स्वातंत्र्यवीर सावरकर भाषण मराठी (4+ अतिशय सुंदर भाषणे)| Swatantra Veer Savarkar Speech in Marathi 2023 | वीर सावरकर भाषण


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

Swatantra Veer Savarkar Speech in Marathi 2023| स्वातंत्र्यवीर सावरकर भाषण मराठी – नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर 04 अतिशय सुंदर आणि धडाकेबाज भाषणे बघणार आहोत. मित्रांनो या थोर क्रांतिकारकाची 26 फेब्रुवारी रोजी पुण्यतिथी आहे. त्यामुळे आपल्याला शाळेत, महाविद्यालयात किंवा आपल्या कार्यालयात वीर सावरकर यांच्यावर भाषण द्यायचे असेल.

मित्रांनो ही भाषणे अगदी सोपी आणि सुंदर आहेत. आपण ही भाषणे लिहून ही घेऊ शकता. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचाविषयी ची भाषण आपल्याला नक्की आवडतील. चला तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता भाषणाला सुरूवात करूया.

स्वातंत्र्यवीर सावरकर भाषण मराठी 10 ओळी – भाषण क्र. 01

  1. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे संपूर्ण नाव विनायक दामोदर सावरकर असे होते.
  2. त्यांचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी झाला.
  3. लहानपणापासूनच ते ब्रिटिश सरकारचे वाढते अत्याचार पहात होते.
  4. चाफेकर बंधूंना इंग्रजांकडून फासावर चढवल्या गेल्यावर सावकारांना खूप दुःख झाले.
  5. अवघ्या पंधराव्या वर्षी सावरकरांनी अशी शपथ घेतली की “इंग्रजांना मारता मारता मरेन पण लढेन.”
  6. पुण्यात त्यांनी “अभिनव भारत” नावाची जहाल क्रांतिकारी संघटना स्थापन केली.
  7. इंग्रज सरकारने त्यांना देशद्रोही ठरवले व त्यांना कैद केले.
  8. सावरकरांनी जहाजातून जीवाची पर्वा न करता समुद्रात उडी घेतली. मात्र दुर्दैवाने ते पुन्हा पकडले गेले.
  9. त्यांना अंदमानच्या तुरुंगात काळ्यापाण्याची शिक्षा सुनावण्यात आली.
  10. सागरा प्राण तळमळला हे त्यांचे गीत सर्वांना राष्ट्रभक्तीची शिकवण सदोदित देत राहील.

स्वातंत्र्यवीर सावरकर भाषण मराठी | Swatantra Veer Savarkar Speech in Marathi – भाषण क्र. 02

आदरणीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर व माझ्या बांधवांनो स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी लढवय्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी मी जे काही दोन शब्द सांगणार आहे ते आपण शांत चित्ताने ऐकावे ही विनंती.

“ने मजसी ने परत मातृभूमीला,
सागरा प्राण तळमळला,
तळमळला सागरा”

या आर्त शब्दात जलदिस विनवणी करणारे विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिक जवळील भगूर या गावात झाला. त्यांना लहानपणापासूनच अभ्यासाची, वाचनाची गोडी होती. त्या काळात भारत ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीखाली भरडला जात होता. सावरकर हे सर्व जवळून पाहत होते.

लहान वयातच देशभक्तीची ज्योत त्यांच्या हृदयात पेटली होती. “मारता मारता मरेन पण इंग्रजा विरुद्ध लढेन” अशी प्रतिज्ञाच त्यांनी लहानपणापासून घेतली होती.

त्यांचे उच्च शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय येथे झाले. शिक्षण घेत असतानाच त्यांनी परदेशी मालावर बहिष्कार घालून परदेशी कपड्यांची होळी केली होती. त्यांनी पुण्यात अभिनव भारत नावाची क्रांतिकारी संस्था स्थापन केली. पुढे बॅरिस्टर होण्यासाठी ते इंग्लंडला गेले.

तिथे त्यांनी “फ्री इंडिया सोसायटी” नावाची संघटना स्थापन केली. इंग्रज सरकारचा त्यांच्यावर रोष वाढला होता. लंडनमध्ये त्यांना अटक झाली आणि त्यांना बोटीतून भारतात परत पाठवले जात होते. कैद होणे सावरकरांना आवडले नाही. त्यांनी इंग्रजांच्या तावडीतून सुटण्यासाठी भर समुद्रात उडी मारली. पोहत पोहत ते मार्सेलिस बंदरावर पोहोचले. पण दुर्दैवाने त्यांना परत पकडण्यात इंग्रज यशस्वी झाले.

ब्रिटिश सरकारने त्यांना दोन जन्मठेपेची शिक्षा सुनावली व त्यांची रवानगी अंदमानच्या तुरुंगात केली गेली. तिथे सावरकर अक्षरशः नरक याताना भोगत होते. आता पुन्हा माय भूमीचे दर्शन होईल की नाही या विचाराने त्यांचा जीव तीळ तीळ होत असे. मात्र याही परिस्थितीत त्यांनी अंदमानच्या तुरुंगात अनेक काव्य लिहिली. ‘काळे पाणी’ नावाचे पुस्तक लिहिले. अखेर काही वर्षानंतर ते भारतात परतले.

सावरकर जहाल मतवादी होते. त्यांनी आपले देशसेवेचे कार्य सुरूच ठेवले. तुरुंगात त्यांचा झालेला छळ आणि देशासाठी घेतलेले अथक कष्ट यामुळे त्यांची प्रकृती खालावली. अखेर 26 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली देशासाठी प्राणपणास लावून ते अजरामर झाले. अशा या भारत मातेच्या महान सुपुत्रास त्रिवार वंदन !!

स्वातंत्र्यवीर सावरकर भाषण मराठी | Swatantra Veer Savarkar Bhashan in Marathi – भाषण क्र. 03

भारताच्या स्वातंत्र्य युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारे विनायक दामोदर सावरकर यांनाच स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणूनही ओळखले जाते. विनायक दामोदर सावरकर या क्रांतिकारी देशभक्त अत्यंत प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्त्वाचे नाव भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. आज मी तुम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल दोन शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म 28 मे 1883 साली नाशिक जवळील भगूर या गावात झाला. त्यांचे वास्तविक नाव “विनायक दामोदर सावरकर” होते. त्यांच्या वडिलांचे नाव दामोदर सावरकर तर आईचे नाव राधाबाई होते. सावरकरांना दोन भाऊ व एक बहीण होती. नऊ वर्षाच्या कमी वयात त्यांच्या आईचे निधन झाले. सात वर्षानंतर प्लेगच्या महामारीत त्यांचे वडीलही वारले.

वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे मोठे भाऊ गणेश यांनी कुटुंबाचे पालन पोषण केले. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी 1898 साली त्यांनी मातृभूमीला पारतंत्र्यापासून मुक्त करण्यासाठी देवीपुढे सशस्त्र क्रांतीची शपथ घेतली. “जयोस्तुते” हे स्वातंत्र्य देवीचे स्त्रोत्र त्यांनी वयाच्या 20 व्या वर्षी लिहिले. 1857 च्या स्वतंत्र्य समराचा इतिहास त्यांनी गुप्तपणे छापून भारतात सर्वत्र पाठवला. त्यांची अनेक भाषांत भाषांतरे होऊन त्यापासून देशभक्त क्रांतिकारकांनी प्रेरणा घेतली.

मोरया या नावेवर पोलिसांच्या पहाऱ्यात ते भारतात येत होते. जेव्हा नाव फ्रान्स च्या मार्शलिस बंदरात थांबली. तेव्हा 08 जुलै 1910 च्या सकाळी सौचास जायचे आहे असे सांगून सावरकर शौचालयात गेले. आणि त्यानंतर शौचालयातील सौच कुप द्वारे ते पोर्ट हॉलमध्ये पोहोचले व तेथून समुद्रात उडी मारून त्यांनी समुद्र मार्गाने फ्रेंच हद्द गाठली. किती हा धाडसी पणा!!

भारतात आल्यावर ब्रिटिशांनी त्यांच्यावर खटला चालवला व स्वातंत्र्यवीर सावरकरांना दोन जन्मठेपेच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या. त्यांना 04 जुलै 1911 रोजी अंदमान बेटावरील सेल्युलर जेलमध्ये आनण्यात आले. येथील कैद्यांवर ब्रिटिश खूप अत्याचार करायचे. कैद्यांना नरक यातना द्यायचे.

1921 मध्ये सावरकरांना अंदमानातून रत्नागिरीच्या तुरुंगात आणण्यात आले. तेथे त्यांनी “हिंदुत्व” आणि “माझी जन्मठेप” हे ग्रंथ लिहिले. जवळपास दहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा व दोन वर्षे रत्नागिरी तुरुंगातील शिक्षा भोगल्यानंतर 1924 मध्ये त्यांना अनेक अटींवर मुक्त करण्यात आले.

तुरुंगातून मुक्त झाल्यानंतर ही त्यांनी देश सेवेचे कार्य सुरूच ठेवले. ते हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले. भारत पाकिस्तान विभाजनाला सावरकरांचा प्रखर विरोध होता. गांधीजींच्या या निर्णयाने असहमत असलेल्या हिंदू महासभेचा एक तरुण नथुराम गोडसे यांनी 1948 मध्ये गोळी मारून गांधीजींची हत्या केली.

गांधी हत्या प्रकरणात भारत सरकारने सावरकरांनाही अटक केली. परंतु त्यांच्याविरुद्ध पुरावे न मिळाल्याने भारत सरकारने त्यांना निर्दोष घोषित केले. आपले धाडस व साहित्याच्या बळावर समाजात प्रबोधन घडवणाऱ्या या महापुरुषाने अन्नत्याग करून 26 फेब्रुवारी 1966 ला 83 वर्षाच्या वयात देहत्याग करून मृत्यूला कवटाळले. भारताच्या या महान आत्म्यास माझे कोटी कोटी प्रणाम.

एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.
जय हिंद! जय महाराष्ट्र! जय भारत.!

स्वातंत्र्यवीर सावरकर भाषण मराठी | Swatantra Veer Savarkar Speech in Marathi – भाषण क्र. 04

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, वंदनीय गुरुजन वर्ग, उपस्थित मान्यवर आणि माझ्या बाल मित्रांनो, आज मी आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते आपण शांत चित्ताने ऐकावे ही विनंती.

भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास म्हणजे एक रक्तरंजित क्रांती, जिवंतपणे मरण यातना, अतोनात छळ, प्रचंड जुलून आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे भारत मातेसाठी हसत हसत मरणाची तयारी, मग ती फाशी असो, वा छाताडात गोळी घुसून आलेले मरण! कारण प्रत्येकाचे एकच ध्येय आणि ते म्हणजे ‘स्वातंत्र्य’! भारत मातेसाठी आयुष्यभर झटणारा असाच एक महान क्रांतिकारक म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर !

सशस्त्र क्रांतीची बीजे पेरणारा क्रांतिकारक ! क्रांतिकारकांची खान निर्माण करणारा क्रांतिकारक ! “ये मृत्यू! येतोस तर ये! कोण भीतोय तुला!” असे सरळ सरळ मृत्यूलाच आव्हान देणारा क्रांतिकारक! परदेशात राहून भारत मातेसाठी बॉम्ब बनवत असतानाही मातृभूमीची आठवण झाल्यावर – “ने मजसी ने परत” मातृभूमीला सागरा प्राण तळमळला! सागरा प्राण तळमळला! अशी सागरालाच साथ घालणारा क्रांतिकारक !

स्वातंत्र्यवीर सावरकर लहानपणापासूनच हुशार होते. जसे अभ्यासात हुशार, तसेच भाषणातही ! नेतृत्व गुण तर त्यांच्यात बालपणापासूनच दिसत होता. सावरकरांचे पुर्ण नाव विनायक दामोदर सावरकर असे होते. या विनायकाचे आदर्श होते, छत्रपती शिवराय! महाराजा राणा प्रताप! इटलीचा महान क्रांतिकारक मॅझिनी आणि रँड नावाच्या जुलमी इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडून त्याला ठार मारणारे चाफेकर बंधू!

रँड चा खून झाला त्यावेळी विनायचे वय होते फक्त 14 वर्षे ह्या गोष्टीचा लहानशा विनायक वर फार मोठा परिणाम झाला. चाफेकर बंधून प्रमाणेच आपणही काहीतरी भव्य दिव्य केलेच पाहिजे. असे विनायकला वाटू लागले. चाफेकर बंधूंना फाशीची शिक्षा झाली. पण झोप मात्र सावरकरांची उडाली. रात्री उठून विनायक देवीसमोर जाऊन बसला. डोळे रागाने बेभान झाले होते. डोळ्यातून अश्रू ही वाहत होते. इंग्रजांची चीड आल्यामुळे रक्त सळसळत होते. त्याच आवेषात विनायक ने अष्टभुजा भवानी समोर प्रतिज्ञा केली.

माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी शस्त्र युद्धात शत्रूस मारीत चाफेकरांसारखा मरेन किंवा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा विजय होऊन मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा अभिषेक करीन.

मॅट्रिक पर्यंत नाशिक, तर बीए पुण्यात झाल्यानंतर ते इंग्लंडला गेले. ते फक्त बॅरिस्टर होण्यासाठी नाही तर उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला आलेल्या हिंदुस्तानी तरुणांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत फुलविण्यासाठी. शस्त्र हाताळण्यासाठी, बॉम्ब बनविण्याची कला शिकून घेण्यासाठी.

त्यासाठी त्यांनी तेथे “फ्री इंडिया सोसायटीची” स्थापना केली. दर आठवड्याला इंडिया हाऊसवर सोसायटीची सभा व्हायची. सभेतील सावरकरांच्या जोशपूर्ण भाषणाने हिंदुस्तानी तरुण अक्षरशः पेटवून उठायचे. त्यामुळे हळूहळू इंडिया हाऊस म्हणजे क्रांतिकारकांची खाण तयार झाली. क्रांतिकारकांची तालीम तयार झाली. आणि याच तालमीतून मदनलाल धिंग्रा, सेनापती बापट, निरंजन अय्यर सारखे अनेक महान शूर क्रांतीकारक तयार झाले. एवढेच नाही तर ते चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अनंत कान्हेरे असे कितीतरी रत्नांचे सावरकर प्रेरणास्थान होते. सर्वच क्रांतिकारकांचे ते गुरु होते. दैवत होते.

स्वातंत्र्य लक्ष्मी की जय! वंदे मातरम! अशा या घोषणा देत देत क्रांतिकारकांनी हातात बंदुका घेतल्या. अनंत कान्हेरे नावाच्या कोवळ्या मुलाने नाशिकच्या जुलमी कलेक्टर जॅक्सनचा खून केला. महाराष्ट्र, बंगाल, गुजरात, बिहार आणि पंजाब असे वेगवेगळे कट शिजू लागले. बॉम्बस्फोटाची तर मालिका सुरू झाली.

त्यामुळे भारतावरच नव्हे, तर जगावर राज्य करणारी इंग्रज सत्ता पार हादरून गेली आणि मग त्यांच्या डोक्यात एकच प्रश्न पडला. भारतात पिस्तुले कुठून आली? बॉम्ब कसे तयार होऊ लागले? भारतात साहित्य कुठून आले? याचा मुख्य सूत्रधार कोण? शोध सुरू झाला आणि इंग्रज अधिकाऱ्यांचा फास सावरकरांभोवती आवळला गेला. त्यांना अटक झाली. आणि शिक्षा कोणती? तर काळ्यापाण्याची! तेही दोन वेळा! पन्नास वर्षे तुरुंगवास! ही शिक्षा ऐकून सावरकर गरजले! “पन्नास वर्षे या देशावर इंग्रजांच्या राज्य तरी टिकणार आहे काय?” सावरकरांना अंदमानच्या तुरुंगात डांबण्यात आले. तेथे त्यांचा अतोनात छळ केला.

जनावरेही खाणार नाहीत असे अन्न त्यांना दिले. त्यात साप, गोम, त्यांचे तुकडेही असायचे. भाकर तीही एक तर कच्ची किंवा जाळलेली आणि तीही पोटभर नाहीच. पण काम बैलाऐवजी सावकारांना घाण्याला जुंपले. एवढा छळ करण्याचे कारण एकच या वाघाला तर या तुरुंगातच हाल हाल करून मारायचे. पण सावकार त्यांना पुरून उरले.

14 वर्षानंतर त्यांची तुरुंगातून सुटका झाली. आजारी पडला काय! किंवा चकला काय! शेवटी वाघ तो वाघच! तुरुंगातून सुटल्यानंतर या वाघाने पुन्हा डरकाळी फोडली. पण आता मात्र ब्रिटिश सावरकरांना अटक करू शकले नाहीत. कारण सावरकरांच्या डरकाळी ने इंग्रज सत्ता डळमळीत झाली. क्रांतीचा विजय झाला. आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी आपली भारत माता स्वतंत्र झाली.

भारत मातेसाठी मरण तळहातावर घेऊन लढणाऱ्या महान सुपुत्राला, क्रांतिकारकांच्या दैवताला, युगपुरुषाला स्वातंत्र्यवीर सावरकरांना माझे कोटी कोटी प्रणाम!

जय हिंद! जय महाराष्ट्र! जय भारत!

सारांश | स्वातंत्र्यवीर सावरकर भाषण मराठी

Swatantra Veer Savarkar Speech in Marathi 2023| स्वातंत्र्य वीर सावरकर भाषण मराठी – मित्रांनो, वरील स्वातंत्र्यवीर सावरकर भाषण मराठी आपल्याला नक्कीच आवडली असतील अशी आम्हला खात्री आहे. वरील लेखात आपण वीर सावरकर यांच्यावर 04 अप्रतिम भाषणे पहिली. याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल.

मित्रांनो, जर आपल्याला आमचा हा छोटासा प्रयत्न आवडला असेल. तर हा लेख आपल्या गरजू विद्यार्थ्यांना, मित्रांना नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

Swatantra Veer Savarkar Speech in Marathi 2023| स्वातंत्र्यवीर सावरकर भाषण मराठी | Swatantra Veer Savarkar Bhashan in Marathi | स्वातंत्र्यवीर सावरकर भाषण Swatantra Veer Savarkar Speech in Marathi 2023| स्वातंत्र्यवीर सावरकर भाषण मराठी | Swatantra Veer Savarkar Bhashan in Marathi | स्वातंत्र्यवीर सावरकर भाषण Swatantra Veer Savarkar Speech in Marathi 2023| स्वातंत्र्यवीर सावरकर भाषण मराठी | Swatantra Veer Savarkar Bhashan in Marathi | स्वातंत्र्यवीर सावरकर भाषण

Leave a Comment