शिवाजी महाराज कविता मराठी 2024 (07+ अतिशय सुंदर कविता) | Shivaji Maharaj Kavita in Marathi | Shivaji Maharaj Poem in Marathi


Deprecated: Function wp_get_loading_attr_default is deprecated since version 6.3.0! Use wp_get_loading_optimization_attributes() instead. in /home/u541674152/domains/ordar.in/public_html/wp-includes/functions.php on line 6078

शिवाजी महाराज कविता मराठी 2024 | Shivaji Maharaj Kavita in Marathi – नमस्कार मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जवळ आली आहे. आज आपण या लेखात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर 7+ अतिशय सुंदर कविता बघणार आहोत. या कविता आपण शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त भाषण देताना वापरू शकता आणि श्रोत्यांची मने जिंकू शकता.

चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता कवितांना सुरुवात करुया.

शिवाजी महाराज कविता क्र. 01 | Shivaji Maharaj Kavita in Marathi

धगधगत्या ज्वालातून
पेटल्या मशाली
स्वराज्याच्या संकल्पनेची
नवी पहाट झाली

दरी दरीतून
नाद गुंजला
महाराष्ट्रात भगवा
सूर्य उगवला

सह्याद्रीच्या कुशीतून
एक हिरा चमकला
भगवा टिळा चंदनाचा
शिवनेरीवर प्रगटला
हातात घेऊन तलवार
शत्रू वर गरजला

नाही कुणापुढे झुकला
नाही कुणापुढे वाकला
नाही भीत कुणाला
वाघ म्हणतात या मर्दाला
असा मर्द मराठा
राजा शिवराय एकला

जय भवानी जय शिवाजी

शिवाजी महाराज कविता क्र. 02 | Shivaji Maharaj Poem in Marathi

सत्याची ढाल होती
निष्ठेची तलवार
वीरतेचा भाला होता
हर हर महादेव नारा होता

सह्याद्रीची साथ होती
जिजाऊंचा आशीर्वाद
मरणाची भीती नव्हती
स्वराज्य हाच ध्यास

तोफांचा आवाज होता
घोड्यांच्या टापांचा नाद
कडेकपारित फिरत होता
मर्द मराठ्यांचा वाघ

योवनांच्या छातीत धडकी होती
आमच्या छातीत राम
पळता भुई कमी पडली
ज्यांच्या भीतीने
राजे शिवछत्रपती त्यांचे नाव

जय जिजाऊ ! जय शिवराय !!

शिवाजी महाराज कविता मराठी क्र. 03 | Shivaji Maharaj Kavita in Marathi

काय लिहू ते कळेना
मनाची हळहळ काही केल्या जाईना
आठवावे रूप तुझे देवा क्षणोक्षणी
लढतानाही बळ असावे तुझ्यासारखे कनोकणी

या कलियुगी गुलामगिरीच्या बंधातूनी
आम्हा मुक्त करूनी
सोडला श्वास तू जगदंब म्हणूनी
निर्भय होऊनी
जगण्यास आम्हा सांगुनी
सोडला श्वास तू जगदंब म्हणूनी
सोडला श्वास तू जगदंब म्हणूनी

मुघलांशी दोन हात करुनी
थांबवला तुझ्या जीवनाचा प्रवास तू
सुराज्य स्वराज्य आम्हा देऊनी
का केलास पोरका आम्हा तू
का आलीस तारीख ती
जिथे सोडूनी आम्हा गेलास तू

सह्याद्रीच्या कडा झुंकला
स्वराज्याचा सूर्य मावळला
काळाआड तू सोडूनी आम्हा गेला
सोडला श्वास तू जगदंब म्हणूनी
सोडला श्वास तू जगदंब म्हणूनी

घेऊनी जन्म तू
आम्हा गरिबांचा वाली झाला
धन्य आई ती
जिच्या पोटी तू जन्मला
भले सोडूनी गेला तू
त्या काळात आम्हा
तरी देई वचन हा मावळा तुला
करी रक्षण त्या स्वराज्याचे
जे देऊनी तू आम्हा गेला

ऐसा राजा युगे युगे पुन्हा होवे नाही
कोटी कोटी प्रणाम त्या राजास
ज्यांच्या असण्याने
अन्यायाच्या अंधकारातुनी वाट
न्यायाच्या गुजरात गेली
निराशेतून गेली
कोटी कोटी प्रणाम त्या राजास
ज्यांनी दुष्टाची होळी केली
पराक्रमाची ज्योत पेटवली
सोडला श्वास तू जगदंब म्हणुनी
सोडला श्वास तू जगदंब म्हणुनी

ऐसा राजा पुन्हा होणे युगे युगे शक्य नाही
हे देवा नमन तुला माझे कर स्वीकारतो
जरी गेलास सोडून आम्हा तू
आमच्या राहशीला मनामनात तू

जय जिजाऊ जय शिवराय

शिवाजी महाराज कविता मराठी क्र. 04 | Shivaji Maharaj Poem in Marathi

आई जिजाऊंच्या पोटी जन्मला
एक महापराक्रमी तारा
नाव शिवाजी
अवघ्या महाराष्ट्राला होता तो प्यारा

तोरणा जिंकून महाराष्ट्राचा
पाया त्यांनी रोवला
आज लाज वाटते मला
त्यांचाच भगवा आजच्या मावळ्यांनी
दारूच्या दुकानावर नेऊन मांडला

होता धिप्पाड असा अफजल खान
त्याच्या पोटातल्या आतड्या बाहेर काढणारा
तेवढा एकच जन्मला वाघ

स्वराज्यावर केली वाकडी नजर
त्याची बोटे उडवली चार
शत्रूस केले ठार
हातात घेऊनी भवानी तलवार
झेंडा फडकवला भगवा
इतिहासाला जोडले सोनेरी पान

आज लाज वाटते मला
कारण त्यांचाच भगवा
आजच्या मावळ्यांनी
दारूच्या दुकानावर
नेऊन रोवला

आम्ही विसरून गेलो
तेव्हा मावळ्यांच्या हृदयात
महाराज बसलेले होते
हृदय फाडले तरी
शिवछत्रपती दिसत होते

विसरलो सगळं आम्ही
फक्त 19 फेब्रुवारी आणि 12 मार्च लक्षात असते
झेंडा बांधून गाडीला दारूच्या नशेत
जय जिजाऊ जय शिवराय म्हणत असते

इतिहासाच्या पानात
मातीच्या कणात
रयतेच्या मनात
सगळ्यांनी तो इतिहास
वाचलेला असतो

राज्याचे ते एकच जाहले छत्रपती
जनतेचे ते होते जीव की प्राण
साऱ्या मावळ्यांची होती ती शान

त्यांनी दाखवलेला मार्ग विसरलो आम्ही
जातीतच भेदभाव करतो
आता भगवा कधी हिरवा,
कधी निळा, कधी पिवळा झेंडा
घेऊन फिरत असतो

महाराष्ट्रात तर त्याचा आहे ज्यांनी
आपल्यासाठी गमावला
स्वतःचा प्राण
पण विसरलो आम्ही त्या मावळ्यांना
अशी अवस्था आहे आज

अरे शिवबा म्हणजे महाराष्ट्राचा श्वास
शिवबा म्हणजे आपला ध्यास
उडल्या चिंध्या उडली माती
रक्तात त्यांच्या महाराष्ट्राची ज्योती

शिवरायांचे नाव जरी घेतले
तरी फितुरांवर तुटून पडत होती मावळी
अशी होती माझ्या राजाची कीर्ती
त्यांच्या नावाला सुद्धा फीतुर घाबरत होती

अरे 33 कोटी देवांपेक्षा
उपकार त्यांचे या महाराष्ट्रावर आहे
थोडे विचार बाळगा त्यांचे
एवढेच सांगायचे आहे

थोर उपकार जिजाऊंचे
संभाजीना धर्मवीर करून गेले
राज्याचे राजे
शिवछत्रपती या मातीला
सोनं करून गेले

मावळ्यांच्या रक्ताने
वादळ भगव पेटून गेले
लाज वाटते आम्हाला
त्यांचे विचार आम्ही
फेकून दिले
लाज वाटते आम्हाला
त्यांचे विचार आम्ही
फेकून दिले

घेऊन तुमचा भगवा
दुकानावर टांगून गेले !
घेऊन तुमचा भगवा
दुकानावर टांगून गेले !!

शिवाजी महाराज कविता मराठी क्र. 05 | Shivaji Maharaj Kavita in Marathi

नकोय शिवराय आम्हा नोटेवर
विकला जाईल तो वाटेवर
आहेत समाजात काही दरिंदे
नाहीत ते कुठलेच परिंदे

घेऊन जातील शिवराय
दारूच्या अड्ड्यावर
लावतील त्यालाही सट्ट्यावर
म्हणतील शिवराय घ्या
अन दारू द्या

होतील ते पिऊन तराट
माजवतील कल्लोळ घरात

नाचणारींवर जाईल
पैसा उधळला
नाचता नाचता तोही
जाईल तुडवला

झोपला आहे भ्रष्टाचार
नाही उरलेला शिष्टाचार

भाटाच्या ताटी जाईल थोपवला
गणिकांच्या हाती
जाईल शिवराय सोपवला

खाटीकाच्या दुकानात
जातील घेऊन त्याला
मंदिरात येतील
देवासमोर ठेवून त्याला

नाही विकनाऱ्यांमधला तो
नाही मांडायचा
आम्हाला त्याचा शो

फाटून जाईल
हृदय आमचं
नाही ऐकणार
आम्ही तुमचं

राहू द्या तुमचा
गांधीचा नोटेवर
शिवराय आमचे
शोभतात हृदयाच्या
सिंहासनावर

जय शिवराय! जय महाराष्ट्र!!

शिवाजी महाराज कविता मराठी क्र. 06 | Shivaji Maharaj Poem in Marathi

जिजाऊ पोटी जन्मला
असा एकच सिंह, स्वराज्यासाठी
ज्याने झिजवला आपुला देह

शत्रुवरती करी हा असा घनाघात
एकाच हल्ल्यात
धाढी त्यास यमसदनात

भवानी मातेचा होता
त्याच्या डोक्यावर हात
महाराष्ट्रातील जनतेच्या हे आहे
अन राहील हृदयात

स्वराज्यासाठी लढतांना
ज्यांनी लावली जीवाची बाजी
धन्य जाहलो मी ते आहे
आमचे राजे छत्रपती शिवाजी

जय जिजाऊ! जय शिवराय !!

छत्रपती शिवाजी महाराज कविता मराठी क्र. 07 | Chhatrapati Shivaji Maharaj Kavita Marathi

जिजाऊ पोटी जन्माला बाळ
यवनांचा तो झाला काळ
मराठी मातीशी त्याची घट्ट नाळ
सह्याद्रीचा जो विजय माळ

पुसला जाने गुलामगिरी चा कलंक
सावलीत विसावली ज्याच्या धनी आणि रंक
गरुडा समान उदात्त पंख
आव्हान देणारा जो निडर शंख

हरले जाने आया बहिणींचे दुःख ताप
चालेना ज्याच्या सामोरे दिल्लीची टाप
चेचला जाणे अफजल्या साप
तो शिवबा, आम्हा मावळ्यांचा मायबाप
तो शिवबा, आम्हा मावळ्यांचा मायबाप

जय जिजाऊ ! जय शिवराय!! जय महाराष्ट्र !!!

सारांश | शिवाजी महाराज कविता मराठी | Shivaji Maharaj Poem in Marathi

मित्रांनो वरील लेखात आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर 07 अतिशय सुंदर कविता बघितल्या. शिवजयंती निमित्त कविता आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. आम्हला खात्री आहे की आपल्याला शिवाजी महाराज कविता मराठी नक्की आवडल्या असतील.

आमचा हा छोटासा प्रयत्न आपल्याला कसा वाटला आम्हाला Comment द्वारे नक्की कळवा. या कविता आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. आमच्या ordar.in या मराठी शैक्षणिक ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

शिवाजी महाराज कविता मराठी 2023 | Shivaji Maharaj Kavita in Marathi | Shivaji Maharaj Poem in Marathi

Leave a Comment