत !
संकटांचा सामना केला,
नुसती चिंता केली नाही !

तिच्या मायेच्या छायेत,
नव्हता जाती धर्म !
सर्व धर्म समभाव,
हेच तिचे कर्म !

जननी मराठा साम्राज्याची,
सारुनी बाजूस राजघराणी !
जनतेच्या खऱ्या न्यायाखातर,
लढा लढली ही रणरागिणी !

एक उजळणी ठिणगी,
आणि लाख पेटल्या मशाली !
स्वराज्याच्या संकल्पची,
नवी पहाट झाली !

संघर्षांची चेतना तूच दिली राजमाता !
भल्याभल्या शत्रूंनी टेकला महाराष्ट्र भूमीवर माथा !
तुझ्यामुळेच घडली स्वराज्याची सुवर्ण गाथा !
इतिहासात तुझे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले राजमाता !

महाराष्ट्राची दिव्य ज्योती,
ओवाळू त्यांची आरती !
नमन माझे जिजामातेस,
आहे आज त्यांची जयंती !

जिजाई तुझ्या स्वप्नाला,
तू हिमतीचे अन संस्काराचे बळ दिले !
तुझ्या आशीर्वादानेच,
शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले !

धर्माचे रक्षण करून गोरगरिबांचे,
शिवराय बनले मायेची सावली !
अशा या शूरवीर वाघाची,
तूच शोभली माउली !

आई, जिजाई जिजाई तुझीच ग पुण्याई,
ज्यांनी रक्षिले महाराष्ट्राला त्याला तू घडवले आई !

तुम्ही धाडसाचे धडे दिले शिवबाला,
म्हणून पराक्रमी राजे भेटले आम्हाला !
थोर अभिवादन तुम्हाला,
तुमचे विचार सदैव राहतील सोबतीला !!

वाघाची आई बनायला,
काळीजही वाघिणीचेच असावं लागते !
म्हणून तर जिजामाता,
तुमच्या चरणापुढे..
मान आमची सदैव झुकते !!

संस्कार तुझे थोर,
घडवले शिवबाला !
रयतेला उध्दारीले,
तो आदर्श राजा झाला !!

इतिहासा, तू वळूनी पहा,
पाठीमागे जरा.
झुकवूणी मस्तक करशील,
जिजाऊंना मानाचा मुजरा !

राजमाता जिजाऊ चारोळी मराठी | Rajmata Jijau Charoli Marathi

मराठी मातीत जाने केला गनिमी कावा,
तो एकच होता माझ्या जिजाऊंचा छावा !
सांभाळले तिने सर्वांना प्रेमाने,
स्वराज्य उभे राहिले तिच्याच आशीर्वादाने !!

जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते झाले शिवराय नि शंभू छावा !
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा !!

जिजाऊ एक स्त्री होती,
शहाजीराजांची वीर पत्नी होती,
जाधव घराण्याची लाडकी लेक होती,
स्वराज्य घडवणाऱ्या स्फूर्तीची ती मूर्ती होती.

आपल्या पुत्रावर महान संस्कार करणारी,
जिजाऊ महान माता होती !
जगातील प्रत्येक स्त्रीने आदर्श घ्यावा,
अशी आदर्श माता होती !!

जिजाऊ आई, पूर्व जन्माची पुण्याई असावी,
जन्म जो तुझ्या गर्भात शिवबांनी घेतला !
जग पहिल जरी नव्हतं तरी,
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला !!

राजमाता होता तुम्ही कर्तबगार,
म्हणूनच दिली शिवबास तलवार !
लावूनी शब्दांची धार,
केले शिवबा तयार !
तुमचे हे उपकार आम्ही कधी न विसरणार !!

धगधगत्या ज्वालातून,
पेटल्या मशाली !
स्वराज्याच्या संकल्पनेची,
नवी पहाट झाली !
अखंड स्वराज्याची सावली,
धन्य ती जिजाऊ माऊली !!

संपूर्ण महाराष्ट्राने,
गाथा तुमची गाईली !
कारण आई तू मुघलांपुढे,
कणखरपणे उभी राहिली !!

तुमच्या थोर संस्कारांनी,
शिवबाला घडवले !
म्हणून शिवबांनी औरंगजेबाला,
महाराष्ट्र बाहेर आडवले !
बघून पराक्रम शिवबांचा,
मुगल पूर्णपणे गडबडले !!

थोर त्या जिजाऊ माता,
ज्यांची अपरंपार गाथा !
दिली शिवबास तलवार,
होण्या स्वराज्यावर स्वार !!

स्वराज्याची सावली…
ज्यांनी शिवबाला दिशा दावली !
स्वराज्याची गुढी उभारली…
धन्य ती जिजाऊ माउली !!

स्वराज्याचा ज्यांनी…
घडविला विधाता !
धन्य त्या स्वराज्य जननी…
जिजामाता !!

त्रिवार असावा मानाचा मुजरा…
ज्यांनी घडविला रयतेचा राजा !
रचली स्वराज्याची गाथा…
धन्य त्या स्वराज्य जननी जिजामाता !!

जाधवांची कन्या,
भोसलेंची सून,
शिवबांची माता,
भाग्य कोणते अजून.

अशी करारी नजर सदा,
गनिमा भेदून पाही आरपार !
जिजाऊ तुमच्यामुळेच झाले,
स्वराज्याचे स्वप्न साकार !

डंका जिजाऊंच्याच नावाचा,
आजही वाजतोय जगती !
घालुनी स्वराज्याच्या पाया,
घडविले तिने छत्रपती !!

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
माऊलीची माया कधी तुटणार नाही !
चंद्र, सूर्य असेपर्यंत
कीर्ती जिजाऊंची मिटणार नाही !!

जिजाऊ तुम्हीच अस्मिता,
तुम्हीच आमची शान !
घडविला तुम्ही एक हिरा,
ज्याचा आम्हा सर्वांना अभिमान !!

आई तू जिजाऊ हो,
आणि मला शिवबा कर !
अंधारातून चालताना,
फक्त माझा हात धर !!

मराठवाड्याच्या होत्या त्या सून,
विदर्भाच्या होत्या लेक !
रयतेच राज्य उभ राहण्यासाठी त्यांच्याच
उपस्थितीत झाला स्वराज्याचा राज्याभिषेक !!

योध्यांच्या गोष्टी सांगून त्यांनी,
शिवबांना व शंभूराजांना दिले शिक्षण !
म्हणून तर शिवबांनी घडवले स्वराज्य व
शंभूराजांनी केले स्वराज्याचे मरेपर्यंत रक्षण !!

सारांश | Rajmata Jijau Charoli | Rajmata Jijau Charolya | राजमाता जिजाऊ चारोळ्या मराठी

मित्रांनो, वरील लेखात आपण आपल्या राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त अतिशय सुंदर चारोळ्या मराठी मध्ये बघितल्या. वरील लेखात आपण एकूण 40 राजमाता जिजाऊ चारोळ्या मराठी मध्ये बघितल्या. राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त भाषण देतांना या चारोळ्या तुमच्या भाषणात नक्की वापरा. यामुळे तुम्ही श्रोत्यांचे तसेच उपस्थित अतिथी चे मन नक्की जिंकू शकता.

मित्रहो, आम्हला आशा नाही तर खात्री आहे की आपल्याला वरील राजमाता जिजाऊ चारोळी ह्या नक्की आवडतील. आपल्या गरजू विद्यार्थ्यांना, मित्रांना ह्या चारोळी नक्की शेअर करा. आपले आमच्याबद्दल काही मत किंवा सूचना असतील तर आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

राजमाता जिजाऊ चारोळ्या मराठी | Rajmata Jijau Charoli Marathi 2023 | राजमाता जिजाऊ चारोळी मराठी

Leave a Comment