26 जानेवारी भाषण मराठी 2023 (07 सर्वोत्तम नमुने )| 26 January Speech in Marathi 2023 | प्रजासत्ताक दिन भाषण मराठी 2023


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6031

26 January Speech in Marathi 2023 | 26 जानेवारी भाषण मराठी 2023 | प्रजासत्ताक दिन भाषण मराठी 2023 – नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, 26 जानेवारी म्हणजेच आपला प्रजासत्ताक दिन अगदी काही दिवसांवर येऊन ठेवला आहे. शाळेत आणि इतर सरकारी कार्यालयात 26 जानेवारी या राष्ट्रीय सणाची जंगत तयारी सुरू आहे. सगळी कडे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मित्रांनो तुम्ही हा लेख वाचत आहात याचा अर्थ असा आहे की, आपल्याला 26 जानेवारीला भाषण द्यायचे आहे किंवा 26 जानेवारीच्या भाषण स्पर्धेत भाग घायचा आहे. आज आम्ही आपल्यासाठी 26 जानेवारीचे भाषण मराठी तून (प्रजासत्ताक दिन भाषण मराठी) घेऊन आलो आहोत. मित्रांनो, आज आपण या लेखात 26 जानेवारी साठी एकूण 07 अतिशय सुंदर भाषण बघणार आहोत. ही भाषणं तुम्हाला लवकर पाठ व्हावी या उद्देशाने सोप्या भाषेत लिहिली आहेत. चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता भाषणाला सुरुवात करुया.

Contents hide

26 जानेवारी भाषण मराठी | प्रजासत्ताक दिन भाषण मराठी – भाषण क्र. 01

उजाडली आज प्रजासत्ताक दिनाची
मंगलमय प्रभात
देशभक्ती, देशप्रेम संचारले आज चराचरात
भारत मातेला वंदन करूनी
करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात !!

आज येथे उपस्थित व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे, माझे गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो!! आज अभिमानाने फडकत असलेल्या या तिरंग्या झेंड्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. आजच्या या शुभ मुहूर्तावर मी आपल्याला जे काही 2 शब्द सांगणार आहे ते आपण शांत चित्ताने ऐकावे अशी मी विनंती करतो.

मित्रांनो प्रथम आपल्याला प्रजासत्ताक दिणाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 26 जानेवारी म्हणजेच आपला प्रजासत्ताक दिन. मित्रांनो आपल्या माहीत आहे का? की आपण प्रजासत्ताक दिन का साजरा करतो. आणि हा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला च का साजरा करतो. आज मी आपल्याला प्रजासत्ताक दिनाचा इतिहास सांगणार आहे.

मित्रांनो आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. परंतु एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून देश चालविण्यासाठी आपल्याकडे आपली स्वतःची राज्यघटना नव्हती. अशावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापन करण्यात आली.

या समितीने 2 वर्षे 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम करून भारत देशाला स्वतंत्र आणि मजबूत संविधान दिले.
26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशात हे संविधान लागू करण्यात आले. तेव्हा आपला भारत देश सार्वभौम, लोकशाही, प्रजासत्ताक देश बनला. आपली राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. या घटनेने आपल्याला आपले मूलभूत हक्क आणि अधिकार दिले आहे.

मित्रांनो आपला भारत देश स्वतंत्र होणे आणि प्रजासत्ताक राष्ट्र होणे हे इतके सोपे नव्हते. आपल्या भारत देशाला स्वतंत्र करण्यासाठी अनेक शूर स्वतंत्र वीरांनी आपले अवघे आयुष्य वाहून घेतले. काही वीरांनी तर आपल्या आयुष्याचे बलिदान दिले आहे. जसे की, वीर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस अशा सर्व स्वातंत्र्य वीरांना माझे त्रिवार वंदन.

आजही आपल्या देशाच्या सीमेवर आपले जवान डोळ्यात तेल घालून खडा पहारा देतात. वेळेवर आपल्या दुष्मानांशी लडता लडता वीरगती ला प्राप्त होतात. आपले जवान आपल्या देशाची आन बाण शान आहे. अशा माझ्या शूर जवानांना माझे कोटी कोटी प्रणाम.

एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.

जय हिंद! जय महाराष्ट्र! जय भारत!!!

-: समाप्त :-

26 जानेवारीचे भाषण मराठी | प्रजासत्ताक दिन भाषण मराठी – भाषण क्र. 02

“अनमोल योगदान दिले ज्यांनी स्वातंत्र्यासाठी,
त्या सर्व वीरांना, महापुरुषांना वंदन मी करतो!
वंदन करूनी माझ्या प्राणप्रिय भारत मातेला,
मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो!
मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो!!”

मित्रांनो, आज 26 जानेवारी, भारताचा प्रजासत्ताक दिन! आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. परंतु आपल्या देशाकडे स्वतःचे संविधान नव्हते. भारताचे संविधान तयार करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षते खाली मसुदा समितीची स्थापना करण्यात आली.

संविधान समितीने भारताचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले व दिनांक 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान अमलात आले, त्यामुळे हा दिवस आपण “प्रजासत्ताक दिन” म्हणून आपण साजरा करतो. त्या दिवशी आपले राष्ट्र सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. आणि खऱ्या अर्थाने प्रजेची सत्ता त्या दिवसापासूनच सुरू झाली. आपण सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.

जय हिंद! जय महाराष्ट्र! जय भारत!

-: समाप्त :-

26 जानेवारी भाषण मराठी | प्रजासत्ताक दिन भाषण मराठी – भाषण क्र. 03

आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि स्वतंत्र प्रजासत्ताक देशाचे सुजान देशवासी असलेले बंधू आणि भगिनींनो.

आज प्रत्येक भारतीयासाठी आनंदाचा, उत्साहाचा, सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. आज आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन. म्हणजेच संविधान लागू केल्याचा दिवस होय.

“नसे फक्त पुस्तक, हा भारतीय धर्मग्रंथच!
समृद्ध संविधान बनले देशाचे सुज्ञ पालक.
गुलामगिरी संपली, झाले गणराज्य!
सत्ताधारी बनले चालक, जनता झाली मालक.

प्रजासत्ताक दिवस म्हणजे तो दिवस, ज्या दिवशी गुलामगिरीत कितपत पडलेला प्रत्येक भारतीय या देशाचा मालक झाला. तो दिवस ज्या दिवशी प्रत्येक भारतीयाला पवित्र आणि समृद्ध असे संविधान मिळाले, भारतीयांच्या हातात सत्ता आली. देशाची प्रजा सत्ताक बनली. आपल्या देशात सर्वात मोठी लोकशाही अवतरली. भारत देश हा एक लोकशाही प्रणित गणराज्य बनले.

“लोकांचे, लोकांनी आणि लोकांसाठी चालवलेले जनतेचे राज्य म्हणजेच गणराज्य.”

आज आपण जे गणराज्य अनुभवत आहोत. त्याच्या निर्मितीसाठी ज्या ज्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. अशा थोर व्यक्तींना कोटी कोटी प्रणाम.

15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले असले तरीही देशातले लोक सैरभैर झालेले होते. विभिन्न तुकड्यात देश विभागलेला होता. अशा दिशाहीन व भरकटलेल्या देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक होती नियमावली. भारतीय म्हणून पाळावयाचे नियम.

आपल्या भारत देशात सर्वांना शांततेत, सुखा-समाधानाने जगता यावे. स्वातंत्र्याचा आनंद घेत घेत नांदता यावे. म्हणून, संविधान निर्मितीचे महान कार्य सुरू झाले.

आज हा प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे ‘संविधान’ होय. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद आणि संपूर्ण मसुदा समितीच्या सदस्यांची संविधान निर्मितीची जबाबदारी 02 वर्षे 11 महिने आणि 17 दिवसात पूर्ण केली.

26 नोव्हेंबर 1949 रोजी अधिकृतपणे संविधानाचा स्वीकार करण्यात आला व 26 जानेवारी 1950 रोजी अंमलबजावणी करण्यात आली.

संविधानानुसार भारत देश सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य बनला जो न्याय, समानता, स्वातंत्र्य, बंधुत्व यांना चालना देत असतो. पण आज देशातील जातीय दंगली, दहशतवाद, भ्रष्टाचार, गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार वगैरे वगैरे पाहिल्यास प्रश्न पडतो की,

हाच तो क्रांतिकारकांचा स्वप्नातला भारत का? याचसाठी महापुरुषांनी अथक परिश्रम घेऊन आपल्याला स्वातंत्र्य दिले आहे का?

नक्कीच नाही मित्रांनो! प्रजासत्ताक देशाचे पवित्र आपण सर्वांनी राखलेच पाहिजे. संविधानाने दिलेले अधिकार जसे आपल्याला माहित आहे. तसेच कर्तव्यही आपण जाणून घेतले पाहिजे. व त्याचा आदर केला पाहिजे.

चला तर देशाची समस्या माझी समस्या समजून दूर करण्याचा प्रयत्न करूया. देशाचा प्रत्येक देश बांधव माझा बांधव आहे. असे वागून संविधानाचा सन्मान करूया. सर्वच क्षेत्रातील भ्रष्टाचाराचा नायनाट करून लोकशाही बळकट करूया. आपल्या भारत मातेला अभिमान वाटेल असे वागूया धन्यवाद.

एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.
जय हिंद! जय महाराष्ट्र! जय भारत!

-: समाप्त :-

26 जानेवारी भाषण मराठी | प्रजासत्ताक दिन भाषण मराठी – भाषण क्र. 04

तिरंग्याचे तीन रंग
खूप काही सांगून जातात…
भारत देशाची खरी ओळख
आसमंती झळकून जातात…!!

सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग तसेच येथे उपस्थित माझ्या देश बांधवांनो आज 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण उत्साहात साजरा करीत आहोत. हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी आनंद, उत्साहाचा, सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. या मंगल दिनी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मित्रहो 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. पण स्वातंत्र मिळाल्यानंतर देशाला संविधानाची खरी गरज होती. त्याशिवाय देशाचा राज्यकारभार सुरळीतपणे चालणार नव्हता. आपल्या देशात सर्वांना सुखा समाधानाने शांततेत जगता यावे म्हणून संविधान निर्मितीचे महान कार्य सुरू झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या संविधान समितीने 02 वर्षे 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम घेऊन देशाचे समृद्ध संविधान तयार केले. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशात संविधान अमलात आले. देश प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला. आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. या संविधानामुळे प्रत्येक भारतीयाला भेद-भावाशिवाय समान हक्क व अधिकार मिळालेले आहेत.

आपला भारत देश स्वतंत्र व प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवाची ही परवा केली नाही. आज त्या शूर वीरांना आपण वंदन करूया. कारण त्यांच्यामुळे आज आपण मुक्त श्वास घेत आहोत. आजही देशाच्या सीमेवर सैनिक अहोरात्र मातृभूमीची च्या सेवेसाठी सज्ज आहेत. त्यांचा आपण सदैव सन्मान करूया.

थोर आमची भारत माता
आम्ही तिचे संतान..
आमचा भारत देश महान…

बोला भारत माता की जय! वंदे मातरम.!!

-: समाप्त :-

26 जानेवारी भाषण मराठी | प्रजासत्ताक दिन भाषण मराठी – भाषण क्र. 05

स्वप्न तर सगळेच बघतात,
स्वतःसाठी व इतरांसाठी आज
आपण एक स्वप्न बघूया,
देशासाठी आपल्या सर्वांसाठी..

आजच्या या मंगलमय पावन दिवसाच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष, व्यासपीठावरील प्रमुख अतिथी गण, पूज्य गुरुजन वर्ग व उज्वल भारताचे देशदूत माझ्या बंधू-भगिनींनो.

अनमोल योगदान दिले ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी त्या सर्व वीरांना, महापुरुषांना वंदन मी करतो. वंदन करूनी माझ्या प्राणप्रिय भारत मातेला, मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो.

आज आपला भारत देश प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. हा आपला महत्त्वाचा राष्ट्रीय सण आहे. या सणानिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा.

15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाल्यावर भारत देशाचा कारभार चालवण्यासाठी कोणतेही कायदे नव्हते. अशावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापन करण्यात आली. या समितीने 02 वर्षे 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम घेऊन भारत देशाला मजबूत संविधान दिले.

26 जानेवारी 1950 ला आपल्या देशामध्ये हे संविधान लागू करण्यात आले. आपला भारत देश सार्वभौम, लोकशाही, प्रजासत्ताक देश बनला. आपल्या देशाची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे.

घटनेने आपल्याला हक्क आणि अधिकार दिलेले आहेत. आपल्या देशाला स्वतंत्र आणि प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. त्या शूरवीरांचे आपल्यावर खूप उपकार आहेत.

त्यांच्यामुळेच आज आपण सुखाचे दिवस जगत आहोत. आज देखील आपले भारतीय जवान डोळ्यात तेल घालून मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी सीमेवर खडा पहारा देत आहेत. आपले भारतीय जवान आपले आन बाण शान आहे. या जवानांना माझी कोटी कोटी प्रणाम.

एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.

जय हिंद! जय महाराष्ट्र! जय भारत!

-: समाप्त :-

26 जानेवारी भाषण मराठी | प्रजासत्ताक दिन भाषण मराठी – भाषण क्र. 06

सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शितल छाया देणारे प्रिय गुरुजन आणि चांदण्या प्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांना माझा नमस्कार.

“प्रजासत्ताक दिन आज आला,
प्रत्येकास आनंद आज झाला !
तिरंगा अभिमानाने आज फडकला,
देशभक्तीच्या रंगात सारा देश रंगला !!”

आपण दरवर्षी 26 जानेवारी या दिवशी मोठ्या उत्साहात, आनंदात ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा करतो. प्रत्येक भारतीयासाठी हा दिवस म्हणजे आनंदाचा पर्वच असतो. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून स्वतंत्र झाला. देशाला स्वातंत्र्य तर मिळाले, मात्र त्यावेळेस भारताचे स्वतःचे संविधान नव्हते.

भारताचे संविधान निर्माण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली. 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू करण्यात आले. त्यामुळे हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून संपूर्ण देशभर साजरा केला जातो.

मित्रांनो केवळ भारत मातेचा जयघोष केला. हा दिवस आनंदाने, उत्साहाने साजरा केला, व्हाट्सऐप, सोशल मीडियावर संदेश पाठवला, म्हणजे आपले कर्तव्य संपले का? नाही मुळीच नाही! तर देशाच्या ऐक्क्यासाठी विकासासाठी आपण एक भारतीय नागरिक म्हणून प्रयत्न करूया. चला आपल्या भारताला समृद्ध बनवूया.

एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.
जय हिंद ! जय भारत !

-: समाप्त :-

26 जानेवारी भाषण मराठी | प्रजासत्ताक दिन भाषण मराठी – भाषण क्र. 07

दे सलामी या तिरंग्याला…
ज्यामुळे तुझी शान आहे…
हा तिरंगा नेहमी राहू दे उंच…
जोपर्यंत तुझा जीव आहे…

आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग तसेच उपस्थित सर्व देश बांधवांनो; सर्वप्रथम, सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

आज 26 जानेवारी आणि आज आपण इथे सर्वजण प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत. भारत या शब्दातील ‘भा’ म्हणजे तेज आणि ‘रत’ म्हणजे रममान झालेला. तेजात रममान झालेला देश म्हणजे ‘भारत’ होय.

प्रजासत्ताक दिन हा आपला राष्ट्रीय सण होय. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. परंतु स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. आपले स्वतःचे संविधान तयार करण्यासाठी 28 ऑगस्ट 1947 रोजी एक समिती नेमण्यात आली. आणि या समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नेमण्यात आले.

26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान, संविधान समितीने स्वीकारले. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान अमलात आले. म्हणून 26 जानेवारीला ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला जातो. या दिनालाच ‘गणराज्य दिन’ असेही म्हटले जाते. आपला भारत देश हे एक मोठे लोकशाही राज्य आहे. म्हणजे हे लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य आहे.

हा अधिकार भारताच्या घटनेनुसार या दिवशी मिळाला आणि या दिवसापासून प्रजेची सत्ता सुरू झाली. संपूर्ण देशभर आज आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. पण मित्रांनो असे उत्साहाने आजचा सण साजरा केला म्हणजे आपले कर्तव्य संपले का? तर मुळीच नाही. आपल्या भारत देशाचे नागरिक म्हणून आपण देशाच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजे.

“वंदन करतो त्या वीरांना…
जे देशासाठी झाले शहीद, अमर…
देशभक्तीच्या या रंगात…
रंगले आज सारे चराचर…”

एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.
जय हिंद! जय महाराष्ट्र! जय भारत!!

-: समाप्त :-

26 जानेवारी भाषण मराठी लहान मुलांसाठी

सारांश | 26 January Speech in Marathi | प्रजासत्ताक दिनाचे भाषण

मित्रांनो वरील लेखात आपण 26 जानेवारी म्हणजेच ‘प्रजासत्ताक दिन’ भाषण बघितली. हे भाषण अगदी छोटे आहे. तसेच सोपे आणि सुंदर भाषेत लिहिली आहे. आपल्याला ही भाषण लवकर पाठ व्हावी या हेतूने सोपे करून लिहिली आहेत.

हे भाषण आपल्या शाळेत द्या आणि श्रोत्यांकडून शाबासकीची थाप मिळवून घ्या. आम्हला आशा नाही तर खात्री आहे की आपल्याला वरील 26 जानेवारी निमित्त भाषण नक्की आवडतील. हे भाषण आपल्या गरजू विद्यार्थ्यांना मित्रांना नक्की शेअर करा. आपले मत आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. आमच्या ordar.in या मराठी ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

  1. २६ जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतो?

    26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारत देशाने राज्यघटना लागू केली. तेव्हापासून आपला भारत देश सर्वबौम, गणाराज्य, लोकशाही राष्ट्र बनले. तेव्हापासून आपण दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करतो.

  2. 26 जानेवारी 2023 कितवा प्रजासत्ताक दिन आहे?

    26 जानेवारी 2023 हा 74 वा प्रजासत्ताक दिन आहे.

4 thoughts on “26 जानेवारी भाषण मराठी 2023 (07 सर्वोत्तम नमुने )| 26 January Speech in Marathi 2023 | प्रजासत्ताक दिन भाषण मराठी 2023”

  1. Very useful
    All the speeches are excellent but
    Specially I love 3rd speech 😊
    I hope you will share your thoughts on other topics also
    Soon 19 February is coming
    So I request you to share something really beautiful

Leave a Comment